काळ व त्याचे प्रकार व्याकरण ( वर्तमानकाळ भूतकाळ भविष्यकाळ )

काळ व त्याचे प्रकार मराठी

क्रियापदावरून क्रियेचा बोध होतो . 
क्रियापद → करतो उदा . , → करण्याची क्रिया
क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो , तसेच क्रिया कोणत्या  काळात घडते आहे , याचा जो बोध होतो , त्याला काळ म्हणतात . 

काळाचे प्रकार मराठी -

 मुख्य तीन प्रकार आहेत : 
( १ ) वर्तमानकाळ 
( २ ) भूतकाळ 
( ३ ) भविष्यकाळ . 
https://www.nirmalacademy.com/

1 ) वर्तमानकाळ : 

मी अभ्यास करतो . 
( अभ्यास ) करण्याची क्रिया आता घडत आहे , म्हणून करतो वर्तमानकाळ . 

जेव्हा क्रियापदाने दाखवलेली क्रिया आता घडते ( वर्तमानात घडते ) असा बोध होतो , तेव्हा त्याला वर्तमानकाळ म्हणतात 

( २ ) भूतकाळ : 

मी अभ्यास केला . 
( अभ्यास ) करण्याची क्रिया घडून गेली आहे , म्हणून केला → भूतकाळ . 

जेव्हा क्रियापदाने दाखवलेली क्रिया घडून गेली आहे , असा बोध होतो , तेव्हा त्याला भूतकाळ म्हणतात .

 ( ३ ) भविष्यकाळ 

मी अभ्यास करीन . 
( अभ्यास ) करण्याची क्रिया पुढे घडणार आहे , म्हणून करीन भविष्यकाळ . 
जेव्हा क्रियापदाने दाखवलेली क्रिया पुढे घडणार असते , असा बोध होतो , तेव्हा त्याला भविष्यकाळ म्हणतात .
 • लक्षात ठेवा : 
( १ ) मी अभ्यास करतो . → करतो → वर्तमानकाळ 
( २ ) मी अभ्यास केला . → केला → भूतकाळ 
( ३ ) मी अभ्यास करीन . → करीन → भविष्यकाळ

काळ व त्याचे उपप्रकार : 

प्रत्येक काळाचे चार उपप्रकार आहेत : 
( १ ) साधा ( सामान्य ) काळ ( क्रिया आता घडते . ) 
( २ ) अपूर्ण काळ ( क्रिया घडत आहे . ) 
( ३ ) पूर्ण काळ ( क्रिया नुकतीच घडली आहे . ) 
( ४ ) रीती काळ ( क्रिया सतत चालते . ) 

( अ ) वर्तमानकाळाचे उपप्रकार : 

( १ ) साधा वर्तमानकाळ → मी अभ्यास करतो . 
( २ ) अपूर्ण वर्तमानकाळ → मी अभ्यास करत आहे . 
( ३ ) पूर्ण वर्तमानकाळ → मी अभ्यास केला आहे . 
( ४ ) रीती वर्तमानकाळ → मी अभ्यास करत असतो . 

( आ ) भूतकाळाचे उपप्रकार : 

( १ ) साधा भूतकाळ मी अभ्यास केला . 
( २ ) अपूर्ण भूतकाळ → मी अभ्यास करत होतो . 
( ३ ) पूर्ण भूतकाळ → मी अभ्यास केला होता . 
( ४ ) रीती भूतकाळ → मी अभ्यास करत असे . 


( इ ) भविष्यकाळाचे उपप्रकार : 

( १ ) साधा भविष्यकाळ → मी अभ्यास करीन , 
( २ ) अपूर्ण भविष्यकाळ → मी अभ्यास करत असेन .
( ३ ) पूर्ण भविष्यकाळ → मी अभ्यास केला असेन . 
( ४ ) रीती भविष्यकाळ → मी अभ्यास करत जाईन .

काळांचे अर्थ व उपयोग : वर्तमानकाळ (Meanings and Uses of Tenses: Present Tense)

परीक्षेत क्रियापदाचे योग्य रूप वापरण्यास सांगतात. त्यासाठी काळांच्या रचने बरोबरच काळांचे उपयोग माहीत असावे लागतात.

