साने गुरुजी भाषण मराठी | sane guruji jayanti bhashan
RelatedImages for
साने गुरुजी भाषण मराठी | sane guruji jayanti bhashan
" मी जीवनाचा एक नम्र उपासक आहे. सभोवतालचा सारा संसार सुखी नि समृद्ध व्हावा, ज्ञानविज्ञान संपन्न नि कलामय व्हावा. सामर्थ्यसंपन्न नि प्रेममय व्हावा हीच एक मला तळमळ आहे. माझे लिहिणे वा बोलणे, माझे विचार वा माझी प्रार्थना या एकाच ध्येयासाठी असतात. "
असं तळमळीनं सांगणाऱ्या साने गुरुजींचा जन्म २४ डिसेंबर १८९९ रोजी पालगड येथे झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात हे गाव आहे. पांडुरंग सदाशिव साने असं त्यांचं पूर्ण नाव होतं.
महाराष्ट्राचा लाडका श्याम... एक लोकप्रिय शिक्षक... एक 5.... एक थोर स्वंयसेवक... एक विचारवंत... मातृहृदयाचा कथालेखक.... कथानिवदेक्... साहित्यिक... आणि मानवप्रेमी म्हणून सानेगुरुजी अखंड महाराष्ट्राला परिचित आहेत.
आई देह देते मनही देते. जन्माला घालणारी तीच आणि ज्ञान देणारीही तीच. साने गुरुजींनी, 'श्यामची आई' या पुस्तकाच्याद्वारे आपल्याला मातेची महती सांगितली आहे. ही महती सांगताच त्यांच्या मनातील नारी तत्त्वाचा • विकास होत गेला. म्हणूनच ते मुलांच्यात सतत रमायचे. त्यांना गोष्टी सांगायचे. गाणी शिकवायचे, हसायचे, खिदळायचे अगदी फुलांच्या ताटव्यासारे फुलून यायचे. त्यांच्यातला नरपणा लुप्त व्हायचा आणि ते केवळ माऊली बनायचे.
कधी सुंदर पत्रे लिहून तर कधी मुलांसाठी विविध भावांची गाणी लिहून महाराष्ट्रातल्या मुलांची मने त्यांनी घडवली. त्यांच्या आईनं जे जे त्यांच्यात ओतलं तेच सारं मुलांच्यात त्यांनी पेरलं. मग आंघोळ केल्यानंतर आईने जेव्हा त्यांचे अंग पुसले. तेव्हा ते म्हणाले, " अंग पुसलीस ते बरोबर, पण आता तळवे ओले आहेत त्यांना माती लागेल. माझे तळवेही पूस."
आई म्हणाली, "कशाने पुसू ?"
'तुझे पदराचे ओचे पसर. त्यावर पाय ठेवून मी आत येईन." तसे आईने केले. मग फुले तोडून आल्यावर आई म्हणाली, " श्याम ! पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस तसाच मनाला घाण लागू नये म्हणून जय हो!" आईच्या या विचारांनी छोटा श्याम म्हणचे सानेगुरुजी स्फटिकासारखे स्वच्छ आयुष्य जगले. मुलांना रमवलं. मराठी मुलांचा ते हॅन्स अँडरसनच बनले.
'राष्ट्रसेवादल हा माझा प्राणवायू आहे' असे ते म्हणायचे. त्याचे भाष्य हे सुद्धा मुलांवर प्रेम आणि तरुणाईवरचा त्यांचा विश्वास हेच होतं. याच प्रेरणेतून त्यांनी आंतरभारतीची चळवळ उभी केली. प्रत्येक राज्यातलं जे जे उत्तम आहे, ते मुलांनी शिकलं पाहिजे. त्यांची अशी सतत तळमळ त्यांना लागली होती. जे विचार आचारात रुपांतरीत होऊन जीवनाचा एक भाग बनत नाहीत त्या विचारांचे लौकरच निर्माल्य होते, असे त्यांचे मत होते. १९४२ च्या क्रांतिकाळात
तर गुरुजींच्या विचारांनी हजारो तरुण भारून गेले होते. "
येथून तेथून सारा पेटू दे देश,
उठू दे देश
कोटी कोटी आता उठू दे किसान
उंच करा आता तेजे आपुली मान,"
हे त्यांचे गीत अनंत ओठांवर खेळत होते. यामुळेच महाराष्ट्रातल्या कित्येक मुलांनी चळवळीला पूरक असं काम केलं. पत्रकं पोचवली. निरोप दिले. या साऱ्यामुळेच तरुणांच्या, मुलांच्या मनात भारताविषयीचं प्रेम निर्माण झालं. सारा भारत एक अश्वत्थवृक्ष आहे. त्याची सळसळ येथील मुलांत, तरुणांत निर्माण झाली पाहिजे अशी गुरुजींची धारणा होती.
गुरुजींनी हरिजन उद्धाराचं कार्य करून मानवतेशी असलेलं आपलं नातं ही स्पष्ट केलं आहे. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराची कवाडे हरिजनांना खुली करण्यासाठी त्यांनी उपोषण पण केलं. सनातनी मंडळींनी मंदिरप्रवेशाला हरिजनांना विरोध केला. पण त्यांना अखेर साने गुरुजींसमोर हार स्वीकारावी लागली.
'साधने' सारख्या विचारांचं पाथेय पुरवणाऱ्या, श्रमणाऱ्यांचं, पुरोगामी चळवळीचं व्यासपीठ बनून अनेकांना प्रेरणा देणाऱ्या साहित्याची निर्मिती पण त्यांचीच. देव आणि देशभक्तीपर कविताचं पुस्तक 'पत्री' ही त्यांचचं ! सानेगुरुजींच्या गोड गोष्टी, भारतीय संस्कृती, तीन मुले, क्रांती यासारखी त्यांची पुस्तके तर आजही मोठ्या संख्येने वाचली जातात. त्यांनी लिहिलेल्या "श्यामची आई" या पुस्तकावरील चित्रपटाला राष्ट्रपती पुरस्कार पण मिळाला होता.
मानवतावादी महाकवी, एक महान शिक्षक, थोर समाजसेवक, आणि मुलांचा लाडका लेखक म्हणून साने गुरुजींच्या विचारांचं गारुड माणसांवर आजही कायम आहे. ११ जून १९५० रोजी सानेगुरुंजीचा मृत्यू झाला. पण त्यांनी सुरु केलेली साधना, राष्ट्रसेवादल, आंतरभारती ही त्यांची स्मारकं बनून आजही उभी आहेत.
" करी मनोरंजन जो मुलांचे
जडेल नाते प्रभूशी तयांचे"
असं म्हणणाऱ्या
साने गुरुजींना माझी भावपूर्ण आदरांजली.
साने गुरुजी मराठी निबंध | Sane Guruji Marathi Nibandh
FREQUENTLYPEOPLE ALSO ASK
Q.1) साने गुरुजींचे संपूर्ण नाव काय होते ?
Ans. साने गुरुजींचे संपूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने असे होते.Q.2) साने गुरुजीचा जन्म कधी व कोठे झाला ?
Ans. साने गुरुजींचा जन्म 24 डिसेंबर 1899 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या ठिकाणी झाला.साने गुरुजी नाव ?
साने गुरुजी नाव पांडुरंग सदाशिव साने.
POSTRELATED SEARCHES
- साने गुरुजी माहिती मराठी
- साने गुरुजी भाषण मराठी
- sane guruji jayanti bhashan
- साने गुरुजी माहिती मराठी निबंध
Tags:
मराठी भाषण