माहितीपत्रक म्हणजे काय ते सोदाहरण सांगा | Mahitipatark in marathi

माहितीपत्रक म्हणजे काय ते सोदाहरण सांगा

माहितीपत्रक म्हणजे काय ते सोदाहरण सांगा

माहितीपत्रकाचे स्वरूप :

• एखादी संस्था, उदयोग, गृहोदयोग यांत दिवसेंदिवस नवनवीन संपूर्ण योजनांची भर पडत असते. जागतिकीकरणाच्या युगात नवनवीन संस्था, बँका, विविध सेवा पुरवणाऱ्या संस्था यांची निर्मिती व वाढ होत आहे. माहितीपत्रकातून विशिष्ट उत्पादन, सेवा यांची तपशीलवार माहिती मिळत असते.

• माहितीपत्रक म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण माहिती देणारे लिखित स्वरूपातील परिचयात्मक पत्रक होय.
• माहितीपत्रक हे एक प्रकारे सेवा, संस्था लोकांपर्यंत पोहोचवण्याचे ये साधन आहे.
• माहितीपत्रकामुळे उत्पादक आणि ग्राहक यांच्यात संवाद निर्माण होतो.

• उत्पादनाला नवीन बाजारपेठ मिळवण्यासाठी माहितीपत्रक पहिली पायरी असते.
• माहितीपत्रक कमी वेळात, कमी खर्चात सविस्तर माहिती लोकांपर्यंत पोहोचवत असते.
• माहितीपत्रक उत्पादनाविषयी जनसामान्यांच्या मनात कुतूहल, उत्कंठा निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असते. 

माहितीपत्रकाची आवश्यकता :

• माहितीपत्रक म्हणजे सर्वसाधारणपणे प्रसिद्धीपत्रक असते.
• निरनिराळ्या संस्था, व्यापारी कंपन्या, उत्पादक आपल्या योजनांची तसेच उत्पादनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लिखित स्वरूपाच्या माहितीपत्रकांची निर्मिती करीत असतात.
• फळे, भाजीपाला विक्रेत्यांपासून ते लक्षावधींची उलाढाल करणाऱ्या व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांना माहितीपत्रकाची आवश्यकता असते. 
उदा., पुस्तके, खेळणी, किराणामाल, दिवाळीअंक, फर्निचर, स्टेशनरी, घरगुती वापराची उपकरणे, वाहने, कारखाने, औषधे, विविध खाद्यपदार्थ, रेडीमेड साड्या अशा बाजारात उपलब्ध होणाऱ्या सर्वच वस्तूंची माहितीपत्रके पाहावयास मिळतात. यासोबतच सिनेमागृहे, सांस्कृतिक संस्था, बँका, शैक्षणिक संस्था,

 पतपेढ्या, पर्यटनसंस्था इत्यादींमध्येही समुदायाला आकर्षित करण्यासाठी माहितीपत्रकाची आवश्यकता असते. आपली वैशिष्ट्ये, वेगळेपण आणि ग्राहकाला होणारे फायदे अधोरेखित करण्यासाठी माहितीपत्रक उत्तम साधन असते.

माहितीपत्रकाची रचना :

(१) माहिती 'ला प्राधान्य :

• माहितीपत्रकाच्या शीर्षकावरूनच त्याची प्रकृती लक्षात येते. माहितीपत्रकाचा 'माहिती देणे हा मुख्य हेतू आहे.
• ज्या विषयाचे माहितीपत्रक आहे, त्याची सुसंगत, सविस्तर आणि अचूक माहिती त्यात असणे आवश्यक असते. संस्थेबद्दल विश्वासार्ह माहिती गरजेची असते. उदा., संस्थेचे कार्यालय, पत्ता, नोंदणीक्रमांक, बोधचिन्ह, संस्थेचे संचालक, अध्यक्ष यांचे संपर्क, ई-मेल, वेबसाईट इत्यादी माहिती अचूक असावी.

• माहितीपत्रकातील माहिती वस्तुनिष्ठ व सत्य असावी. अतिशयोक्ती तसेच चुकीची माहिती माहितीपत्रकात असू नये.
• माहितीपत्रकाची भाषा साधी, सोपी असावी. सामान्य लोकांना सहज आकलन होईल अशी भाषिकरचना असणे आवश्यक असते.

• माहितीचे स्वरूप सुटसुटीत असावे. माहितीचा अतिरेक असता कामा नये.
• परीक्षेत माहितीपत्रक तयार करताना त्यात चित्रे काढणे अपेक्षित नाही. फक्त भाषिक मजकूर पुरेसा असतो.

(२) माहितीपत्रकाची उपयुक्तता :

• माहितीपत्रक हे उपयुक्त असावे. वाचून झाल्यावर चुरगळून फेकून न न देता लोकांनी संग्रही ठेवावे अशा स्वरूपाचे असावे.
• माहितीपत्रकात ग्राहकाच्या उपयोगाची, जिव्हाळ्याची माहिती असल्यास माहितीपत्रकाची उपयुक्तता नक्कीच वाढते.
• माहितीपत्रकातील माहिती आकर्षक परंतु विश्वासार्ह असल्यास वाचक असे माहितीपत्रक जपून ठेवतात. त्याचा प्रचार करतात.

• माहितीपत्रकांची काही क्षेत्रे : ग्राहकाचे दैनंदिन प्रश्न, आरोग्य, शेती, तांत्रिक किंवा वैज्ञानिक स्वरूपाची माहिती देणारे माहितीपत्रक. ग्राहक अशा माहितीपत्रकांकडे लगेच वळतात. उदा., 'कोरोनावर मात करताना अशी वाढवावी प्रतिकार शक्ती', 'फळांची खरी ओळख पटवताना...', 'कशी असते अन्नधान्यातील भेसळ?'

