गुरुपौर्णिमा भाषण मराठी | Guru purnima Speech in Marathi

गुरुपौर्णिमा भाषण मराठी | Guru purnima Speech in Marathi  

Guru purnima Speech in Marathi : मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण सर्वजण गुरुपौर्णिमा मराठी भाषणाविषयी माहिती ( गुरुपौर्णिमा भाषण मराठी | Guru purnima Speech in Marathi ) घेणार आहोत अर्थातच आम्ही आपल्यासाठी खाली खूप सारे गुरुपौर्णिमा विषयी भाषण टाकलेली आहेत आपण ती भाषण अगदी बारकाईने वाचून समजून घेतली पाहिजे आणि त्याच पद्धतीने आपल्याला जर शाळेमध्ये गुरुपौर्णिमा विषयी भाषणासाठी तयारी करायची असेल तर आपण या भाषणांचा वापर करून देखील आपली तयारी करू शकता मित्रांनो आम्ही हा लेख लिहिण्यास खूप मेहनत केलेली आहेत तरीही आपण हा लेख बारकाईने वाचाल अशीच आम्ही अपेक्षा करतो आणि आजच्या या गुरुपौर्णिमा मराठी भाषण याविषयी आपल्यासमोर काही भाषण प्रस्तुत करतो चला तर पाहूया.
गुरुपौर्णिमा भाषण मराठी | Guru purnima Speech in Marathi

गुरुपौर्णिमा 


भारत हा उज्ज्वल प्राचीन संस्कृती असलेला देश आहे. ऋषी-मुनींच्या या देशात नीतीला, चारित्र्याला खूपच महत्त्व आहे. नीतीचे नियम, सिद्धांत यांची जाणीव आपल्या पूर्वीच्या काळी गुरुनीच करून दिली आहे....

पूर्वी तर विद्यार्थी गुरुगृही जाऊनच शिकायचे. प्रभू रामचंद्र, धनुर्धर अर्जुन, एकलव्य अशी अनेक उदाहरणे आपल्याला देता येतील. शिष्याच्या मनात गुरुविषयी असणारा जो आदर आहे तो व्यक्त करण्याची संधी शिष्याला मिळावी. महनीय गुरूंनी आपल्याला जे संपन्नत्व दिले. त्यांचा उतराई होण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. या गुरु पौर्णिमेलाच व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. महाभारतासारखा अजोड ग्रंथ व्यासांनी लिहिला. म्हणूनच त्यांना अखंड भारतवर्षाचे गुरु मानले जाते. 

आपल्या घरातील आई वडील हे या विश्वात आपल्याला आणून सोडतात, जन्म देतात. आकाशाएवढं उंच करण्याचं काम गुरु करतात. म्हणून प्रथम आई-वडिलांना नमस्कार करावा आणि नंतर गुरुंची पूजा करावी. त्यांना मनोभावे वदंन करावे. ज्यांच्याकडून आपल्याला विद्या मिळते, त्यांना गुरुदक्षिणा द्यावी. त्यांचे शुभाशिर्वाद घ्यावेत. म्हणजे आपली विद्या सफल होते. अशी धारणा आहे.

भारतीय संस्कृतीत आद्य शंकराचार्याचे स्थान हे अतिशय वरचे आहे. त्यांना संन्यासी व्यासांचेच अवतार मानतात. म्हणून त्यादिवशी षोडशोपचार करून व्यासांची पूजा केली जाते. तामिळनाडूत तर ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेलाच व्यासपूजा केली जाते. शृंगेरी आणि कुंभकोणम् या ज्ञानपीठात ही व्यासपूजेचा उत्सव मोठ्या प्रमाणात होतो.

याच दिवशी जैन लोक उपवास करून 'जिनपूजा करतात. तर बौद्धधर्मीय लोकसुद्धा हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतात. कारण गौतम बुद्धाने धर्मचक्र परिवर्तन याच दिवशी केले. हिंदू, जैन आणि बौद्ध धर्मात या दिवसाला अत्यंत महत्त्व असते.