साध्या वर्तमानकाळाचे उपयोग Uses of The Simple Present Tense

१. कायम सत्य ( permanent truth) व वर्तमान सत्य ( present truth) व्यक्त करण्यासाठी साधा वर्तमानकाळ वापरतात.
उदा
i. The sun rises in the east. (कायम सत्य)
ii. The earth is round. (कायम सत्य)
ii. India is a developing country. (वर्तमान सत्य)
iv. My father works in a private firm. (वर्तमान सत्य)
v. Ram stays with his uncle. (वर्तमान सत्य)

२. दैनंदिन काम किंवा सवयी व्यक्त करण्यासाठी साधा वर्तमानकाळ वापरतातः (routine or habitual activity)
उदा.
  1.  Ramesh gets up early in the morning. He takes exercises
  2. regularly. .. gets ready for school. .. takes his bicycle out
  3. and bicycles to school. (Routine)
  4. Ramesh likes mangoes. (सवय)
  5. Ramesh writes with a ball pen. (सवय)

• Always, every day, every week, every year, once a year, twice a year, whenever, generally, usually, often, never, seldom, rarely सारखे शब्द कायम परिस्थिती किंवा सवयी व्यक्त
करतात म्हणून त्यांच्या सोबत साधा वर्तमानकाळ येतो.
उदा.
1. They always help the poor.
2. I go to church every Sunday.
3. He stays with us every summer.
4. We visit the Taj once a year.

३. लोकांचे, वस्तूंचे किंवा ठिकाणाचे ठिकाणाचे वर्णन करण्यासाठी साधा वर्तमानकाळ वापरतात :
उदा. 
  1. This table is 140 cm high. It is made of fine wood.
  2. It is used for putting a T.V. on it.

४. बोलतेवेळेस चालू असलेली कृती व्यक्त करण्यासाठी साधा वर्तमानकाळ वापरतात. (म्हणजेच demonstration आणि commentary करण्यासाठी Simple Present Tense वापरतात.)
उदा. 
Ramesh bowls. Vinod hits the ball towards the boundrary. A fielder runs to the ball. (Cricket commentary) Now I pour this liquid in the acid. (प्रयोग करताना शिक्षक)

५. बातमीच्या नावामध्ये तिचा ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठी साधा वर्तमानकाळ वापरतात.
  • उदा. India wins World Cup
६. भविष्यकाळ व्यक्त करण्यासाठी सुध्दा साधा वर्तमानकाळ वापरतात.***


चालू वर्तमानकाळाचे उपयोग Uses of The Present Continuous Tense

१. बोलताना जी क्रिया चालू आहे तिच्यासाठी चालू वर्तमानकाळ
वापरतात. उदा.
  1. The boy is crying. (चालू क्रिया)
  2. At this moment, now (हे शब्द क्रिया चालू आहे हे दर्शवितात)
• याच बरोबर रेडीओ, दुरदर्शनवरील धावत्या वर्णनासाठीदेखील चालू
वर्तमानकाळ वापरतात.
उदा. 
The bowler is running to the ball. The batsman is getting ready to strike. The fielders are taking their positions. The spectators are shouting.
जर चालू वर्तमानकाळ वापरला तर कृती साध्या काळाने व्यक्त
केल्यापेक्षा जास्त काळ चालणारी व ताजी वाटते.

२. एखादी क्रिया दीर्घकाळ चालणार नाही हे सुचविण्यासाठी देखील चालू वर्तमानकाळ वापरतात. या ठिकाणी वर्णन करण्यात येत असलेली क्रिया वर्णन करते वेळी चालूच असेल असे नाही. अशा अर्थासाठी (रोजची) सवयीची कृती + progressive अशी रचना येते.

  • उदा. He is a History teacher but this year he is teaching Sociology.

३. शिक्षणाविषयी बोलण्यासाठी चालू वर्तमानकाळ वापरतात.
उदा.
  •  She is studying in Pune University.

५. पूढील अवस्था, मालकी व जाणिवा दाखविणारी क्रियापदे चालू काळात
sense, agree, be, believe, belong, forget, have (मालकी, नाते
असणे), know, like, love, own, see, smell, taste, want, wish

Exercise8.1: Use proper forms of the verbs given in the brackets. (उत्तरे पुढील पाठा अखेरीस)
1. She......... (cook), so she cannot help you now.
2. My teacher always ....... (tell) the truth.
3. Children ........ (play) at this moment.
4. Ramesh......... (be) a very lazy boy.
5. Shila .......... (get up ) late.

