मी आरसा बोलतोय मराठी निबंध | me aarsa boltoy marathi nibandh

मी आरसा बोलतोय मराठी निबंध | me aarsa boltoy marathi nibandh


             मी माझी मिशी निरखत होतो . ती अस्फुट अस्फुट दिसू लागली होती . कसा आकार होईल तिचा ? मला मिशी हवी थोडीशी रुंद . ओठांवरून किंचित उतरत उतरत येणारी आणि ओठांच्या टोकावर येताच झटकन खाली वळणारी . माझ्या मिशीचा आकार मला हवा तसा मिळाला तर मी कसा दिसेन ? मी कोणाकोणाला आवडेन ? माझ्या डोळ्यांसमोर काही चेहरे तरळू लागले . मी गुंग होत गेलो . खळखळून हसण्याच्या आवाजाने माझ्या समाधीचा भंग झाला . मी चटकन इकडेतिकडे पाहिले . पण समोरचा आरसाच मला हसत होता , हे कळायला फार वेळ लागला नाही . वा ! वा ! किती छान गुंग झाला होतास , नाही का ? पण ते जाऊ दे . तुम्हां माणसांना स्वप्न दाखवण्यासाठीच तर माझा जन्म झाला आहे !

             हे बघ . प्रत्येक माणसाचं स्वत : वरच सर्वांत जास्त प्रेम असतं . आपण इतरांपेक्षा वेगळं दिसावं म्हणून प्रत्येक जण काहीतरी वेगळी कृती , कोणीही न केलेली नवीनच कृती करण्याच्या प्रयत्नात असतो . या धडपडीतूनच माणसाने या पृथ्वीतलावर अनंत पराक्रम गाजवले आहेत . म्हणून तर माणूस आज सर्व प्राण्यांचा राजा , या पृथ्वीचा राजा म्हणून वावरतोय . या पराक्रमी माणसांनी आपल्या प्रत्येक पराक्रमानंतर आरशात स्वत : ला पाहिले असणारच आणि पाहता पाहता मुठी आवळून , हात उंचावून ' माझा विजय असो ' असे मोठ्याने मनातल्या मनात घोषणा देत स्वत : चा जयजयकार केला असणारच , हे लक्षात ठेव . 

       तुमच्या मनातल्या या प्रेरणेचा निर्माता मीच आहे . मीच तुमची प्रगती घडवून आणतो . आठवते का रे ? जत्रेत आपली भेट झाली होती ! किती विविध रूपांत मी त्या आरसे महालात अवतरलो होतो ! तू तर नुसता लोटपोट हसत होतास . तुझ्याच किती प्रतिमा पाहायला मिळाल्या होत्या ! गोलगरगरीत , हडकुळी , एकदम बुटकी ! किती प्रतिमा ! एका आरशातली प्रतिमा आठवते ? डोकं मोठं भोपळ्याएवढं . बाकीचा देह दोन - अडीच फूट फक्त ! काय हसत होता तुम्ही सगळेजण !

             लक्षात ठेव . ही माझी रूपं केवळ विनोद करण्यासाठी निर्माण झालेली नाहीत . ड्रायव्हरला पाठीमागून येणाऱ्या गाड्या दाखवण्यासाठी मीच तर गाडीच्या कडेवर बसतो . वेगवेगळी भिंगे ही माझीच रूपे आहेत . प्रयोगशाळेतल्या सूक्ष्मदर्शकापासून अवकाशातल्या ग्रहगोलांचे निरीक्षण करणाऱ्या दुर्बिणींपर्यंत सर्वत्र मीच असतो . घरात , दारात , कपड्यांवर , दुकानांत , रस्त्यांवर , गाड्यांमध्ये , जत्रांमध्ये , इथे तिथे सर्वत्र मीच असतो . पण लक्षात ठेव , मी कधी स्वत : च्या मिजाशीत राहिलो नाही . पाणी पिण्यासाठी माणूस प्रथम नदीत वाकला तेव्हा त्याला स्वत : लाच स्वत : चे दर्शन घडले असणार . तेव्हापासून मी त्याच्यासोबत आहे . मी स्वत : ला बाजूला ठेवून माणसाला मदत केली आहे . तूसुद्धा अशीच मदत करीत राहा . पाहा , केवढा मोठा होशील तू !

