Interrogative Sentence Examples In Marathi ( What is WH question )


 What Is an Interrogative Sentence

Interrogative Sentence, प्रश्न तयार करणे Interrogative sentence म्हणजेच question (प्रश्न). विधानात । फरक आहे? हे कळण्यासाठी खालील वाक्यांचे निरीक्षण प्रश्नात काय कराः

i. He is happy.  ii. Is he happy?
iii. He runs.   iv. Does he run?

Interrogative Sentence Examples In Marathi

१. वरील वाक्यांत काय फरक आहे?
२. वाक्य क्र. i, iii प्रश्न आहेत की वाक्य क्र. ii, iv?
३. प्रश्न कशावरून ओळखायचा व वाक्य कशावरून ओळखायचे?
४. वाक्यापासून प्रश्न तयार करावयाचा असल्यास काय करावे लागेल? 

1 ) वरील वाक्यांचे निरीक्षण केल्यास आपणास खालील गोष्टी कळतात: वाक्याच्या शेवटी पूर्णविराम ( . ) full stop येतो तर प्रश्नाच्या शेवटी प्रश्नचिन्ह (? ) question mark येते.

२. विधानापासून प्रश्न तयार करण्यासाठी वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद कर्त्याच्या आगोदर ठेवतात.
३. वाक्याची रचना S-V - O/C असते तर सहाय्यकारी क्रियापद आगोदर घेतल्याने प्रश्नाची रचना V-S-0/C-? होते. (साह्यकारी क्रियापद- कर्ता- कर्म/पुरक-? (प्रश्नचिन्ह))

४. वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसेल तर वाक्याच्या सुरवातीला Do/ Does / Did घेतात व मुख्य क्रियापद त्याच्या मूळ जागीच परंतु काळविरहित येते.*
उदा.
Statement : He runs.
Question : Does he run?

वाक्यातील क्रियापदाच्या काळानूसार व कर्त्यानूसार Do / Does /Did वापरतात

Interrogative Sentence Examples 

  1. Statement: Ram helped me. (Did)
  2. Question:Did Ram help me?
  3. Statement: Ram helps me. (Does)
  4. Question: Does Ram help me?
  5. Statement: My friends help me. (Do)
  6. Question: Do my friends help me?

या ठिकाणी जो प्रश्न तयार होतो तो yes/no प्रश्न असतो. Yes/no प्रश्न म्हणजे असा प्रश्न ज्याचे उत्तर yes/no असते व
ज्याची सुरुवात helping verb ने होते. अर्थ बदलऊ द्यायचा नसेल तर मात्र होकारात्मक वाक्याचा नकारात्मक प्रश्न तयार करतात व नकारात्मक वाक्याचा होकारात्मक प्रश्न तयार करतात. बऱ्याच परीक्षांत असे करावयास सांगतात.
  1. Statement : He runs.
  2. Question : Doesn't he run?
  3. Statement : He does not run.
  4. Question : Does he run?
Interrogative Sentence Examples In Marathi

Exercise22.1: Make questions from the following statements.( Interrogative Sentence Examples )

1. No one would read it.
2. Her family and their well-being were her highest priority. .
3. It is time for the villagers to wake up and do something themselves.
4. Self-esteem is the most important value in life.
5. Poverty-free world would be economically much stronger than the world of today.
6. It sounded like a lot of fun. (Didn't)
7. My friend asked If I wanted fresh coconut water.
8. No city municipality can possibly clean our streets 24 hours a day.
9. More needs to be done at the policy level. (10th)

Wh- questions (open questions) - ( what are wh questions examples )

Wh- questions (open questions)


Wh-question - Wh प्रश्न तयार करणे खालील प्रश्न पहा. 
1. Who is your friend?
2. Are you happy today?
3. How many friends do you have?
4. Can you help me?
5. Why are you laughing?
6. Do you like to play games?


१. वरील प्रश्नात कोणते प्रश्न yes/no प्रश्न व कोणते प्रश्न wh प्रश्न आहेत?
२. Wh- प्रश्न व yes/no प्रश्न यात कोणता फरक आहे?
३. Wh- प्रश्नात सहाय्यकारी क्रियापद कोठे येते व yes/no प्रश्नात सहाय्यकारी क्रियापद कोठे येते? वरील गोष्टींचे निरीक्षण केल्यास खालील गोष्टी आपल्या लक्षात येतातः
Wh- questions (open questions)

१. Wh- प्रश्न म्हणजे What, Who, Whom, Whose, Why, Where, When, How इ. शब्दांनी सुरू होणारे प्रश्न,
२. Wh- प्रश्न तयार करण्यासाठी सुरवातीला Wh- शब्द घेतात, त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद घेतात. त्यानंतर कर्ता-क्रियापद अशी रचना करून शेवटी प्रश्नचिन्ह देतात.
उदा. What are you doing?

