कथा लेखन म्हणजे काय ? ( कथा लेखन मराठी - नमुना व महत्त्वाचे घटक )

कथा म्हणजे काय?

कथा लेखन म्हणजे काय
कथा लेखन म्हणजे काय 


कथा लेखन मराठी - कथेत घटना-प्रसंग असतात. पात्रे असतात. घटना-प्रसंग असल्याने स्थळ, काळ, वेळ या बाबी असणारच. या सगळ्यांना व्यवस्थित गुंफण्यासाठी कथानक असते. कथेमध्ये या सर्व बाबी आवश्यक असतात. कथेतील पात्रांचे एकमेकांशी बरेवाईट संबंध असतात. त्यांतून ताणतणाव, संघर्ष, गुंतागुंत निर्माण होते. पात्रांतले ताणतणाव, संघर्ष वाढले की, उत्कर्षबिंदू निर्माण होतो. हे सर्व घटक कथेचे अंगभूत घटक असतात. तसेच, कथेला एक शीर्षकही असते. 

कथेची व्याख्या आपल्याला अशी करता येईल : ( कथा लेखन म्हणजे काय )

'एका विशिष्ट स्थलकालात पात्रांच्या परस्परसंबंधातून घडलेल्या घटनांचे विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे कथा होय.' कथेचे वर सांगितलेले अंगभूत घटक सर्व कथांमध्ये सारख्याच प्रमाणात असतात असे नाही. लेखकाच्या हेतूनुसार ठरावीक घटकांना जास्त महत्त्व मिळते

कथेची पूर्वपीठिका १८०६ साली छापलेले ‘बालबोधमुक्तावलि' हे मराठीतील गोष्टीचे पहिले पुस्तक होय. त्यानंतर पंचतंत्र (१८१५), हितोपदेश (१८१५), सिंहासनबत्तिशी (१८२४), इसपनीतिकथा (१८२८), वेताळपंचविशी अशी अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली.

 'मराठी ज्ञानप्रसारक' या १८५० साली सुरू झालेल्या नियतकालिकातून अनेक लहान लहान गोष्टी प्रसिद्ध झाल्या. यांतील बहुतेक सर्व गोष्टी रचनेच्या दृष्टीने अत्यंत प्राथमिक स्वरूपाच्या होत्या. आजच्या कथेची खऱ्या अर्थाने सुरुवात १८९० साली झाली. प्रख्यात कादंबरीकार ह. ना. आपटे यांनी त्या वर्षी करमणूक' साप्ताहिक सुरू केले. त्यातून त्यांनी दैनंदिन जीवनाचे प्रतिबिंब असलेल्या स्फुट गोष्टी लिहिल्या. पुढे अनेक कथाकारांनी अनेक अंगांनी मराठी कथा समृद्ध करीत नेली.

 ग्रामीण कथा, दलित कथा असे नवनवीन प्रवाह निर्माण झाले. स्वातंत्र्यानंतर शिक्षणाचा प्रसार झाला. विविध जातिधर्माचे लोक शिक्षणाच्या कक्षेत आले. स्त्रियांमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढले. या सगळ्या समाजघटकांमधून कथालेखक निर्माण झाले. त्यामुळे जीवनाचे विविधांगी दर्शन घडवणाऱ्या कथा मराठीत लिहिल्या जाऊ लागल्या. कथेचे घटक

कथाबीज म्हणजे काय ? 

(१) कथाबीज : कथा म्हणजे अनेक घटनांची मालिका असते. ही घटनांची मालिका आपण आत्यंतिक संक्षिप्त रूपात दोन-तीन वाक्यांत सांगू शकतो. ही कथेची मूळ घटना होय. या घटनेलाच 'कथाबीज' म्हणतात.

कथानक म्हणजे काय ? 

(२) कथानक : कथेत अनेक घटना असतात. लेखक या घटना विशिष्ट क्रमाने रचत जातो. या रचनेतून पात्रांच्या कृती, त्यांची स्वभाववैशिष्ट्ये, भोवतालचे सामाजिक वातावरण, परस्परसंबंधांतून निर्माण होणारे संघर्ष हे सर्व घटक उलगडत जातात. कथेच्या भावाशयासहित पात्रांच्या कृतीतून निर्माण होणाऱ्या घटनांची मालिका म्हणजे कथानक.