पुर्ण वर्तमानकाळाचे उपयोग Uses of The Present Perfect Tense

१. नुकत्याच पूर्ण झालेल्या क्रियेसाठी वापरतात. खालील संभाषणावरून चालू वर्तमानकाळ व पूर्ण वर्तमानकाळातील फरक लक्षात येईल.

Mother : Ravi, what are you doing?
Ravi : I'm doing homework, mother.
Mother: ( अर्ध्या तासा नंतर) Are you still doing homework?
Ravi : No mother, I have done it.

२. भूतकाळात सुरू झालेली कृती/ स्थिती वर्तमान काळात चालू असते तेव्हां
  • PAST { We have lived here for ten years. } FUTURE

यथे आम्ही दहा वर्षांपासून रहात आहोत. आता रहातही आहोत किंवा आमचे राहणे नुकतेच थांबले आहे.(संदर्भानूसार अर्थ निघेल.)
  • 1991  [ We have lived in Partur since 1991. ] FUTURE

३. भूतकाळात घडलेल्या क्रियेची वेळ दर्शविणारा शब्द वाक्यात दिलेलान सल्यास पूर्ण वर्तमानकाळ वापरतात. अशावेळी भूतकाळ ते वर्तमानकाळ दरम्यान कोठेही कृती घडली किंवा घडत राहीली असेल तेव्हां पूर्ण वर्तमानकाळ वापरतात.
उदा
  1. I have seen that movie.
  2. I have seen that movie many times.
  3. I have never seen that movie.
जेव्हां वाक्यात भूतकाळ दर्शविणारा शब्द येतो तेव्हा साधा भूतकाळ वापरतात. साधा भूतकाळ वापरावयाचा नसेल तर भूतकाळवाचक शब्दापूर्वी since असतेच असते. म्हणून पूढील वाक्य क्र..चूक आहे तर
  1. Isaw him yesterday.
  2. I have not seen him since yesterday.
Exercise8.2: Fill in the blanks with proper forms of verbs
given in the brackets. (उत्तरे पुढील पाठा अखेरीस)
1.1........ (complete) the work just now.
2. We ...... ( (live) in Pune for 10 years.
3. Who......(break) this window?

चालूपूर्ण वर्तमानकाळाचे उपयोग Uses of The Present Perfect Continuous Tense

या काळाच्या रचनेचा व अर्थाचा विचार करता यात Perfect Tense व Continuous Tense या दोन्हीही काळांचा सामावेश आहे.

१. भूतकाळात सुरू झालेली क्रिया वर्तमानकाळात देखील सुरू असेल तर चालूपूर्ण वर्तमानकाळ वापरतात. जास्त काळ क्रिया चालत आहे हे दाखविण्यासाठी हा काळ वापरतात.
उदा. 
i. I have been living here since 1990.
ii. I am standing here.

वरील वाक्यांची तुलना केली असता पहिले वाक्य 'कृती भूतकाळात सुरू झाली व वर्तमानकाळात अजूनही सुरूच आहे' असे सांगते तर दुसरे वाक्य 'कृती वर्तमानकाळात सुरू आहे' एवढेच सांगते, ती कधी सुरू झाली हे आपणास सांगत नाही. पूर्ण वर्तमानकाळ व चालूपूर्ण वर्तमानकाळ यांची तुलना  केल्यास पूर्ण काळामध्ये क्रिया पूर्ण झाली असा अर्थ निघतो तर चालूपूर्ण वर्तमानकाळात क्रिया चालू आहे असा अर्थ निघतो.
उदा.
i. I have been reading your book. (अजून वाचतच आहे)
ii. I have read your book. (नुकतेच संपवले आहे)

२. भूतकाळात सुरु झालेली क्रिया खूपवेळ चालून नुकतीच संपलेली असल्यास देखील Present Perfect Continuous Tense वापरतात.
उदा. Look at her eyes! I'm sure she has been crying. 
( येथे क्रिया भूतकाळात सुरु झाली, खूपवेळ चालली व नुकतीच संपली.

Exercise8.3: Change the following sentences into Present Perfect Continuous Tense. (उत्तरे पुढील पाठा अखेरीस)

1. I marvelled at what the cellphone revolution has brought in
our country.
2. India sells four times as many phones as it sold three
3. Attitudes have also changed.
4. I live here for ten years.
5. We had an enjoyable holiday.

