वाक्य व त्याचे प्रकार मराठी व्याकरण | वाक्यप्रकार व्याकरण व लेखन

वाक्य व त्याचे प्रकार मराठी व्याकरण | वाक्यप्रकार व्याकरण व लेखन

वाक्य व त्याचे प्रकार मराठी व्याकरण

मूलध्वनींच्या आकारांना अक्षरे म्हणतात.
विशिष्ट क्रमाने येणाऱ्या अक्षरांच्या समूहाला शब्द म्हणतात. अर्थपूर्ण शब्दांच्या संघटनेला वाक्य म्हणतात. ( वाक्य व त्याचे प्रकार ) 
आपण मराठी भाषेत बोलताना व लिहिताना अनेक प्रकारची वाक्ये' एकापुढे एक मांडतो.
एकच आशय अनेक प्रकारच्या वाक्यांतून सांगता येतो. ( वाक्य व त्याचे प्रकार )
उदा., 
 • (१) पाऊस धो धो पडला.
 • (२) किती जोरात पडला पाऊस!
 • (३) पाऊस तर पडायलाच हवा.
 • (४) पाऊस न पडून कसे चालेल?

वाक्यातील अर्थ अकलानानुसार वाक्याचे प्रकार ( वाक्य व त्याचे प्रकार )

• वाक्यांच्या अशा अनेकविध वापरातून 'वाक्यांचे प्रकार' निर्माण झाले आहेत.
वाक्यांच्या प्रकारांचे मुख्य दोन विभाग आहेत. -
 • (अ) आशयावरून व भावार्थावरून.
 • (आ) क्रियापदाच्या रूपावरून,
 • (अ) आशय व भावार्थ असलेला वाक्यप्रकार,
वाक्याच्या आशयावरून व भावार्थावरून वाक्यांचे तीन प्रकार आहेत.
(१) विधानार्थी वाक्य (२) प्रश्नार्थी वाक्य (३) उद्गारार्थी वाक्य,

(१) विधानार्थी वाक्य

पुढील वाक्ये नीट वाचा व समजून घ्या :
(१) हे फूल खूप सुंदर आहे.
(२) माझी शाळा मला खूप आवडते.

वरील दोन्ही वाक्यांत 'विधान' केले आहे. ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते, त्याला विधानार्थी वाक्य म्हणतात.

(१) हे फूल खूप सुंदर आहे. 
 → विधानार्थी वाक्य
(२) माझी शाळा मला खूप आवडते. 
विधानार्थी वाक्य

(२) प्रश्नार्थी वाक्य :

पुढील वाक्ये नीट वाचा व समजून घ्या :
(१) हे फूल सुंदर आहे का?
(२) तुझी शाळा कुठे आहे?

वरील वाक्यांत 'प्रश्न' विचारले आहेत. ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो, त्यास प्रश्नार्थी वाक्य म्हणून, 

(१) हे फूल सुंदर आहे का? 
प्रश्नार्थी वाक्य
(२) तुझी शाळा कुठे आहे? 
प्रश्नार्थी वाक्य

(३) उद्गारार्थी वाक्य :

पुढील वाक्ये नीट वाचा व समजून घ्या :
(१) किती सुंदर आहे हे फूल!
(२) किती आवडते मला माझी शाळा !

वरील दोन्ही वाक्यांत बोलणाऱ्याच्या मनातील भाव उत्कटपणे व उत्स्फूर्तपणे व्यक्त झाला आहे. ज्या वाक्यात मनातील विशिष्ट भाव उद्गाराद्वारे उत्कटपणे व्यक्त होतो, त्यास उद्गारार्थी वाक्य म्हणतात. म्हणून, 

(१) किती सुंदर आहे हे फूल! 
उद्गारार्थी वाक्य
(२) किती आवडते मला माझी शाळा!
 → उद्गारार्थी वाक्य

प्रश्नार्थी वाक्याच्या शेवटी (?) प्रश्नचिन्ह देणे आवश्यक आहे. तसेच उद्गारार्थी वाक्याच्या शेवटी (!) उद्गारचिन्ह देणे आवश्यक आहे.
ही वाक्ये 'होकारार्थी किंवा नकारार्थी' शकतात:

उदा., 
(१) हा गुलाब चांगला आहे. 
→  होकारार्थी वाक्य
(२) हा गुलाब वाईट नाही.
 →  नकारार्थी वाक्य

(आ) क्रियापदाच्या रूपावरून असलेला वाक्यप्रकार.
वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून वाक्यांचे चार प्रकार आहेत.
 • (१) स्वार्थी वाक्य 
 • (२) आज्ञार्थी वाक्य 
 • (३) विध्यर्थी वाक्य
 • (४) संकेतार्थी वाक्य.

क्रियेतुन का्य बोध होतो त्यावरून

(१) स्वार्थी (स्व + अर्थी) वाक्य :

पुढील वाक्ये नीट वाचा व समजून घ्या :
(१) मी दररोज शाळेत जातो.
(२) मी पहाटे व्यायाम केला.

वरील वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून काळाचा  बोध होतो. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून नुसताच काळाचा बोध होत असेल, तर त्याला स्वार्थी वाक्य म्हणतात. म्हणून,

 (१) मी दररोज शाळेत जातो. 
स्वार्थी वाक्य
(२) मी पहाटे व्यायाम केला. 
स्वार्थी वाक्य

(२) आज्ञार्थी वाक्य :

पुढील वाक्ये नीट वाचा व समजून घ्या :
(१) दररोज शाळेत जा.
(२) नेहमी पहाटे व्यायाम कर.

वरील दोन्ही वाक्यातील क्रियापदाच्या रूपातून आज्ञा केली आहे. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, प्रार्थना, विनंती, उपदेश, आशीर्वाद व सूचना या गोष्टींचा बोध होतो, त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतात.
म्हणून,
(१) दररोज शाळेत जा. (आज्ञा)
(२) देवा, मला चांगली बुद्धी दे. (प्रार्थना)
(३) कृपया, मला पुस्तक दे. (विनंती)
(४) मुलांनो, खूप अभ्यास करा. (उपदेश) वाक्ये
(५) तुम्हांला नक्की यश मिळेल. (आशीर्वाद)
(६) येथे धुंकू नये. (सूचना)

(३) विध्यर्थी वाक्य :

पुढील वाक्ये नीट वाचा व समजून घ्या :
(१) विदयार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी. (इच्छा/अपेक्षा)
(२) वर्ग स्वच्छ ठेवणे, हे आपले कर्तव्य आहे. (कर्तव्यदक्षता)
(३) बहुतेक पुढच्या आठवड्यात परीक्षा होतील. (शक्यता)
(४) आत्मविश्वास असणाराच विदयार्थी यशस्वी होतो. (योग्यता)
वरील वाक्यांमधील क्रियापदावरून विधी (म्हणजे वरच्या
कंसातील गोष्टी) व्यक्त होतात.

ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून इच्छा, कर्तव्य, शक्यता, योग्यता वगैरे गोष्टी (विधी) व्यक्त होतात, अशा वाक्याला विध्यर्थी वाक्य म्हणतात. म्हणून, वरील सर्व वाक्ये 'विध्यर्थी वाक्ये' आहेत.

(४) संकेतार्थी वाक्य :

पुढील वाक्ये नीट वाचा व समजून घ्या :
(१) तू नियमित अभ्यास केलास, तर नक्की पास होशील.
(२) जर पाऊस पडला, तर रान हिरवेगार होईल.

वरील दोन्ही वाक्यांत पहिली अट पूर्ण केली, तर पुढचा परिणाम होईल, असा संकेत दिला आहे. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपातून अट किंवा संकेत दिसून येतो, त्या वाक्याला संकेतार्थी वाक्य म्हणतात. म्हणून, 

(१) तू नियमित अभ्यास केलास, तर नक्की पास होशील.
→ संकेतार्थी वाक्य
(२) जर पाऊस पडला, तर रान हिरवेगार होईल.
→ संकेतार्थी वाक्य

Read Marathi Grammar Topic Wise Marathi Grammar       

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post