गुरुपौर्णिमा भाषण मराठी | Guru purnima Speech in Marathi  

आदी गुरुसी वंदावे | मग साधनं साधावे  ||१||
गुरु म्हणजे माय बापं | नाम घेता हरतील पाप ||२||
गुरु म्हणजे आहे काशी | साती तिर्थ तया पाशी ||३||
तुका म्हणे ऐंसे गुरु | चरणं त्याचे ह्रदयीं धरू  ||४||

सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, प्रमुख पाहुणे आणि माझे वंदनीय गुरुवर्य ! सर्व प्रथम मी जगातील सर्व गुरुंना वंदन करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो.भारतीय संस्कृतीत गुरुला ईश्वराचे स्थान दिले आहे; कारण गुरू आपल्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश घेऊन येतात.

आषाढ पौर्णिमेला व्यासपौर्णिमा किंवा गुरूपोर्णिमा असे म्हणतात. गुरु या शब्दामध्ये सगळे सामावलेले आहे. गुरूंना नेहमी देवतुल्य मानले गेले आहे. ज्या शिष्याने गुरूला देवतुल्य मानले, त्याने यशाची शिखरे गाठल्याची अनेक उदाहरणे दिसतात. योग्य गुरु भेटल्याशिवाय माणूस आयुष्यात काहीही करू शकत नाही. महर्षी व्यास, गुरु द्रोणाचार्य यांचे रामायण, महाभारतातील आदर्श आजही युवकांना नवी दिशा देतात. आई - वाडेल पंख देतात, त्या पंखात भरारी मारण्याचे बळ गुरुजन देतात.

गुरु परमात्मा परेषु प्रत्येक विध्या, कला शास्त्र यांच्या निर्मितीमध्ये गुरू-शिष्याची मोठी परंपरा दिसून येते. गुरु - शिष्याचे नाते हे केवळ शिक्षणापुरते मर्यादित नसते. शिष्याच्या मनातील वैचारिक गोंधळ दूर करणारा, समाजाला सकारात्मक दिशा दाखविणारा गुरु असतो.

गुरूपौर्णिमा भाषण मराठी |  Guru Purnima speech in marathi 

गुरुपौर्णिमा चारोळी  ( guru purnima charolya )

विद्यालय सुटत पण आठवणी कधीच 
आपल्या जीवनात सुटत नाहीत ..
गुरू नावाचं पातं कधीच तुटन नाही.

आधुनिक काळात सर्वच क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञाना मुळे प्रगती झाली आहे. तरीसुद्धा वेदकाळापासून ज्ञानदानाचे कार्य व प्रसार गुरू - शिष्य परंपरेनेच झालेला आहे व आजतागायत तो सुरू आहे. संत कबीरांनी लिहून ठेवल्याप्रमाणे 'गुरु बिन कौन बतावे बाट' या ओळीची प्रचिती प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला येते. गुरूच्या ज्ञानाने ज्ञानी होऊन ज्ञानाचा योग्य विनियोग शिष्याकडून होऊ शकतो व अनेक आदर्श व्यक्तिमत्त्व घडून आपला देश अधिक सुखी  आणि समृद्ध होणार आहे.

विध्यार्थी मित्रांनो गुरू म्हणजे काय तर जगातले दुःख नाहीसे करण्याची शक्ती हिऱ्या मोत्यात नाही, ती दुसऱ्याचे दुःख पाहून द्रवणाऱ्या आणि अहंकार सोडून त्याच्या सेवेसाठी सज्ज होणाऱ्या मनुष्याच्या चिमुकल्या हृदयात आहे. हेच हृदय म्हणजे गुरू तर शिष्य म्हणजे काय ? तर शिष्य म्हणजे. विद्येची आस असणारा एक नायक - शिष्य ही अशी एक बी आहे की, ज्या जमिनीत तुम्ही पेशल, तिथे ती फलदायी ठरणारच. शिष्य म्हणजे ज्ञानरूपी सागरात पोहणारा राजहंस. 

