HELPING VERBS /AUXILIARY VERBS In Marathi - सहाय्यकारी क्रियापदे

HELPING VERBS /AUXILIARY VERBS - सहाय्यकारी क्रियापदे


इंग्रजीमध्ये दोन प्रकारची क्रियापदे आहेत. i. मुख्य क्रियापदे ii. सहाय्यकारी क्रियापदे.

सहाय्यकारी क्रियापदे वाक्ये तयार करण्यासाठी, प्रश्न तयार करण्यासाठी, नकारात्मक वाक्ये तयार करण्यासाठी व काळ,  सुपर काय सांगण्यासाठी मुख्य क्रियापदाला मदत करतात तर मुख्य क्रियापद  हळद सांगण्यासाठी वापरतात

HELPING VERBS /AUXILIARY VERBS In Marathi - सहाय्यकारी क्रियापदे



Exercisel: खालील वाक्ये पहा व त्यातील सहाय्यकारी क्रियापदे व मुख्य क्रियापदे ओळखा.

1. Ram runs.
2. Riya is singing.
3. Shashi has helped me.
4. Does Kiran take exercise?
5. Ramesh was helped by his friends.
6. We are going tomorrow.
7. He did not tell anything. .
8. Vinod had told the truth.
9. Rajan took part in the competition. .

Answer:
  • Main Verbs - runs, singing, helped, take, helped, going, tell, took part
  • Helping Verbs -  is, has, does, was, are, did, had

या पाठात आपण सहाय्यकारी क्रियापदांची माहीती पाहणार आहोत. सहाय्यकारी क्रियापदाचे दोन प्रकार आहेतः
1. Primary Helping Verbs, 
2. Modal Auxiliaries**

HELPING VERBS /AUXILIARY VERBS

Primary Helping Verbs 

प्राथमिक सहाय्यकारी क्रियापदे खालील प्रमाणे आहेत.
1. Be ची रुपे,
2. Have ची रुपे,
3. Do ची रुपे

Be ची रुपे

मुळ रूप be
वर्तमानकाळी रुप am, is, are
भूतकाळी रुप was, were
भविष्यकाळी रुप shall be, will be
चालू काळातील रुप being.
पूर्णकाळातील रुप been


Be चे उपयोग

Be चे उपयोग Be चे उपयोग
१. सहाय्यकारी क्रियापद म्हणून He is going
२. मुख्य क्रियापद म्हणून He is a doctor.
३. प्रश्न तयार करण्यासाठी Is he going?
४. नकारार्थी वाक्यात not च्या आगोदर He is not going.
५. Passive वाक्यात He is helped (by Ram),
६. भविष्यकालीन वाक्यात- मुळ रुपात He will be going.

 Have ची रुपे व ऊपयोग

 Have, has आणि had ही have ची रुपे आहेत. Have म्हणजे असणे / आहे, had म्हणजे होता. पूर्णकाळ व्यक्त करण्यासाठी have वापरतात. परंतु कर्ता तृतीय पुरुषी एक वचनी असेल
तर has वापरतात. खालील वाक्ये पहा.
  1. I have gone.
  2. We have gone.
  3. You have gone.
  4. They have gone.


पूर्ण वर्तमानकाळातील व नकारात्मक वाक्ये, तयार करण्यासाठी देखील have वापरतात. त्याच बरोबर मुख्य क्रियापद म्हणून देखील have वापरतात.
उदा.
  1. Have you come? (प्रश्न करण्यासाठी वापर)
  2. You have not helped him. (नकारात्मक वाक्य करण्यासाठी...)
  3. We have a house. ( मुख्य क्रियापद म्हणून उपयोग)

पूर्ण भूतकाळ व्यक्त करण्यासाठी had वापरतात.
उदा. 
  • They had gone.
  • He had gone.


 Do, does, did व done ही do ची रुपे आहेत. प्रश्न व नकारात्मक वाक्ये करण्यासाठी, त्याच बरोबर मुख्य,क्रियापद म्हणून देखील do चा उपयोग करतात. ( पुढील पाठ पहा.)
उदा.
  • I did it. (मुख्य क्रियापद म्हणून उपयोग)
  • Do you like him? You do not like him. (सा. क्रि.)

