जीवनात ज्याच्या । खेळा स्थान मिळे । पांडुरंग खेळे । त्याच्याशीच ।।

जीवनात ज्याच्या । खेळा स्थान मिळे । पांडुरंग खेळे । त्याच्याशीच ।।


         " अरे किती खेळतोयस अभ्यास करायचाय को नाही ? चल आधी घरी " बाक्ये प्रत्येक आईबाबांच्या तोंडी असतात . सगळा मोठ्या माणसांना असेच वाटत असरे को , खेळ म्हणजे केवळ गंभातजमत . खेळ म्हणजे फक्त वेळ घालवणे , मणन निरर्थक मला हे मात्र अजिबात मान्य नाही . खेळात मुख्यत्वे मनोरंजन घडते . खूप मजा येते . मनसोक्त आनंद लुटता येतो . सगळयांत महत्त्वाचे म्हणजे मोठी माणसे दम क्ष्यायला तिथे नसतात , आमचे आम्हीच गरे असतो . त्यामुळे मुक्तपणे खेळायला मिळते . याचा आनंद मिळतोच . पण त्यात वाईट काय ? खेळात फका मनोरंजन असते , हे मात्र मला अजिबात मान्य नाही . मैदानात आम्दी मनसोक्त धावतो , उड्या मारतो , यामुळे चपळता येत नाही का ? त्यामुळे आपोआप व्यायाम घडतो त्याचे काय ? खेळून घरी जातो तेव्हा किती भूक लागते । हा फायदाही लक्षार बेतला पाहिजे . खेळाबद्दल मी शांतपणे विचार करू लागलो . तेव्हा मला त्याचे खूपच फायदे दिम् लागले . 

            आपल्याला कोणत्याही कामात पश मिळवायचे असेल तर प्रयत्न करावे लागलात , मैदानात जिंकण्यासाठी आम्हा जीव तोडून प्रयत्न करतो . प्रत्येकजण जिंकण्यासाठी घडपडतो . जिंकायचे , अधिक पुढे जायचे , अधिक प्रगती करायची ही प्रेरणा किती चांगली आहे ? याच प्रेरणेमुळे माणूस प्रगती करतो ना ? खेळामुळे ही प्रेरणा रुजत नाही काय ? आम्ही जिंकण्यासाठी धडपडतो ; आटोकाट प्रवल करतो . पण जिंकणारा शेवटी एकच असतो . आपण जिंकू किंवा हरू . यातले काहीही होऊ शकते . हे सर्व आम्हांला समजते . हरल्यावर वाईट वाटते , हे खरे . पण जिंकलेल्यांचे मनःपूर्वक अभिनंदनही करतोत्र ना ? नंतर आम्ही हसतखेळत पुन्हा खेळायला तयार होतोच की नाही ? जोवनात देखील हारजीत हसतखेळत स्वीकारली पाहिजे , ही शिकवण आपल्याला खेळाच्या मैदानावरच मिळते .

         खेळाचा आणखी एक फायदा आहे . जेव्हा आम्ही संघातर्फे खेळतो , तेव्हा संघाचा विजय व्हावा म्हणून जिवापाड प्रयत्न करतो . आपल्याला पडायला होईल , मार लागेल , जखमी होऊ , अशी कसलीच भीती त्या वेळी मनात नसते . आपला संघ जिंकला पाहिजे , हीच एक इच्छा आपल्या मनात असते . सगळेच जण संघासाठी धडपडत असतात . त्या वेळी कोणाच्याच मनात व्यक्तिगत स्वार्थ नसतो . या वेळी प्रत्येकजण स्वत : च्या इच्छेला , भावनेला बाजूला ठेवतो . फक्त संघाचाच विचार करतो . किती महत्त्वाचा संस्कार आहे हा ! शिवाय , आणखी एक महत्त्वाचा फायदा आहे . सगळेच काय वर्गात , अभ्यासात हुशार नसतात . अशांच्या मनात , आपले जीवन व्यर्थ आहे , 

          असा न्यूनगंड निर्माण होतो . ते आत्मविश्वास गमावून बसतात . यांच्यापैकी कित्येकजण मैदानात विलक्षण कर्तबगारी दाखवतात . सचिन तेंडुलकर कुठे कॉलेजात अभ्यासात चमकला होता ? म्हणजे आपली कर्तबगारी सिद्ध करायला मैदानात वाव मिळतो , हा केवढा मोठा फायदा आहे ! खेळाचे असे कितीतरी फायदे मला आठवू लागले आणि शालेय जीवनात खेळाला अभ्यासाइतकेच महत्त्वाचे स्थान आहे , हे अधिकाधिक पटू लागले .



Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post