झाडे लावा , देश वाचवा मराठी निबंध

झाडे लावा , देश वाचवा मराठी निबंध

झाडे लावा , देश वाचवा मराठी निबंध


        एका कार्यक्रमाचा समारोप चालू होता . वक्ता आमंत्रित पाहुण्यांचे आणि सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानत होता आणि आभार मानताना पुष्पगुच्छाऐवजी प्रत्येकाच्या हाती एकेक रोप देत होता . अतिशय आवडली मला ही कल्पना . आज एवढ्या घरातून नक्की झाडे लावली जातील आणि कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून ती जोपासली जातील . आजच्या काळाची ती एक नितांत गरज आहे . माणसाच्या हातून नकळत फार मोठा गुन्हा घडला आहे . माणसांनी विकासाच्या नावाखाली अमर्याद जंगलतोड केली , वनांचा विध्वंस केला . जंगलांवर कुणाचा हक्क ? कुणाची मालकी ? कुणाचीही नाही ; म्हणजे सर्वांचीच . शहरे फुगत चालली तसतशा मोठ्या इमारतींची आवश्यकता निर्माण झाली . वाहनांची सोय करण्यासाठी मोठमोठे रस्ते आवश्यक झाले . 

         मग वाटेत येणारी झाडे ; झाडे कसली मोठमोठे वृक्ष तोडण्यात आले . घरे उभारण्यासाठी लाकूड , घरे सजवण्यासाठी लाकूड ... पुस्तके , ग्रंथ , कचेयांतील कामांसाठी कागद , त्यासाठी पुन्हा लाकूड . वर्षानुवर्षे डोळ्यांवर पट्टी बांधून आपण झाडे तोडत राहिलो . खेडेगावांतील गरजा वेगळ्या , पण त्यांना त्यांचे अन्न शिजवण्यासाठी सरपण हवेच . मग झाडे तोडली जातात . शेवटी व्हायचे तेच झाले . या बेसुमार वृक्षतोडीमुळे सारा देश उजाड झाला . देशातील वनस्पती लयास गेली आणि मग या नाठाळ माणसाच्या लक्षात आले , की पर्यावरणाचा तोल बिघडला आहे ! झाडे कमी झाली , तसा पाऊस कमी झाला . माणसे वाढली , पाण्याचा उपसा अखंड चालू राहिला . त्यामुळे जमिनीच्या पोटातील पाण्याची पातळी खाली गेली . 
झाडे लावा , देश वाचवा मराठी निबंध

          आता माणसाला पिण्यासाठीही पुरेसे पाणी मिळणे कठीण झाले आहे . सगळ्या जगापुढेच हा प्रश्न उभा राहिला आहे . मग मात्र माणूस खडबडून जागा झाला . स्वतःला वाचवण्यासाठी झाडांना वाचवले पाहिजे , हे त्याच्या लक्षात आले . आता कुणी झाड तोडू लागला की चारजण धावून त्याचा हात धरतात , त्याला वृक्षतोड करू देत नाहीत . प्रत्येक मंगलप्रसंगी वृक्षारोपणाची कल्पना आपण आता स्वीकारली पाहिजे . घरात बाळ झाले , झाड लावा . बाळाबरोबर झाडाला वाढवा . पाहुणे आले ; त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करा . इतकेच नाही तर घरातील प्रियजनांच्या वियोगप्रसंगी ‘ स्मृतिवना'त झाड लावून त्यांच्या स्मृती जतन केल्या पाहिजेत . जंगलतोडीच्या चुकीचे परिमार्जन झाडे लावूनच करायचे आहे . अगदी खेडोपाडी , समाजाच्या तळागाळापर्यंत हा विचार पोचवायचा आहे . त्यातच आपल्या देशाचा उत्कर्ष आहे .

झाडे लावा , देश वाचवा मराठी निबंध

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post