नारळाच्या झाडा विषयी माहिती | नारळाचे झाड कसे लावावे | नारळाच्या जाती

नारळाचे झाड माहिती | नारळाचे झाड कसे लावावे | नारळ फळाची माहिती  

शेतकरी मित्रांनो आजच्या या नवीन लेखांमध्ये आपण सर्वजण नारळाचे झाड अगदी चांगल्या रीतीने कसे मोठे करता येईल याबद्दल काही माहिती घेणार आहोत शेतकरी मित्रांनो आपण ज्यावेळेस नारळाचे झाड लावतो त्यावेळी काही गोष्टींची आपल्या सर्वांना खूप काळजी घ्यावा लागते जेणेकरून नारळाचे झाड हे मरणार नाही किंवा जळणार नाहीत आणि त्याच पद्धतीने त्याची वाट देखील खूप चांगल्या पद्धतीने होईल म्हणून आम्ही आपल्यासाठी हा लेख घेऊन आलो आहोत आपण या लेखांमध्ये हे सर्व माहिती बघणार आहोत चला तर सुरुवात करूया नारळाच्या झाडाबद्दल माहिती.
नारळाचे झाड माहिती | नारळाचे झाड कसे लावावे | नारळ फळाची माहिती

नारळाचे झाड माहिती | नारळाचे झाड कसे लावावे | नारळ फळाची माहिती   

नारळाचे झाड कसे लावावे ?

झाड लावण्या अगोदर आपण जेसीबी किंवा हाताने तीन बाय तीन या लांबी आणि रुंदीचा एक खोल असा खड्डा घ्यावा खड्डा घेतल्यानंतर आपण त्या खड्ड्यामध्ये प्रथमता 50 किलो गाईचे गोबर त्याचप्रमाणे एक किलो मीठ टाकावे आणि तो खड्डा एका दिवसासाठी तसाच राहू द्यावा.

दुसऱ्या दिवशी त्या खड्ड्यामध्ये भरपूर असे पाणी देऊन दोन तासानंतर आपण त्यामध्ये नारळाचे झाड लावू शकतो नारळाचे झाड लावत असताना आपण नारळाची खूप चांगली अशी व्हरायटी सिलेक्ट करावी त्यासाठी आपल्याला युट्युब वर खूप सारे नवनवीन आणि चांगले व्हिडिओ पाहायला मिळतील ज्यामध्ये आपल्याला व्हरायटी बद्दल खूप चांगल्या प्रकारे समजून सांगितलेले आहेत

नारळाचे झाड खड्ड्याजवळ घेऊन आल्यानंतर आपण त्या नारळाची काळी पिशवी ही अल्ल तरी ते बाहेर काढावी जेणेकरून झाडाच्या मुळाला कोणत्याही प्रकारची विजा पोहचणार नाही किंवा त्याचे मूळ तुटणार नाही याची काळजी आपण नक्की घेतली पाहिजे

आपण जर जास्त झाडे लावणार असो तर झाडांमधील अंतर ही खूप महत्त्वाची बाब देखील आपण नारळ लागवडी अगोदर नीट अभ्यास करूनच नारळाची लागवड करावी त्यामध्ये आपल्याला मशागतीसाठी ट्रॅक्टर त्याचप्रमाणे ज्या नारळाच्या फांद्या असतात त्यांचे प्रॉपर नियोजन करण्यासाठी देखील आपल्याला जास्तीत जास्त जागा लागते म्हणून दोन्ही नारळांमध्ये अंतर हे कमीत कमी दहा फूट आणि जास्तीत जास्त पंधरा ते वीस फूट ठेवावे आपल्या झाडाप्रमाणे हे अंतर मागेपुढे होऊ शकतं.

नारळाचे झाड उंच जाती  

उंच जाती: बाणावली, प्रताप, लक्षद्वीप ओर्डीनरी, फिलिपिन्स ऑर्डीनरी.

1) बाणवली (वेस्ट कोस्ट टॉल) या जातीची वैशिष्ट्ये:
  1. हि उंच वाढणारी जात असून तिचे आयुष्य 70 ते 80 वर्ष असून 6 ते 7 वर्षात फुलोऱ्यास येते.
  2. प्रत्येक झाडापासून प्रतिवर्षी 50 ते 100 नारळ मिळतात, सरासरी 80 नारळ मिळतात.
  3. या नारळ जातीच्या फळात सरासरी 176 ग्रॅम खोबरे  व तेलाचे प्रमाण 67 ते 70 टक्के असते.
  4. या जातीमध्ये रंग, आकार आकारमान, उत्पन्न, खोबरे तेलाचे प्रमाण यात विविधता आढळून येते.
2) प्रताप या जातीची वैशिष्ट्ये:
  1. या जातीचे नारळ आकाराने मध्यम असून गोल असतात.
  2. हि जात फळधारणेस येण्यास 6 ते 7 वर्ष लागतात.
  3. नारळाचे प्रति माड उत्पन्न 139 ते 160 असून सरासरी 143 फळे मिळतात.
  4. खोबऱ्यात तेलाचे प्रमाण 68% असते.
  5. तसेच खोबरे 120 ते 160 ग्रॅम असून सरासरी 150 ग्रॅम मिळते.

