श्री दत्तगुरू शरणाष्टक - श्री दत्त महाराज

श्री दत्तगुरू शरणाष्टक -  श्री दत्त महाराज 

श्री दत्तगुरू शरणाष्टक -  श्री दत्त महाराज


भक्ताचा उद्धार करणारे अष्टक

दत्तात्रेया तव शरणं । दत्तनाथा तव शरणं ।।
त्रिगुणात्मका त्रिगुणातीता त्रिभुवनपालक तव शरणम् ।।१।।
शाश्वतमूर्ते तव शरणं । श्यामसुंदरा तव शरणं ।।
शेषाभरणा शेषभूषणा शेषशायि गुरू तव शरणम् ।।२।।

षड्भुजमूर्ते तव शरणं । षड्भुजयतिवर तव शरणं ।
दंडकमंडलुगदापद्मकर शंखचक्रधर तव शरणम् ।।३।।
करुणानिधे तव शरणं । करुणासागर तव शरणं ।
श्रीपाद श्रीवल्लभ गुरूवर नृसिंह सरस्वती तव शरणम् ।।४।।

श्रीगुरूनाथा तव शरणं । सद्गुरूनाथा तव शरणं ।
कृष्णासंगमतरूवरवासी भक्तवत्सला तव शरणम् ।।५।।
कृपामूर्ते तव शरणं । कृपासागरा तव शरणं ।
कृपाकटाक्षा कृपावलोकन कृपानिधे प्रभु तव शरणम् ।।६।।

कालांतका तव शरणं । कालनाशका तव शरणं ।
पूर्णानंदा पूर्णपरेशा पुराणपुरुषा तव शरणम् ।।७।।
जगदीशा तव शरणं । जगन्नाथा तव शरणं ।
जगत्पालका जगदाधीशा जगदुद्धारा तव शरणम् ।।८।।

अखिलांतरा तव शरणं । अखिलैश्वर्या तव शरणं ।
भक्तप्रिया वज्रपंजरा प्रसन्नवक्त्रा तव शरणम् ।।९।।
दिगंबरा तव शरणं । दीनदयाघन तव शरणम् ।
दीनानाथा दीनदयाळा दीनोद्धारा तव शरणम् ।।१०।।

तपोमूर्ते तव शरणं । तेजोराशी तव शरणं ।
ब्रह्मानंदा ब्रह्मसनातन ब्रह्ममोहना तव शरणं ।।११।।
विश्वात्मका तव शरणं । विश्वरक्षका तव शरणं
विश्वंभरा विश्वजीवना, विश्वपरात्पर तव शरणम् ।।१२।।

विघ्नांतका तव शरणं । विघ्ननाशका तव शरणं ।
प्रणवातीता प्रेमवर्धना प्रकाशमूर्ते तव शरणम् ।।१३।।
निजानंदा तव शरणं । निजपददायक तव शरणं ।
नित्यनिरंजन निराकारा निराधारा तव शरणम् ।।१४।।

चिद्घनमूर्ते तव शरणं । चिदाकारा तव शरणं ।
चिदात्मरूपा चिदानंदा चित्सुखकंदा तव शरणम् ।।१५।।
अनादिमूर्ते तव शरणं । अखिलावतारा तव शरणं ।
अनकोटिब्रह्मांडनायका अघटितघटना तव शरणम् ।।१६।।
भक्तोद्धारा तव शरणं । भक्तरक्षका तव शरणं ।
श्री दत्तगुरू शरणाष्टक -  श्री दत्त महाराज

श्री दत्तात्रेय कवच -  श्री दत्त महाराज 

श्रीमत् प.पू. वासुदेवानंद सरस्वतीविरचित हे कवच अनर्थापासून मुक्त करणारे, संसार तापात, संकटात सापडलेला साधक भक्तांना भक्तीचे कवच पांघरून संकट मुक्त करणारे आहे. ते ग्रहपीडा, भूत पिशाच पीडेपासूनही सुटका करणारे आहे. रोज सकाळी स्नानादी कर्मे करून मम सर्वार्थ निरसनपूर्वक परम कल्याण सिध्यर्थ, 

श्री दत्तात्रेय प्रीत्यर्थ दत्त कवच जप अहं करिष्ये । असा संकल्प करून रोज १ असे रोज १२ पाठ करावेत. यावेळी देवापुढे निरांजन, उदबत्ती लावून कवच म्हणावे. व उदबत्तीचा अंगारा स्वत:ला व घरातील इतरांना लावून बाकी घरभर फुकावा. हे कवच सायंकाळीही रोज म्हणता येते.

