लोकमान्य टिळकांवर भाषण | Lokmanya Tilak Speech in Marathi
विद्यार्थी मित्रांनो आजचा हा लेख आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आणि खूप मजेदार देखील होणार आहेत कारण आजच्या या लेखांमध्ये आपण सर्वजण लोकमान्य टिळकांविषयी भाषण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो लोकमान्य टिळक मराठी भाषण ( Lokmanya Tilak marathi bhashan ) हे आपल्या शाळेमधील स्पर्धांसाठी खूप महत्त्वाचा मुद्दा आहेत आणि त्याचप्रमाणे मराठी भाषण हे कसे करायचे आपण स्टेजवर गेल्यानंतर काय बोलले पाहिजे या सर्वांची तयारी आपण आजच्या या लेखांमधून करणार आहोत म्हणून आपल्या सर्वांसाठी हा लेख खूप मजेदार आणि महत्वपूर्वक होणार आहेत चला तर पाहूया लोकमान्य टिळक मराठी भाषण किंवा लोकमान्य टिळक भाषण.
Lokmanya Tilak Speech in Marathi | लोकमान्य टिळक मराठी भाषण
लोकमान्य टिळक (२३ जुलै १८५६ ते १ ऑगस्ट १९२० )
" परंपरा ही शूर वीरांची,
नररत्नांची खाण
इथे निपजले राजे योद्धे,
मुत्सद्दी विद्वान. "
या रत्नभूमीत आजवर अनेक रत्नं जन्माला आली. उतुंग राजकारणी, सखोल विचारवंत, कलावंत कवी, कणव असणारे समाजसुधारक म्हणून अनंत नावं या लाल मातीशी संबंधित आहेत. इतिहासाच्या पाना पानावर त्यांची नाव कोरलेली आहेत. 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच!' असे इंग्रजांना ठासून सांगणारे लोकमान्य टिळक पण याच भूमीतले. तसं टिळकांचं मूळ घराणं चिखलगावचं. पण त्यांचे वडील नोकरीनिमित्त रत्नागिरीत राहत होते. तेथे २३ जुलै १८५६ रोजी बाळ टिळकांचा जन्म झाला.
त्यांच्या वडिलांचं नाव गंगाधरपंत असं होतं तर आईचं नाव पार्वतीबाई असं होतं. प्रखर बुद्धीचा निर्भय विद्यार्थी अशी टिळकांची बालपणापासूनच ख्याती होती. बुद्धीचं तेज त्यांच्या पाणीदार डोळ्यात स्पष्ट दिसायचं. गणित आणि संस्कृत या विषयांवर त्यांचं उदंड प्रेम होतं. उत्तम संस्कृत कथा-कादंबऱ्या वाचण्याकडेही त्यांचा ओढा होता. अत्यंत क्लिष्ट गणितही टिळक लिलया तोंडी सोडवायचे.
त्यांच्या अचाट बुद्धिमत्तेपुढे शिक्षकही स्तिमीत होऊन जायचे. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षीच त्यांच्या अचाट बुद्धिमत्तेपुढं शिक्षकही स्तिमीत होऊन जायचे. मात्र वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षीच त्यांना मातृसुखाला पारखं व्हावं लागलं. वडिलांनी त्यांना पितृछत्रात झाकून टाकलं.
आपल्या मुलानं उच्च शिक्षण घ्यावं, महान बनावं हाच त्यांचा ध्यास होता. शाळा खात्यात इन्स्पेक्टर म्हणून पुण्याला बदली झालेली असल्याने घरी शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यातही ते यशस्वी झाले. पण मॅट्रीकच्या वर्गात टिळक असतानाच त्यांना पितृसुखाला पण पारखं व्हावं लागलं. अकाली पोरके झालेल्या टिळकांनी उच्च शिक्षणाची वडिलांची इच्छा पूर्ण करण्याचा आपला निर्धार मात्र याचवेळी केला...
मॅट्रीकनंतर त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पण त्यांच्या एका मित्राने टिळकांच्या नाजूक प्रकृतीची चेष्टा केली. टिळकांना ते चांगलंच खटकलं. त्यांनी कॉलेजच्या पहिल्या वर्षीचा अभ्यासक्रम सोडला. आपलं सगळं लक्ष व्यायामावर केंद्रित केलं आणि प्रकृती सुधारली. आयुष्यातील सर्व आव्हानांना तोंड द्यायचं असेल तर शरीर बळकट असलंच पाहिजे अशी त्यांची धारणा होती.