जीवनाशी सांगड घालणारा मूकनायक आयुष्य जगत असतांना आपल्याला गुरूने शिकविलेले सदाचरण कायम आपण लक्षात ठेवावयास हवे , आणि पुढच्या पिढीकडे संस्कारातुन हस्तांतरित करायला हवे हीच आपल्या गुरू चरणी खरी गुरू दक्षिणा ठरेल।

शेवटी जाता जाता एवढंच बोलेले 
गुरु म्हणजे आहे काशी ,साती तीर्थ तया पाशी 
तुका म्हणा ऐंसे गुरु ,चरण त्याचे हृदयी धरू ||

गुरुपौर्णिमा भाषण निबंध मराठी माहिती | Guru purnima bhashan nibandh marathi 


        गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि
            अखंड वाहणारा झरा.....
        गुरू म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य...
     गुरू म्हणजे निस्सीम श्रध्दा आणि भक्ती...
        गुरू म्हणजे विश्वास आणि वात्सल्य...
गुरू म्हणजे आदर्श आणि प्रमाणतचे मूर्तिमंत प्रतिक....
गुरूपौर्णिमेच्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा.......

गुरू त्यांच्याजवळील ज्ञान आणि अनुभवातून शिष्याला मार्गदर्शन करत असतात. जीवन जगत असतांना या ज्ञान आणि अनुभवाची प्रत्येकाला गरज असते. स्वानुभवातुन शिकण्यापेक्षा एखादया व्यक्तीचा सल्ला घेतल्यामुळे जीवनातील समस्या लवकर सोडविता येतात आणि जीवन सुखी-समाधानी होते.

थोडक्यात जीवनात गुरूशिवाय तरणोपाय नाही. म्हणूनच जन्म देणारी आई असो अथवा अध्यात्मिक मार्गदर्शन करणारे सद्गुरू असोत खरा गुरू मिळणं ही भाग्याची गोष्ट आहे. ज्याच्या जीवनात खरा गुरू अथवा सद्गुरू आहे त्याचे जीवन यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. मात्र शिष्याला गुरूं प्रती कृतज्ञता आणि श्रध्दा असणे गरजेचे आहे. यासाठीच गुरूपौर्णिमेचे महत्त्व प्रत्येकाला माहीत असणे आवश्यक आहे.

        गुरूब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा 
      गुरू साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः 
अर्थात गुरू म्हणजे ब्रम्हा, विष्णू आणि महेश.

...गुरू ईश्वराचे दुसरे रूप असतात. आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरूपौर्णिमा असे म्हटले जाते. ज्या गुरूंनी आपले व्यक्तिमत्व घडविले त्या गुरूप्रती आदर व्यक्त करण्याचा, त्यांना नतमस्तक होण्याचा दिवस म्हणजे गुरूपौर्णिमा. या पौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही संबोधले जाते कारण आदिगुरू व्यासांचा जन्म या पौर्णिमेला झाला होता.

ज्ञानेश्वरांनी सुध्दा ज्ञानेश्वरी लिहितांना 'व्यासांचा मागोवा घेतु' असे व्यास ऋषींबद्दल गौरवोद्गार - काढले आहेत. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन मडके बनवतो. त्याचप्रमाणे गुरू सजीव - मानवरूपी व्यक्तिमत्वाला आपल्या संस्कारांनी आदर्श घडवितात. गुरूंचे ज्ञान सागराप्रमाणे अथांग आहे.आपण त्याच्यापुढे नम्र होऊन ज्ञान सागराप्रमाणे .अथांग आहे. आपण त्याच्यापुढे नम्र होऊन ज्ञानकण वेचले पाहिजे. कारण शेवटी गुरुविण कोण दाखविल वाट.

             हजार चांदण्या शोधण्यापेक्षा
            एकच चंद्र शोधा, आणि हजार
     चंद्र शोधण्यापेक्षा एकच सूर्य जवळ ठेवा.

गुरूपौर्णिमा भाषण निबंध मराठी माहिती | Guru purnima speech essay in marathi


ऊँ गुरूवे नमः
गुरुब्रह्मा गुरुविर्ष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।
गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः।

गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर मी जगातील सर्व शिक्षकांना नमन करतो. गुरुचे महत्त्व आपल्या सर्व ऋषीमुनींनी आणि महान व्यक्तींनी उच्च स्थान दिले आहे.संस्कृतमध्ये ‘गु’ म्हणजे अंधार (अज्ञान) आणि ‘रु’ म्हणजे प्रकाश (ज्ञान). गुरू आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात. दरवर्षी आषाढ शुक्ल पौर्णिमेला संपूर्ण भारतात गुरुपौर्णिमेचा सण साजरा केला जातो. हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मातील लोक या दिवशी आपल्या गुरूच्या स्मरणार्थ उपवास, पूजा इत्यादी करून हा सण आपापल्या परीने साजरा करतात.

