{120+} मनाला स्पर्श करणाऱ्या मराठी प्रेम कविता | Marathi Prem Kavita

{१००+} मनाला स्पर्श करणाऱ्या मराठी प्रेम कविता | Marathi Prem Kavita

मित्रांनो या लेखात तुम्हाला मराठी प्रेम कविता वाचायला मिळणार आहे.प्रेम आपल्या आयुष्यात विशेष मार्ग असतो यातून आपल्याला आनंद आणि नात्यांनी समृद्ध बनवतो. आपण प्रेमामुळे अनेक नाते रक्ताशिवाय जोडू शकतो आपण बोलतो की हा आपल्या रक्ताच्या नात्याचाही आपली रक्ताच्या नात्याची परंतु प्रेमामुळे आपल्याला कळते की रक्ताच्या नात्याशिवाय देखील आपण एखाद्या व्यक्तीला जीव लावू शकतो. मित्रांनो प्रेमात वेडे होणे किंवा प्रेम मिळवलेच पाहिजे असे काही नसते काही काही व्यक्ती फक्त प्रेम करत राहतात.

राधा कृष्णाचे प्रेम याबद्दल आपण अजूनही गोष्टी ऐकत असतो कृष्णाला राधा मिळाली नाही परंतु ते निस्वार्थ भावनेने प्रेम करत राहिले. एकमेकांसोबत फिरणे म्हणजे प्रेम नव्हे तर प्रेम हे मुक्त असते. आणि प्रेम हे अनेक प्रकारचे असते जसं की आई-वडिलांवर प्रेम करणे किंवा भावा-बहिणींवर प्रेम करणे किंवा पती पत्नी वर प्रेम करणे. तर यावरच मी काही कविता घेऊन आलेले आहे. खाली दिलेल्या मराठी चारोळ्या तुम्हाला नक्कीच आवडतील अशी मी आशा करते.

Marathi Prem Kavita | तुमच्या मनाला स्पर्श करतील अश्या मराठी प्रेम कविता

गरज आहे आज मला

गरज आहे आज मला………

त्या तुझ्या आधाराची

अडखळनारे पाऊल माझे

सावरणाऱ्या तुझ्या हातांची … …

गरज आहे आज मला………..

त्या तूझ्या मोहक मिठीची

दडपण असता या मनी

तुझ्यात स्वतःला सामावून

टाकणाऱ्या त्या बाहूंची गरज आहे आज मला…..

त्या तुझ्या कोमल प्रीतीची

भय दाटताच या मनी आपलेपणा देणाऱ्या

त्या तुझ्या स्पर्शाची गरज आहे आजहि मला……….

माझ्यावरच्या त्या तूझ्या निस्वार्थी

प्रेमाची सारे जग असुरक्षित वाटताच तू

जवळ आहेस या जाणिवेची गरज

आहे मला खूप गरज आहे….

----------------------

कस असत ना आपण

एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो

तिच्या सहवासात वावरतो

त्या व्यक्ती सोबत प्रत्येक

क्षणाचा आनंद घेतो पण

तीच व्यक्ती जेव्हा आपणास

सोडून जाते आपल्या

जीवनातून निघून जाते तेव्हा

खुप वाईट वाटत……….. कारण

आपल्याला त्या व्यक्ती ची

सवय झालेली असते तिच्या

सहवासात राहण्याची आणि

तीच व्यक्ति जेव्हा सोडून

जाते तेव्हा उरतो तो फ़क्त

एकांत आणि तिच्या

आठवणीत आपण खुप खुप

रडतो एकट्याची सुरुवात

शेवटी एकटाच

# प्रेम कविता 

---------------------------

Romantic Marathi Prem Kavita for Boyfriend / Girlfriend

माझी “ती” अशी असावी

माझी “ती” अशी असावी,

जगात दूसरी तशी नसावी,

मलाच सर्वस्व माननारी,

माझी “ती” अशी असावी…

प्रानजळ असावी, अवखळ असावी,

परी ती अगदी सोज्वळ असावी,

सर्वांना अगदी आपलं माननारी,

माझी “ती” अशी असावी…

फारच सुंदर, फारच गोरी,

फारच देखणी पण नसावी,

मजवर भरपूर प्रेम करणारी,

माझी “ती” अशी असावी…

आपली माणसं, आपलं घर,

आपलेपणा जपणारी असावी,

ससूलाही आई म्हणनारी,

माझी “ती” अशी असावी…

चाणाक्ष, हुशार, व्यवहारी,

आयुष्यातील सल्लागार व्हावी,

माझ्या चुका लक्षात घेणारी,

माझी “ती” अशी असावी…

माया, प्रेम आपुलकी,

हे सर्व देणारी असावी,

माझी “ती” अशी असावी… माझी “ती” अशी असावी…!!