३. जर वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसेल तर Wh शब्दानंतर do/ does / did घेतात. नंतर कर्ता-क्रियापद घेतात व नंतर इतर वाक्यांश येतो.
I wrote a book. What did I write?*

परीक्षेत अधोरेखित भाग उत्तर म्हणून मिळविण्यासाठी Wh प्रश्न करावा लागतो. खाली Wh शब्दाचा अर्थ व कोणता भाग अधोरेखित असल्यानंतर कोणत्या शब्दाने प्रश्न तयार होईल ते दिलेले आहे
1. Who कोण : मानव कर्ता अधोरेखित असेल तर प्रश्नाची सुरूवात Who ने होते.
उदा.
  • He is very happy.
  • Who is very happy?

2. Whom कोणाला : मानव कर्म अधोरेखित असेल तर प्रश्नाची सुरूवात Whom ने होते.
उदा.
  •  He gave a pen to Ram.
  •  Whom did he give a pen?
3. Whose कोणाचा : मालकीदर्शक शब्द अधोरेखित असेल तर प्रश्नाची सुरूवात Whose ने होते.
उदा.
  • It is my car. It is Ravi's car.
  •  Whose car is it?
4. What काय : निर्जीव कर्ता, कर्म व पूरक भाग अधोरेखित असेल तर प्रश्नाची सुरूवात What ने होते.
i. Partur is a small town. (कर्ता अधोरेखीत)
→ What is a small town?

ii. Partur is a small town. (पूरक अधोरेखीत)
What is Partur?

iii. I wrote a letter. (कर्म अधोरेखीत)

5. Where कोठे : ठिकाण अधोरेखित असेल तर प्रश्नाची सुरूवात Where ने होते. ठिकाणापूर्वी बहूतेकवेळी preposition दिलेले असते.
उदा. I went to Partur.
→ Where did I go?

6. When केंव्हा : वेळेचा शब्द अधोरेखित असेल तर प्रश्नाची सुरूवात When ने होते.
उदा. We left Dehradun early in the morning.
→ When did we leave Dehradun?

7. How कसे : क्रियेची पध्दत अधोरेखित असेल तर प्रश्नाची सुरूवात How ने होते.
उदा. It was raining heavily.
→  How was it raining?

8. Which कोणता : विशेषण अधोरेखित असेल तर प्रश्नाची सुरूवात Which ने होते.
उदा. 
I like blue dress.
→ Which dress do I like?

9. Why का : कारणदर्शक शब्द अधोरेखित असेल तर प्रश्नाची सुरूवात Why ने होते.
उदा. We should take regular exercise to be healthy.
→ Why should we take regular exercise?
He helped me because I am his friend.
Why did he help me?

10. How many किती : मोजता येणाऱ्या वस्तूंची संख्या अधोरेखित
असेल तर प्रश्नाची सुरूवात How many ने होते. Mai
उदा. Forty three rescue teams were working.
→ How many rescue teams were working?

11. How much किती : मोजता न येणारा घटक अधोरेखित असेल तर प्रश्नाची सुरूवात How much ने होते.
उदा. Nehru liked India very much.
→ How much did Nehru like India?

12. How often किती वेळा: घटनेची वारंवारीता अधोरेखित असेल तर
How often ने प्रश्नाची सुरुवात होते..
UGT. He went to Pune twenty times.
→How often did he go to pune? ?

13. How far किती दूर : अंतर अधोरेखित असेल तर प्रश्नाची सुरूवात How far ने होते.
उदा. Aurangabad is sixty kilometres from Jalna.
→ How far is Aurangabad from Jalna?

14. How long किती काळ : वेळेचा कालखंड अधोरेखित असेल तर प्रश्नाची सुरूवात How long ने होते.
उदा. Ravi remained in school for eight hours.
→  How long did Ravi remain in school?

सूचना : कर्ता अधोरेखित असेल तर Wh प्रश्नामध्ये कर्ता व सहाय्यकारी क्रियापदाच्या जागांची अदलाबदल (Inversion) होत नाही.
उदा. i. It imparts fertility.
→ What imparts fertility? 
ii. All fourteen bodies had been sent to Kala hospital. .
→What had been sent to Kala hospital?

how to answer passage questions - How to Answer Comprehension Questions Effectively

how to answer passage questions


प्रश्न
बऱ्याच परीक्षेत "उतारा व त्यावर आधारीत अनेक प्रश्न' अशी प्रश्नांची रचना असते. या अनेक प्रश्नांद्वारे विद्यार्थ्यांच्या विविध कौशल्याची परीक्षा घेण्यात येते. विद्यार्थ्यांना विशिष्ट कौशल्ये आत्मसात आहेत का हे पाहण्यासाठी विशिष्ट प्रकारचा विचारण्यात येतो. कोणत्या कौशल्याची परीक्षा घेण्यासाठी कोणता प्रश्न विचारण्यात येतो ते खाली दिलेले आहे त्याचा नीट अभ्यास करा.