सहाय्यकारी क्रियापदांची संक्षीप्त रुपे 


i. होकारात्मक रुपे: am = 'm; is = 's; are = 'd has = 's; had = 'd; will = 'll; would =
ii. नकारात्मक रुपे : नकारात्मक संक्षीप्त रुपे होतात. उदा. doesn't, didn't, aren't, won't, wouldn't

Exercise2: Use proper forms of Primary helping verbs in
the following sentences. 

योग्य रुपे सोबतच दिलेली आहेत ती वापरून हीच वाक्ये दुरुस्त करुन पुन्हा लिहा.

He has a doctor is
They are gone have
She be happy is
Ravi have run fast. has
I does not like it. do
I are coming. am
I shall is reaching tomorrow be
Vinod did not helped me has

HELPING VERBS /AUXILIARY VERBS - सहाय्यकारी क्रियापदे

 

Uses of 'Do' : Do ची गरज

खालील वाक्य, त्याच्यापासून तयार झालेला प्रश्न व नकारात्मक
वाक्य पहा.
He is working. (विधान) He is not working.(नकारात्मक)
Is he working? (प्रश्न) आता खालील प्रश्नांची उत्तरे द्या.

  • वरील वाक्यापासून प्रश्न कसा तयार झालेला आहे?
  • नकारात्मक वाक्य कसे तयार झालेले आहे?
  • नकारात्मक वाक्यात not कोठे वापरले आहे?
वरील वाक्यांचे निरीक्षण केल्यास आपणास कळलेच असेल की
वाक्याचा प्रश्न करण्यासाठी सहाय्यकारी क्रियापद वाक्याच्या सुरुवातीला
घेतात व नकारात्मक वाक्य करण्यासाठी वाक्यात not वापरतात; ते सहाय्यकारी क्रियापदानंतर वापरतात. 


आता खालील वाक्यांचे निरीक्षण करा.
Statement Question Negative
I work. Do I work? I do not work.
He works. Does he work? He does not work.
He worked. Did he work? He did not work.

वरील statements (विधानार्थी वाक्ये) चे निरीक्षण केल्यास आपणास कळले असेल की त्यामध्ये सहाय्यकारी क्रियापदे नाहीत. अशा वाक्याचा प्रश्न व नकारात्मक वाक्य करावयाचे असल्यास do/does / did वापरतात. 

प्रश्न तयार करण्यासाठी सहाय्यकारी क्रियापद म्हणून do/does/did वाक्याच्या सुरवातीला घेतात व नकारात्मक वाक्य करण्यासाठी do/does/did च्या नंतर not ठेवतात. प्रश्न व नकारात्मक वाक्ये तयार करण्यासाठी सहाय्यकारी क्रियापद लागतेच लागते.

साधा वर्तमानकाळ असलेल्या वाक्याचा कर्ता He / She / It / proper noun, एकवचनी किंवा uncountable नाम असेल तर अशा वाक्याचा प्रश्न / नकारात्मक वाक्य करावयाचे असल्यास do ऐवजी does घेतात तर I सोबत व इतर सर्व कर्त्यांसोबत do घेतात. अशा प्रश्नात किंवा नकारात्मक वाक्यात does वापरल्यानंतर मुख्य क्रियापदाचे -s / -es लोप पावते आणि did वापरल्यानंतर मुख्य क्रियापदाचे -ed लोप पावते व क्रियापदाचे मुळरूप येते. 

वरील table मधील statements मध्ये works/worked अशी क्रियापदे आहेत परंतु त्यामधील काळ do मध्ये गेल्याने प्रश्न व नकारात्मक वाक्यात केवळ work असेच क्रियापद शिल्लक राहीलेले आहे.

Exercise: Change the following sentences first into negatives; then into questions.
1. They are happy.
2. Ram is a very good boy.
3. I study regularly.
4. He wrote three books.
5. He takes exercises regularly.

Answers: 
Negative Question
They are not happy. Are they happy?
Ram is not a very good boy. Is Ram a very good boy?
I do not study regularly. Do I study regularly?
He did not write three books. Did he write three books?
He does not take exercises regularly. Does he take exercises regularly?


Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post