श्री दत्त महाराज - काकड आरती ( ध्यानमंत्र गुरुवंदना पादुका वंदन )
॥श्री गुरुवंदना ॥
गुरूर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः।। गुरू: साक्षात्परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ।।
॥ श्री दत्त महाराज ध्यानमंत्र॥
ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तीम
द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् ।।
एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षीभूतम् ।
भावातीत त्रिगुणरहितं सद्गुरू तं नमामि ।।
काषाय वस्त्रं करदंडधारिणं । कमंडलु पद्मकरण शंखम् ।।
चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं । श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ।।
॥श्री दत्त महाराज ध्यान ॥
धृत्वा कमंडलुं करे दरटंकमालिकां ।। कौपीन मौंजी भुज शास्त्र मूखत्रिकेशवं ।।
नित्यं ही वास अवदुंबरछायी श्रीहरे ।। दत्तात्रेया शरणं मां भवपारकारक ।।
* श्री दत्त गुरूचे बसलेले ध्यान *
चिंतू दत्तात्रेया, अनसूया तनया । श्रुतिगण गेया ध्येया वंद्या ।।१।।
वराभयकर सिद्धास नावर बसे निरंतर सूर
वर्य ।।२।।
जो खेचरी मुद्रा लावी सोडी तंद्रा । सदा योगनिद्रा मुद्रायुक्त ।।३।।
प्रफुल्ल लोचन,सुहास्य वदन । दयेचे सदन,मनमोहन ।।४।।
स्मरता जो भक्ता, भेटे वासुदेव । स्वचित्ती सदैव भावे चिंती ।।५।।
* श्री दत्त गुरूचे उभे ध्यान *
तीन शिरे सहा हात । तया माझा दंडवत ।।१।।
काखे झोळी पुढे श्वान । नित्य जान्हवीचे स्नान ।।२।।
शंख चक्र गदा हाती । पायी खडावा वाजती ।।३।।
माथा शोभे जटाभार । अंगी विभुती सुंदर ।।४।।
तुका म्हणे दिगंबर । तया माझा नमस्कार ।।५।।
॥श्री दत्त महाराज पादुका वंदन ॥
ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळीं है निजरूप तुझें
मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणीं । तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही ।।१।।
॥श्री दत्त महाराज प्रार्थना॥
घालीन लोटांगण, वंदीन चरण, डोळ्यांनी पाहीन रूप तुझें । प्रेमें आलिंगीन, आनंदें
पूजिन, भावें ओवाळीन म्हणे नामा ॥१।। त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च
सखा त्वमेव । त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देवदेव ।।२।।
कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् । करोमी यघत्सकलं परस्मै, नारायणा येती
समर्पयामी ।।३।।
अच्युतं केशवं रामनारायणं, कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम् । श्रीधर
माधवं गोपिकावल्लभ, जानकीनायक रामचंद्र भजे ।।४।।
हरे राम हरे राम राम राम हरे हरे । हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।
हरे दत्त हरे दत्त दत्त दत्त हरे हरे ।
॥ करावी कृपा गुरुनाथा ॥
भवतारक या तुझ्या पादुका वंदीन मी माथां । करावी कृपा गुरुनाथा ।।धृ.।।
बहु अनिवार हे मन माझे चरणी स्थिर व्हावें । तव भजनीं लागावें ।।
कामक्रोधादिक हे षड्रिपू समूळ छेदावे । हेचि मागणे मला द्यावें ।।
अघहरणा करिं करुणा दत्ता धांव पाव आतां । करावी कृपा गुरुनाथा ।।१।।
तूचि ब्रह्मा तूचि विष्णु तूंचि उमाकांत । तूचि समग्र दैवत ।
माता पिता इष्ट बंधू तूचि गणगोत । तूचि माझें सकळ तीर्थ ।।
तुजविण मी गा काहीच नेणे तूचि कर्ता हर्ता । करावी कृपा गुरुनाथा ।।२।।
तनमनधन हे सर्व अर्पूनी कुरवंडीन काया । उपेक्षू नको गुरुराया ।।
कर्महीन मी, मतिहीन मी, सकल श्रम वाया । लज्जा राखी गुरू सदया ।।
मातृबालकापरी सांभाळी तूचि मुक्तिदाता । करावी कृपा गुरुनाथा ।।३।।
शेषा ब्रह्मया वेदां न कळे महिमा तव थोर । तेथें मी काय पामर ।।
वियोग नसू दे तव चरणांचा हाचि देई वर शिरीं । या ठेवी अभयकर ।।
हीच विनंती दर्शन द्यावे दासा रघुनाथा । करावी कृपा गुरुनाथा ।।४।।
॥श्री दत्त महाराज काकड आरती ॥
श्री गुरूदत्ता काकड आरती ओवाळीन आता। तुजला
ओवाळीन आता । भावे ओवाळीन आता।
निद्रातीत जागृत असता तयेचि उठविता ।।धृ.।।
माया वस्त्रातुनी हे चिंधी सापडली मजला । नरतनु सापडली मजला ।
वाया न जाऊ द्यावी म्हणून काकडा केला ।।१।।
विद्या, अविद्या द्वैत उठता त्रिपुटी उदभवली।
साहाजिक त्रिपुटी उद्भवली । मायिक त्रिपुटी उद्भवली।
सद्वस्तूचे स्मरणही नसता पीळ पडूनी गेली ।।२।।
मोहरूपे स्नेहात बुडवुनी ज्योती लावियली ।
स्वयं ज्योती लावियली । स्वयंज्योती लावियली।
परंज्योती लावियली । पाहुनी सद्गुरू बाबा ।
राम म्हणे निशा सरली ।।३।। श्री गुरूदत्ता...
श्री दत्त महाराज - काकड आरती ( ध्यानमंत्र गुरुवंदना पादुका वंदन )
Tags:
देवांची माहिती