१. संपूर्ण उताऱ्याचा विषय कोणता/ एका वाक्यात उताऱ्याचा सार सांगता येतो का हे पाहण्यासाठी Who / What are described here? असा प्रश्न विचारण्यात येतो.

२. उताऱ्यातील विशिष्ट भाग शोधता येतो का/ सापडतो का हे पाहण्यासाठी Where were the scholars living? असा विचारतात.

३. उताऱ्यातील मुख्य मुद्दे, त्यांची उदाहरणे माहीत झाली का हे पाहण्यासाठी What activities did the scholars perform? असा प्रश्न विचारतात.

४. उताऱ्यात सुचीत केलेली माहिती कळते का/ उताऱ्याचा उद्देश कळतो का हे पाहण्यासाठी Why did they sit together? असा प्रश्न....

५. उताऱ्यातील उदाहरणांकडे बघण्याचा विद्यार्थ्याचा दृष्टीकोन काय आहे? अशा परिस्थितीत विद्यार्थ्याने काय केले असते? हे पाहण्यासाठी
What would you do if you were one of the scholars? असा
प्रश्न...
...असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारण्यात येतात. प्रश्नांची उत्तरे लिहिण्यासाठी प्रश्नांचे अर्थ व त्यांची संभाव्य उत्तरे माहीत असणे आवश्यक आहे. प्रश्न सूरू करणाऱ्या Wh- शब्दाचा अर्थ कळला तरी प्रश्नाच्या अर्थाचा अंदाज आपणास येतो. खाली काही Wh-शब्द व त्यांचे अर्थ दिलेले आहेत. त्याच बरोबर संभाव्य उत्तरे देखील दिलेली आहेत.

• When 'केंव्हा' ने प्रश्न सुरू होत असेल तर उत्तर वेळ, वार, दिनांकाच्या रुपात येते. प्रश्न रुपात येते.
• How Many 'किती' ने प्रश्न सूरू होत असेल तर उत्तर संखेच्या रुपात येते.

• How far 'किती दूर' चे उत्तर अंतराच्या रूपात येते.
• How long 'किती काळ' चे उत्तर काळाच्या रुपात येते.

• Who 'कोण' चे उत्तर व्यक्तीच्या रुपात येते. Why 'का' चे उत्तर because कारणाच्या किंवा to+ क्रियापद असे येते.
• How 'कसे' चे उत्तर क्रियेच्या व क्रियेच्या पध्दतीच्या रुपात येते.

• What 'काय' चे उत्तर वस्तू किंवा नाम किंवा क्रियेच्या रुपात येते.
• Which 'कोणते' चे उत्तर माहिती असलेली वस्तू, रुपात येते. याच बरोबर प्रश्नातील महत्वाचे ज्या वाक्यामध्ये सापडतील ते वाक्य त्या प्रश्नाचे संभाव्य उत्तर आहे असे भाषेत कच्चे असलेल्या विद्यार्थ्यांनी समजावे व ते संपूर्ण वाक्य उत्तराच्या रुपात लिहाये.
 (Wh-शब्दांच्या अर्थांसाठी त्यांच्या संभाव्य उत्तरांसाठी मागील पाठ पहा.)

पुढे एक उतारा व (वरील शब्दांच्या व प्रश्नांच्या अर्थाचा सराव व्हावा व उत्तरे लिहीता यावीत म्हणून) त्या खाली प्रश्न
दिलेले आहेत त्यांची उत्तरे लिहा व दिलेल्या उत्तरांशी जुळवून पहा.

Exercise: Read the following passage and answer the questions given below.*


In Vishnupur there were four scholars living together. They had studied grammar for twelve years and spent twelve more in mastring the scriptures; but by the time they had finished their studies they found that they were in bad plight: their legacies were exhausted and not one patron was willing to make them an allowance. So they sat down together to think out what they should do to make a living.

Questions : ( how to answer passage questions )

1. Where did the scholars live?
2. When did they find that they were in bad plight?
3. Who were living in Vishnupur?
4. How long did they study grammar?
5. How many years did they spend on the scriptures?
6. What did they do for 24 years?
7. Why did they sit together? 
8. How many scholars were living in Vishnupur?

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post