स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी भाषण | Swatantra veer savarkar speech in Marathi


स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी भाषण | Swatantra veer savarkar speech in Marathi

 स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी भाषण : विद्यार्थी मित्रांनो आजच्या या लेखांमध्ये आपण सर्वजण विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनाविषयी माहिती घेणार आहे . त्याचप्रमाणे आपण आजच्या या लेखांमध्ये विनायक दामोदर सावरकर मराठी भाषण नाची तयारी देखील करणार आहोत कारण हे एक खूप चांगले असे स्वतंत्र वीर होऊन गेलेले आहे ज्यांनी आपल्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःची जीवनाचा विचार न करता आपल्या भारताचा विचार केलेला आहे याच स्वातंत्र्य दिनाच्या जीवनाविषयी आपण काही माहिती घेणार आहोत .

या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विषयी भाषणाची तयारी देखील करणार आहोत मग आपण सर्वजणांनी हा लेख खूप काळजीपूर्वक वाचावा जेणेकरून विनायक दामोदर सावरकर मराठी भाषण आणि विनायक दामोदर सावरकर यांची मराठी मध्ये माहिती आपल्याला वाचायला मिळेल आणि आपल्याला नवीन काही गोष्टी शिकायला देखील मिळते चला तर पाहूया आजच्या या लेखाला आणि जाणून घेऊया विनायक दामोदर सावरकर यांचे जीवन.

RELATEDIMAGES FOR 

स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी भाषण | Swatantra veer savarkar speech in Marathi

स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी भाषण | swatantra veer savarkar bhashan marathi


" बंदीस देवशाळा । 
बेडीस पुष्पमाला हातास मानू झोला । 
काळाशी खेळू खेळा आम्ही स्वराष्ट्र संत । 
करू मातृभू स्वतंत्र वारून पारतंत्र्य करू राष्ट्रभू स्वतंत्र "

असा मूलमंत्र मानून उभे आयुष्य झिजवणारे महान स्वातंत्र्यवीर म्हणजे सावरकर होय. शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात जन्मलेला हा पोलादी पुरुष म्हणजे क्रांतिचळवळीचा आत्मा होता. १८५७ च्या स्वातंत्र्य समरानंतर सशस्त्र क्रांतिचा इतिहास वीर सावरकरांच्या नावाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात त्यांनी दिलेली पूर्णाहुती, त्यासाठी ज्या यातना, हाल-अपेष्टा सहन केल्या त्याचा इतिहास जर साक्षी नसता तर पुढील क्रांती घडणे अशक्यच होते.

सावरकरांचे मूळ घराणे कोकणातले, परशुराम भूमीतील गुहागर विभागातले. छत्रपती शिवराय आणि बाजीरावांच्या काळात त्यातील काही घराणी देशावर आली. त्यातीलच सावरकर कुटुंब नाशिक जवळील भगूर येथे स्थिर झाले. येथेच २८ मे १८८३ रोजी दामोदरपंत सावरकर यांच्या पत्नी सौ. राधाबाई यांनी चौथ्या मुलाला जन्म दिला. त्याचे तेजस्वी नेत्र, विशाल भाळ आकर्षक मुद्रा पाहून नाव ठेवले विनायक, विशेष नायक! पण याच सावरकरांना लहानपणीच मातृसुखाला पारखे व्हावे लागले.

लहानाचे मोठे होत असतानाच त्यांना लेखन आणि वक्तृत्व या दोन कलांचा छंद जडला. एकदा एक वक्तृत्त्व स्पर्धेची बातमी त्यांना उशीरा समजली. तरीही त्या स्पर्धेत त्यांनी भाग घेतला. पण भाषण करणाऱ्यांच्या यादीत त्यांचे नाव शेवटी आले. सर्व स्पर्धकांची भाषणे ऐकताना परीक्षक कंटाळून गेले होते. अशा वेळी सावरकर बोलायला उभारले. त्यांच्या बाणेदार विचारांनी, ओघवत्या भाषेनी परीक्षकांचा कंटाळा कुठल्या कुठे गेला. त्या स्पर्धेत सावरकरांना पहिला क्रमांक मिळाला!

बक्षीस वितरण कार्यक्रमात एक परीक्षक बोलताना म्हणाले, "सावरकर आता जे काही बोलला ते काही त्याचे विचार नसावेत. त्याच्या वयाला झेपणारे हे विचार नाहीत. त्याने दुसऱ्या कोणाकडून तरी भाषण लिहून घेतलं असावं. ते काही असलं तरी तो बोलला उत्कृष्ट, म्हणूनच आम्ही त्याला पहिला नंबर दिला."