Exercise8.4: Change the following dialogue into Present Perfect Continuous Tense.** (उत्तरे पुढील पाठा अखेरीस)

Visitor: I am exhausted. I.......(look) for books since morning.
Librarian: What type of books ..... (look) for?
Visitor: I .... (try) to find books on 'Environmental
Pollution for the last three days.
Librarian: Why are you looking for them?
Visitor:
I.... (do) research on the issues regarding pollution
since December 2011.

Exercise 8.5: Change the following sentences into Present Perfect Continuous Tense using the words given in the brackets. You can use the words like, for, since to frame your sentences. One has been done for you.

1. Ujjawala prepares aloo parathas. (An hour) Ujjawala has been preparing aloo parathas for an hour.
2. The government convinces the people for effective waste management. (last year) (31 gela YIGT BRUT) The adivasis fight to save medicinal plants in Saputara Ranges. (12 years)
4. Students learn many issues of pollution control. (Std.v)
5. Our teacher tells us to develop a project on Disadvantages of Plastic. (a month)

काळांचे अर्थ व उपयोग : भूतकाळ (Meanings and Uses of Tenses: Past Tense)

साधा भूतकाळ

The Simple Past Tense कधी वापरतात?

१. भूतकाळात घडलेल्या आणि संपलेल्या घटनेसाठी साधा भूतकाळ वापरतात. कृती घडणे व त्या विषयी बोलणे यात वेळ निघून गेलेला असतो. उदा. 
  1. He played cricket y7esterday.
  2. We lived in Aurangabad in 1999.
Exercisel: तुम्ही दहावीला येईपर्यंत अनेक गोष्टी केल्या असतील, अनेक कार्यक्रमात भाग घेतला असेल, अनेक बक्षीसे मिळविली असतील; तेच आपल्या मित्रांना सांगा. केलेल्या गोष्टी खाली balloons मध्ये दिलेल्या आहेत.

I secured 75% marks when I was in Std. VII.
  • secure
  • participate
  • complete
  • won
  • achieved
२. भूतकालीन सवयी साठी, अवस्थेसाठी किंवा भूतकाळात सतत घडलेल्या क्रियेसाठी देखील साधा भूतकाळ वापरतात. ती अवस्था, घटना, सवय संपून भूतकाळातच थांबलेली असते.
उदा.
  • He played cricket when he was in school.
• भूतकालीन सवयीसाठी used to देखील वापरतात.
उदा.
  • He used to play cricket when he was in school.

३. मुख्य उपवाक्यात भूतकाळ असेल तर परावलंबी उपवाक्यात देखील भूतकाळच येतो.
उदा. We picked up a stone and found that it was a piece of quartz.
 ( येथे picked हे भूतकाळात असल्याने found व was दोन्हीही क्रियापदे भूतकाळात आलेली आहेत.)

साधा भूतकाळ व पूर्ण वर्तमानकाळ:

1) साधा भूतकाळ: Present Perfect Tense आणि Simple Past दोन्हीही काळ भूतकाळात घडलेल्या घटनेची माहिती देतात. परंतु Simple Past मध्ये भूतकालीन संदर्भ, शब्द वाक्यात आलेला असतो.
उदा. 
I saw the Taj Mahal in 2002. ( भूतकालीन संदर्भ देणारे इतर शब्द: 
yesterday, on that day, in 1998, this morning, this week, this year)

2) पूर्ण वर्तमानकाळ: Present Perfect मध्ये भूतकालीन संदर्भ देणारा शब्द नसतो. उदा. I have seen the Taj Mahal. 

• पूर्ण वर्तमानकाळातील कृती भूतकाळात सुरू होते खरी परंतु भूतकाळात संपत नाही..
किंवा कृती ताजी-ताजी संपलेली असते..
किंवा कृती  भूतकाळात संपल्यास कधी संपली यापेक्षा कृतीच्या वर्तमानकालीन परिणामाविषयी सांगावयाचे असते.
• पूर्ण वर्तमानकालीन वाक्यात भूतकाळात कृती सुरू झाल्याचा वेळ येऊ शकतो. 
उदा. 
I have lived in Agra since 2008.
याच बरोबर for, since, yet, lately, already, just, ever, Present Perfect वापरतात. For चा अर्थ बोलण्यापर्यंतचा काळ असा असावा लागतो. 

