Chandrasekhar Venkataraman Marathi Information | सी वी रमन यांच्या विषयी माहिती
सर चंद्रशेखर वेंकटरमन माहिती : सर चंद्रशेखर व्यंकट रमण, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ ज्यांनी भौतिकशास्त्रासाठी नोबेल पारितोषिक जिंकणारे पहिले भारतीय बनून आपल्या मातृभूमीचा अभिमान बाळगला, ते एक उत्कृष्ट वैज्ञानिक होते. लहानपणीही त्यांनी तल्लख मन दाखवले आणि मॅट्रिकची परीक्षा इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत खूपच कमी वयात उत्तीर्ण झाली. गणित आणि भौतिकशास्त्राच्या लेक्चररचा मुलगा म्हणून, तरुण रमणला सुरुवातीपासूनच शैक्षणिक वातावरणाचा सामना करावा लागला. त्याच्या संपूर्ण शैक्षणिक दिवसांमध्ये एक टॉपर, त्याला संशोधनात खूप रस होता;
किंबहुना तो विद्यार्थी असतानाच त्याने प्रकाशशास्त्र आणि ध्वनिशास्त्रावर संशोधन कार्य सुरू केले. उपमहालेखापाल म्हणून त्यांनी आपली कारकीर्द सुरू केली असली, तरीही ते संशोधनापासून दूर राहू शकले नाहीत, अनेकदा भौतिकशास्त्राच्या क्षेत्रात नवीन गोष्टी शोधण्यासाठी रात्रभर जागून राहायचे. हिमनद्यांचा निळा रंग आणि भूमध्य समुद्र पाहून त्याला कुतूहल वाटले आणि त्याला हे रहस्य उलगडायचे होते की पाणी, एक रंगहीन द्रव, डोळ्यांना निळे का दिसते. अशा प्रकारे प्रकाशाच्या विखुरण्यावर प्रयोगांची मालिका सुरू झाली ज्यामुळे शेवटी त्याला ‘रामन इफेक्ट’ म्हणून ओळखले गेले ज्यासाठी त्यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले.
चंद्रशेखर वेंकटरमन मराठी भाषण | Chandrasekhar Venkataraman Marathi speech
चंद्रशेखर वेंकटरमण (१७ नोव्हें १८८८ ते २१ नोव्हें १९७०)
रंग, गंध, ध्वनी इत्यादीचं कुतूहल मनाला नेहमीच असतं. पण एखाद्या गोष्टीचा ध्यास घेऊन त्या प्रश्नाचं उत्तर शोधणारे फारच कमी असतात. मात्र बुद्धिमत्ता, चिकाटी या अंगभूत गुणांना प्रोत्साहन, योग्य मार्गदर्शन आणि संधी यांची जोड मिळाली तर कोणताही प्रश्न अनुत्तरीत राहत नाही.
अशाच एका मुलाला निसर्गाबद्दल अपार प्रेम आणि कुतूहल होतं. मोठेपणी त्यांनी रंगाविषयी संशोधन केलं आणि ते संशोधन 'रमण परिणाम' (रमण प्रभाव) म्हणून जगन्मान्य झालं. 'रमण परिणाम' सांगणारे होते डॉ. चंद्रशेखर वेंकटरमण.
त्यांचा जन्म १७ नोव्हेंबर १८८८ रोजी मद्रास प्रांतातील त्रिचनापल्ली येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव चंद्रशेखर अय्यर असे होते. तर आईचं नाव पार्वतीअम्मा असे होते. वडील भौतिक विज्ञानाचे शिक्षक तर आई शास्त्री परिवारातील अत्युत्तम संस्कारात वाढलेली. त्यामुळेच विज्ञान आणि बुद्धिमत्ता •याचा मिलाफ डॉ. सी. व्ही. रमण यांच्यात झालेला आढळतो.
लहानपणापासून त्यांना शंखशिंपले, सागरगोटे यांचे विविध रंग, त्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करण्यात आनंद वाटायचा. कुशाग्र बुद्धिमत्ता त्यांना लाभल्यामुळेच अभ्यासात ते प्रथम क्रमांक मिळवायचे. मी. ए. परीक्षेत ते प्रथम क्रमांकाने पास झाले होते. त्यांना विद्यापीठाचं सुवर्णपदकही मिळालं होतं.
१९०७ ते १९१७ या कालावधीत त्यांनी सरकारी नोकरी केली पण मूळचा विज्ञानाचा पिंड असलेल्या संशोधक वृतीच्या रमण यांचे नोकरीत मन रमेना म्हणून १९१७ मध्ये त्यांनी ही नोकरी सोडली. त्यानंतर दोन वर्षे त्यांनी कलकत्यातील 'इंडियन असोसिएशन फॉर कल्टिव्हेशन ऑफ सायन्स' या संशोधन संस्थेत विज्ञानाचा अभ्यास व संशोधन केले. काही काळ प्राध्यापक म्हणून ही काम केले. कोणतेही काम चिकाटीने करणे या स्वभावामुळे ते विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारे मार्गदर्शन करीत. त्यामुळे कलकत्ता विद्यापीठातील ते एक विद्यार्थीप्रिय प्राध्यापक होते.
