संगणक वर मराठी निबंध Essay On Computer In Marathi

  संगणक वर मराठी निबंध Essay On Computer In Marathi

संगणक - निबंध मराठी एक कल्पवृक्ष हाती तारे लक्ष लक्ष

संगणक - एक कल्पवृक्ष हाती तारे लक्ष लक्ष निबंध मराठी

           आजचे युग हे ' संगणकाचे युग ' आहे हे सर्वांनी मान्य केले आहे . त्यामुळे संगणकाला कोणी शाप मानेल , असे वाटत नाही . पण ज्या वेळी आपल्याला प्रथम संगणकाची ओळख झाली , तेव्हा मात्र लोकांना ' संगणक ' हे मोठे संकट वाटले होते . एक अनेकजण बेकार होतील , अशीच भीती सर्वांना वाटत होती . संगणक अनेकांची कामे करतो . त्यामुळे एखादया कार्यालयात एक संगणक आणला , तर प्रारंभी निर्माण झालेली ही भीती वगळली तर संगणकाच्या विरोधात एकही गोष्ट दाखवता येणार नाही . उलट , संगणकाचे फायदेच फायदे दिसून येत आहेत . 

            संगणकाचा सर्वांत मोठा गुण म्हणजे अत्यंत अचूक आणि प्रचंड वेगात काम करण्याची अफाट क्षमता . या गुणाचा सर्वत्र उपयोग होत आहे . अगदी गुंतागुंतीच्या गणितांपासून ते छपाईपर्यंत सर्व कामे संगणक सहजपणे करू शकतो . त्यामुळे लहान लहान कार्यालयांपासून ते मोठमोठ्या कंपन्यांपर्यंत सगळीकडे संगणकाचा सर्रास उपयोग केला जात आहे . संगणकात हवी तितकी माहिती साठवून ठेवता येते आणि हवी ती माहिती क्षणार्धात मिळवता येते . यामुळे कामाच्या प्रत्येक टप्प्यावर पटापट निर्णय घेता येतात . कामे झटझट होतात . साहजिकच वेगाने प्रगती होते . इंटरनेटमुळे हे विशाल जग अगदी छोटे बनले आहे . 

           जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील कोणत्याही व्यक्तीशी क्षणार्धात संपर्क साधता येतो . याचा सर्व क्षेत्रांत कल्पनातीत फायदा होत आहे . इंटरनेटवरील माहितीच्या महाखजिन्यातून कोणत्याही विषयावरील अत्यंत अद्ययावत माहिती मिळते . माणसे एकमेकाला पत्रे पाठवू शकतात , बोलू शकतात . नैसर्गिक आपत्ती वा गुंतागुंतीचे आजारपण यांसारख्या महत्त्वपूर्ण बाबतीत मदत मागवता येते वा पाठवता येते . त्यामुळे असंख्य लोकांची संकटातून मुक्तता होते . प्राणही वाचवता येतात . घरबसल्या नाटक - सिनेमांची किंवा रेल्वे विमानाची तिकिटे आरक्षित करता येतात . कोणत्याही बँकेत आपले पैसे असले , तरी जगातील कोणत्याही
 
           ' ए . टी . मधून पैसे काढता येतात . सध्याच्या जागतिकीकरणाच्या काळात कोणत्याही क्षेत्रांतील स्पर्धेत जिंकायचे असेल तर संगणक टाळता येणार नाही . तसेच , बेकारीबाबत आपली कल्पनाच चुकीची आहे . आता आपण पाहतो की संगणकामुळे कितीतरी नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत , व्यवसाय वाढले आहेत . पूर्वीच्या नोकऱ्या शिल्लक राहिलेल्या नाहीत . पण त्यांच्या कितीतरी पटीने नवीन नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत . संगणकाबाबत तर आपण जगात पहिला क्रमांक पटकावला आहे . अशा या गुणी संगणकाला शाप कोण म्हणेल ?

 संगणक - निबंध मराठी एक कल्पवृक्ष हाती तारे लक्ष लक्ष 

संगणक - निबंध मराठी एक कल्पवृक्ष हाती तारे लक्ष लक्ष



Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post