या उत्तम शरीरयष्टीचा फायदा भविष्यात तुरुंगातील दगदगीच्या काळात त्यांना झाला. उत्तम शरीर संपदेसोबत उत्तम शिक्षणही त्यांना घ्यायचच होतं. १८७६ साली ते बी. ए. ची परीक्षा पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण झाले. १८९७ साली त्यांनी एल. एल. बी. पण पूर्ण केली.
त्या काळात चांगल्या पगाराची नोकरी मिळाली असती पण त्यांनी तो विचार मनातून काढून टाक्कला. जे सरकार देशावर जुलूम करतं. आपल्या मातृभूमीला लुटून कंगाल करतं अशांची नोकरी त्यांना कदापी पटली नाही.
हिंदुस्थानी तरुणांनी स्वावलंबी व्हावं. त्यांच्या मनात देशप्रेम जागृत व्हावं म्हणून राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या 'न्यू इंग्लिश स्कूल' या विष्णूशास्त्री चिपळूरकरांनी सुरू केलेल्या शाळेत त्यांनी पगार न घेता शिक्षकाचं काम पत्करलं. गोपाळ गणेश आगरकर यांच्या साथीनं त्यांनी पुढे फर्ग्युसन कॉलेजही सुरू केले.
अंतःकणात देशभक्तीची ज्योत पेटली म्हणजे कालांतराने ती कृतिरूप धारण करते आणि देशात क्रांती घडवून आणते. त्यासाठी जनमनाची घडण करणे ही प्राथमिक गरज आहे हे ओळखून - १८८१ साली त्यांनी आर्यभूषण छापखाना काढून 'केसरी' आणि 'मराठा' ही साप्ताहिक वृत्तपत्रे सुरू केली.
कोल्हापूरचे दिवाण बर्वे यांच्या गैरकारभारावर आणि सातारच्या छत्रपतींना ब्रिटीश सरकारने दिलेल्या वाईट वागणूकीवर कडक टीका केल्याने आगरकर आणि टिळक यांना डोंगरीच्या तुरुंगात १०१ दिवसांची शिक्षाही झाली. अशा शिक्षेने टिळकांच्या व्यक्तिमत्त्वाला विविध पैलूच पडत गेले. पुढे 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ?' "राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे!" अशा लेखांनी तर महाराष्ट्रात खळवळच उडवून दिली.
" राज्य करणे म्हणजे जेथे तेथे आपली तलवार काढून मानवा, तू काय समजलास? तुला सुपारीच्या खांडासारखा खाऊन टाकीन, मारीन, जाळीन. पोळीन. असे लोकांना एकसारखे भिववीत सुटणे नव्हे. राजाने आपल्या शक्तीचा उपयोग दुष्टांचे शासन आणि निरपराध लोकांचे रक्षण करण्याकडे केला पाहिजे." असे त्यांनी लिहिले होते. त्यांच्या जहाल लेखणीची कल्पना यावरून आपल्याला येते.
लोकजागृतीसाठीच त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरू केला. १२ मे १९०८ च्या केसरीत त्यांनी लिहिलेल्या 'देशाचे दुर्दैव' या लेखाबद्दल सरकारनं त्यांच्यावर खटला भरला. न्यायमूर्ती दावर यांनी त्यांना सहा वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली.
ही शिक्षा भोगण्यासाठी त्यांना मंडालेला पळवण्यात आलं. पण तेथील उष्ण हवेचा त्यांच्या प्रकृतीवर खूपच परिणाम झाला. कपाळावर फोड उठणे, हिरड्या सुजणे, अंतर्गळ असे त्रास, सत्यभामाबाईचा मृत्यू या साऱ्यांनी त्यांना भंडावून सोडलं. पण टिळकांनी आपली स्थिरवृत्ती सोडली नाही. कारागृहातही त्यांनी 'गीतारहस्य' सारखा ग्रंथ लिहिला. पुढे ' ओरायन', 'आर्टिक होम इन वेदाज' सारखे ग्रंथही लिहिले. अखंड आयुष्य त्यांनी कुटुंबाचा, घराचा विचार न करता भारतभूमीच्या स्वातंत्र्याचा ध्यास मनात जपला.