निसर्ग निरीक्षण करण्यात त्यांना मनापासून आनंद मिळे, रंगांच्या नयनमनोहरी मिश्रणाचा नमूना म्हणून त्यांना फुलपाखरांचे खूप आकर्षण होते. म्हणूनच त्यांनी स्वतःच्या घरी सुमारे एक हजार फुलपाखरांचा संग्रह करून ठेवला होता. सुरुवातीच्या काळात त्यांनी ध्वनीतरंगासंबंधी संशोधन केले. नंतर मात्र प्रकाशातील विविध रंगच त्यांना साद घालू लागले. १९२१ मध्ये ऑक्सफर्डला भरलेल्या एका परिषदेला विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून जाण्याची उत्तम संधी रमण यांना मिळाली. त्यानिमित्ताने केलेला मोठा सागर प्रवास अनेक कारणांनी त्यांना आवडला. या सागर प्रवासात त्यांनी भूमध्यसमुद्रातील स्फटिकासारख्या स्वच्छ परंतु निळसर झाक असलेल्या पाण्याचे तसेच हिमनगातील निळ्या रंगाच्या बर्फाचे सूक्ष्म निरीक्षण करून सांगितलं की बर्फाला प्राप्त होणारा निळा रंग हा बर्फामधून सूर्यप्रकाश गेला असता त्याने अपस्करण होऊन मिळणाऱ्या पंक्तिमधील निळ्या रंगाचे विकिरण होत असल्याने निर्माण होतो.
डॉ. रमण यांनी पारदर्शक वायू, द्रव, घन पदार्थातून जाऊन दिले असता प्रकाश किरणांच्या गुणधर्मात होणाऱ्या बदलांचे संशोधन केले. या संशोधनाचं फलस्वरूप म्हणजेच 'रमण परिणाम
रमन परिणाम म्हणजे जेव्हा एखाद्या पारदर्शक पदार्थावर एफरंगी म्हणजे तरंगलांबीचा प्रकाशकिरण पडला की त्या पदार्थामुळे त्या किरणाचे विकिरण होते. त्या विकिरण प्रकाशात मूळ किरणाची तरंगलांबी असलेली लहर तर असतेच पण त्या सोबत त्याच्याहून कमी तरंगलांबीची किंवा अधिक तरंगलांबीची आणखी एक लहर आढळते. या दोन तरंगलांबीतला फरक हा विकिरण करणाऱ्या पदार्थाची अंतर्गत रचना आणि उर्जावस्था यांच्याशी एका विशिष्ट सूत्राने बांधलेला असतो की, त्यामुळे त्या पदार्थाची उर्जावस्था व पदार्थांची आंतर्रचना दोन्ही समजू शकेल,
"रमण परिणाम' या शोधातून स्पेक्ट्रोस्कोपीतील 'रमण स्पेक्ट्रोस्कोपी' ही नवी शाखा तयार झाली आहे. आधुनिक काळात रमण स्पेक्ट्रोस्कोपीचे उपयोजन भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, वैद्यकीय विज्ञान, पुरातत्वशास अभियांत्रिकी विज्ञान, गुन्हा अन्वेषणशाख, प्रकाशकिय तंतू विज्ञान इत्यादी अनेक क्षेत्रात होत आहे. रामण परिणामाच्या माध्यमातून लेसर तंत्राचा विकास घडू लागला.
डॉ. रमण यांनी ध्यानी, कंपने, अल्ट्रासोनिक्स, अपरकरण, चुंबकत्व, विद्युत प्रकाशशास्त्र इत्यादी अनेक विषयांवर सुमारे सहाशे शोधनिबंध लिहिले. मोलेक्यूलस डीफ्रेक्शन ऑफ लाईट, फिजिक्स ऑफ क्रीस्टल्स, फिजिऑलॉजी ऑफ व्हीजन ही त्यांची काही महत्त्वाची पुस्तके होत. त्यांच्या प्रयत्नाने 'इंडियन अॅकेडमी ऑफ सायन्स' ही संस्था स्थापन झाली. त्यांनी मिळवलेली सर्व संपती याच संस्थेला दिली, पुढे विज्ञान प्रबोधिनीने या केंद्रास 'रमण संशोधन केंद्र' असे नाव दिले, रमण यांनी आपले उर्वरित आयुष्य याच संशोधन केंद्रात संशोधन करीत वेचले.