पात्रचित्रण म्हणजे काय ?

(३) पात्रचित्रण : पात्र म्हणजे कथानकातील शब्दरूप व्यक्तीच होत. या व्यक्तीची वृत्ती, प्रवृत्ती, तिच्या भावभावना, विचार, कल्पना, तिच्या कृती, अन्य व्यक्तींशी असलेले परस्परसंबंध हे सर्व लेखक वास्तवातील माणसासारखे रेखाटतो. यातून जे शब्दरूप चित्रण निर्माण होते, ते 'पात्रचित्रण' होय.

वातावरण निर्मिती म्हणजे काय ?

(४) वातावरण निर्मिती : आपल्या अवतीभोवतीच्या परिसरात सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, भौगोलिक इत्यादी घटकांनी एक विशिष्ट वातावरण निर्माण होते. ते स्थळकाळाप्रमाणे बदलते. असे वातावरण लेखक कथेत निर्माण करतो. वाचक या वातावरणामुळे कथेशी जवळीक साधू शकतो. शब्दांतून व्यक्त झालेली कथा मानवी आयुष्यात घडणारी कथा भासली पाहिजे. वातावरण निर्मितीतून हे कार्य घडत असते.

नाट्यमयता / संघर्ष  म्हणजे काय ?

(५) नाट्यमयता/संघर्ष : कधेतील भावभावना एका क्षणाला उत्कट, तीव्र होतात. पात्रांमधील संघर्षही तीव्र होत जातो. आता पुढे काय होईल, पुढे काय होईल अशी वाचकाला उत्कंठा वाटत राहते. वाचकाच्या कल्पनेप्रमाणे पुढे घडले नाही की त्याची उत्कंठा आणखी वाढते. भावभावनांचा हा जो खेळ लेखकाने मांडलेला असतो, ती नाट्यमयता होय.

संवाद म्हणजे काय ?

(३) संवाद : कथेतील संवाद पाल्हाळीक असता कामा नयेत. तर ते चटपटीत, आकर्षक व भाववाही असावेत. पात्रांचे व्यक्तिमत्त्व त्या संवादांतून व्यक्त व्हायला हवे. कथानक नाट्यमयतेने पुढे पुढे सरकायला हवे. कथेची भावनात्मकता त्यांतून व्यक्त झाली पाहिजे, असे संवाद कथेची उंची वाढवतात.

भाषाशैली म्हणजे काय ?

(७) भाषाशैली : कथेतील पात्रांच्या तोंडची भाषा व कचेच्या उर्वरित भागातील भाषा हे कथेतील भाषेचे दोन ढोबळ भाग पडतात, पात्रांच्या तोडची भाषा ही पाशचे वय, शिक्षण, सामाजिक दर्जा, आर्थिक स्तर, त्याची मनोवृत्ती इत्यादी अनेक घटकांवर अवलंबून असते.

 पात्राच्या स्वरूपानुसार त्याच्या तोंडची भाषा लेखकाला लिहिता आली पाहिजे. पात्रांच्या तोंडच्या भाषेखेरीज उरलेली भाषासुद्धा कथेचे व्यक्तिमत्त्व घडवत असते. ती भाषा पात्रांचे चित्रण करते. वातावरण उभे करते. कथानकाला पुढे नेते. ती वाचकाशी संवाद साधत असते. 

या भाषेत वापरलेले शब्द, प्रतिमा - प्रतीके - अलंकार हे महत्त्वाचे असतातच; पण लेखकाचा दृष्टिकोन, त्याचे विचार, त्याची मानसिकता इत्यादींचाही त्या भाषेवर परिणाम होत असतो. हे सर्व म्हणजे लेखकाची 'भाषाशैली' होय.

कथेची वैशिष्ट्ये -

(१) कथा मनोरंजन करते : 

कथा वाचताना आपण कथेतील पात्रांच्या जगात प्रवेश करतो. नेहमीच्या ताणतणावांनी भरलेल्या जगातून बेगळ्या जगात विहार करायला मिळते, याचा आनंद होतो. काही वेळा असेही घडते - माणसाला मनुष्यस्वभावाविषयी कुतूहल असते. 

