माझा वाढदिवस मराठी निबंध| Essay on My Birthday in Marathi
विद्यार्थी मित्रांनो आपल्या शालेय जीवनातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे निबंध लेखन जर तुम्ही दुसरा काहीही अभ्यास केला नाही आणि निबंध लेखन करून गेला तर तुम्ही नक्कीच पास होऊ शकतात आणि शालेय जीवनात विविध प्रकारच्या निबंध लिहायला लावतात. त्यातीलच हा एक निबंध म्हणजे माझा वाढदिवस चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या निबंधाला
माझा वाढदिवस मराठी निबंध| Essay on My Birthday in Marathi
आज ८ जुलै माझा वाढदिवस. या दिवशी मी या विश्वामध्ये प्रकट झाले होते आणि हा दिवस माझ्या घरात एक आनंदाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. मी आज पूर्णपणे बारा वर्षाची झाली आहे. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी घरात सजावट केली जाते गोड गोड जेवण बनवला जातो कारण माझी आई बोलते की आज आपल्या घरात लक्ष्मी जन्माला आली होती.
मला आमच्या घरातली लक्ष्मी मानले जाते कारण मुलगी म्हणजे लक्ष्मीच असते ना ! मी सकाळी उठल्यानंतर सर्वांनीच मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि मला उठल्या उठल्या खूप आनंद झाला त्यानंतर आईने मला गोडधोड बनवून खायला दिले त्यानंतर मी शाळेमध्ये गेले शाळेमध्ये गेल्यानंतर सर्वांनी मला वाढदिवसाबद्दल चे गाणे म्हणून मला शुभेच्छा दिल्य.
शाळेमध्ये मी सर्वांना चॉकलेट वाटले कारण आमच्या शाळेमध्ये ज्याचा वाढदिवस असतो त्याने सर्वांना चॉकलेट द्यायचे असतात तर बाबांनी रात्री चॉकलेटचा पुडा आणून ठेवला होता तर मी तोच सर्वांना वाटून दिला आणि सर्वांनी मला खूप छान छान शुभेच्छा दिल्या मला पुढील वाटचालीसाठी देखील माझ्या शिक्षकांनी आशीर्वाद दिले मी शिक्षकांच्या देखील पाया पडले.
शाळा सुटल्यानंतर मी घरी आले तर आश्चर्यचकित होऊन नुसतं घराकडे बघतच राहिले कारण आमचे घर पूर्णपणे सजवण्यात आलं होतं माझा वाढदिवस असा कायमच साजरा होत नसतो मोठा परंतु ज्यावेळेस मोठा साजरा करायचे ठरवलं होतं त्यामुळे संपूर्ण घराला रोषणाईने सजवलेलं होतं मी घरात गेलो आणि बाबांनी माझ्यासाठी नवीन कपडे आणले होते तर मी ते नवीन कपडे घालून तयार झाले. आई मी माझ्या मामा मामींना काका काकूंना मावशी आजी सर्वांनाच बोलवलं होतं ते सर्व आलेले होते फक्त माझी वाट बघत होते मग मी शाळेतून गेल्यानंतर लगेचच नवीन कपडे घालून तयार झालो त्यानंतर माझ्या आईने माझ्या मित्र-मैत्रिणींना देखील बोलावले होते.
माझ्या घराजवळ माझे लहानपणीचे खूप सारे मित्र-मैत्रिणी राहतात ते सर्वजण आले होते त्यानंतर मला सर्वांनी ओवाळले आणि मी केक कापला. सर्वच पाहुण्यांनी माझ्यासाठी गिफ्ट आणले होते. आणि ते सर्व गिफ्ट बघून मला तर प्रचंड आनंद झाला.
आणि हे सर्व झाल्यानंतर जेवणाचा कार्यक्रम होता माझ्या आईने सर्वांसाठीच मनाने म्हणजेच मनापासून छान असा स्वयंपाक बनवलेला होता आणि सर्वांनीच तो आवडीने खाल्ला त्यानंतर आम्ही मित्र-मैत्रिणींनी खूप सारे खेळ खेळलो. आणि मला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी शाळा असल्यामुळे मला कुठे बाहेर जाता आले नाही परंतु वाढदिवस झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही बाहेर गेलो आमच्या घराच्या तिकडेच एक अनाथाश्रम आहे तिथे खूप सारे मुले मुले राहतात त्यांच्यासाठी आईने आणि बाबांनी खूप साऱ्या वस्तू घेतल्या होत्या त्या माझ्या हाताने मी सर्वांना दिल्याने त्यांच्यासोबत वेळ घालून मला प्रचंड आनंद झाला.
आणि पुन्हा आम्ही घरी आलो आणि असा हा माझा वाढदिवस संपला आणि मला माझ्या वाढदिवसाचा दिवस खूप आवडतो परंतु याचा देखील दुःख असतं की एक वर्षांनी आपण लहान होत चाललोय परंतु वाढदिवस तो वाढदिवस असतो लहान मुलांसाठी तर वाढदिवस हा खूप आनंदाचा दिवस असतो त्यामुळे असा हा माझा वाढदिवस यावर्षी साजरा झाला.