अलौकिक बुद्धिमत्ता, विज्ञानाची आवड, निसर्ग प्रेम, चिकित्सक संशोधक वृत्ती, एकाग्रता, चिकाटी या गुणांनी मंडित झालेल्या या महान संशोधकाचे २१ नोव्हेंबर १९७० रोजी वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले.
डॉ. चंद्रशेखर वेंकटरमण प्रसिद्धीपासून दूर राहणारे होते. तरी त्यांच्या कार्याची दखल घेऊन देशविदेशातील अनेक मानसन्मान त्यांना लाभले. अनेक विद्यापीठांनी त्यांना डी. एस्सी., डी. लीट अशा मानद पदव्या दिल्या. १९५४ मध्ये भारत सरकारनं त्यांना 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब देऊन गौरविले. १९५७ मध्ये आंतरराष्ट्रीय कीर्तीचं ' लेनिन अवार्ड' देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं. सर्वात मुख्य म्हणजे 'रमण परिणाम' या संशोधनासाठी २८ फेब्रुवारी १९३० या दिवशी जागतिक सन्मानाचं सर्वश्रेष्ठ 'नोबेल' पारितोषिक मिळालं. म्हणून या दिवसाचं महत्त्व लक्षात घेऊन हा दिवस 'विज्ञान दिन'" म्हणून साजरा करण्यात येतो.
वैयक्तिक, सामाजिक आणि राष्ट्रीय प्रगती त्या राष्ट्राच्या वैज्ञानिक प्रगतीवर आधारित असते. आपल्या देशात सर्वच क्षेत्रात वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याची आणि वाढविण्याची आवश्यकता आहे. विज्ञानदिनाच्या निमित्ताने सर्वसामान्यांसाठी विज्ञान घरोघरी पोहोचवण्याची जबाबदारी आपल्या सर्वाची आहे. विज्ञानातील नवनवीन शोधांची माहिती सर्वाना मिळाली तर निसर्गातील अनेक रहस्यांचा उलगडा होण्यास मदत मिळेल.
Chandrasekhar Venkataraman Marathi Information | सी व्ही रमण यांची माहिती
Why did CV Raman got Nobel Prize?
Raman was awarded the 1930 Nobel prize in physics “for his work on the scattering of light and for the discovery of the effect named after him”
What is invented by CV Raman?
His discovery of the Raman effect, in which light that passes through a material is scattered and the wavelength of the scattered light is changed because it has caused an energy state transition in the material's molecules.
चन्द्रशेखर वेंकटरमन यांचा जन्म कधी झाला ?
१७ नोव्हें १८८८ रोजी यांचा जन्म झाला.
चंद्रशेखर वेंकटरमन यांचा मृत्यू कधी झाला?
२१ नोव्हें १९७० रोजी चंद्रशेखर वेंकटरमन यांचा मृत्यू झाला
चन्द्रशेखर वेंकटरमन जन्म कोठे झाला?
रामन यांचा जन्म तामिळनाडूमधील तिरुचिरापल्ली आणि शिक्षण चेन्नई येथे झाले
चंद्रशेखर वेंकटरमन मराठी भाषण
चंद्रशेखर वेंकटरमन मराठी माहिती
सर चंद्रशेखर वेंकटरमन माहिती
सी वी रमन यांच्या विषयी माहिती
सी व्ही रमण यांची माहिती
Chandrasekhar Venkataraman Marathi speech
Chandrasekhar Venkataraman Marathi Information
Sir Chandrasekhar Venkataraman information
c. v. raman information in marathi
निष्कर्ष – Conclusion
विद्यार्थी मित्रांनो आजच्या या लेखांमध्ये आपण सर्वजणांनी चंद्रशेखर वेंकट रमण यांच्या विषयी माहिती पाहिली आहे आपण आजच्या या लेखांमध्ये जास्त करून चंद्रशेखर वेंकट रमण यांच्या मराठी भाषण विषयी आपण या लेखांमध्ये चर्चा केली आहे त्याचप्रमाणे चंद्रशेखर वेंकटरमण यांच्या जीवनाविषयी देखील माहिती घेण्याचा आपण या लेखांमध्ये प्रयत्न केला आहे .
चंद्रशेखर वेंकटरमण यांचा जन्म कोठे झाला यांचा जन्म दिनांक मृत्यु दिनांक असे खूप सारे प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या या लेखांमध्ये जाणून घेतली त्याचप्रमाणे चंद्रशेखर वेंकटरमण यांच्या विषयी मराठी भाषणाची तयारी करण्यासाठी भाषण देखील आपण लिहिले आहे अशाप्रकारे आपण आजच्या या लेखाचा निष्कर्ष पाहिला आणि आपण हा लेख पूर्ण वाचला याबद्दल आपले मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आपण हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा हीच आमची इच्छा धन्यवाद.