कथेमार्फत मनुष्यस्वभावाच्या अनेक तन्हांशी परिचय होतो. त्यामुळे आपल्याला आपले कुतूहल शमवण्याचा आनंद मिळतो. काही कथाच मुळात विनोदनिर्मितीसाठी लिहिलेल्या असतात. अशा विविध कारणांनी कथेमुळे आनंद मिळतो. मनोरंजन होते.

(२) कथेमुळे सुसंस्कार होतात : 

कथेमध्ये पात्रे असतात. ती वास्तवातील माणसांसारखीच दाखवलेली असतात. त्यांच्या वागण्याबोलण्यातून, घटना-प्रसंगांतून चांगल्या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले जाते. चांगली मूल्ये व बाईट मूल्ये यांच्या संघर्षात चांगल्या मूल्यांचा विजय होताना दाखवलेला असतो. कथा वाचकाला प्रेरणा, स्फूतों व बोध देते. समता, स्वातंत्र्य, बधुभाव, न्याय, मानवता अशा कितीतरी मूल्यांचा संस्कार

(३) कथा वाचकांची उत्कंठा वाढवते:

कथत सतत 'पूढे काय होणार?' अशी वाचकाला उत्सुकता वाटत राहते, वाचक स्वत:चे काही अंदाज बांधतो. लेखक घटनांची गुफण इतक्या कौशल्याने करतो की बाचकाचे अंदाजही कोलमडून पडतात. वाचकांवर होतो. आपण कोणत्या मार्गाने जावे, कोणता मार्ग ती गुंतवून ठेवते. 

तसेच, कमी पात्रे, कमी प्रसंग, कमी संघर्ष, टाळावा, याचा बोध माणसाला होतो. हे सर्व सुसंस्कार होत. त्यामुळे त्याची उत्सुकता आणखी वाढते. मनुष्यस्वभावाचे अकल्पित नमुने वाचकासमोर येतात. त्यांच्या ज्ञानामुळे वाचक अधिक प्रगल्भ होतो. प्रगल्भ होत जाण्याचा एक उदात्त आनंद वाचकाला मिळतो. या उत्कंठावर्धक रचनेमुळे वाचकावर नकळत संस्कार होत जातात.

(४) कथा एककेंद्री असते : 

कमीत कमी पात्रे कमीत कमी घटना- -प्रसंग, कमीत कमी परिसर, कमीत कमी मूल्यांचा संघर्ष यांमुळे कथेचा एकच परिणाम साधला जातो.

(५) कथा भूतकाळात लिहिली जाते :

आपण वर्तमानकाळात जगतो, तेव्हा सर्वजण एकाच पातळीवर असतो. प्रत्येकजण आपापली कृती करीत असतो. प्रत्येकाच्या कृतीचे परिणाम काय होतील, हे कोणालाही माहीत नसतात. ते भविष्यकाळात दिसणार असतात. 

साहजिकच कोणत्या कृतीचे, मूल्याचे कोणते परिणाम होतील, ते अंधारातच राहते. खरे तर, घटना पूर्ण झाली, कथानक पूर्ण झाले की ते सर्व भूतकाळात जमा होते. तसेच, वाचकाची उत्कंठा शमण्याच्या दृष्टीने, त्याच्यावर संस्कार होण्याच्या दृष्टीने वर्तमानकाळातील रचना उपयुक्त नसते. म्हणून साधारणपणे कथा भूतकाळात लिहिली जाते.

(६) कथेच्या माध्यमातून जीवनाचा वेध घेतला जातो :

जीवनातील घटना, भावभावना, वैचारिक उलथापालथी यांचे दर्शन कथांतून घडत असते. मानवी जीवनाची अगणित रूपे कथांतून दिसतात. आपण स्वत:च्या जीवनात अनुभवतो, त्यापेक्षा कितीतरी व्यापक, विराट जीवनदर्शन कथांमधून घडते.