--------------------

सांग तु माझीच ना ,

कसे जगावे तुझ्याविना,

जशी रात्र चंद्राविना,

जसा मानव भावनांविना,

सांग तु माझीच ना,

कसे जगावे तुझ्याविना…

जसे झाड पानांविना,

जसे फुल सुगंधाविना,

सांग तु माझीच ना,

कसे जगावे तुझ्याविना…

जसा समुद्र पाण्याविना,

जसा दिवस सुर्याविना,

सांग तु माझीच ना,

कसे जगावे तुझ्याविना…

जशी बाग् फुलंविना

जसे आकश चांदण्यांविना

सांग तु माझीच ना,

कसे जगावे तुझ्याविना… .

------------------------

तुझ्या डोळंच्या नजरेने

मी स्वप्न पाहीन सारे

आता लमहा लमहा सरे

बस तुझ्या कुशीत हे सारे

पाहिला होतो मी साधा

मी झालो तुज़्यावरी फिदा

आता दडली दुनिया

तुझ्यात सारी

तुझविन माझा कोणीच नाही…………..

तुझपासुनी मी दूर….

कधी जवळ येशिल तु ग

स्वप्नात दिसतेस तु ग

माझी साजणी…….

----------------------------

शाळेनंतर सुट्टी अन सुटीनंतर शाळा

अभ्यासाच्या घोळामध्ये कोराच राहिला फळा

मित्रांना मात्र यायची सॉलिड प्रेमपत्र

मला फक्त यायची ती गणितं अन सूत्रं

प्रेमाचं गमभन तू तरी शिकवायचस

डोळ्यातलं प्रेम शब्दात तरी सांगायचस

रात्रीचे ते रातकिडे अन पाण्यावरचा फेस

confuse करणारे तुझे sms !

अडाणी अशा या वेड्याला

तू कधी समजावशील का

जीवनाच्या एका वळणावर

तू कधी भेटशील का ?

जीवनाच्या एका वळणावर

तू कधी भेटशील का ?

राकेश शिंदे यांची मराठी प्रेम कविता | Rakesh Shinde Marathi Prem Kavita

तुझं माझं नातं

तुझ्या माझ्या नात्याला मी काय नाव देऊ

कारण नात्याना नावं दिली, कि ति गुंतात,

अडकतात, तुटतात आणि क्षणात संपतात

तुझं माझं नातं जरा वेगळच आहे

ते गुंतलेलं नाही आहे नात्यांच्या जाळ्यात

ते तर खूप सुंदर छान आणि स्वतंत्र आहे

जे गुम्फलेलं आहे स्नेहाच्या धाग्यात

किती उबदार उठावदार असा नाजुक

जसं भर उन्हात गार वाऱ्याची झुळूक

तुझ्यासाठी मी कोण आहे ……

ह्या प्रश्नाचं उत्तर नसेलच तुझ्याकडे

पण तू माझ्यासाठी कोण आहे…..

हयाचं उत्तर मात्र आहे माझ्याकडे

आणि तेच पुरेसं आहे माझ्यासाठी

आणि माझ्या जगण्यासाठी….

 – राकेश शिंदे______________________

मराठी प्रेम कविता चारोळ्या

💘 कदाचित मी तो नाही ज्याचे स्वप्न तू बघतेस पण हे नक्की कि,

ती तूच आहेस जिचे स्वप्न मी बघत असतो कदाचित मी तो नाही

ज्याची तू वाट बघतेस पण ती तूच आहेस जिची

मी आतुरतने वाट बघत असतो कदाचित

मी तो नाही ज्याच्यावर तू प्रेम करतेस

पण ती तूच आहेस जिच्यावर

मी अगदी जीवापाड प्रेम करतो

----------------

माझ्या स्वप्नातील ती

ति तुच होतीस का गं?

अंगात हिरवा शालु नेसुन,

हातांत हिरवा चुडा,

केसांत माळलेला गजरा,

अन भांगातलं सौभाग्यलेणं होय तिच तु…

माझ्या स्वप्नांत दिसणारी,

तु… माझं बेरंग आयुष्यात रंग भरणारी, तु…

आयुष्याला नवं ध्येय देणारी,

थोडीशी लाजरी बुजरी,

माझी “गोंडसपरी” बोल होशील माझी माझी ?

अर्धांगी?? लावशील कुंकु माझ्या नावाचं?