(३) माहितीपत्रकाचे वेगळेपण :

• बाजारात रोज नवनवी उत्पादने येत असतात. या स्पर्धेत आपल्या उत्पादनाच्या माहितीपत्रकाचेही वेगळेपण टिकवणे आवश्यक असते. त्यासाठी माहितीची मांडणी वेगळेपणाने केली जाते.
• अन्य माहितीपत्रकांपेक्षा आपले माहितीपत्रक वेगळे ठरण्यासाठी मजकुराची आकर्षक मांडणी, माहितीची उपयुक्तता सांगणारा आकर्षक मजकूर, आकार, पानांची मांडणी, सुलेखन, अक्षरांची ठेवण इत्यादींद्वारे वेगळेपण आणले जाते.

भाषाशैली:

• आपल्या उत्पादनाची सविस्तर व विश्वासार्ह माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे माहितीपत्रक हे उत्तम साधन आहे. दर्शनी रूपासोबत माहितीपत्रकाच्या मजकुरालाही फार महत्त्व आहे.
• वाचकांना आकर्षित करण्यासाठी मजकुराची भाषा वेधक असणे आवश्यक आहे.
• माहितीपत्रकाची भाषा सोपी परंतु परिणामकारक असावी.
• माहितीपत्रकाची भाषा पाल्हाळीक नसावी. मनाची पकड घेणारी आणि आशय सहज ध्वनित करणारी असावी.
उदा., गाण्याच्या नव्या वर्गाची माहिती देताना; 'सूरांची बैठक पक्की केली जाईल, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि गाण्याच्या सरावाकडे विशेष लक्ष दिले जाईल.' एवढा आशय एका वाक्यातून सांगण्याऐवजी पुढील मुद्द्यांत तो मांडता येईल : 

ठळक वैशिष्ट्ये:

• सुरांची पक्की बैठक. . तज्ज्ञांचे मार्गदर्शन. . सरावावर खास भर.
व्यावसायिक संधी :
(१) आजच्या स्पर्धेच्या काळात आकर्षक आणि नेमकी माहिती पुरवणारे माहितीपत्रक तयार करणे ही व्यावसायिकांची गरज आहे आणि ती वेळेवर उपलब्ध होणे ही ग्राहकांसाठी आवश्यक बाब आहे.
(२) आज बहुतांश माहितीपत्रके इंग्रजीतून निर्माण होत असल्याचे दिसते. अशा वेळी मराठीतून परिणामकारक माहितीपत्रके निर्माण करणाऱ्यांचे महत्त्व विशेष वाढताना दिसत आहे.

(३) तंत्रज्ञान, सौंदर्यदृष्टी आणि भाषेचे प्रभुत्व असणाऱ्या युवावर्गाला हे क्षेत्र खुणावत आहे.
(४) माहितीपत्रक तयार करणे या गोष्टीला व्यावसायिक मूल्य प्राप्त होत आहे.

माहितीपत्रकासाठी आवश्यक मुद्द्यांचा नमुना :

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सुलेखनाचे वर्ग नव्याने सुरू करायचे आहेत. अधिकाधिक विद्यार्थी आणि पालकांपर्यंत ही माहिती पोहोचवायची आहे. त्यासाठी.

(१) ज्या संस्थेमार्फत सुलेखनाचे वर्ग चालवले जाणार आहेत त्या संस्थेचे बोधचिन्ह/बोधवाक्य, तसेच संस्थेच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची नावे, पदनाम.
(२) संस्थेचे नाव/पत्ता/स्थापना वर्ष/नोंदणीक्रमांक/ दूरध्वनी/मोबाइल क्रमांक/ई-मेल/वेबसाईट इत्यादी.

(३) संस्थेची थोडक्यात माहिती. (संस्थेची स्थापना, स्थापनेचा हेतू, संस्थापक, अन्य उपक्रम इत्यादी.)
(४) सुलेखन वर्गाविषयी सविस्तर माहिती. (वर्ग सुरू करण्यामागचा हेतू, वयोगट, कालावधी इत्यादी.)
(५) सुलेखन वर्गासाठी असणाऱ्या सुविधा. (पेन, पेन्सिल, कागद, शाई इत्यादी साधनांची उपलब्धी, आवश्यक पुस्तके.)

(६) सुलेखन वर्गाची वैशिष्ट्ये. (मर्यादित विदयार्थी संख्या, वैयक्तिक मार्गदर्शन, तज्ज्ञ मार्गदर्शक, सुलेखनाचे प्रदर्शन, सुलेखनाची संधी इत्यादी.)
(७) सुलेखन वर्गाचे भविष्यातील महत्त्व.

(८) आधीच्या सुलेखन वर्गाची पूरक छायाचित्रे. (निवडक माजी विदयार्थ्यांच्या सुलेखनाची छायाचित्रे.)
(९) सुलेखन वर्गाच्या इमारतीपर्यंत जाणाऱ्या रस्त्यांची माहिती.

(१०) प्रवेश प्रक्रिया, प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, फी स्वरूप, फी भरण्याचे टप्पे, सुलेखन वर्गाचा एकूण कालावधी, वेळ, सुट्ट्यांचे नियोजन, संबंधित अधिकाऱ्याचे नाव, संपर्क क्रमांक, सुलेखन वर्ग सुरू होण्याची तारीख इत्यादी.

उपयोजित मराठी माहितीपत्रक/mahiti  थोडक्यात माहिती लिहा - भाग ४-उपयोजित मराठी माहितीपत्रक

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post