मदनलाल धिंग्रा भाषण | मदनलाल धिंग्रा मराठी माहिती | Madan Lal Dhingra


मदनलाल धिंग्रा भाषण | मदनलाल धिंग्रा मराठी माहिती | Madan Lal Dhingra


RELATEDIMAGES FOR 

मदनलाल धिंग्रा भाषण | मदनलाल धिंग्रा मराठी माहिती | Madan Lal Dhingra

मदनलाल धिंग्रा भाषण | मदनलाल धिंग्रा मराठी माहिती | Madan Lal Dhingra

मदनलाल धिंग्रा (१८८७ ते १७ ऑगस्ट १९०९)

" माझा असा विश्वास आहे की, परकीय संगिनीच्या सहाय्याने परदास्यात जखडलेले राष्ट्र हे नित्य युद्धमानच राष्ट्र असते. निःशस्त्र जमातीला उघड उघड युद्ध करणे हे अशक्य होत असल्यामुळे मी दबा धरून हल्ला चढविला. मला बंदुका मिळू शकल्या नाहीत म्हणून मी माझे पिस्तूल बाहेर काढले आणि ते झाडले !"

असे नि:संदिग्ध वक्तव्य फाशीपूर्वी करणारे मदनलाल धिंग्रा हे थोर क्रांतिकारक होते. भारत मातेविषयी जाज्ज्वल्य निष्ठा बाळगणाऱ्या या वीराचा जन्म पंजाबमध्ये १८८७ साली झाला. त्यांचे वडील अमृतसरमध्ये सिव्हील सर्जन होते. त्यांचं घराणं अत्यंत सुखवस्तू होतं.

मदनलाल २१ वर्षाचे असतानाच त्यांचा विवाह झाला. त्यांना पुत्ररत्नही झालं. पण त्यांचं संसारात मन रमेना. क्रांतिकाळातल्या अनेक घटना त्यांच्या मनात वैचेनी निर्माण करत होत्या. अखेर १९०६ साली त्यांनी इंग्लंड गाठलं. त्या ठिकाणी 'युनिव्हर्सिटी कॉलेज' मध्ये स्थापत्यशास्त्राचा विद्यार्थी म्हणून पदवीसाठी नाव घातलं. पुढे त्याच विद्यालयात एक हुषार विद्यार्थी म्हणून तीन वर्षे त्यांनी नाव कमावलं.

इंग्लंडमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सहवासात मदनलाल आले. सावरकरांच्या क्रांतिविचारांनी ते चांगलेच प्रभावित झाले. भारतमातेला बंधमुक्त करण्याच्या विषयावर ते अनेकदा सावरकरांशी गप्पा मारत असत. अशाच गप्पांच्यावेळी जपानी लोकांच्या शौर्याचे अनेकदा कौतुक होताना आणि हिंदुस्थानी वीरांना तिरस्काराने उल्लेख होताना पाहून मदनलाल भडकले. ते म्हणाले, " त्यात विशेष काही नाही! माझे हिंदू राष्ट्रही तितकंच शूर आणि साहसी आहे. लवकरच आमच्या किर्तीचे पवाडे पण तुम्ही गाऊ लागाल." यावर प्रतिस्पर्ध्याने हा पोकळ डौल आहे असे म्हटले. धिंग्रांनी त्वरीत त्यादा प्रचिती पाहण्याचे आव्हान दिले. त्यांनी एक टोकदार टाचणी घेतली. आपल्या हाताच्या तळव्यात खूपसून ती दुसऱ्या बाजूने बाहेर काढली. हात रक्तबंबाळ झाला... पण त्यांनी हूं की चूं केले नाही! एकदा इंडिया हाऊसमध्ये रासायनिक प्रयोगाचे प्रात्यक्षिक चालले होते.

भांड्यात रसायन उकळत होते. क्षणार्धात ते भांड खाली उतरणं आवश्यक होतं. अन्यथा स्फोटाची शक्यता होती. सावरकर मदनलालकडे पाहत होते. त्यांनी अडचण सांगताच मदनलालनी निर्धाराने ते भांडे खाली उतरले. रसरसीत लाल झालेल्या त्या भांड्याने घिग्राच्या हाताचे कातडे सोलून निघाले... सावरकर या महान तरुणाकडे, त्याच्या साहसाकडे पाहतच राहिले. साहस हा धिंग्राचा अंगभूत गुणच होता.

२५ जानेवारी १९०९ रोजी त्यांना रिव्हॉल्व्हरची परवानगी मिळाली. त्यांनी एका माणसाकडून तीन पाऊंड पाच शिलींगला एक स्वयंचलीत रिव्हॉल्व्हर विकत घेतलं. नेमबाजीचा सराव केला. हिंदुस्थानातील जनतेवर ब्रिटिशांकडून होणाऱ्या अन्यायाचा प्रतिशोध घ्यायचा म्हणून तर ते जास्तच आसुसले होते. कर्झन वायली या ब्रिटीश अधिकाऱ्याकडे त्याचे लक्ष होते. कारण भारत आणि इंग्लडमध्ये असणाऱ्या क्रांतिकारकांवरील त्याची दडपशाही दिवसेंदिवस वाढत होती. त्याचा धिंग्राना काटा काढायचा होता.

अखेर तो दिवस उजाडला. १ जुलै १९०९ हा तो दिवस होता. नॅशनल इंडियन असोशिएशनच्या मेळाव्यात लंडन मुक्कामी धिंग्रानी वायलींवर गोळीबार केला. वायली यमसदनाला गेला. पण वायलींचा कळवळा बाळगणारे मूळचे मुंबईचे असलेले डॉ. कावसलाल काका हे आडवे आले. धिंग्रानी एक गोळी त्यांच्यावरही चालवली आणि भारतमातेच्या या शत्रूचा पण नायनाट केला. या वेळी रात्रीचे अकरा वाजून दहा मिनिटं झाली होती.