जगशील माझ्यासाठी,

अगदी माझीच बनुन?

बस… अन मी तुझाच…

प्रत्येक जन्मासाठी….

सप्तपदीची सात पाऊले वचने देखील

सात संकटे सारी जातील विरुन जर

हातात असेल तुझा हात.

----------------

येशील का गं कधी

येशील का गं कधी तू माझ्यापाशी

हवेची झुळूक बनून

डोलावाशील ना मान तुझी

गवताचं पातं बनून ?

विसरू दे मला जग सारं

विसरू दे माझं भान सारं

तुझ्या डोळ्यांच्या तिरक्या नजरेत वाहून जाताना

शब्दात प्रत्येक तुझ्या मला पाहताना दुखं जातात

दूर पळून, जेव्हा मनमोकळं हसणं तुझं

जखमांवर माझ्या फुंकर घालतं

प्रेमाची लहर येते दाटून

तुझ्याबरोबर दुरवर क्षितिजं पाहताना ….

----------------------------

इच्छा आहे प्रिये तुला

मिळवण्याची, बाकी

कसलीच आशा नाही

ह्या प्रियकराची..”

तक्रार माझ्याकडे नाही

देवा कडे कर, काय जरुरत

होती तुला इतके सुंदर

बनविण्याची..

प्रेम हे फुल पाखरा सारखे

आहे जेव्हा तुम्ही त्याला

पकडायला जाता तेव्हा

तेदुसरी कडे उडून जाते,

पण जेव्हा तुम्ही शांत

असता तेव्हा ते हळूच

येते आणि तुम्हाला स्पर्श

करते, तेव्हा तुमचे होउन

जाते म्हणून वाट बघुयात

आपापल्या फुल पाखराची..

❤️❤️❤️❤️❤️

# प्रेम कविता

----------------------

# प्रेम कविता

तुझ्याचं प्रेमाने शिकवलें

आहे

तुझ्याचं प्रेमाने शिकवलंय….

तुझ्याचं प्रेमाने शिकवलंय

आयुष्यात पडता पडता

सावरायला…

तुझ्याचं प्रेमाने शिकवलंय

रडता रडता हसायला…

तुझ्याचं प्रेमानं शिकवलं

त्या सर्व गोड आठवणी

जपायला

तुझ्याचं प्रेमानं शिकवलंय

आयुष्यभर साथ द्यायला

पण आज……

आज तुझ्याचं प्रेमाच्या

विरहाने

डोळ्यातून अनं हृदयातून

वाहतंय अखंड

पाणी

-----------------

मराठी प्रेम कविता

💘 ओंजळीतले क्षण केवळ प्रेमाचे होते

नकळत आवड्लेलीस तू माझे मलाच कळले नव्हते..

माळले प्रत्येक फुल सुगंध मलाच देत होते

शेअर केले सारे क्षण फक्त प्रेमानेच भारले होते..

डोळ्यात पाणी तुझ्या मन माझे रडत होते

हसलीस जेव्हा तू सारे जीवन हसले होते..

अवचित आवडलेली तू जीवन एक स्वप्नः होते

रात राणी कधी बहरली माझे मलाच कळले नव्हतं.

---------------------------

मुरादमन

स्वछंद बेधुंद हे क्षण

नि बरसले आनंदघन

आज आत्ता एवढ्यात

कसे हरकले “मुरादमन”

कालचे कशाला सांगायचे

उद्याचे उद्याला बघायचे

आज आत्ता एवढ्यात

“मुरादमन” जगायचे…

कवी: सचिन कृष्णा निकम

------------------------------

# प्रेम कविता

प्रेम मागून मिळत नाही

प्रेम वाटावं लागतं …….

ध्यानी मनी नसताना

अवचित भेटावं लागतं………

माझ्यावर प्रेम करा

असं म्हणता येत नाही.

करू म्हटल्याने असं काही

होत नाही….

त्यासाठी जुळावे लागतात

उभयतांचे धागे…..

भीड आणि भीती मग

आपोआप घडते मागे …..

प्रेमाचे फुलपाखरू स्वछंदी

उडते

मनमोही रंगानी पुरतं वेडं

करत

पण त्यामागे धावलं तर, .

आणखी पुढे पळतं…

डोळे मिटून शांत बसलं कि

हळूच खांद्यावर बसतं.

आपण प्रेमात आहोत

याची जाणीव करून

देतं……..

