वीज नसती तर मराठी निबंध | vij nasti tar marathi nibandh

वीज नसती तर मराठी निबंध | vij nasti tar marathi nibandh


वीज नसती तर मराठी निबंध |  vij nasti tar marathi nibandh |

वीज नसती तर मराठी निबंध |  vij nasti tar marathi nibandh | 

    परवाच एका झोपडपट्टीला मोठी आग लागली. सुमारे अडीच हजार झोपड्या जळून खाक झाल्या. गोरगरिबांच्या उभ्या संसाराची राख झाली. सुमारे दीडशे माणसे होरपळून मेली. त्यांत तीन-चार महिन्यांच्या बाळापासून ते सत्तर वर्षांच्या वृद्धापर्यंतची माणसे होती. होरपळेलेली, किंकाळ्या फोडणारी, आपल्या वस्तू, आपले जिवलग यांचा जिवाच्या आकांताने शोध घेत सैरावैरा झालेली हजारो माणसे दूरदर्शनच्या पडदयावर पाहताना काळीज पिळवटून निघत होते. दूरदर्शनवर बघणेही नकोसा वाटणारा हा हृदयद्रावक प्रसंग निर्माण केला होता विजेने

    होय, विजेनेच ! शॉर्टसर्किट होऊन आगीने अक्राळविक्राळ रूप धारण केले होते. या विजेनेच क्षणार्धात होत्याचे नव्हते करून टाकले होते ! ही वीज नसती ना, तर हा उत्पात घडलाच नसता ! कधी कधी मनात येते, माणसाने ही वीज निर्माण करून संकटाचा केवढा मोठा डोंगर उभा करून ठेवला आहे ! खरंच, माणसाने ही वीज निर्माण करायलाच नको होती. नसतीच ही वीज, तर किती बरे झाले असते ! खरोखर, ही वीज निर्माणच झाली नसती तर? तर.  रात्री झगमगीत वाटल्या नसत्या ! माणसाला निरांजनाची-समईची ज्योत, मेणबत्तीचा, कंदिलाचा उजेड यांचाच आश्रय घ्यावा लागला असता

    आनंदाच्या प्रसंगी केली जाणारी रंगीबेरंगी नेत्रदीपक रोषणाई केवळ स्वप्नात वा कल्पनेतच राहिली असती. जीवनातील प्रत्येक क्षेत्रात विजेचे विलक्षण सामर्थ्य मानवासाठी उपयुक्त ठरले आहे. आज घरातील सर्व प्रकारच्या कामांत वीज ही गृहिणीची सखी झाली आहे. दळणे, कापणे, भाजणे, शिजवणे, केर काढणे, कपडे धुणे, स्वच्छता करणे अशा अनेक कामांत तिला विजेचीमोलाची मदत मिळते. आजच्या या यंत्रयुगात बरीचशी यंत्रे फिरतात, ती विजेच्या सामर्थ्यावर. वीज नसती तर इतकी यंत्रे फिरली नसती. औदयोगिक क्षेत्रात आज झालेली मानवाची प्रगती विजेविना शक्यझाली असती का? अगदी वैदयकीय क्षेत्रातही ही वीज मोठी कामगिरी करते

    अशक्त बाळाला 'इनक्युबेटर'मध्ये ठेवले जाते, त्यासाठी वीज हवीच असते. शल्यविशारद शस्त्रक्रिया करतात, तेव्हा वीज आवश्यक असते.आज विजेवर चालणाऱ्या दूरचित्रवाणीमुळे तसेच नभोवाणीमुळे आपण घरात बसून जगाचा फेरफटका मारू शकतो. संगणकामुळे जग जवळ आले आहे.ज्ञानविज्ञानाची भांडारे खुली झाली आहेत. वीज नसती तर हे कसे शक्य झाले असते? अंतरिक्षातील ही शक्ती माणसानेआपल्या मुठीत बंद करून घेतली आहे. ती जर त्याने गमावली, तर तो दुबळा व असहाय होईल.

वीज नसती तर मराठी निबंध | vij nasti tar marathi nibandh

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post