आता खालील वाक्ये काळजीपूर्वक पहा.

  • 1. Ravi has worked in the school for ten years.
  • 2. Riya worked in the school for ten years.

आता खालील मुद्यांचा विचार करा. 

  • वरील दोन्ही वाक्यांमध्ये काय फरक आहे? 
  • कोण आजही शाळेत काम करत आहे? 
  • दुसऱ्या वाक्याची कृती कधी संपली? 
आपणास कळते की, पहिल्या वाक्यात has worked वापरलेले आहे तर दुसऱ्या वाक्यात worked वापरलेले आहे. Ravi आजही शाळेत काम करतो आहे. दुसऱ्या वाक्याची कृती भूतकाळातच कधीतरी संपलेली
आहे.

Exercise2: Fill in the blanks in the following sentences with
the Present Perfect or Simple Past form of the verbs given
in the brackets.

1. We .......   (live) here since 1998.
2. I......... ( not see) you for a long time.
3. Ramesh......... (not enrol) yet.
4. L............. (be) very busy lately.
5. Riya already...... (apply) for a leave.
6. Ram (left) this place just now.
7. We ( (have) a good holiday last year.
8. We......... (go) to the zoo last week.

पूर्ण भूतकाळ - Past Perfect Tense

पूर्ण भूतकाळ The Past Perfect Tense कधी वापरतात?
ANS - भूतकाळातच दोन कृती घडलेल्या असतील तर आगोदर घडलेल्या कृतीसाठी पूर्ण भूतकाळ वापरतात व नंतर घडलेल्या कृतीसाठी साधा भूतकाळ वापरतात.
उदा. The thief had run away when the police reached.

1) अशा प्रसंगी पहिली कृती ही दुसरी कृती सुरू होण्याच्या आगोदर संपलेली असावी. पहिली कृती संपलेली होती हे
सांगण्यासाठी ही रचना वापरतात.
उदा. When he had shut the window we opened the door of the cage
( येथे खिडकी बंद करण्याची क्रिया पूर्ण झाल्यानंतरच दरवाजा उघडला असा अर्थ निघतो.)

2) दोन्ही कृती जवळपास एकाचवेळी संपलेल्या असतील किंवा एका कृतीनंतर दुसरी कृती घडलेली आहे असे अगदी स्पष्ट सांगितलेले असेल तर मात्र दोन्ही क्रियापदांमध्ये साधा भूतकाळ वापरतात.
उदा. 
  1. When he saw me, he gave me a broad smile.
  2. I came after he left.

Exercise 3: Do as directed or use proper forms of verbs.

1. We are helping him. (Change it into Past Perfect Tense.)
2. Scientists have done experiments. (Use Past Perfect Tense.)
3. My friend ...... (call) me when I was outside.
4. When he ..... (come), I spoke to him.
5. We ..... (run) indoors as soon as it ..... (begin) to rain. .

Exercise 4: Use correct tense forms in the following.

  1. The police (warn) the people that the road (can be blocked due to the land slides in the hilly area. 
  2. The school authorities (declare) that the school (will) be closed for two days. 
  3. Our family (reach) our place before the landslide.
  4.  People (move) to safer places with their animals so there (be) no loss of life. The government and the local authorities (take) every precaution, so the land slide (not cause) much damage. 
  5. If proper care (not take) by the people and the government, there (can) have been more losses.

चालू भूतकाळ - Past Continuous Tense

चालू भूतकाळ The Past Continuous Tense कधी वापरतात?
ANS -  भूतकाळात चालू असलेल्या क्रियेसाठी चालू भूतकाळ वापरतात.
उदा. He was reading when I visited him.

1) या ठिकाणी दोन भूतकालीन कृतीचा उल्लेख आहे. एक साध्या
भूतकाळात तर दुसरी चालू भूतकाळात. 
2) एक भूतकालीन कृती सूरू असताना दुसरी कृती घडलेली आहे. याच बरोबर एक भूतकालीन कृती सुरू असताना दुसरी सुरू राहू शकते.
उदा. He was writing while I was singing,

Exercise 5: Do as directed.**

1. Vinod has helped me.(Change it into Past Continuous Tense.)
2. The four Hartmans were lingering at the dinner table.
(Name the tense used in the sentence.)

