शिकलेली आई घराला पुढे नेई निबंध मराठी
उच्च शिक्षणात तर पुरुषांचीच मक्तेदारी होती . या पार्श्वभूमीवर आजचे दृश्य आश्चर्यचकित करणारे आहे . आजच्या स्त्रीने केलेली स्वत : ची प्रगती ही खरोखरच आश्चर्यचकित करणारी आहे . समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले , आगरकर , महर्षी कर्वे यांनी भारतीय स्त्रीला हा आत्मविकासाचा मार्ग दाखवला आणि स्त्री विचार करू लागली . चूल आणि मूल यांपेक्षाही वेगवेगळ्या क्षेत्रांत आपण समर्थपणे , पुरुषाच्या बरोबरीने कार्य करू शकतो , याची जाणीव तिला झाली . आज सर्व प्रकारच्या उच्च शिक्षणामध्ये स्त्रीने स्थान मिळवले आहे .
आता असे एकही क्षेत्र दाखवता येणार नाही की ज्यात स्त्रीचा सहभाग नाही . अमूक अभ्यास स्त्रीला जमणार नाही ; अमूक काम स्त्रीला झेपणार नाही ; अमूक गोष्ट स्त्रीच्या आवाक्याबाहेर आहे , असे पूर्वी मानले जाई . गेल्या काही वर्षांत स्त्रीने या साऱ्या चौकींना धक्के देऊन आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे . आजच्या स्त्रीला कोणतेच क्षेत्र अगम्य राहिलेले नाही . उलट काही काही क्षेत्रे तिने पूर्णपणे काबीज केली आहेत . ती उत्तम राज्यकर्ती बनते . ती वैदयकीय क्षेत्रात , संशोधनाच्या क्षेत्रातही नेत्रदीपक कामगिरी करते . इतकेच नाही ;
तर ती रणरागिणीही बनू शकते . जग एवढे पुढारले आहे , पण हुंड्याच्या बाबतीत आपला देश अधिकाधिक मागासलेला बनत आहे . मुलगी जितकी जास्त शिकेल , तितका जास्त हुंडा देण्याची पाळी येते . याबाबतीत स्त्रियांनी बंडखोरी केल्याशिवाय समाजाचे मतपरिवर्तन होणार नाही . आजच्या स्त्रीची ताकद जबरदस्त वाढली आहे . ती शिक्षण घेते . विविध प्रकारची नोकरी करते . पण अजूनही घराची जबाबदारी मात्र तीच उचलते . शिवाय मुलांचा अभ्यास , त्यांच्या भवितव्याची जडणघडण यांचा भारही स्त्रीने स्वत : वरच घेतला आहे . एवढे सगळे पेलण्याची प्रचंड क्षमता आजच्या स्त्रीने कमावली आहे आणि आपले अनन्यसाधारण स्थान समाजाला दाखवून दिले आहे .
Tags:
मराठी निबंध लेखन