आपले पालक हे आपल्या आयुष्यातील पहिले शिक्षक आहेत. जो आपलं पालनपोषण करतो, आपल्याला बोलायला, चालायला शिकवतो आणि ऐहिक जगात पहिल्यांदाच सुरुवातीच्या गरजा शिकवतो. त्यामुळे आई-वडिलांचे स्थान सर्वोच्च आहे. जीवनाचा विकास सुरळीत चालण्यासाठी आपल्याला गुरुची गरज आहे. भावी जीवन गुरूंनी घडवले आहे.

मानवी मनातील विषाचे दुष्ट रूप दूर करण्यात गुरूचे विशेष योगदान आहे. महर्षी वाल्मिकी ज्यांचे पूर्वीचे नाव ‘रत्नाकर’ होते. आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी तो लुटारू करत असे. महर्षि वाल्मिकीजींनी रामायणासारखे महाकाव्य रचले, हे तेव्हाच शक्य झाले जेव्हा गुरुजी नारदजींनी त्यांचे हृदय बदलले. मित्रांनो, आपण सर्वांनी पंचतंत्राच्या कथा वाचल्या किंवा ऐकल्या असतील. कुशल गुरू विष्णु शर्मा यांनी अमरशक्तीच्या तीन अज्ञानी पुत्रांना कथा आणि इतर माध्यमांतून कसे ज्ञानी केले.

गुरू आणि शिष्य यांचे नाते पुलासारखे असते. गुरूंच्या कृपेने शिष्याचा ध्येयाचा मार्ग सुकर होतो. स्वामी विवेकानंदांना लहानपणापासूनच ईश्वरप्राप्तीची इच्छा होती. गुरु परमहंसांचा आशीर्वाद मिळाल्यावरच त्यांची ही इच्छा पूर्ण होऊ शकेल. गुरूंच्या कृपेनेच आत्मसाक्षात्कार शक्य झाला.

गुरूंनी सांगितलेला एक शब्द किंवा प्रतिमा माणसाचे रूप बदलू शकते. मित्रांनो, कबीर दास जी यांचे त्यांच्या गुरूंप्रती असलेले समर्पण स्पष्ट करणे आवश्यक आहे कारण गुरूंचे महत्त्व कबीर दासजींच्या दोह्यांमध्ये सर्वात जास्त दिसून येते.

एकदा रामानंद जी गंगेत स्नान करण्यासाठी जात असताना पायऱ्या उतरत असताना त्यांचा पाय कबीरदासजींच्या अंगावर पडला. रामानंदजींच्या तोंडून ‘राम-राम’ हा शब्द बाहेर पडला. कबीर दास जींनी दीक्षा मंत्र म्हणून समान शब्द स्वीकारले आणि रामानंदजींना त्यांचे गुरू म्हणून स्वीकारले. कबीर दासजींच्या शब्दात – ‘आम्ही काशीत प्रकटलो, रामानंद चेतावणी’. गुरूचे जीवनातील महत्त्व कबीर दासजींनी आपल्या दोह्यांमध्ये पूर्ण भावनेने वर्णन केले आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.

गुरू गोविन्द दोऊ खङे का के लागु पाँव,
बलिहारी गुरू आपने गोविन्द दियो बताय।

गुरूचे स्थान भगवंतापेक्षा श्रेष्ठ आहे. गुरू हा आपल्या सुसंस्कृत समाजजीवनाचा आधारस्तंभ आहे. असे अनेक गुरू होऊन गेले, ज्यांनी आपल्या शिष्यांना अशा प्रकारे शिक्षण दिले की त्यांच्या शिष्यांनी राष्ट्राची दिशाच बदलून टाकली.