चालूपूर्ण भूतकाळ - Past Perfect Continuous Tense

The Past Perfect Continuous Tense कधी वापरतात?
ANS - भूतकाळातच सुरू होऊन एखादी कृती भूतकाळातच संपलेली असेल तर चालूपूर्ण भूतकाळ वापरतात.
उदा. We had been living there for last 20 years.
भविष्यात घडणाऱ्या घटनेविषयी बोलण्यासाठी सर्वसामान्यपणे क्रियापदापूर्वी shall/will वापरतात.
उदा. 
i. I shall help you.( Simple Future Tense)
ii. He will be helping you.( Future Continuous Tense)
iii. He will have helped you. (Future Perfect Tense)
iv. He will have been helping you for long time.
(Future Perfect Continuous Tense)

साधा भविष्यकाळ The Simple Future Tense :

साधा भविष्यकाळ The Simple Future Tense : साधा भविष्यकाळ व्यक्त करण्यासाठी अनेक प्रकारच्या रचना वापरतात. त्यांपैकी will Ishall च्या रचनेचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. The Simple Future Tense व्यक्त करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व रचना खालील प्रमाणे आहेत.

Will/shall वापरूनः खालील वाक्ये पहा.
i. I shall visit Rita tomorrow. (मी उद्या रिताला भेटेन.)
ii. Ravi will visit Rita tomorrow. (रवी उद्या रिताला भेटेन.)

वरील वाक्यांत उद्या काय होईल हे सांगितले आहे. अशा प्रकारे will/ shall वापरून भविष्यात काय होणार आहे हे सांगण्यात येते. सर्वसामान्यपणे प्रथम पुरुषी सर्वनामांसोबत shall व इतर नामां / सर्वनामां सोबत will वापरतात. वरील क्र. iव ची वाक्ये पहा. परंतु वर्तमान इंग्रजीमध्ये सर्वच कर्त्यांसोबत will वापरण्याकडे कल आहे. 
उदा.
1. I will visit Rita tomorrow. 
2. Ravi will visit Rita tomorrow.
 दोन्ही वाक्याच्या अर्थामध्ये विशेष फरक नाही.

२. Be going to ची रचना वापरून : भविष्यकालीन उद्देश व्यक्त करण्यासाठी तसेच (पुरावा पाहता) 'होईल' अशी खात्री सांगण्यासाठी ही रचना वापरतात.*
उदा.
i.Ravi is going to give us his camera. (भविष्यकालीन उद्देश)
ii. Ravi will give us his camera. ( केवळ भविष्य )
iii. It is going to rain soon. (पुरावा पहाता, भविष्यकालीन खात्री)
iv. It will rain soon. ( केवळ भविष्य

३. चालू वर्तमानकाळ वापरून Present Continuous Tense :  वापरून भविष्यकालीन आखलेली योजना व्यक्त करतात. Going to मधील उद्देशाचा पुढील टप्पा व्यक्त करण्यासाठी ही रचना वापरतात.
उदा.
i. There are going to be some changes in the tests this year.
ii. This year we are giving oral tests to the students.

वाक्य क्र.i. बदल करण्याचा उद्देश व्यक्त करते तर...
वाक्य क्र. ii. आखलेली योजना व्यक्त करते.

४. साधा वर्तमानकाळ वापरून: भविष्यातील आखलेली योजना निश्चित झालेली आहे आणि आता तिच्यात बदल होण्याची शक्यता खूपच कमी आहे हे सांगण्यासाठी Simple Present Tense (साधा वर्तमानकाळ) वापरतात. या रचनेचा अर्थ स्पष्ट होण्यासाठी आपण वरील वाक्यांचाच उपयोग करू. वाक्य क्र. iii मध्ये साधा वर्तमानकाळ
वापरलेला आहे.
i. There are going to be some changes in the tests this year. (Decision)
ii. This year we are giving oral tests to the students. (Planning)
iii. The oral tests begin on Januray 20t". (Programme)

वाक्य क्र.1 बदल करण्याचा उद्देश व्यक्त करते तर 
वाक्य क्र.ii आखलेली योजना व्यक्त करते. 
वाक्य क्र. iii मध्ये या योजनेचे