Marathi Prem Kavita Sandip Khare | संदीप खरे यांची मराठी प्रेम कविता

प्रेम…

प्रेम नाही; हवी असते एक जखम फक्त

ज्याच्यायोगे गरम राहील धमन्यांमधले रक्त

ओल्या आठवणींचे काही क्षण हवे असतात

चाकोरीला उध्वस्ताचे घण हवे असतात….

तसे काही चेहऱ्यावरती अधिक उणे नसते

पण मनात दु:खी असणाऱ्यांचे हसणे वेगळे दिसते !

ओठांत नाही हवी असते डोळ्यांत एक कथा

हवी असते षड्जासारखी सलग, शांत व्यथा….

गाणे नाही; गाण्यासाठी उर्मी हवे असते

वरून खाली कोसळणारी मिंड हवी असते

स्वर नाही, हव्या असतात स्वरांमधल्या श्रुती

प्रेम नाही, हवी असते मला चौथी मिती !…

प्रेम नाही दुःखासाठी तारण हवे असते

स्वतःवरच हसण्यासाठी कारण हवे असते

मनासाठी हवा असतो अस्वस्थाचा शाप

आत्म्यासाठी हवा असतो निखळ पश्चात्ताप !…

– संदीप खरे

---------------------

तिच्या प्रेमात पडतांना

तिला प्रेमात पाडायचं राहून गेलं

तोंड दुखेपर्यंत बडबडलो

पण हवं ते सांगायचं राहूनच गेलं.

तिनं माझ्या नजरेतून जग पाहिलं

तिच्या नजरेला नजर भिडवतांना

तिला डोळ्यात साठवायचं राहूनच गेलं.

तिच्या हाताचा, ओढणीचा,

स्पर्श हवाहवासा वाटतो

सांगेन तिला कधीतरी म्हणतांना

हा विषय काढायचं राहूनच गेलं.

हसत राहीलो, हसवत राहिलो

तिला दरवेळी, दर भेटीला.

तिच्या हसण्यामागचे अर्थ शोधतांना

माझ्या हसविण्याचा मतितार्थ सांगायचं राहूनचं गेलं.

ती आली की

वेळही उडून जायचा मला न समजता.

पण,

त्या दिवशी ती आली आणि निघाली

त्यावेळी तिला नेमकं अडवायचं राहून गेलं…

Romantic Marathi Prem Kavita

💘 एखाद्याला आपलं करता आलं नाही

म्हणून जीव जाळायचा नसतो जीवनच संपल्यावर

आपण त्या व्यक्तिच्या सहवासालाही मुकतो

------------------

होशील का माझी

झुगारून बंधने अशी

देशील का साथ तुझी

वाटेवर जीवनाच्या माझी…राहशील का हृदयात अशी

मोती वसतो शिंपल्यात तशी

होशील का सावली माझी

पावलो पावली असते तशी…होशील का ओळख अशी

नावाने नातं ओळखतील तशी

होशील का स्पंदने अशी

काट्यांची घडीच्या असतात तशी

# प्रेम कविता


प्रेम म्हणजे ?

समजली तर भावना..

पाहिले तर नाते..

म्हंटले तर शब्द..

वाटली तर मैत्री..

घेतली तर काळजी.. तुटले तर नशीब..

पण मिळाले तर

स्वर्ग.. ..प्रेम कविता

----------------------------

# प्रेम कविता काय आहे

तिच्यात अस मी नेहमी

तीला बगितल्या तिच्यात

हरवून जातो.

तिच्या फोटो बगितल्या वर

मी एका

वेगळया आनंदाच्या दुनियात जातो.

खुप बोलावस वाटते तिचा

सोबत

पण बोलायला गेलो तर मी

परत तिच्यात हरवून जातो.

ती online नसताना

मन विचलित होत

मग परत परत तीच्या dp

बगन्यात

कळत नाही टाइम कुट

निगुण जातो.


Marathi Prem Kavita | Marathi Prem Kavita Charolya | प्रेम कविता इन मराठी | Love Poem Marathi.

#प्रेम कविता तू आणि तुझं सर्व विश्व……

तू आणि तुझं सर्व विश्व

अगदी माझं बनून गेलं होतं ज्या क्षणी तुझ्या मध्ये मी स्वतःला सामावून घेतल होतं

तू आणि तुझा तो श्वास अगदी माझ्या जगण्याचा आधार बनला होता ज्या क्षणी तुझ्या इवल्याश्या हृदयाला मी माझ्या काळजात आसरा दिला होता

तू आणि तुझी स्वप्न

“अगदी माझ्या डोळ्यात जगत होती ज्या क्षणी तुझ्या भावनांच्या विश्वात मी माझं आयुष्य फुलवत होती

तू आणि तुझा भास माझ्या जगण्याची दिशा बनली होती ज्या क्षणी तुझ्या प्रेमाला, मी अंतर्मनाने भुलली होती

----------------------

#प्रेम कविता

पावसाचा थेंब खुप छोटा *

असतो…….

