मला पंख असते तर मराठी निबंध। Mala Pankh Aste Tar Marathi Nibandh
मला पंख असते तर मराठी निबंध। Mala Pankh Aste Tar Marathi Nibandh
मला वाटते, प्रत्येक लहान मुलाची हीच इच्छा असते की, उंच आकाशात भरारी मारावी. अगदी लहानपणी पाठ केलेली एक कविता आठवते, "हे विमान उडते अधांतरी किती मौज दिसे ही पहा तरी !" म्हणून तर आकाशातील विमानाची घरघर ऐकू आली की लहान मुले विमान बघायला धावत जातात. मलाही फार लहानपणापासून या आकाशाचे आकर्षण वाटत असे आणि आपल्याला या पक्ष्यांसारखे पंख फुटले तर किती मजा येईल ना ! माझे बालपण जरा गावाबाहेर गेल्यामुळे माझे बरेचसे दोस्त हे पक्षीच होते. कावळे, चिमण्या, कोंबड्या, साळुक्या
या पक्ष्यांना निरखण्यात माझा वेळ मजेत जात असे. किती आरामात उडतात हे बेटे !
आपणही त्यांच्यासारखे उंच उडावे असे सारखे मला वाटत राही. मला पंख असते तर - मी दररोज काही अंतर उडत राहिले असते. कवी मंगेश पाडगावकर यांच्या कवितेत भेटणारा 'एक जिप्सी' माझ्या मनात सतत घुटमळत असतो मलाही खूप 'भटकंती' करावी असे वाटत असते. पण प्रवास म्हटला की खर्च आलाच. शिवाय प्रवासाची पूर्वतयारी, तिकिटे काढणे वगैरे नकोसे वाटते. मला पंख असते तर या कशाचीच आवश्यकता उरणार नाही. मनात आले की पंख पसरावे आणि दूरवर प्रवासाला निघावे. प्रवासाबरोबर मला प्रेक्षणीय स्थळे पाहण्याचीही मौठी हौस आहे. मला पंख असते तर मी खूप दूरवरचीही प्रेक्षणीय स्थळे पाहू शकले असते.
उडत उडत प्रवास करताना मी निसर्गाच्या खूप जवळ जाऊ शकेन. झाडांची ओळख पुस्तकांतून करून घेण्यापेक्षा त्या झाडांच्या निकट जाणे, त्यांची पाने, फुले, फळे यांची माहिती करून घेणे अधिक शक्य झाले असते. हवे तेव्हा आकाशात विहार केला असता आणि हवे तेव्हा हव्या त्या झाडावर विश्रांती घेतली असती. म्हणून 'पंख' हे मला स्वातंत्र्याचे, मुक्ततेचे प्रतीक वाटते. आकाशातील पक्ष्यांचा मला म्हणूनच हेवा वाटतो. पण या उडणाऱ्या पक्ष्यांनाही अनेकदा संकटांनाही सामोरे जावे लागते. हजारो मैलांचा प्रवास करणाऱ्या पक्ष्यांनाही कधी अपघातांना सामोरे जावे लागतेच. मोठे पक्षी लहान पक्ष्यांना मारतात.
शिकारी तर पक्ष्यांच्या मागावरच असतात. किती अडचणी सांगाव्यात? तसेच, मला पंख मिळाले तर माझ्याबरोबर अनेकांना पंख मिळतील आणि मग, यागगनपथावरील गर्दीही वाढत जाईल. म्हणजे शहरातील रस्त्यावरील गर्दी टाळण्यासाठी मी पंख मागितले, मिळवले पण तीच गर्दी तेथे उडाली तर कशाला हवेत हे पंख ! त्यापेक्षा विमानातून आरामात प्रवास करावा, हेच बरे !
मला पंख असते तर मराठी निबंध। Mala Pankh Aste Tar Marathi Nibandh
Tags:
मराठी निबंध लेखन