(७) श्रवणीयतेमुळे कथेचे सादरीकरण करता येते : 

समोर उपस्थित असलेल्या श्रोत्यांसमोर कथा कथन करता येते, म्हणजे सांगता येते. कथा श्रवणोय असल्यामुळे हे शक्य होते. कथा श्रवणीय का होते? कारण ती उत्कंठावर्धक असते. वाचकाच्या मनाला साहजिकच ऐकता ऐकता कथा समजून घेणे सहज शक्य होते.  कधी कधी कथेतील विनोदामुळे आकर्षकता वाढते. हे सगळे घटक श्रवणीयता वाढवायला मदत करतात, 

कथेचे सादरीकरण सादरीकरणाचे अभिवाचन व कथाकथन हे दोन भाग आहेत :

(१) अभिवाचन : लिहिलेली किंवा छापलेली कथा आहे तशीच वाचणे म्हणजे अभिवाचन होय. अभिवाचनात विरामचिन्हे लक्षात घेऊन वाचन करावे लागते. कथेतील भावनांचे चढउतार लक्षात घ्यावे लागतात. वाचनाची द्रुत लय व संथ लय यांचा गरजेप्रमाणे उपयोग करून घ्यावा लागतो. ऐकून समजून घेता येईल, असा वेग ठेवावा लागतो. थोडक्यात, कथेचे भावपूर्णतेने वाचन केले जाते. येथे वाचिक अभिनय महत्त्वाचा असतो.

(२) कथाकथन : कथाकथनासाठी कथा प्रथम पूर्णपणे पाठ केली जाते. गप्पांच्या जवळ जाणाऱ्या शैलीत कथा सादर केली जाते. वाचिक अभिनयाची गरज असतेच; शिवाय काही प्रमाणात हावभाव, क्वचित हालचाली यांचाही उपयोग केला जातो. शब्दफेक, प्रभावी उच्चारण, स्पष्टता, गर्भितार्थ श्रोत्यांपर्यंत थेट पोहोचवणे हे फार मोठे कौशल्य असते.

समारोप 
छपाईचे तंत्रज्ञान निर्माण होण्यापूर्वी कथा मौखिक रितीने एकमेकांना सांगितली जात होती. आजची कथाकथनाची पद्धत टिकून आहे. निबंध, लेख, वैचारिक वाङ्मय, कादंबरी हे प्रकार कथनाद्वारे वाचकांपर्यंत पोहोचवणे कठीण असते. पण कथा मात्र अजूनही कथन पद्धतीने वाचकांपर्यंत नेता येते.

(2) कथेची कोणतीही दोन वैशिष्ट्ये तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

उत्तर : (१) कथा मनोरंजन करते : 

कथा मनोरंजन करते म्हणजे कथा वाचताना वाचकाला आनंद मिळतो. त्याचे मन कथेत गुंतून राहते. वाचक कथा वाचताना कथेतील पात्रांच्या जगात प्रवेश करतो. त्याला नेहमीच्या ताणतणावांनी भरलेल्या जगाहून वेगळ्या जगात विहार करायला मिळते. वास्तवातील ताणतणावांपासून तो काही काळ दूर जातो.

 या घटनेतून त्याला आनंद मिळतो. कथेमार्फत वाचकाला मनुष्यस्वभावाचे अनेक नमुने पाहायला मिळतात. माणसाच्या स्वभावाविषयीची त्याची जाण वाढते. याचा त्याला आनंदच होतो. काही कथा तर विनोदनिर्मितीसाठीच लिहिल्या जातात. त्या कथांमुळे वाचक खळखळून हसतो. या सर्व बाबींमुळे वाचकाचे मनोरंजनच होते. कथेचे ते एक मोठे वैशिष्ट्य ठरते.

(२) कथेमुळे सुसंस्कार होतात : 

कथेमध्ये पात्रे असतात. ती वास्तवातील माणसांसारखीच रंगवलेली असतात.त्यांच्या वागण्याबोलण्यातून, घटना-प्रसंगांतून, चांगल्या-वाईट मूल्यांचे दर्शन घडते. कथेमध्ये चांगल्या व वाईट मूल्यांच्या संघर्षात चांगल्या मूल्यांचा विजय दाखवलेला असतो. या संघर्ष-दर्शनाने वाचकाला प्रेरणा मिळते;

 स्फूर्ती मिळते. वाचक त्यातून बोध घेतो. स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, न्याय, मानवता अशा कितीतरी उदात्त मूल्यांचा वाचकाच्या मनावर संस्कार होतो. आपण स्वत:च्या जीवनात कोणत्या मार्गाने जावे, कोणता मार्ग टाळावा याचे दिग्दर्शन होते. हे सुसंस्कारच होत.

कथा लेखन मराठी - नमुना व महत्त्वाचे घटक


Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post