Parts of Speech - In Marathi ( शब्दांच्या जाती )

Parts of speech, शब्दांच्या जाती

Parts of speech, शब्दांच्या जाती - अक्षराला अक्षर जोडून शब्द तयार होतो. जसे र + मे + श या तीन अक्षरांचा मिळून रमेश हा अर्थपूर्ण शब्द तयार झाला. याच प्रकारे अशा शब्दाचे मिळून वाक्य तयार होते. उदा. 'रमेश मुलगा आहे. या वाक्यात तीन शब्द वापरलेले आहेत. 'रमेश', 'मुलगा' व 'आहे'. 

या शब्दांना आपण ज्या नावाने ओळखतो त्याला शब्दांच्या जाती म्हणतात. म्हणजेच 'रमेश' हे नाम आहे. 'मुलगा' हे देखील नाम आहे. 'आहे' हे क्रियापद आहे. नाम . व क्रियापदाप्रमाणेच शब्दांच्या इतर जाती शब्दांच्या जाती
 Parts of speech खालील प्रमाणे आहेत
Parts of Speech | Grammar
 1. Noun - नाम
 2. Adjective -विशेषण
 3. Verb - क्रियापद
 4. Adverb - क्रियाविशेषण
 5. Pronoun - सर्वनाम
 6. Preposition -  शब्दयोगी अव्यय
 7. Conjunction - उभयान्वयी अव्यय
 8. Interjection - उद्गारवाचक अव्यय

वरील पैकी पहिल्या 4 जातींची परीक्षेत आपसात आदलाबदल करावी लागते. या जाती तयार करण्यासाठी काही प्रत्यये काढावी किंवा लावावी लागतात. शब्दांच्या जाती खालील प्रमाणे आहेत 

Noun - नाम 

Noun  नाम - वस्तूंची, पदार्थांची, माणसांची, प्राण्यांची, ठिकाणांची, गुणांची किंवा भावनांची ओळख पटण्यासाठी त्यांना दिलेले नाव म्हणजे नाम होय. उदा. घर, रमेश, वाघ, औरंगाबाद, राग, चांगुलपणा, Ramesh, tiger, water, goodness, anger वाक्यात कर्ता subject, कर्म object व पूरक complement म्हणून नामाचा उपयोग करतात. उदा. Ram is running. 

या वाक्यात Ram हे नाम कर्ता म्हणून आलेले आहे. He is a doctor. या वाक्यात doctor हे नाम पूरक (complement) म्हणून आलेले आहे. He broke नामे ही वस्तुला दिलेली नावे असली तरी बरीच नामे इतर तयार करता येतात. त्यासाठी क्रियापदे व विशेषणांना काही प्रत्यये the egg. या वाक्यात egg हे नाम कर्म म्हणून आलेले आहे. 

शब्दांपासून तयार होतात. क्रियापदापासून व विशेषणांपासून देखील नाम लावावी लागतात. खाली क्रियापदांपासून नामे तयार करणारी प्रत्यय दिलेली आहेत; त्यांचा अभ्यास करा.
क्रियापदापासून नाम तयार करणे
क्रियापद suffix नाम
govern -ment. government- सरकार


Exercise 1 Change the verbs in brackets into noun forms and rewrite the sentences.

1. He gave us an (assure) that it would not happen.
2. The teacher expects (explain) from his students.
3. He made unexpected (announce) of his transfer.
4. Her dance (perform) got world wide fame.
5. There was a look of (satisfy) on his face.
6. The cause of the fire is still under (investigate).

1.2 Adjective विशेषण 

Adjective विशेषण


Adjective विशेषण - नामाची ओळख पटण्यासाठी नामाचे वर्णन करणारा शब्द वापरला जातो त्या शब्दाला विशेषण, adjective किंवा describing word देखील म्हणतात. 
उदा - काळा पेन, पिवळा चेंडू, लहान मुलगा, सुंदर मुलगी

वरील शब्दांमध्ये काळा, पिवळा, लहान, सुंदर ही विशेषणे आहेत. ती त्या नामांचे वर्णन करतात ज्या नामाचे वर्णन केलेले आहे त्यापूर्वी ती येतात; अशा विशेषणाला attributive adjective म्हणतात. वाक्यातील नामाचे पूरक complement म्हणून आल्यास विशेषण नामानंतर येते. 
उदा. The red book is on the table.
 या वाक्यात red हे विशेषण book या नामापूर्वी आलेले आहे. Ramesh is fat. या वाक्यात fat हे विशेषण Ramesh या नामाचे पूरक म्हणून नामांतर आलेले आहे.

Exercise 4: Identify the describing words in the following sentences and use them in your own sentences.

1. Yesterday my mother told me an interesting story.
2. My friend Riya gave me a red rose.
3. The big book is a dictionary.
4. Expensive things are not always good.


1.3 Verb - क्रियापद 

Verb - क्रियापद


Verb क्रियापद  - क्रिया, अवस्था, मालकी इत्यादी सांगणाऱ्या शब्दाला क्रियापद म्हणतात. वाक्यात काय घडतंय हे क्रियापद सांगते.
उदा.
 1.  He goes to school. (क्रिया)
 2. I like your dress. (क्रिया)
 3. He is happy. (अवस्था)
 4. He has a house.(मालकी)

वरील वाक्यांमध्ये goes, like, is a has ही क्रियापदे आहेत. नामाला आणि विशेषणाला suffix किया prefix जोडून देखील क्रियापदे तयार करता येतात. ती खालील प्रमाणे आहेत.