पण एक तहानलेला त्याच्या

शोधात असतो……

असाच एक एसएमएस

खुप छोटा असतो……

पण पाठवणारा तुमची

मनापासून आठवण काढत

असतो……

---------------

शोधु कुठे तुला

आलीस जीवनात मन फुलवुनी गेलीस

सावली बनुनी रुद्याला जिंकलीस

चांदणी पर्री चंद्राला चमकवलीस

शोधु कुठे तुला

एकट्या जीवाला प्रेमाचा तारा बनवलीस

लाजरी पणे मला ही लाजवलीस

मेलेल्या रोपट्याला का गं जगवलीस

शोधु कुठे तुला

प्रेम होते खरे की खोटे का नाही बोलीस

काटेरी वनात का गं सोडुन गेलीस

स्वप्नापरी तुही आज हरवलीस

शोधु कुठे तुला

टोचणारे काटे अजुनही सांगताहेत

इश्काच्या जखमा अजुनही आल्या आहेत

प्रेम अन् प्रेम महाग पडतय काळजास

शोधु कुठे तुला…. !

# प्रेम कविता


Marathi Prem Kavita Text

प्रेमाचा सुगंद

प्रेमाचा सुगंद पुन्हा एकदा मातीतून यावा

प्रेमाचा पाऊस आज माझावर हि पडावा

आज नवी व्हावी सारी धरती

अन समुद्राला हि यावी प्रेमाची भरती

सुखाची स्वप्ने मी डोळ्यात लपवावी

डोळे उघडताच ती पूर्ण झालेली असावीत

प्रेमाच्या पावसात मी भिजले ओलेचिंब

प्रीतीचा मिळाला आज नवा रंग

रंग रांगात मी असे रंगुनी गेले

मी माझीच न राहता, न माझात उरले

सारे काही नष्ट व्हावे उरावी फक्त हि प्रीत

प्रेमाचा सुगंद पुन्हा एकदा मातीतून यावा

प्रेमाचा पाऊस आज माझावर हि पडावा

#प्रेम कविता


💘 एका मिनिटा मध्ये ७२ वेळा आपलं हृदय धडधडत असते ………….

पण तुझे हृदय एका मिनिटात एकदाच जरी धडधडले तरी तू जिवंत राहू शकशील, …………

कारण एका मिनिटात ७१ वेळा माझे हृदय तुझ्यासाठीच धडधडत असते ♥ ♥ ♥


# प्रेम कविता

तुझाच स्पर्श नेहमी हवासा

वाटतो

तुझ्याच श्वासात नेहमी

रहावस वाटत

स्वप्नात का होईना तुझ्याच

सोबत रहावस वाटत

आयुष्य आहेस तू माझ

तुझ्याच मिठीत जगावस

वाटत

---------------------

लिहतो आहे कविता फक्त

तुझ्यासाठी..

वेडा प्रेमी झालो फक्त

तुझ्यासाठी..

आणखी कुणाला नाही

बघणार आता हे नयन माझे..

तरसतील नयन

माझे फक्त

तुला पाहण्यासाठी..

प्रत्येक श्वास माझी आठवण

काढेल तुझीचं..

हा श्वास ही निघेल कदाचीत

फक्त तुझ्यासाठी..

सर्वान पेक्षा मला तु खुपचं

जास्त आवडतेस..

मी प्रेम ही शिकलो ते फक्त

आणि फक्त तुझ्यासाठी

# प्रेम कविता


Marathi Prem Kavita Suresh Bhat | सुरेश भट यांच्या मराठी प्रेम कविता

उजाडल्यावरी सख्या निघून जा घराकडे

उजाडल्यावरी सख्या निघून जा घराकडे

अजून ही उशीवरी टिपूर चांदणे पडे

उगीच वेळ सारखी विचारतोस काय तू

पुन्हा पुन्हा मिठीतही शहारतोस काय तू

पुन्हा अशी हवी तशी कुणास रात्र सापडे

अजून कुंतलात या तुझा न जीव गुंतला

अजून पाकळ्यांतला मरंदही न संपला

अजूनही कसे तुझे लबाड ओठ कोरडे

अजून थांब लागली जगास झोप आंधळी

दिसेल या नभातही हळूच रात्र सावळी

तुला मला विचारुनी फुटेल आज तांबडे

– सुरेश भट____________________


जीव..

मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल,

अन् माझी हाक तुझ्या अंतरात हुर-हुरेल.

मी फिरेन दूर दूर तुझिया स्वप्नात चुर,

तिकडे पाऊल तुझे उंबऱ्यात अडखळेल.

विसरशील सर्व सर्व आपले रोमांच पर्व,

पण माझे नाव तुझ्या ओठांवर हुळहुळेल.

सहज कधी तू घरात लावशील सांज वात,

माझे ही मन तिथेच ज्योती सह थर-थरेल.

जेव्हां तू नाहशिल दर्पणात पाहशील, 

माझे अस्तित्व तुझ्या आस-पास दरवळेल.

जेव्हां रात्री कुशीत घेशील माझे गीत,

माझे तारुण्य तुझ्या गात्रातून गुण-गुणेल.

मग सुटेल मंद मंद वासंतिक पवन धुंद,

माझे आयुष्य तुझ्या अंगणात टप-टपेल.

– सुरेश भट.


Marathi Prem Kavita Images

#प्रेम कविता

भेटूया पुन्हा कधीतरी

कुठल्याशा अपुऱ्या कवितेच्या

ओळीत

अर्धवट राहिलेल्या अनवट सुरावटीत

भेटूया पुन्हा कधीतरी

माझ्या हृदयात तुझ्यासाठी

झुरझुरणाऱ्या झऱ्याकाठी

स्वप्नाच्या प्रदेशात अज्ञात तरुतळी

मग पडतील केशर उन्हाचे सडे

हळदुली शेतं मनात डोलायला

लागतील

निळेशार स्फटिक-झरे झुलझुलातील

सारेच कसे मंतरलेले होऊन जाईल

त्यावेळी तू आणि मी

दोन प्रेमी युवामाळी

हातात हात घेऊन बसू

तुझ्या भस्मी डोळ्यांना

मी माझे डोळे देईन

गुलाबी ओठांना ओठ देईन.

-----------------------

💘 एक तरी मैत्रीण असावी

चांदणीसारखी मैत्रीच्या आकाशात मित्रांचे दिवे

मावळले म्हणजे चालावं पुढे तिच्याच प्रकाशात

------------------------

धुंद धुंद ही हवा

मंद मंद गारवा

तोच रंग हिरवा

मागतो सखी तुवा

तेच शब्द लाघवी

आज आण अधरी

तीच मौन संमती

येवू देत लाजरी

आस तुझी लागता

स्पंद होय कापरा

स्मित आणि स्मरता

जीव होय बावरा

स्वप्न गीत गावुनी

अर्थ देई जीवनी

आज मी तुझा ऋणी

स्पर्श गंध जागवुनी

#प्रेम कविता

Marathi Prem Kavita | Love Poem In Marathi | मराठी प्रेम कविता

तुमच्यासाठी काय पण

कस सांगु तुम्हाला तुम्ही

माझ्यासाठी काय

आहात

श्वासा शिवाय कदाचित मी काही

क्षण जगू शकेन

पण तुमच्याविना नाही

हो तुम्हीच पहिले आहात

की ज्यांना मी जिवापेक्षा जास्त

प्रेम केल.

आज पण जेव्हा मी मंदीरात जातो

हे वेड मन तुमच्यासाठीच

काही ना काही मागण देवाकडे

मागत असत

माझी अवस्था त्या बिना पाण्या

शिवाय

तडफ़डना-या माशा सरखी झालिय

माहीत आहे तुम्ही येणार नाहीत

तरीही….

हे तारे तुटुन जातील, हा सूर्य

विझुन जाईल

पण आशेच्या शेवटच्या किरणा

पर्यंत

शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमची वाट

पाहतोय

मी तुमचीच वाट पाहतोय

#प्रेम कविता


💘 एक तरी मैत्रीण असावी

बाईकवर मागे बसावी

जुनी हीरो होंडा सुद्धा मग करिझ्माहून झकास दिसावी


प्रेम कविता बायको

धागा रेशीम बंधाचा

आधार घर धन्याचा

पान्हा तान्हया लेकरचा

सागर प्रेम वात्सल्याचा

श्वास जोडीदाराच्या प्रेमाचा

पदर मायेच्या उबेचा

पाय गृह लक्ष्मीचा

ताळेबंध संसाराचा

ओढा वाहणाऱ्या प्रेमाचा

घास खरपूस भाकरीचा

नाजूक तुकडा काळजाचा

खंबीर साथीदार सहजीवनाचा

Marathi Prem Kavita for Wife

प्रेम कधी रुसण असतं,

डोळ्यांनीच हसणं असतं,

प्रेम कधी भांडतसुद्धा!