नारळाच्या जाती


उंच जाती
1) वेस्ट कोस्ट टॉल (बाणवली) - या जातीचे आयुष्यमान 80 ते 100 वर्षे असून सहा ते सात वर्षांनी फुलोऱ्यात येते. पूर्ण वाढलेल्या प्रत्येक झाडापासून सरासरी 80 ते 100 फळे मिळतात. 

2) लक्षद्वीप ऑर्डिनरी - या जातीची झाडे आणि फळे बाणवलीसारखीच असतात, परंतु फळाच्या तीनही कडा उठावदार असतात, पूर्ण वाढलेल्या झाडापासून सरासरी 150 फळे मिळतात. या जातीच्या नारळात सरासरी 140 ते 180 ग्रॅम खोबरे मिळते, तर तेलाचे प्रमाण 72 टक्के असते. 

3) प्रताप - नारळाचा आकार मध्यम, गोल असून ती सहा ते सात वर्षांत फुलोऱ्यात येते. या जातीच्या एका झाडापासून 150 नारळ मिळतात. 

4) फिलिपिन्स ऑर्डिनरी - ही उंच प्रकारातील जात आहे. या जातीचे नारळ आकाराने फारच मोठे असतात. एका नारळापासून सरासरी 213 ग्रॅम खोबरे मिळते, तर नारळाचे उत्पादन 94 ते 159 असून सरासरी 105 नारळ आहे.

ठेंगू जाती

या जातीची झाडे उंचीने ठेंगू असतात आणि लवकर म्हणजे लागवड केल्यापासून तीन ते चार वर्षांनी फुलोऱ्यात येतात. ठेंगू जातीचे आयुष्यमान 30 ते 35 वर्षे असते. रंगावरून ऑरेंज डार्फ, ग्रीन डार्फ आणि यलो डार्फ अशा पोटजाती आहेत. त्यातील ऑरेंज डार्फ ही जात शहाळ्यासाठी सर्वांत उत्तम असून तिच्या 100 मि.लि. पाण्यात सात ग्रॅम एवढे साखरेचे प्रमाण असते.

संकरित जाती

1) टी - डी (केरासंकरा) - या जातीची झाडे चार ते पाच वर्षांत फुलोऱ्यात येतात. एका झाडापासून 100 ते 160 नारळ फळे, तर सरासरी 150 नारळ फळे मिळतात. खोबऱ्यात तेलाचे प्रमाण 68 टक्के इतके असते. 

2) टी - डी (चंद्रसंकरा) - या संकरित जातीची फळधारणा चार ते पाच वर्षांनी होते. या जातीचे उत्पादन प्रति वर्षी 55 ते 158 फळे असते, तर सरासरी उत्पादन 116 फळे आहे.

नारळाचे  पाणी व्यवस्थापन ?    

नारळाची झाड लावल्यानंतर आपण जर जास्त झाडे लावत असेल तर त्यासाठी पाहण्यासाठी सुविधा म्हणून ड्रिप इरिगेशनचा वापर नक्की करावा त्याचप्रमाणे आपण वाफा पद्धत देखील करू शकतात माझे वैयक्तिक मत आहे आपण दोन्हीही गोष्टी नारळाच्या झाडासाठी कराव्यात अर्थातच आपण ड्रिप इरिगेशन पद्धतीने आणि वाफा पद्धतीने या दोन्ही पद्धतीने नारळाच्या झाडाला पाणी द्यावे

ड्रिप इरिगेशन पद्धतीने नारळाला आपण चांगल्या प्रकारचे खत टाकू शकतो त्याचप्रमाणे पाण्याचा तुटवडा असल्याकारणाने आपण झाडांना जास्तीत जास्त जगवण्याचा प्रयत्न देखील करू शकतो. म्हणून ड्रिप इरिगेशन पद्धत ही नारळाच्या झाडाला अवश्य द्या आणि आपल्या ट्रिप इरिगेशन पद्धतीमध्ये आपण 16 एम एम ची नळी वापरा आणि त्यापुढे ड्रीपर हे तीन लिटर एका तासाला पाणी टाकतील हे वापरू शकता किंवा आपल्याला खूप सारे व्हरायटीज या ड्रीपर मध्ये पाहायला मिळतात आपल्या पाईपलाईनच्या अंतरानुसार आणि किती झाडांवर आपण ड्रिप इरिगेशन पद्धतीचा वापर करत आहोत यानुसार आपण ड्रीपर वापरू शकता.