श्रीपादः पातु मे पादावुरू सिद्धासनस्थितः ।।
पायाद्दिगम्बरो गुह्यं नृहरिः पातु मे कटिं ।।१।।
नाभिं पातु जगत्स्स्रष्टोदरं पातु दलोदरः ।।
कृपालुः पातु हृदयं षड्भुजः पातु मे भुजौ ।।२।।

सक्कुण्डीशूलडमरुशङ्खचक्रधरः करान् ।
पातु कण्ठं कम्बुकण्ठः सुमुखः पातु मे मुखम् ।।३।।
जिह्वां मे वेदवाक्पातु नेत्रे मे पातु दिव्यद्दक् ।।
नासिकां पातु गन्धात्मा पातु पुण्यश्रवाः श्रुती ।।४।।

ललाटं पातु हंसात्मा शिरः पातु जटाधरः ।।
कर्मेन्द्रियाणि पात्वीशः पातु ज्ञानेन्द्रियाण्यजः ।।५।।
सर्वान्तरोन्तःकरणं प्राणान्मे पातु योगिराट् ।।
उपरिष्टादधस्ताच्च पृष्ठतः पार्श्वतोऽग्रतः ।।६।।

अन्तर्बहिश्च मां नित्यं नानारूपधरोऽवतु ।।।
वर्जितं कवचेनाव्यात्स्थानं मे दिव्यदर्शनः ।।७।।
राजतः शत्रुतो हिंस्त्राद् दुष्प्रयोगादितोघतः ।।
आधिव्याधिभयार्तिभ्यो दत्तात्रेयः सदावतु ।।८।।

धनधान्यगृहक्षेत्रस्त्रीपुत्रपशुकिङ्करान् ।।
ज्ञातीचं पातु नित्यं मेऽनसूयानन्दवर्धनः ।।९।।
बोलोन्मत्तपिशाचाभो द्युनिट्सन्धिषु पातु मां ।।
भूतभौतिकमृत्युभ्यो हरिः पातु दिगम्बरः ।।१०।।

य एतद्दत्तकवचं संनह्याद्भक्तिभावितः ।।।
सर्वानर्थविनिर्मुक्तो ग्रहपीडाविवर्जितः ।।११।।
भूतप्रेतपिशाचाद्यैर्देवैरप्यपराजितः ।।
भुक्त्पात्र दिव्यभोगान्स देहान्ते तत्पदं व्रजेत् ।।१२


या कवचाच्या प्रत्येक श्लोकात वेगवेगळ्या शरीराच्या अवयवांचे रक्षण करण्याची प्रार्थना आहे. आपाद मस्तक रक्षणासाठी प्रथम साडे चार श्लोक, साडेचार ते सात पर्यंत कर्मेंद्रिये, ज्ञानेंद्रिये, शरीराचे इतर भाग, शरीराच्या आतील व बाहेरील स्थान रक्षणाची विनंती आहे. आठव्यात राजा, हिंस्त्र पशु, पाप, आधिव्याधी भय, पीडा आदींपासून रक्षण मागितले आहे. नवव्यात धन-धान्य, शेत व कुटुंबीय आदींचे रक्षण मागितले आहे. अकरा व बाराव्या श्लोकात हे पठण करण्याचे लाभ सांगितले आहेत. संब

श्री दत्तगुरू शरणाष्टक -  श्री दत्त महाराज


॥ श्री दत्त मंत्र माहात्म्य ॥ श्री दत्त महाराज 

मननात् त्रायते इति मंत्रः म्हणजे ज्याचे मनन केले असता तो आपले रक्षण करतो. तो मंत्र दत्त उपासनेत मंत्रांचे अनन्य साधारण महत्त्व आहे. मंत्र उच्चारात सामर्थ्य असून त्याच्या शब्द लहरीतून निर्माण होणाऱ्या कंपनात जबरदस्त आध्यात्मिक शक्ती असते. मंत्रातील शब्दांत मोठी मनःशक्ती एकवटलेली असते. विशिष्ट ध्वनी कंपनानेच मंत्र सक्रीय होतात. मंत्रांचा उच्चार स्पष्ट, शुद्ध, एका सुरात, प्रसन्न मुद्रेने, शांत वातावरणात झाला 

