चैतन्य महाप्रभू मराठी कथा | Marathi Katha | Stories in Marathi

चैतन्य महाप्रभू मराठी कथा 


बंगालमध्ये नवद्वीपात गंगा नदीच्या काठी जगन्नाथ मिश्र आणि शची देवी नावाचे जोडपे राहात होते. ती दोघं अतिशय धर्मपरायण होती. मुलगा त्यांना एक अत्यंत सुंदर मुलगा होता. त्याचं नाव होतं निमाई. निमाईला वाढदिवसाच्या दिवशी बाबांनी सुंदर पोषाख आणला. 

नवीन पोषाख घालून निमाई आपल्या मित्रांना भेटायला गेला. सर्वजण गंगेच्या काठी खेळू लागले. खेळ खेळत असताना निमाईला एक गरीब दिसला. त्याचे मळकट कपडे फाटले होते. खूप दिवसांपासून त्याला पुरेसे अन्नही मिळालेले दिसत नव्हते. 

त्या मुलाकडे पाहून निमाईला खूपच वाईट वाटले. त्याने त्या गरीब मुलाची आस्थेने चौकशी केली. त्याला आपल्याजवळचा खाऊ दिला. त्याचे फाटके कपडे निमाईने स्वत: घातले आणि आपले नवीन कपडे त्या गरीब मुलाला दिले. 
चैतन्य महाप्रभू मराठी कथा | Marathi Katha | Stories in Marathi
चैतन्य महाप्रभू मराठी कथा

घरी आल्यावर माता शचीदेवीला ही घटना समजली. परंतु ती निमाईवर रागावली नाही. उलट तिला आपल्या मुलाचा अभिमान वाटला. गरिबांविषयी असलेली दया, करुणा पाहून वडिलांनीही त्याला प्रेमाने जवळ घेतले. हाच मुलगा पुढे बंगालमधील थोर संत "चैतन्य महाप्रभू" म्हणून जगभरात नावारूपास आला. 

चैतन्य महाप्रभुंचा धर्मशास्त्रांचा अभ्यास दांडगा होता. त्याहीपेक्षा त्यांचा ईश्वरानुभूतीचा अनुभव दांडगा होता. त्यामुळे शब्दज्ञानात ते कधीच अडकले नाहीत, की विद्वत्तेच्या जोरावर कोणाशी वाद घातला नाही. पारब्रह्म हे शब्दाच्या पलीकडले आहे. 

तिथे वाणी मौन होते. तिथे पोकळ शब्दांचे काय काम? परंतु एका विद्वान पंडिताला मात्र चैतन्य महाप्रभुंना वादविवाद हरविण्याची खुमखुमी आली. त्याने महाप्रभुंना उघड आव्हान दिले. परंतु शास्त्रचर्चा करुन आपली विद्वत्ता सिद्ध करण्याची महाप्रभुंची अजिबात इच्छा नव्हती. ते विद्वानाला म्हणाले

"मी तुला वादविवादात जिंकू शकलो नाही असे मी कबूल करुन वाटेल त्या कागदावर लिहून देतो. कृपा करुन मला भगवंताच्या अनुसंधानात राहू दे आणि तूही रहा त्यातच आपल्या दोघांचही भलं आहे!"

चैतन्य महाप्रभू मराठी कथा | Marathi Katha | Stories in Marathi

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post