माझे बालपण निबंध मराठी | Maze Balpan Nibandh Marathi

माझे बालपण निबंध मराठी | Maze Balpan Nibandh Marathi

माझे बालपण निबंध मराठी : विद्यार्थी मित्रांनो आजच्या या नवीन लेखांमध्ये आपण सर्वजण आहोत हा निबंध वर्णनात्मक निबंध लेखनामध्ये मोडला जातो या निबंध लिहीत असताना आपण माझे बालपण कसे गेले बालपणामध्ये झालेल्या गोष्टींचे वर्णन आपण या निबंधामध्ये करू शकतो जेणेकरून आपला निबंध हा खूप चांगला आणि सुटसुटीत बनला जाईल त्याचप्रमाणे माझे बालपण निबंध लिहीत असताना आपण जर शहरातील बालपण अनुभवले असेल तर आपण शहरातील बालपणाविषयी माहिती लिहा त्याचप्रमाणे आपण जर गावांमधील बालपण अनुभवले असेल तर आपण गावातील बालपण कसे होते यावर निबंध लिहा कारण खूप साऱ्या गोष्टी आपण आपल्या मनातून या निबंध लेखनामध्ये लिहू शकता चला तर सुरुवात करूया आजच्या या नवीन निबंधाला आणि जाणून घेऊया माझे बालपण मराठी निबंध.

माझे बालपण निबंध मराठी | Maze Balpan Nibandh Marathi

माझे बालपण हे एका गावामध्ये गेलेले आहेत मी लहानपणापासून तर मोठा होईपर्यंत म्हणजेच माझे पूर्ण कॉलेज होईपर्यंत मी गावातच राहिलेलो आहे. गावातील बालपण हे खूप निसर्गाशी मिळते जुळते बालपण आहे असं मला वाटतं कारण की मी जेव्हा लहान होतो तेव्हा मी खूप खेळायचो लहानपणी आम्ही म्हणजेच माझे मित्र आणि मी खूप सारे खेळ खेळलेलो आहेत.

बालपण आठवले की लहानपणची सर्व मित्र आठवतात परंतु ती सर्व मित्र आता ज्यांच्या त्यांच्या कामामध्ये व्यस्त आहे परंतु लहानपणी आम्ही जेव्हा सर्व सोबत होतो तेव्हा खूप साऱ्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत त्यामध्ये शाळेमध्ये आम्ही सर्वजण सोबत पायी जायचो कारण की आमची शाळा आमच्या घरापासून जवळच होती त्याचप्रमाणे शाळेमध्ये झालेली मस्ती शाळेत केलेली मजा या सर्व गोष्टी बालपणामध्ये आठवतात.

 घरामध्ये सर्वजण शेती व्यवसाय करत असल्याकारणाने शेतीमध्ये देखील माझा तेवढाच जास्त कल पहायला बालपणी मिळाला मी शेतामध्ये देखील खूप जास्त प्रमाणात काम केलेली आहेत शेतामध्ये झाडांची काळजी घेणे म्हणजेच आमच्या शेतामध्ये फळबागा होतात त्या फळबागांची काळजी घेणं त्यापासून तर त्याच झाडांपासून फळ मिळून ती फळ खाणं या सर्व गोष्टी मी लहानपणीच पाहिलेल्या आहेत त्यामुळे मला लहानपणी खूप सार्‍या गोष्टी शिकायला मिळाल्या झाडांसोबत झालेला लगाव हा मला आतापर्यंत आहे तसाच आहे मी अजून देखील झाडांची खूप काळजी घेतो कारण की हा गुण माझ्या बालपणातच माझ्या मध्ये आलेला आहेत.

पहिली ते चौथी मध्ये मला खूप साऱ्या गोष्टी आठवतात त्यामध्ये मला शाळेमधील आमचे शिक्षक जास्त आठवतात त्यानंतर शाळेतील मित्र शाळेमध्ये खेळलेलो खेळ शाळेमध्ये शिकवलेल्या गोष्टी त्याचप्रमाणे शाळेच्या निघालेल्या सहल आणि शाळेमध्ये झालेले गेम कॉम्पिटिशन त्याचप्रमाणे घरच्या देखील खूप साऱ्या गोष्टी आठवतात त्यामध्ये लहानपणी फिरायला गेलेले ठिकाण त्याचप्रमाणे घरी असलेल्या मित्रांसोबत खेळलेले सर्व खेळ. सायकल चालवायचं शिकताना असलेले प्रकरण या सर्व गोष्टी मला  बालपणामध्ये आठवतात. मी जसं जसं मोठं होत गेलो तसतसं माझे बालपण दूर होत गेले परंतु मला माझ्या बालपणाचा विचार करून खूप आनंद होतो.

माझे बालपण निबंध मराठी | My childhood essay in Marathi


विद्यार्थी मित्रांनो आपल्याला वरती दिलेला निबंध कसा वाटला माझे बालपण याविषयी आपल्याला जर आपल्या मनातून कोणता निबंध बनत असेल तर तो तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवू शकता त्याचप्रमाणे आपल्याला अजून कोणत्या गोष्टीचा निबंध पाहिजे ते देखील तुम्ही आम्हाला सांगू शकता जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी तो निबंध घेऊन नक्की येऊया त्याचप्रमाणे माझे बालपण हे गावाकडचे बालपण आहेत त्याचप्रमाणे आपण देखील आपले शहराकडील किंवा गावाकडील बालपणाविषयी इतर विद्यार्थ्यांना माहिती देऊ शकता आपण तुमच्या शब्दांमध्ये हा निबंध लिहू शकता म्हणून तुमचा निबंध हा आम्हाला स्कॅन करून कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आम्ही तुमचा निबंध देखील आपल्या या वेबसाईटवर टाकण्याचा नक्की प्रयत्न करूया धन्यवाद .

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post