दोन ओळींची चिठ्ठीसुद्धा प्रेम असतं,

घट्ट मिठीसुद्धा प्रेम असतं,

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं

तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं- मंगेश पाडगावकर


💘 एकटेपणा तेव्हा वाटत नाही…

जेव्हा आपण एकटे असतो ,

तर तो तेव्हा वाटतो…

जेव्हा आपल्या बरोबर सर्व जण असतात ,

पण ती व्यक्ती नसते जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते


आयुष्यभर कोणासाठी तरी थांबणे

म्हणजे प्रेम,

कोणीतरी सुखात असल्याचा आनंद

म्हणजे प्रेम,

कोणासाठी तरी रडणारे मन

म्हणजे प्रेम,

आणि कोणाशिवाय तरी मरणे

म्हणजे प्रेम


#प्रेम कविता

प्रेमाच्या पाऊसधारा…….

क्षणात येता पाऊसधारा,

गडगडले मेघ अंतरी…

प्रेमवर्षा बरसवण्या,

आसुसले मन तुझ्यावरी …

खिळल्या नजरेत नजरा,

नि:शब्द ओठ जरी,

हिरमुसलेला अल्लड वारा,

प्रीत आपली सावरी,

प्रेमसागर खळाळणारा,

भावनांचे मनात मंथन….

स्पर्श तुझा भिजवणारा,

तुझ्या बाहूंचे बंधन…..

थेंब ओघळणारा,

माझ्या गालावरी,

ओठाने तुझ्या टिपून घेता,

आला शहारा अंगावरी….

प्रेम घन ओथंबणारा,

बरसू दे माझ्यावरी….

हृदयात मज

विसावू दे निरंतरी….


Marathi Prem Kavita Kusumagraj

💘 एक मनी आस एक मनी विसावा

तुझा चंद्र्मुखी चेहरा रोजच नजरेस पडावा

नाहीतर तो दिवसच नसावा.


# प्रेम कविता

कधी कधी वाटते,

एका अशा ठिकाणी जावे,

“तो आणि मी

“सोबत दुसरे कुणीही नसावे,

वळण-वळणाची ती वाट असावी

हिरव्या-गर्द झाडांनी जी डुंबून

जावी,

लाल मातीचा गंध असावा,

धुंद गंधाने त्याच्या

हवेत गारवा घुमावा,

हवेच्या नाजूक झुळकीने

मनाला माझ्या भेदून जावे,

स्पर्शाने तिच्या मग

हे देह अगदी रोमांचित व्हावे,

धुंद अशा त्या क्षणी

भाव-भावनांचे काहूर माजावे,

आणि मधुर मिठीत त्याच्या

माझे सर्व विश्व एकरूप व्हावे,


प्रेम कविता

खळखळणारे हास्य तुझे

मनात मी साठवून घेतो

अन अश्रू तुझ्या नकळत

मी सदैव टिपून घेतो….

गालावरची खेळी तुझी

हेच माझे विश्व आहे

गुंफलेले हात आपले

हेच चिरंतन सत्य आहे……

विरहाचा कापरा वारा

सदा मला त्रस्त करतो

बरसणाऱ्या पावसातही

तुझी आठवण घेऊन येतो….

शब्द हेच साधन असतं

एकमेकांच्या जवळ येण्याचं

मुका स्पर्शही बोलून जातो

निमित्त फक्त कोसळणाऱ्या

पावसाचं

-----------------

तुला कधी माझं प्रेम अन् प्रेमाची

भाषा कळुच शकतं नाही।

तु तर स्वतःसाठी जगतं आलीस

दुसर्यासाठी कधी जगली नाही।

नक्कीच प्रेम कळेन तुला

मनापासून

एखाद्यावर प्रेम करुन बंघ।

स्वतः साठी तर संगळेच जगतात

गं दुसर्यासाठी थोडं जगुन बघं।

# प्रेम कविता

Marathi Prem Kavita Mangesh Padgaonkar | मंगेश पाडगावकर यांची प्रेम कविता

तिथेही तुझा चेहरा

रात्र अशी सुनसान, उदासी घेउनिया पाउस आला, 

सांग कुणाचे व्याकूळ डोळे घेउनिया पाउस आला  ? 

तुझ्या घरावर, कौलारावर असेल बरसत या वेळी, 

हाक तुझी भिजलेली ओली घेउनिया पाउस आला. 