1.4 Adverb  - क्रियाविशेषण 

Adverb - क्रियाविशेषण


Adverb क्रियाविशेषण - ज्याप्रमाणे विशेषण नामाचे वर्णन करते त्याचप्रमाणे क्रियाविशेषण क्रियेचे वर्णन करते; म्हणजेच क्रियापदाचे वर्णन करते; क्रिया कशी, केव्हां व कोठे घडली ते सांगते.
उदा. 
 1. He ran fast. 
 2. He fought bravely.
या वाक्यामध्ये fast, bravely हे शब्द क्रियाविशेषणे आहेत आणि ते क्रियापदांचे वर्णन करतात. क्रियाविशेषण विशेषणाचे व क्रियाविशेषणाचे देखील वर्णन करते. Mumbai is a very big city. या वाक्यात very हा शब्द big या विशेषणाचे वर्णन करतो म्हणून तो क्रियाविशेषण आहे. 

Mumbai is growing very fast. या वाक्यात very व fast दोन्हीही क्रियाविशेषणे आहेत. Very हे fast या क्रियाविशेषणाविषयी अधिक माहिती देते. क्रियापदाला -ly लागून adverbs तयार होतात. याच बरोबर wards, -wise लावूनदेखील adverbs तयार करता येतात.

1.5 Pronoun - सर्वनाम 

Pronoun - सर्वनाम


Pronoun सर्वनाम - नामाच्या बदल्यात वापरण्यात येणाऱ्या शब्दाला
म्हणतात.
 1. Ram is a good boy.
 2.  He likes to play. 
 3. His friend is Riya. 
 4. She also likes to play. 
 5. Ram helps her.
वरील वाक्यात वापरण्यात आलेली he, his, she, her ही सर्वनामे आहेत. ती अनुक्रमे Ram व Riya साठी वापरण्यात आलेली आहेत.

1.6 Preposition - शब्दयोगी अव्यय 

Preposition


Preposition शब्दयोगी अव्यय - Prepositions हे असे शब्द आहेत जे नामांपूर्वी येतात नामांचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध जोडतात.
उदा.
 1.  I put the book on the table.
 2. There is a bridge over the river.
 3. He jumped into the moving train.

वरील वाक्यात अधोरेखित केलेले शब्द on, over, into - ही prepositions आहेत व ती अनुक्रमे table, river व moving train या शब्दांचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध जोडतात.

1.7 Conjunction - उभयान्वयी अव्यय 

Conjunction

Conjunction उभयान्वयी अव्यय - दोन किंवा जास्त शब्द, उपवाक्ये किंवा वाक्यांना जोडणाऱ्या शब्दांना उभयान्वयी अव्यये म्हणतात. खालील वाक्ये पहा.

1. I worked hard and passed the exam.
2. People like to rest and enjoy themselves.
3. Ramesh ran fast but he could not catch the train.
4. Although Riya is poor, she is generous.

वरील वाक्यांत and, but, although ही conjunctions वापरण्यात आलेली आहेत. पहिल्या वाक्यात and हे I worked hard आणि passed the exam या दोन वाक्यांना जोडते. दुसऱ्या वाक्यात and हे rest आणि enjoy themselves या दोन शब्दांना जोडते. 

तिसऱ्या वाक्यात but हे Ramesh ran fast a he could not catch the train या वाक्यांना जोडते. शेवटच्या वाक्यात although वापरण्यात आलेले आहे.
ते Riya is poor a she is generous या दोन वाक्यांना जोडते.

1.8 Article उपपद

Article


Article उपपद -  जेव्हा एखाद्या नामाविषयी बोलण्यात येते तेव्हां ते नाम अनिश्चित आहे कि निश्चित आहे हे दाखविण्यासाठी त्याच्यापूर्वी जे  Pronoun सर्वनाम नामाच्या बदल्यात वापरण्यात येणाऱ्या शब्दाला
म्हणतात.
 1. Ram is a good boy. 
 2. He likes to play.
 3. His friend is Riya. 
 4. She also likes to play. 
 5. Ram helps her.

वरील वाक्यात वापरण्यात आलेली he, his, she, her ही सर्वनामे आहेत. ती अनुक्रमे Ram व Riya साठी वापरण्यात आलेली आहेत. शब्द ठेवण्यात येतात त्यांना उपपदे म्हणतात. उपपदाचे दोन प्रकार आहेत. अनिश्चित उपपद a/an व निश्चित उपपद the.
खालील वाक्ये पहा.
 1. I have read a book.
 2. The book is very interesting.

पहिल्या वाक्यात book अनिश्चित आहे म्हणून a वापरण्यात आलेले आहे तर दुसऱ्या वाक्यातbook निश्चित झालेले आहे म्हणून त्यापूर्वी निश्चित उपपद the वापरण्यात आलेले आहे.

1.9 Interjection केवलप्रयोगी अव्यय

interjection


Interjection केवलप्रयोगी अव्यय - आपल्याला आश्चर्य वाटले, भीती वाटली, आपण थक्क झालो की आपल्या तोंडून आपोआप काही उद्गार बाहेर पडतात; त्यांना केवलप्रयोगी अव्यये किंवा उद्गारवाचक अव्यये म्हणतात. या अव्ययांचा समोरील वाक्याशी रचनेच्या दृष्टिने काही संबंध नसतो म्हणून त्यांना केवल प्रयोगी अव्यये म्हणतात. 
खालील वाक्ये पहा.
 1. Ouch, that hurts !
 2. Oh no, I forgot that the exam was today!
 3. Hey ! Put that down !
वरील वाक्यांतील Ouch, Oh no आणि Hey ही केवलप्रयोगी अव्यये आहेत.

Parts of Speech - In Marathi ( शब्दांच्या जाती )

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post