अंतीम स्वरूप व्यक्त करण्यात आलेले आहे. योजनेचा हा आणखी पुढचा टप्पा आहे आणि यात बदल होण्याची शक्यता खुपच कमी आहे. येथे लेखी कार्यक्रम (programme, time table) दिलेला आहे. Simple present ने व्यक्त होणारे वेळापत्रक वर्तमान काळाइतके निश्चित असते. ते बदलत नसते. कॅलेंडरवरील तारखा, शाळेचे, खेळांच्या सामन्याचे, कार्यक्रम पत्रिकांचे, निसर्गाचे वेळापत्रक या काळाने व्यक्त करतात.
उदा.
  1.  Tomorrow is Thursday.
  2. School finishes on 1 May.
  3. When is high tide?
  4. What time does the match begin?
The plane takes off at 20.30 tonight. जर शेवटचे वाक्य पूढील प्रमाणे आले तर... The plane is taking off at 20.30 tonight. तर 'विमानाच्या वेळेत बदल झालेला आहे आणि आज रात्री ते 20.30 ला उड्डान करेल' असा अर्थ निघतो. Programme मध्ये तात्पुरता बदल झाल्यास चालू वर्तमानकाळ वापरतात. चालू वर्तमानकाळाचा तात्पुरत्या काळासाठी' असा अर्थ निघतो.

खाली एक आराखडा दिलेला आहे. त्यावरून लक्षात येईल की भविष्यकालीन कृतीला प्रत्येक टप्यानूसार कसे अंतीम रुप येते.
First step is expressing just future action

  • Less certain अनिश्चित कृती
  • We shall make some changes next year. (इच्छा, wish)
  • There are going to be some changes in the tests this year. (निर्णय, decision)
  • This year we are giving oral tests to the students. (योजना, planning)
  • The oral tests begin on Januray 20". (programme, वेळापत्रक) 
  • More certain निश्चित कृती
Final step of the fixed future plan
Exercisel1.3: Your principal is thinking of making some plans about compulsion of identity cards for students. Make at least four sentences using constructions like, will + verb, , going to, verb + -ing, verb + -s/-es. 

काळांचे अर्थ व उपयोग : इतर भविष्यकाळ (Meanings and Uses of Tenses: Other Future Tenses)

1. चालू भविष्यकाळ The Future Continuous Tense : 

भविष्यातील वेळेच्या एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत चालणाऱ्या क्रियेसाठी चालू भविष्यकाळ वापरतात. 
उदा.
1. At this time tomorrow, he will be taking the exam.
2. After three years from now I will be studying in a college.

2. पूर्ण भविष्यकाळ The Future Perfect Tense : 

वाक्यात जर दोन भविष्यकालीन कृती किंवा बिंदू दिलेले असतील तर अगोदर आलेल्या भविष्यकालीन कृतीसाठी/ क्रियेसाठी Future Perfect Tense वापरतात.
उदा. i. He will have done that by the end of this year.

या वाक्यात the end of this year व do हे दोन भविष्यकालीन बिंदू किंवा क्रिया आहेत. Do ची क्रिया end of this year च्या आगोदर घडलेली असेन म्हणून या क्रियापदाचा पूर्ण भविष्यकाळ (will have done) आलेला आहे. अशा वाक्यातील मुख्य उपवाक्यात भविष्यकाळ असतो तर परावलंबी उपवाक्यात साधा वर्तमानकाळ असतो; परंतु तो भविष्यातील वळेचा बिंदू म्हणजेच भविष्यकाळ सुचवितो.
उदा.  Ravi will have become 20 by Riya gets 12.

Exercise12.1: Complete the following sentences using theFuture Perfect Tense forms of the verbs given in the bracets. (उत्तरे पुढील पाठा अखेरीस )

1. I..English for 12 years when I join the Senior college.(leam)
2. Mother.........cooking when Father comes home. (finish)
3. Sachin ... his 101" century by the end of this year. (score)

3. चालू पूर्ण भविष्यकाळ The Future Perfect Continuous Tense :

भविष्यकाळातच क्रिया जास्तवेळ चालणार असेल तर चालूपूर्ण भविष्यकाळ वापरतात. परंतु इंग्रजीमध्ये हा काळ जास्त वापरात नाही.
उदा.
  1.  By 2030 my father will have been teaching for 20 years.
  2. By this time tomorrow my friends will have been practicing dance for five hours.

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post