पुस्तकात मिटूनी सुकलेले फूल कुणितरी ठेवियले

तशा स्मृती मिटलेल्या हळव्या घेउनिया पाउस आला. 

घेतलात तू निरोप माझा तेव्हा मिटल्या डोळयांनी, 

मौन तुझे ओथंबून भरले घेउनिया पाउस आला. 

उंबरठ्याने फुलांसारखे थेब झेलले ओठांनी, 

तू म्हटलेले माझे गाणे घेउनिया पाउस आला. 

खोल खोल मी बुडी घेतली या अंधारी एकाकी, 

तरी तिथेही तुझा चेहरा घेउनिया पाउस आला. 

– मंगेश पाडगावकर______________________

-----------------------------------------

तू प्रेम केलंस म्हणून

तिचं प्रेम लाभलं नाही ? रडू नको, 

जीव द्यायला पाण्यामध्ये बुडू नको ! 

आपण प्रेम केलं म्हणजे 

काय केलं ?

फुलून आलो !

कुणासाठी आपण जीव टाकला

म्हणजे काय केलं ?

फुलून आलो!

फुलणाऱ्याला

जगावंसं वाटलं पाहिजे ! 

फुलणारं प्रत्येक फूल 

बघावंसं वाटलं पाहिजे ! 

रोग लागल्या झाडासारखा झडू नको  ! 

तिचं प्रेम लाभलं नाही ? रडू नको, 

जीव द्यायला पाण्यामध्ये बुडू नको ! 

फांदीने जेव्हा बहर धरला होता, 

रंगांनी जीव सगळा भरला होता ! 

कशासाठी नाकारायचा आपलाच बहर

आणि जगणं करायचं काळं  जहर ?

खोटे खोटे मुखवटे, त्यांच्यामागे दडून नको !

तिचं प्रेम लाभलं नाही ? रडू नको, 

जीव द्यायला पाण्यामध्ये बुडू नको ! 

सगळं रान

पाचूंनी वाकलं आहे  

हिरवं तळं

कमळांनी झाकलं आहे ; 

मातीच्या मौनाला

इवलं इवलं फूल आलं ;

आकाशाचं

निळंनिळं देऊळ झालं !

रानं कां हिरवी होतात ?

कमळं का फुलून येतात ?

मौनाचं कां फुल होतं ?

आकाश कसं देऊ होतं ?

या प्रश्नाचं उत्तर आहे एकच धून :

” तू प्रेम केलंस म्हणून, 

तू प्रेम केलंस म्हणून ! “

तू प्रेम केलंस म्हणून

जगात या जगावंसं वाटतं मला, 

तू प्रेम केलंस म्हणून

माझं गाणं गावं असं वाटतं मला, 

तुझं गाणं तूच असं खुडू नको,

तिचं प्रेम लाभलं नाही ? रडू नको,

जीव द्यायला पाण्यामध्ये बुडू नको !

– मंगेश पाडगावकर

------------------------------

प्रेम म्हणजे काय ?

प्रेम आपल्या जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते एखादी व्यक्ती प्रेमाशिवाय जीवनात प्रगती करू शकत नाही.कोणतेही प्राणी,वस्तू,सजीव,निर्जीव,इत्यादीबद्धल मनामध्ये आपुलकी,स्नेह,जिव्हाळा,आदर,निर्माण होणे आणि ती गोष्ट सहवासात,जीवनात हवीशी वाटणे म्हणजे प्रेम

Related Searches:

  • {120+} मनाला स्पर्श करणाऱ्या मराठी प्रेम कविता | Marathi Prem Kavita
  • Marathi Prem Kavita Mangesh Padgaonkar | मंगेश पाडगावकर यांची प्रेम कविता
  • मराठी कविता प्रेमाच्या आठवणी | Marathi Love Poems
  • Marathi prem kavita मराठी कविता प्रेमाच्या | Love poem in Marathi
  •   Marathi prem kavita [ तू मला विसरून जाणार ]
  • Marathi Prem Kavita | Love Poem In Marathi | मराठी प्रेम कविता
  • मराठी प्रेम कविता (Marathi Prem Kavita)
  • बायकोसाठी मराठी प्रेम कविता (Marathi Prem Kavita For Wife/Gf)
  • प्रिय नवरोबांसाठी मराठी प्रेम कविता (Love Poem In Marathi For Husband)
  • मराठी प्रेम कविता स्टेटस (Marathi Love Poem Status For Whatsapp)
  • मराठी प्रेम कविता थोडक्यात (Short Love Poem In Marathi)
  • मराठी प्रेम कविता चारोळ्या (Marathi Prem Kavita Charolya)


Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post