आचार्य चाणक्य हे एक महान व्यक्तिमत्व होते, ज्यांनी आपल्या विद्वत्ता आणि कर्तृत्वाच्या जोरावर भारतीय इतिहासाची दिशा बदलून टाकली. गुरु चाणक्य हे कुशल राजकारणी आणि उत्तम अर्थतज्ज्ञ म्हणून जगप्रसिद्ध आहेत. आपला वीर शिष्य चंद्रगुप्त मौर्य याला राज्याचे गादीवर बसवून त्याने दाखवलेल्या विलक्षण प्रतिभेची संपूर्ण जगाला ओळख आहे.

गुरू आपल्याला आपले मन दुखावल्याशिवाय सभ्य जीवन जगण्यास सक्षम करतात. जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन गुरूंच्या कृपेने प्राप्त होतो. प्राचीन काळापासून चालत आलेली गुरु महिमा शब्दात लिहिता येणार नाही. संत कबीर असेही म्हणतात की –

सब धरती कागज करू, लेखनी सब वनराज।
सात समुंद्र की मसि करु, गुरु गुंण लिखा न जाए।।

गुरुपौर्णिमेच्या सणाला फक्त आपल्या गुरूंचे स्मरण करण्याचा प्रयत्न असतो. गुरूचा महिमा दाखवणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखे आहे. गुरूंची कृपा आपल्या सर्वांवर राहो. सरतेशेवटी, कबीर दासजींच्या पुढील दोह्यासह आपली लेखणी थांबवतो.

यह तन विष की बेलरी, गुरु अमृत की खान।
शीश दियो जो गुरु मिले, तो भी सस्ता जान।।


गुरुपौर्णिमा विषयी मराठी भाषण | guru purnima bhashan in marathi


“गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः ll
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः ll”

येथे जमलेल्या सर्व अतिथी मंडळी शिक्षक व विद्यार्थ्यांना माझा प्रणाम. माझे नाव ( येथे तुमचे नाव ) आहे मी आपल्या शाळेतील इयत्ता ( तुमचा वर्ग ) वी चा विद्यार्थी आहे. आज आपण गुरु पौर्णिमेच्या या दिवसाला साजरे करण्यासाठी जमले आहोत. गुरु पौर्णिमा आषाढ पौर्णिमेला साजरी केली जाते, गुरु पौर्णिमेचा भारतीय संस्कृतीमध्ये खूप मोठा वाटा आहे.गुरु हा शब्द संस्कृत भाषेत ‘अंधकार दूर करणारा’ या अर्थाने समजला जातो. गुरु हा आपल्या शिष्याचे अज्ञान दूर करून त्याच्या जीवनावर प्रकाश टाकतो.

बौद्ध धर्मामध्ये या दिवशी भगवान बुद्धाची पूजा केली जाते, हिंदू पद्धतीनुसार गुरुपौर्णिमेच्या दिवशी महान ऋषी व्यास यांची पूजा केली जाते. ऋषी व्यास यांना गुरु-शिष्य परंपरेचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की गुरुपौर्णिमेच्या दिवशी ऋषी व्यास यांचा जन्म झाला होता आणि याच दिवशी त्यांनी ब्रह्म सूत्र लिहिण्यास सुरुवात केली.


गुरूपौर्णिमेचे महत्व – Guru Purnima Information In Marathi


गुरू अणि शिष्य या दोघांचे नाते खुप पवित्र असते.असे म्हटले जाते की जर आपणास जीवनात खुप यशस्वी व्हायचे असेल तर आपण एक चांगल्या गुरूचे मार्गदर्शन घेणे फार गरजेचे आहे.

गुरू,शिक्षक हा तो व्यक्ती असतो जो स्वता आहे तिथेच राहतो पण आपल्या प्रत्येक शिष्याला यशाच्या उंच डोंगरावर घेऊन जात असतो.अणि आपल्या शिष्याला जीवनात खुप यशस्वी झालेले पाहुन गुरूची मान अभिमानाने उंचावली जात असते.

