शिकता शिकता कमवा आणि कमवता कमवता शिका मराठी निबंध
या प्रश्नाचे उत्तर आहे , ' कमवा आणि शिका ' . ' कमवा आणि शिका ' ही कल्पना काही आपल्याला नवीन नाही . कर्मवीर भाऊराव पाटील यांनी खेडोपाडी हिंडून मुले गोळा केली आणि त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था केली . तेव्हा त्या योजनेचा पाया होता , ' कमवा आणि शिका . ' कष्ट करा , शेतात राबा , स्वतःचे पोट भरण्याची व्यवस्था करा आणि शिक्षण मिळवा , अशी त्यामागील कल्पना होती .
प्राचीन काळी विदयार्थी ज्ञानसंपादन करण्यासाठी गुरुमगही जात . या आश्रमांना राजाचा व धनिकांचा आश्रय असे . मात्र शिष्यांना तेथे कष्ट करावे लागत . प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णालाही सांदिपनी ऋषींच्या आश्रमात कष्ट करावे लागले होते . या शिष्यांना गुरुगृही घरातील कामांपासून ते शेतीपर्यंतची अंगमेहनतीची सर्व कामे करावी लागत . साहजिकच या कामात ते कुशल बनत असत . जीवनाला आवश्यक असे प्रशिक्षणच तेथे मिळे . अनेकदा बेकारांच्या बाबतीत विचित्र परिस्थिती उद्भवते . कामाचा अनुभव तसल्यामुळे त्यांना नोकरी मिळत नाही आणि नोकरी नसते म्हणून अनुभव मिळत नाही .. परिणामी त्यांना घरीच बसावे लागते .
यातून मार्ग काढण्यासाठी म्हणून सुद्धा ' कमवा आणि शिका ' ही संकल्पना राबवली जाते . अशी सुविधा असलेल्या संस्थेत अननुभवी तरुणांना ' शिकाऊ उमेदवार ' म्हणून नेमतात . त्यांना विशिष्ट प्रकारचे काम शिकवले जाते . त्यात त्यांना कुशल बनवतात . या काळात त्यांना पगार मिळत नाही ; पण बऱ्यापैकी रक्कम विद्यावेतन म्हणून देतात . त्यामुळे शिकणाऱ्याला हुरूप येतो . शिकण्याचे काम अगदीच फुकट गेले असे वाटत नाही आणि शिकल्यानंतर नोकरी नक्की मिळेल , याची खात्री असते . खरे तर हीच पद्धत सर्वच ठिकाणी वापरली पाहिजे ; अगदी बँका , सरकारी कचेया येथेसुद्धा . यामुळे बेकारीची समस्या सुटण्यास मदत होईल .
शिकता शिकता कमवा आणि कमवता कमवता शिका मराठी निबंध
Tags:
मराठी निबंध लेखन