तर तो अधिक प्रभावी असतो. मंत्र ॐ ने जोडून चालू करावा. या मंत्रोच्चारामुळे दिव्य शक्ती जागृत होते. प्रत्येक मंत्र ११, २१, किंवा १०८ वेळा म्हणावा. प.पू. वासुदेवानंद सरस्वती ऊर्फ टेंबे स्वामीनी समस्याग्रस्त लोकांसाठी रचलेले काही महत्त्वाचे मंत्र त्यांचे रोज किमान १०८ वेळा पठण करावे असे त्यांनी सांगितले.


* दारिद्य निवारण : दरिद्रविप्रगेहे यः शाकं भुक्तोत्तमश्रियम ।
ददौ श्री दत्तदेव : स दारिद्र्याच्छ्रीप्रदोऽवस्तु ।।१।।
* सौभाग्य : जीवयामास भर्तारं मृतं सत्या ही मृत्यु हा ।
मृत्युजंयः स योगींद्रः सौभाग्यं मे प्रयच्छतु ।।

* संतान प्राप्ती : दुरीकृत्यपिशाचार्ति जीवयित्वा मृतं सुतम् ।
योऽभूदभीष्टदः पातु स नः संततिवृद्धिकृत् ।।
* सर्वबाधा मुक्ती : नमस्ते भगवन्देव दत्तात्रेय जगत्प्रभो ।।
सर्वबाधाप्रशमनं कुरू शांती प्रयच्छ मे ।।

* सर्व पाप निवारण : अत्रिपुत्रो महातेजा दत्तात्रेयो महामुनी ।
तस्य स्मरण मात्रेण सर्वपापैः प्रमूच्चते ।।
* ऋण मुक्ती : अत्रेयत्मप्रदानेन या मुक्तो भगवानृणात ।
दत्तात्रेय तमीशानं नमामि ऋण मुक्त ये ।।

* असाध्य व्याधी : नमस्ते भगवत देवा, दत्तात्रेया जगत् प्रभो ।।
सर्व रोगा प्रशमन कुरूशांतीम् प्रयोच्चमे ।।
* विद्या : नमस्ते शारदे देवि सरस्वती मति प्रदे ।
वस त्वं मम जिह्मग्रे सर्वविद्या प्रदा भव ।
विद्यापुत्रा अविद्यमया आगतम लोक निर्वतम ।
चिन्हजिखम बुधमचक्रे श्रीदत्तः शरण नमः ।।

* संकटाचे निवारण होण्यासाठी : अनसूयाऽत्रिसंभुतो दत्तात्रेयो दिगम्बरः ।।
स्मर्तगामी स्वभक्तानामुध्दर्ता भव संकटात् ।।
* सर्व बाधा इष्ट फल प्राप्तीसाठी : ।। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।।

इतर काही दत्तमंत्र

।। ॐद्रां ॐ॥
ॐद्राम्
ॐ श्रीं ह्रीं क्लीं ग्लौं द्राम ।।
ॐ द्रां दत्तात्रेयाय एहि स्वाहा ।
ॐआं ही क्रौं, दत्तात्रेयाय एहि स्वाहा ।
ॐ ऐं क्लां क्लीं ह्रीं ह्रीं हूँ सो दत्तात्रेयाय नमः दत्तात्रेयाय नमः
ॐ ह्रीं क्लीं दत्तात्रेयाय नमः
ॐ ऐं क्रौं क्लां क्लीं क्लूं ह्रीं ह्रीं हूं सो. दत्तात्रेयाय स्वाहा ।
एक मंत्र निवडून रोज त्याचे ११, २१, १०८ वेळा मोठ्याने उच्चार करावे.

श्री दत्तगुरू शरणाष्टक -  श्री दत्त महाराज

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post