गुरुभक्त उपमन्यू | मराठी कथा | Marathi Katha | Stories in Marathi

गुरुभक्त उपमन्यू मराठी कथा

धौम्य ऋषींनी उपमन्यूच्या गुरुभक्तीची परीक्षा घेण्याचे ठरविले. धौम्य ऋषींच्या आश्रमात अनेक शिष्य होते. त्यापैकी एक होता उपमन्यू, त्याच्याकडे आश्रमाच्या गाई चारायला नेण्याचे काम दिले होते. एकदा उपमन्यू आश्रमाच्या गाई चारुन संध्याकाळी आश्रमात परत आला. म्हणाले, "उपमन्यू! तुझी तब्बेत एवढी सदृढ कशी काय? काय खातोस मागून तेव्हा गुरुजींनी त्याला जवळ बोलावले. त्याच्याकडे निरखून पाहत तू?" 

"गुरुजी, मी रोज भिक्षा मागून खातो.” उपमन्यू म्हणाला. गुरुजी म्हणाले, "अरे! तुला ठाऊक नाही का, जी काही भिक्षा आणली ती प्रथम गुरुला अर्पण करायची असते म्हणून?" उपमन्यू म्हणाला, "गुरुजी, क्षमा करा. यापुढे अशी चूक होणार नाही.' पुढे उपमन्यू जी भिक्षा मागून आणी, ती सर्व तो गुरुदेवांना अर्पण करी. परंतु गुरुजी त्याला त्यातील एक कणही देत नसत. बरेच दिवस असे चालले. तरीही त्याची शरीरप्रकृती धडधाकट होती. गुरुजींनी पुन्हा त्याला विचारले, 
गुरुभक्त उपमन्यू | मराठी कथा | Marathi Katha | Stories in Marathi

"उपमन्यू! तू मागून आणलेली सगळी भिक्षा माझ्याकडे देतोस, मी तुला काहीही देत नाही. तरीही तुझी प्रकृती सदृढ कशी?" "गुरुजी, तुम्हाला भिक्षा आणून दिल्यानंतर मी पुन्हा भिक्षा मागायला जातो आणि मी स्वतः ती खातो." गुरुजी म्हणाले, "बेटा! ही वाईट गोष्ट आहे. तू तर आता दुसऱ्याचा हक्क हिरावून घेतो आहेस." 

"गुरुजी क्षमा करा मला. यापुढे मी अशी चूक करणार नाही.” असे म्हणून त्याने पुन्हा भिक्षा मागणे सोडून दिले. परंतु तरीही त्याच्या शरीर प्रकृतीत कोणताही फरक पडला नाही. याबाबत गुरुजींनी त्याला पुन्हा विचारले, "बेटा, तुला मिळालेली सगळी भिक्षा तू मला आणूस देतोस. पुन्हा भिक्षा मागत नाहीस. तरी तू अजूनही धडधाकट दिसतोस. हे कसे?" उपमन्यू म्हणाला, "गुरुजी, मी गाईचं दूध पिऊन राहतो." गुरुजी म्हणाले, '

'ही तर फार वाईट गोष्ट आहे. याला चोरी म्हणतात.' त्याने गुरुजींकडे क्षमा मागून गाईचं दूध पिणं बंद केलं. एवढं करुनही उपमन्यूची प्रकृती आहे तशीच! यावेळी गुरुजींनी त्याला कारण" विचारल्यावर तो म्हणाला, "गाईची वासरं दूध पिताना त्यांच्या तोंडातून जो फेस खाली सांडतो तो मी खात असतो.” गुरुजी म्हणाले, "बाळ, अशाने वासरं उपाशी राहतील. मुकी जनावरं दयाळू असतात. ती आपल्या नकोस.

" मालकाविषयी अधिक आपुलकी दाखवतात. त्यांच्यात तू वाटेकरी होऊ उपमन्यूने गुरुची ही आज्ञासुद्धा स्वीकारली. जेव्हा पोट भरण्याचे सगळे मार्ग बंद झाले तेव्हा त्याने जंगलातील झाडांचा पाला खाणे सुरु केले. परंतु त्याच्याने भूक थोडीच शमणार? तो रोज उपाशी राही. पण गुरुजींकडे त्याने कधी तक्रार केली नाही. गुरुजींचंही त्याच्याकडे पूर्ण लक्ष होतेच.  एके दिवशी उपमन्यू गाई चारायला नेहमीप्रमाणे निघाला. जाता जाता वाटेत त्याला जो झाडपाला दिसे तो खात पुढे जाई. नकळत त्याच्याकडून विषारी पानं खाल्ली गेली. पोटात जळजळ सुरु झाली. 

अंगाचा दाह होऊ लागला. हळू हळू डोळ्यापुढे अंधारी येऊ लागली. त्याला समोरचे काही दिसेना. संध्याकाळ झाली. सवयीप्रमाणे गाई आश्रमात परत आल्या. उपमन्यू परतला नाही. सर्वांना काळजी वाटू लागली. गुरुजी स्वतः शिष्यांना घेऊन उपमन्यूला शोधण्यासाठी निघाले. गुरुजी त्याला मोठमोठ्याने आवाज देऊ लागले. "उपमन्यू, बाळ कुठे आहेस तू?' खूप वेळानंतर एका विहिरीतून आवाज आला. "गुरुजी, मी इथे आहे.

 विहिरीत पडलोय." गुरुजींनी त्याला आश्रमात आणले. त्याच्याकडून सारी हकीगत -श्रवण केली. त्याच्यावर औषधउपचार करुन त्याला बरे केले. प्रसन्न होत गुरुजी म्हणाले, "बाळ उपमन्यू! तू परीक्षेत पास झालास. आता माझी खात्री पटली की तू खरोखरच विद्याभ्यास करण्यास योग्य आहेस.' मित्रांनो, जो गुरुविषयी अपार श्रद्धा आणि विश्वास बाळगतो; गुरु त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला कृपाशीर्वाद देतात.

गुरुभक्त उपमन्यू | मराठी कथा | Marathi Katha | Stories in Marathi

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post