खरा तो एकचि धर्म , जगाला प्रेम अर्पावे

खरा तो एकचि धर्म , जगाला प्रेम अर्पावे  

खरा तो एकचि धर्म , जगाला प्रेम अर्पावे  निबंध मराठी


         ! धर्मात ' खरा तो एकचि धर्म । जगाला प्रेम अर्पावे ।। ' हा परमपूज्य साने गुरुजींनी सर्व जगाला दिलेला संदेश आहे . आज जगात आपल्याला काय आढळते ? धर्माधर्मावरून युद्धे पेटतात , संघर्ष भडकतात . स्वधर्माविषयीची नाहक चुकीचा अभिमान हे त्याचे मूळ कारण . नीट अभ्यास केला तर बहुतेक धर्माची मूलतत्त्वे समान असतात , हे सहज लक्षात येईल . पण एवढा मुळापर्यंत जाऊन अभ्यास कोण करणार ? 

         या सर्वांना साने गुरुजी सांगतात की , दुसऱ्यावर प्रेम करणे हाच आपला श्रेष्ठ धर्म आहे . ' अरे'ला ' कारे ? ' करून संघर्ष वाढत जातो . याउलट संतापलेल्या , चुकलेल्या माणसाला आपण प्रेमाने गोंजारले तर तो शांत होतो , विचार करतो आणि कदाचित आपला चुकीचा मार्ग सोडून देतो . सर्वजण प्रेमाने वागू लागले तर जग किती सुंदर होईल ! कोणी कोणाचा द्वेष करणार नाही ; कोणाची हिंसा करणार नाही . 

           जगातील भांडणे , कटकटी , युद्धे नष्ट होतील . प्रत्येकजण दुसऱ्याला मदत करील ; दुसऱ्याचे दुःख दूर करण्यासाठी झटेल . संगळ्यांना एकमेकांचा आधार वाटेल . मानवी जीवनातील सगळा दुःखद , काळा भाग नष्ट होईल . प्रत्येक धर्म हेच आश्वासन देतो ना ! साने गुरुजींनी सर्व धर्माच्या मुळाशी असलेले तत्त्वच या उक्तीतून सांगितले आहे .

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post