मी आरसा बोलतोय मराठी निबंध | me aarsa boltoy marathi nibandh


मी आरसा बोलतोय मराठी निबंध

 मी आरसा बोलतोय मराठी निबंध

    काल परवाची गोष्ट आहे मी आरशापुढे  उभा राहून स्वतःची निरीक्षण करत होतो बघत होतो माझ्या चेहर्या मध्ये कोणत्या गोष्टीची कमी आहेत तर मला असे समजले की मला थोडी दाढी असली तर बरं झालं असतं बरं असं मी बघत बघत विचार करू लागलो तर दाढी असती तर मी कसा दिसलो असतो हे सर्व पाहून आरसा मोठ मोठ्याने हसू लागला पहिल्यांदा तर मला समजलंच नाही कोण असतात आहेत परंतु त्यानंतर मला समजलं की माझ्याकडे पाहून हसत आहेत हे पाहून मी खूप आश्चर्यचकित झालो मी पूर्णपणे घाबरून गेलो मग आरसा माझ्याशी बोलतो घाबरू नकोस मी तुझा आरसा तू माझ्याकडे पाहून बडबड करत असतो तो बोलत असतो ते सर्व मी ऐकत असतो तूच मी तुझा आरसा मला तुझ्याशी खूप काही गप्पा मारायचा आहे खुप दिवसानंतर मला तुझ्याशी बोलण्याची संधी मिळाली म्हणून मला घाबरू नकोस

   अरे मी तुला माझी गोष्ट सांगतो जेव्हा माणूस अश्मयुगात राहू लागला माणसाचा पृथ्वीवर जन्म झाला तेव्हा माणूस फक्त अन्न वस्त्र आणि निवारा या तीनच गोष्टींवर लक्ष देत होता माणसाची हळूहळू प्रगती होण्यास सुरुवात झाली तसतसे माणसाला आपला चेहरा आपले शरीर आपण कसे दिसत आहोत हे जाणून घेण्याची उत्कंठा निर्माण होऊ लागली तेव्हाच शिकार करत असताना एकदा एक माणूस पाण्यामध्ये डोकावला आणि त्याला समजले की पाण्यामध्ये सुद्धा माझ्यासारखा एक माणूस माझ्याकडे बघत आहेत  म्हणजेच ती माणसाची प्रतिबिंब होते हे सर्व पाहून तो माणूस खूप घाबरला आणि त्या पाण्याला मारू लागला त्यांनी जसे त्या पाण्याला मारले ते प्रतिबिंब निघून गेले हळूहळू माणसाला समजायला लागले की हे प्रतिबिंब दुसरा माणसाचे नव्हे तर माझी सारी यापासूनच माझा जन्म झाला

    त्यानंतर मनुष्याने मला दैनंदिन वापरासाठी तयार केले म्हणजेच तू बघत आहे तसा फारसा मी बोललो माझे काम तुम्हाला तुमचे खरे रूप दाखवण्याचे आहेत सुंदर पुरुष आणि महिला माझ्यापुढे तासन्तास बसतात आणि त्यांची सुंदरता बघत असतात  तसेच कुरूप दिसणारे व्यक्ती माझ्यापासून लांब लांब पळतात आणि माझा वापर करत नाही असेही मनुष्य मी माझ्या जीवनात पाहिले आहेत काही काही माणसं तर माझ्यासोबत बोलतात म्हणजेच आरशामध्ये त्यांचे प्रतिबिंब दिसते त्याच्या सोबतच  बडबड करत असतात ते मी सर्व ऐकतो कधीकधी तर मला खूप हसू येतं आणि मला सतत असे वाटते की कधी माझ्यापुढे कोण येईल आणि सुंदरता बघेल बोलायला तर अजून खूप काय आहे परंतु माझा जाण्याचा टाईम झाला आहेत माझ्यापुढे एक आणि माझ्या सोबत गप्पा मारतात  जा मग भेटू   परत ना येतो मी आता

मी आरसा बोलतोय मराठी निबंध | me aarsa boltoy marathi nibandh

1 Comments

Thanks for Comment

  1. Mala stri purush samante vae nibandh pahijel aahe plz help🙏🏻

    ReplyDelete
Previous Post Next Post