नारळाचे खत आणि व्यवस्थापन    

खत आणि व्यवस्थापन करत असताना आपण झाडाला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मिठाचा वापर करावा कारण आपण नारळाचे झाड हे सर्व ठिकाणी उगवू शकतो आम्ही आमच्या घरी नारळाचे झाड हे खडकाळ जमिनीवर देखील अत्यंत चांगल्या पद्धतीने उगवलेले आहेत त्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त पाणी आणि मिठाचा जास्त वापर त्याचप्रमाणे खतांचा पुरेपूर वापर आणि जर नारळाच्या झाडावर किंवा त्याच्या पानावर आपल्याला काही बदल दिसत असेल तर कीटकनाशकाचा फवारा बुरशीनाशक थोड्या प्रमाणात मिळवून आपण करू शकतो जेणेकरून आपले झाड तंदुरुस्त आणि वाढण्यामध्ये त्याला मदत होईल.

मित्रांनो नारळाचे झाड लावल्यानंतर आपण प्रति दोन महिन्यानंतर एकदा त्याला शेणखत टाकले पाहिजे व त्याचप्रमाणे सात दिवसाला आपण प्रत्येक झाडाला एकदा नीट पाहिले पाहिजे की याला पाणी नीट जातं की का आणि नारळाच्या झाडांमध्ये खोडकिडा हा खूप भयानक रोग आपल्या पुढे येऊ शकतो जेणेकरून आपले जर झाडांवर चांगले निरीक्षण असेल तर आपण खोडकिड्याला प्रतिसाद देण्याची तयारी देखील ठेवू शकतो.

नारळाचे झाड लावल्यानंतर आपण तीन ते चार वर्षांमध्ये त्याचे उत्पन्न घेऊ शकतो आणि आपण जर चांगले नारळाचे रोप निवडून आणलेले असल तर प्रतिरोध शंभर ते तीनशे नारळापर्यंत आपल्याला ते रोप नारळ देऊ शकतो म्हणून नारळाचे रोप निवडताना खूप काळजी घ्यावी असे आम्हाला वाटते.

नारळाचे झाड माहिती | नारळाचे झाड कसे लावावे | नारळ फळाची माहिती   

नारळाचे खत व्यवस्थापन:
नारळ झाडे खताला चांगला प्रतिसाद देतात. झाडापासून उत्पादन कमी मिळणे, वाढ खुरटलेली राहणे, नारळ फळांना तडे जाणे जाणे, फळामध्ये बुरशी धरणे, फळे लहान असतानाच मोठ्या प्रमाणात गळ होणे. यामागील प्रमुख कारण म्हणजे त्यांना होणारा अपुरा अन्नपुरवठा होय. अनेक वेळा झाडांना फक्त शेणखत अथवा युरिया खतच दिले जाते, हे अयोग्य आहे. नारळ झाडास नत्र, स्फुरद आणि पालाश अशा तिन्ही अन्नघटकांचा योग्य प्रमाणात पुरवठा होणे महत्वाचे आहे. नारळ झाडास वयोमानानुसार शिफारशीप्रमाणे खते द्यावीत.

5 ते 6 वर्षाच्या नारळाच्या झाडास 50 किलो शेणखत, दोन किलो युरिया, तीन किलो सिंगल सुपर फॉस्पेट आणि साडेतीन किलो म्यूरेट ऑफ पोटॅश तीन समान हफ्त्यात द्यावे. (जून-सप्टेंबर व फेब्रुवारी) पैकी संपूर्ण शेणखत व सिंगल सुपर फॉस्पेट जून महिन्यातच एकाच वेळी द्यावीत. रोपे लावल्यानंतर पहिल्या वर्षी रोपांची मुळे 30 से.मी.अंतरापर्यंत सभोवती विखरून टाकावीत आणि खुरप्याच्या सहाय्याने मातीत मिसळावी. त्यानंतर पुढील प्रत्येक वर्षी खते देताना 30 से.मी.अंतर वाढवत जावे व पाचव्या वर्षी व त्या पुढे 1.5 ते 1.80 मीटर पर्यंतच्या अंतराने ती पसरून टाकावीत आणि ती मातीत मिसळावी.


नारळ लागवड तंत्रज्ञान |  नारळ फळाची माहिती  | Coconut Tree Information In Marathi

शेतकरी मित्रांनो आपल्याला अजून कोणत्याही प्रकारची माहिती हवी असेल ते आम्हाला तुम्ही कमेंट मध्ये नक्की कळवू शकता आम्ही तुमच्यासाठी सर्व प्रकारची माहिती आपल्या या वेबसाईटवर घेऊन येण्याचा प्रयत्न नक्की करूया त्याच पद्धतीने आपल्याला या लेखांमध्ये अजून कोणत्याही प्रकारची माहिती टाकावीशी वाटत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये ती माहिती नक्की कळवू शकता आम्ही तुमच्यासाठी ती माहित या लेखांमध्ये नक्की टाकूया धन्यवाद.

नारळाचे झाड माहिती | नारळाचे झाड कसे लावावे | नारळ फळाची माहिती   

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post