शिबिराच्या आयोजकांना O+ या रक्तगटाची मागणी करणारे पत्र लिहा. | magni patra in marathi

शिबिराच्या आयोजकांना O+ या रक्तगटाची मागणी करणारे पत्र लिहा.

शिबिराच्या आयोजकांना O+ या रक्तगटाची मागणी करणारे पत्र लिहा.

शिबिराच्या आयोजकांना O+ या रक्तगटाची मागणी करणारे पत्र लिहा.

उत्तर: (१) मागणी पत्र:

दिनांक २८ मार्च २०१९

प्रति,
मा. सचिव
मानवता मित्र मंडळ,
शुक्रवारपेठ,
सोलापूर ४१३००२.

विषय : एका रुग्णाला O+ या रक्तगटाच्या तीन बाटल्या रक्त पुरवणे.

महोदय,

मी आपल्या शेजारच्या शनिवारपेठेत राहणारा इयत्ता दहावीतील विद्यार्थी आहे. माझ्या शेजारी राहणाऱ्या एक आजी गंभीरपणे आजारी असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. या शस्त्रक्रियेदरम्यान त्यांना O+ या रक्तगटाच्या तीन बाटल्या रक्ताची होते. त्यामुळे आपण हे O+ या गटाचे रक्त मिळवून दयायला नक्की मदत करू शकाल, अशी मला खात्री वाटते, तरी आपण त्या आजीसाठी रक्त मिळवून दयायला मदत कराल का?

गरज भासणार आहे, असे हॉस्पिटलने कळवले आहे. काही दिवसांपूर्वी आपण आमच्या परिसरात रक्तदान शिविर आयोजित केले आपण सांगाल त्या वेळी या रक्ताच्या गरजेसंबंधातील सर्व कागदपत्रे घेऊन मी आपल्याकडे येईन. कृपया रक्तपुरवठ्यासंबंधात साहाय्य करावे, ही कळकळीची विनंती.
कळावे,

आपला नम्र
अ. ब. क.

पत्ता :
अ. ब. क.
५३, सेवासदन, शनिवारपेठ, सोलापूर ४१३००२
ई-मेल: x x x x x

(२) विनंतिपत्र :

दिनांक २१ मार्च २०१९

प्रति,
मा. सचिव,
मानवता मित्रमंडळ, शुक्रवारपेठ,
सोलापूर ४१३००२.

विषय : रक्तदान शिबिरात सहभागी होणे,

महोदय,

मी आणि माझे आणखी चार मित्र आम्ही इयत्ता दहावीत शिकत असलेले वर्गमित्र आहोत. आपण सूचनाफलकावर लावलेले रक्तदान शिबिराचे माहितीपत्रक आम्ही वाचले आणि आम्हाला खूप आनंद झाला. आम्हाला रक्तदानाचे महत्त्व पटलेले आहे. आमच्या शिक्षकांनीही अनेकदा हे महत्त्व आमच्या मनावर बिंबवले आहे. आम्ही वयाने लहान असल्याने रक्तदान करू शकणार नाही. पण रक्तदान शिबिरात तर सहभागी होऊ शकतो ! आमची तशी तीव्र इच्छा आहे. आपण आम्हाला साजेसे काम करण्याची संधी द्यावी आणि शिबिरात सहभागी करून घ्यावे ही विनंती.
कळाये,
आपला नम्र
अ.ब.क.

पत्ता :
अ. ब. क.
५३, सेवासदन, शनिवारपेठ, सोलापूर ४१३००२.
ई-मेल: x x x x ××× x xxx××××××

शिबिराच्या आयोजकांना O+ या रक्तगटाची मागणी करणारे पत्र लिहा. | magni patra in marathi

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post