वाक्य रूपांतर किंवा वाक्य परिवर्तन मराठी व्याकरण

वाक्य रूपांतर किंवा वाक्य परिवर्तन मराठी व्याकरण

• लेखन करताना काही वेळा वाक्यरचनेत बदल करण्याची गरज भासते, अशा बदलाला 'वाक्यरूपांतर किंवा वाक्यपरिवर्तन' असे म्हणतात.
• वाक्यांचे रूपांतर करताना वाक्यरचनेत बदल होतो, पण वाक्यार्थाला बाध येत नाही. विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी, आज्ञार्थी या वाक्यांचे एकमेकांत रूपांतर होते.
उदाहरणार्थ,
वाक्य रूपांतर किंवा वाक्य परिवर्तन मराठी व्याकरण


• पुढील वाक्ये नीट अभ्यासा :

(१) मुलांनी शिस्त पाळणे खूप आवश्यक आहे. (विधानार्थी वाक्य.)
(२) किती आवश्यक आहे मुलांनी शिस्त पाळणे! (उद्गारार्थी वाक्य.)
(३) मुलांनी शिस्त पाळणे आवश्यक नाही का? (प्रश्नार्थी वाक्य.)
(४) मुलांनो, शिस्त अवश्य पाळा. (आज्ञार्थी वाक्य.)

म्हणून : वाक्यार्थ्याला बाध न आणता वाक्याच्या रचनेत केलेला बदल म्हणजे वाक्यरूपांतर होय.

होकारार्थी - नकारार्थी (वाक्यरूपांतर)

पुढील वाक्ये नीट अभ्यासा.
(१) क्रिकेट मालिकेत भारतीय संघ विजयी झाला. (होकारार्थी वाक्य.)
(२) क्रिकेट मालिकेत भारतीय संघ पराभूत झाला नाही. (नकारार्थी वाक्य.)

होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर करताना आपण काय केले?
  • (१) विजयी - पराभूत 
  • (२) झाला झाला नाही.
दोन विरुद्धार्थी शब्दबंध घेऊन वाक्य बदलले. पण वाक्याचा अर्थ बदलला नाही. म्हणून, वाक्य रूपांतर करताना वाक्याच्या रचनेत बदल झाला, तरी वाक्याच्या अर्थात बदल होता कामा नये.

वाक्य रूपांतरण मराठी उदाहरण

(२) बापरे! किती वेगाने वाहने चालवतात ही तरुण मुले! वाक्यप्रकार उद्गारार्थी वाक्य   
विधानार्थी - नकारार्थी वाक्य → तरुण मुलांनी खूप वेगाने वाहने चालवू नयेत.

(३) स्वयंशिस्त ही खरी शिस्त नाही का?
वाक्यप्रकार → प्रश्नार्थी वाक्य
विधानार्थी - होकारार्थी वाक्य → स्वयंशिस्त ही खरी शिस्त आहे.

(४) मोबाइलचा अतिवापर योग्य नाही. 
वाक्यप्रकार + विधानार्थी - नकारार्थी वाक्य 
आज्ञार्थी वाक्य →  मोबाइलचा अतिवापर टाळा.

(५) खऱ्या समाजसेवकाला लोकनिंदेची भीती नसते.
वाक्यप्रकार + विधानार्थी – नकारार्थी वाक्य
प्रश्नार्थी वाक्य → खऱ्या समाजसेवकाला लोकनिंदेची भीती असते का?

वाक्य रूपांतर किंवा वाक्य परिवर्तन मराठी व्याकरण


4 Comments

Thanks for Comment

Previous Post Next Post