राजद्रोहाचा खटला ताई महाराज प्रकरण, प्लेगचा उद्रेक, महाभयंकर दुष्काळ, , रँडचा खून अशा सर्व प्रसंगात त्यांनी विवेक राखून आपली भूमिका बजावली. भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीला बळ दिलं. असं महान कार्य करतानाच १ ऑगस्ट १९२० रोजी त्यांचा मृत्यू झाला. तेव्हा गगनाचे कंगोरेही काजळून गेले.
लोकमान्य टिळक मराठी भाषण | lokmanya tilak speech in marathi
लोकमान्य टिळकांचा जन्म कधी झाला?
लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी झाला.
लोकमान्य टिळकांनी केसरी व मराठा ही वृततपत्रे कधी सुरू केली?
लोकमान्य टिळकांनी केसरी व मराठा ही वृततपत्रे 1881 मध्ये सुरू केली.
लोकमान्य टिळकांचे पूर्ण नाव काय ?
लोकमान्य टिळकांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक आहे .
लोकमान्य टिळक का जन्म कुठे झाला?
बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील एका गावात झाला.
लोकमान्य टिळक यांचा मृत्यू कुठे आणि केव्हा झाला?
लोकमान्य टिळकांनी मुंबई येथे १ ऑगस्ट १९२० रोजी अखेरचा श्वास घेतला
Lokmanya Tilak Speech in Marathi
Lokmanya Tilak Bhashan in Marathi
lokmanya tilak bhashan in marathi
lokmanya tilak speech in marathi
लोकमान्य टिळक मराठी भाषण
लोकमान्य टिळक भाषण मराठी माहिती
लोकमान्य टिळकांवर भाषण
लोकमान्य टिळक पुण्यतिथी भाषण
लोकमान्य टिळक जयंती निमित्त भाषण
लोकमान्य टिळक भाषण दाखवा
लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त भाषण
लोकमान्य टिळक भाषण लहान मुलांसाठी
लोकमान्य टिळक पुण्यदिन भाषण
लोकमान्य टिळक यांच्या विषयी भाषण
लोकमान्य टिळक यांच्यावर भाषण
निष्कर्ष – Conclusion
विद्यार्थी मित्रांनो वरती दिलेल्या लेखांमध्ये आपण सर्वांनी लोकमान्य टिळक मराठी भाषण ( Lokmanya Tilak marathi bhashan ) पाहिले भाषणामध्ये आपण खूप सारी लोकमान्य टिळकांच्या जीवनाविषयी माहिती पाहिली या माहिती द्वारे आपण एक अंदाज लावू शकतो की लोकमान्य टिळकांचे जीवन कसे गेले असेल आणि त्याच प्रमाणे लोकमान्य टिळक मराठी भाषण पाहिल्यानंतर आपण त्याखाली काही प्रश्नांची उत्तरे देखील वाचली .
आम्ही तुमच्यासाठी काही महत्त्वपूर्वक प्रश्न त्या ठिकाणी टाकली होती आणि त्यांचे उत्तर देखील तुम्हाला अगदी सुटसुटीत आणि सोप्या शब्दांत देण्याचा प्रयत्न केलेला होता तो देखील आपण सर्वांनी वाचलाच असेल अशी आम्ही अपेक्षा करतो आणि त्यानंतर आपण या लेखाद्वारे आपल्या लोकमान्य टिळक मराठी भाषणाची तयारी करण्यास आपल्या सर्वांना खूप मदत झाली असेल अशीच आम्ही अपेक्षा करतो .
आज या ठिकाणी थांबतो तरी आपण आम्हाला लोकमान्य टिळक मराठी भाषण ही आम्ही कसे लिहिले यामध्ये अजून कोणत्याही प्रकारचा सुधार करावा वाटत असेल तो देखील अन्नाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवू शकता जेणेकरून आम्ही तुम्हाला वाटलेले गोष्टीवर विचार करून लवकरात लवकर ती गोष्ट दुरुस्त करण्याचा देखील प्रयत्न करूया.
त्याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे जर लोकमान्य टिळक मराठी भाषण असल तर ते तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवू शकता आम्ही तुमचे भाषण आमच्या या निर्मळ अकॅडमी वर टाकण्याचे नक्की प्रयत्न करूया धन्यवाद.