मात्र याचवेळी सावरकरांनी परीक्षकांना ठणकावून सांगितलं, "हे भाषण माझं आहे. मी कोणाकडूनही लिहून घेतलेलं नाही. मला सवय आहे ती स्वतःचे विचार मांडण्याची. मी दुसऱ्याकडून विचार उसणे घेत नाही." याच वेळी बळवंतराव पारख तेथे उपस्थित होते. ते सावरकरांच्या वाग्वैभवावर मुग्ध होऊन पाठ थोपटत म्हणाले, "सावरकर नाव यथार्थ कर बरं का! ज्याचा 'कर' पडत्या राष्ट्राला सावरतो तोच खरा सावरकर..." नंतर सावरकरांनी आपल्या नावाची यथार्थता आपल्या कर्तृत्वाने सिद्ध पण केली. आपल्या वयाची पंधरा वर्षे पूर्ण होण्याच्या आधीच सावरकरांनी भरपूर वाचन केले. मराठ्यांचा इतिहास, बखरी वाचल्या. एक इतिहासाच्या ग्रंथांचे पहिले पान फाटून गेल्याने वाचायला मिळाले नाही, त्यांनी निष्कर्ष काढला की विश्वाच्या इतिहासाचे पहिले पान कधीच वाचायला मिळणार नाही. महाभारत वाचल्यावर अर्जुनापेक्षा भीम हाच श्रेष्ठ आदर्श पुरुष असल्याचे मत त्यांनी मांडले. आंग्ल भाषेतील 'इलियड ' सारखे महाकाव्यही त्यांनी वाचले.

ते शिक्षणासाठी पुढे इंग्लडला गेले. तिथे शिक्षण चालू असतानाही देशकार्यात मात्र खंड पडलेल्या नव्हता. तेथेच त्यांनी 'अभिनव भारत' ही क्रांतिसंघटना स्थापन केली. गावठी पिस्तुले तयार करून मित्रांकरवी एकवीस पिस्तुले भारतात पाठवून दिली. १८५७ च्या सशस्त्र उठावाची माहिती व्हावी म्हणून 'स्वातंत्र्यसमर' हा ग्रंथ लिहिला. या सर्वांची परिणती स्वातंत्र्ययुद्ध भडकण्यात झाली. तपासाची चक्रे गतिमान झाली, त्यातच सावरकरांना अटक झाली. ब्रिटिशांच्या कडक पहाऱ्यातून त्यांना नेले जात असताना मार्सेलीस बंदरात त्यांनी सागरात झेप घेतली. त्यांची ही उडी त्रिखंडात गाजली. अशा अनंत प्रसंगांमुळेच त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. यशवंत आपल्या कवितेत म्हणतात.

" वाढू दे कारागृहांच्या भिंतींची उंची किती मन्मना नाही क्षिती
भिंतींच्या उंचीत आत्मा राहतो का कोंडूनी ?
मुक्त तो रात्रंदिनी."

या ओळीच सावरकारांच्या जीवनाचा अचूक वेध घ्यायला पुरेशा आहेत. सावरकर हेच मुळी राष्ट्रीय वृत्तीचे, उत्तुंग प्रतिभेचे कवी होते.

सत्तावनचे स्वातंत्र्यसमर, जोसेफ मॅझिनी, माझी जन्मठेप, सन्यस्त खड्ग, काळे पाणी, गोमंतक, कमला, सप्तर्षी इत्यादी विविध वाङ्मय प्रकारातली पुस्तके त्यांनी समरसून लिहिली. एका बाजूला स्वातंत्र्यवीर तर दुसऱ्या बाजूला स्वातंत्र्यशाही अशा आगळ्या रसायनामुळे त्यांची कविता म्हणजे स्वातंत्र्य

देवतेची आरतीच झाली आहे. त्यांच्या या ओजस्वी साहित्याचा सन्मान करायचा म्हणूनच १९३८ साली मुंबई येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांना निवडण्यात आले होते.

सावरकर कट्टर हिंदुत्त्ववादी होते पण स्पृश्य-अस्पृश्य हा भेदभाव त्यांच्याजवळ नव्हता. विज्ञाननिष्ठ दृष्टीही त्यांना लाभली होती.

२४ डिसेंबर १९१० रोजी त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. ६ जानेवारी १९२४ रोजी रत्नागिरी कारागृहात त्यांना स्थानबद्ध करण्यात आलं. पुढे दोन वेळा स्थानबद्धतेत वाढ होऊन अखेर १९३७ ला ही स्थानबद्धता संपली. त्यांचं कारागृहातलं जीवन, काथ्या कुटणं, चुण्याची घाणी ओढणं असे प्रसंग तर मन थरारून सोडतात. भारत स्वतंत्र झाल्याचे भाग्य मात्र त्यांना डोळ्यांनी पाहता आले.