गुरूला आज आपण देवाचा दर्जा दिला जातो.गुरूविना महान अणि मोठा झाला असा एकही व्यक्ती आज आपणास ह्या जगात दिसुन येत नाही.कारण तोच आपल्याला योग्य तो मार्ग दाखवून मार्गदर्शन करून आपल्या जीवनाला एक योग्य दिशा देत असतो. गुरूचे मार्गदर्शन हे प्रत्येकाच्या जीवनात महत्वाचे असते.अणि असे म्हटले देखील जाते की गुरूशिवाय ज्ञान नाही.गुरूच आपल्याला ज्ञान प्रदान करून अज्ञानाचा सज्ञान बनवित असतो.

आपले गुरूच आपणास नेहमी खरे बोलावे अणि सत्याचा मार्ग अवलंबित करावा ही अनमोल शिकवण देत असतात.अणि समाजामधील एक आदर्श नागरीक तसेच व्यक्ती बनवून आपल्या व्यक्तीमत्वाला आकार देत असतात. गुरूच तो व्यक्ती आहे जो आपल्या अंधकारमय जीवणाला ज्ञानाच्या प्रकाशात घेऊन जात असतो.गुरूच आहे जो दगडा प्रमाणे असलेल्या शिष्यास योग्य आकार देऊन त्याची मुर्ती साकारत असतो.

म्हणुन आपल्या जीवनाला एक योग्य आकार दिशा प्राप्त करून देणारया गुरूविषयी कृतज्ञता आदर व्यक्त करण्यासाठी त्यांचे मनापासुन आभार मानण्यासाठी त्यांच्या समर्पणाचे कौतुक करण्यासाठी आपण दरवर्षी गुरू पौर्णिमा साजरी करत असतो. हिंदु धर्मीय लोक यादिवशी महर्षी व्यास यांची पुजा करतात तर बौदध धर्मात याचदिवशी गौतम बुदध यांच्या प्रतिमेची पुजा केली जात असते.

गुरूपौर्णिमा हा तो दिवस आहे ज्या दिवशी प्रत्येक शिष्य आपल्या गुरूची भेट घेतो त्यांचा आर्शिवाद प्राप्त करतो.आषाढ महिन्यामधला हा पौर्णिमेचा दिवस हिंदु धर्मीय वर्षातील खुप शुभ दिवस मानला जातो. गुरूपौर्णिमेला गुरूची उपासना केल्याने आपणास गुरूच्या दिक्षेचे पुर्ण फळ मिळत असते.याच दिवशी गुरूच्या नावाने काही जण दानपुण्य देखील करत असतात.

गुरुपौर्णिमा भाषण मराठी | Guru purnima Speech in Marathi

विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हा गुरुपौर्णिमा भाषण मराठी आणि विषयी लेख कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा त्याच पद्धतीने आपल्याकडे अजून कोणतेही गुरुपौर्णिमा विषयी मराठी ( Guru purnima Speech in Marathi ) मध्ये भाषण असेल तर ते भाषण आम्हाला कृपया करून आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका आम्ही तुमचे हे भाषण तुमच्या नावासोबत आमच्या या नवीन वेबसाईटवर टाकण्याचा नक्की प्रयत्न करू या आणि त्याच प्रमाणे आपण आपले नाव या वेबसाईटवर मेन्शन देखील करू शकता त्यामुळे आपण आपले बनवलेले भाषण आमच्याशी नक्की कमेंट बॉक्समध्ये शेअर करू शकता आणि आपल्या हा लेख आपल्या सर्व मित्र परिवारांची नक्की शेअर करू शकता जेणेकरून त्यांना देखील गुरुपौर्णिमेचे भाषण मराठीमध्ये शोधण्यामध्ये किंवा त्यांना गुरुपौर्णिमा मराठी भाषणाची तयारी करण्यास खूप सोप्पं जाईल आणि मदत होईल आज या ठिकाणी थांबतो धन्यवाद.
Related searches :
  • गुरुपौर्णिमेचे महत्व
  • गुरु विषयी निबंध
  • गुरुपौर्णिमा विषयी निबंध
  • गुरुपौर्णिमा विषयी माहिती
  • गुरुपौर्णिमा भाषण
  • गुरुपौर्णिमा निबंध
  • गुरुपौर्णिमा माहिती मराठी

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post