या खळबळजनक प्रकारानंतर धिंग्राना अटक झाली. त्यांना वॉल्टन स्ट्रीट पोलीस ठाण्यावर नेण्यात आले. दोन जुलैला ही बातमी सर्वत्र पसरली आणि हिंदूस्थान हा तेजस्वी क्रांतिकारकांचा देश आहे, हे सिद्ध झालं. पण धिंग्राना फाशीची शिक्षा द्यायचेही याच वेळी ठरले.

कारागृहात त्यांना भेटायला अनेक लोक उत्सुक होते. कधी

क्रांतिकारकांना संधि मिळायची, कधी नाही. एकदा गॅनचंद वर्मा धिंग्रांना भेटायला

गेले होते. तेव्हा ते म्हणाले, "मदनलाल, मी तुझ्यासाठी काय करू ?" "आता काही दिवसात फाशी होणारच आहे. भारतमातेच्या चरणी प्राण अर्पण करताना कसं नीटनेटकं जायला हवं नाही! पण चांगला पोषाख

करण्यासाठी इथे अरे साधा आरसाही नाही. एक छानदार आरसा दे पाठवून !"

हे ऐकून ग्यानचंद वर्मा शहारलेच. मृत्यूचे आक्राळ विक्राळ रुप समोर उभे असतानाही किती अविचल आहे हा ! १७ ऑगस्ट १९०९ रोजी तो दुर्देवी दिवस उजाडला. लंडनच्या पेंटनव्हील तुरुंगात मदनलालला फाशी देण्यात आलं. या बातमीने स्वातंत्र्य आंदोलनाने पुन्हा पेट घेतला. अनेक ब्रिटीश अधिकारी त्यात मृत्यूमुखी पडले. धिंग्राच्या बलिदानाचे फलक सर्वत्र लागले आणि हजारो तरुण मुलं या क्रांतिकुंडात समिधा बनायला सिद्ध झाली.

आपल्या मृत्यूनंतर हिंदूपद्धतीने आपल्यावर अंत्यसंस्कार व्हावेत अशी धिंग्रांची इच्छा होती. पण क्रूर ब्रिटिशांनी त्यांची ती इच्छा पूर्ण होऊ दिली नाही. त्यांच्या मृत्यूनंतर ६९ वर्षांनी त्यांची शवपेटी विमानाने हिंदुस्थानात आणली. २५ डिसेंबर १९७६ ला लाखो लोकांच्या उपस्थितीत हरिद्वार येथे त्यांच्या अस्थिंचे विसर्जन करण्यात आले.

कोणतीही राष्ट्रे जिवंत राहतात, ती अशा बलिदान करणाऱ्यांच्या अखंड स्मृतीनेच होय. मदनलाल धिंग्रांच्या बलिदानाबद्दल मी एवढच म्हणेन

" यज्ञी ज्यांनी देऊनि निज शीर 
घडिले भारत वैभव मंदिर
 परी जयांच्या बलिवेदीवर नाही चिरा, 
नाही पणती तेथे कर माझे जुळती."

People also ask

मदन लाल ढींगरा ने कर्जन वायली को क्यों मारा था?

दरअसल, ढींगरा कर्जन वायली को भारतीयों पर किए जा रहे अत्याचारों के लिए दोषी मानते थे। इसीलिए उन्होंने कर्जन वायली को मारा था।


मदन लाल ढींगरा की मृत्यु कब हुई थी?

17 अगस्त 1909


मदन लाल ढींगरा का जन्म कहाँ हुआ था?

अमृतसर मदनलाल ढींगरा / जन्म की जगह

अमृतसर भारत के पंजाब राज्य का एक शहर है। यह पंजाब का सबसे महत्वपूर्ण और पवित्र शहर माना जाता है। पवित्र इसलिए माना जाता है क्योंकि सिक्खों का सबसे बड़ा गुरूद्वारा स्वर्ण मंदिर अमृतसर में ही है। ताजमहल के बाद सबसे ज्यादा पर्यटक अमृतसर के स्वर्ण मंदिर को ही देखने आते हैं। स्वर्ण मंदिर अमृतसर का दिल माना जाता है।


मदन लाल ढींगरा ने इंग्लैंड जाकर कौन सी पढ़ाई की?

बिहारी लाल ने उन्हें अपनी उच्च शिक्षा जारी रखने के लिए ब्रिटेन जाने के लिए मजबूर किया। अंततः ढींगरा सहमत हो गए, और 1906 में, वे मैकेनिकल इंजीनियरिंग का अध्ययन करने के लिए यूनिवर्सिटी कॉलेज , लंदन में दाखिला लेने के लिए ब्रिटेन चले गए ।


कर्जन विले को किसने मारा?

ऐसे ही एक संगठन - नेशनल इंडियन एसोसिएशन - द्वारा 1909 में दिए गए एक स्वागत समारोह में, वायली को एक भारतीय छात्र मदन लाल ढींगरा ने गोली मार दी थी।


Related searches

  • madan lal dhingra
  • madan lal dhingra family
  • madan lal dhingra siblings
  • madan lal dhingra biography
  • madan lal dhingra in gujarati
  • madan lal dhingra history
  • dhingra last name
  • which caste is madan
  • why madan lal dhingra was hanged
  • madan lal dhingra date of birth

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post