अखेर २६ फेब्रुवारी १९६६ रोजी ते काळाच्या पडद्याआड गेले. एक ज्वलंत देशभक्ती, जाज्ज्वल्य देशनिष्ठा, अतुल शौर्याची गाथा असलेलं त्यांचं जीवन होतं. म्हणूनच लोककवी मनमोहन यांनी म्हटले आहे

" ते आता दिसणार नाही
की जे निशाणातच नव्हे, प्राणातही भगवे होते
आता स्पंदणार नाही
की जे वेरूळचे शिल्प अंदमानात घडवीत होते ते आता बोलणार नाही
की जे सत्तावन नंतरचे खरे अठ्ठावन्न होते.
ते आता हसणार नाही
की जे अमावसेची प्रसन्न पुनव करीत होते."


स्वातंत्र्यवीर सावरकर यांची माहिती | Vinayak Damodar Savarkar Marathi speech


FREQUENTLYPEOPLE ALSO ASK

  •  स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म कधी झाला ?

    विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म 28 मे 1883 रोजी नाशिक मधील भंगूर ह्या गावी झाला. विनायक दामोदर सावरकर (२८ मे १८८३ ते २६ फेब्रुवारी १९६६)
  • विनायक दामोदर सावरकर यांना स्वातंत्र्यवीर सावरकर अशी उपाधी कोणी दिली ? 

    सावरकराना स्वातंत्र्यवीर सावरकर अशी उपाधी प्रल्हाद केशव अत्रे यांनी दिली होती
  • सावरकरांना तुरुंगात का टाकले?

    7 एप्रिल 1911 रोजी नाशिकचे जिल्हाधिकारी जॅक्सन यांच्या हत्येप्रकरणी नाशिक कट खटल्यात काळ्या पाण्याच्या शिक्षेवर त्यांची रवानगी सेल्युलर जेलमध्ये झाली. त्यांच्या मते येथे स्वातंत्र्यसैनिकांना खूप कष्ट करावे लागले.
  • वीर सावरकरांच्या पत्नी कोण होत्या? 

    वीर सावरकरांच्या पत्नी यमुनाबाई होत्या 
  • कोण होते विनायक दामोदर सावरकर?

    विनायक दामोदर सावरकर हे एक स्वातंत्र्यवीर होते यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी खूप संघर्ष केलेला आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी | swatantra veer savarkar bhashan marathi


निष्कर्ष – Conclusion

 आपण आजच्या या लेखांमध्ये विनायक दामोदर सावरकर हे एक स्वतंत्र्यवीर आहे त्याचप्रमाणे यांनी आपल्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी खूप काही सहन केलेले आहे आणि आपल्या स्वातंत्र्यासाठी खूप संघर्ष देखील केलेला आहे याच थोर व्यक्तींचे आज आपण या लेखाद्वारे माहिती घेतली आहे आणि त्याचप्रमाणे विनायक दामोदर सावरकर यांचे मराठी भाषण करण्यासाठी तयारी म्हणून आपण वरती काही माहिती आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही आशा करतो की आपल्याला ही माहिती आवडली असेल आणि आपल्याला या माहितीचा फायदा देखील झालेला असेल.

 विद्यार्थी मित्रांनो आजच्या या लेखांमध्ये आपण सर्वांनी पाहिले विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनाविषयी माहिती आणि त्याचप्रमाणे आपण विनायक दामोदर सावळकर मराठी भाषण (  Swatantra veer savarkar speech in Marathi ) देखील पाहिले विद्यार्थी मित्रांनो आपल्याला यामधील कोणती गोष्ट आवडली ही आम्हाला आपण सर्वजण कमेंटमध्ये नक्की कळवू शकता त्याचप्रमाणे आपल्याला विनायक दामोदर सावरकर यांच्या विषयी कोणत्याही प्रकारच्या प्रश्न पडलेला असेल तो देखील तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर देणे नक्की प्रयत्न करूया आणि त्याच प्रमाणे विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनाविषयी आपण आजच्या या लेखांमधून काय शिकला आपण हे देखील आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवू शकता धन्यवाद.


POSTRELATED SEARCHES

  • स्वातंत्र्यवीर सावरकर यांची माहिती
    विनायक दामोदर सावरकर मराठी भाषण
    स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी भाषण
    स्वातंत्र्यवीर सावरकर माहिती मराठी भाषण निबंध
    स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी निबंध
    विनायक दामोदर सावरकर यांच्या विषयी माहिती
    स्वातंत्र्यवीर सावरकर भाषण
    स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर मराठी भाषण 
    Swatantra veer savarkar speech in Marathi
    swatantra veer savarkar bhashan marathi
    Veer Savarkar Speech In Marathi
    Vinayak Damodar Savarkar Marathi speech


Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post