Marathi Kavita On Life | आयुष्यावर आधारित मराठी कविता | marathi poems on life

 Marathi kavita on life आयुष्यावर आधारित मराठी कविता | marathi poems on life

जीवन हे एक सुंदर आणि गुढ नावच. सुखदुःख याचे मिश्रण म्हणजे जीवन होय जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास कितीतरी रहस्यांनी भरलेला असतो कालच्या दुःखामधून आजच सुख शोधावं लागतं. सुखा मागून दुख येत असतं दुःखामधून सुख येतं असत.

या कवितेत आपल्या मनाच्या कळकळीतून जन्मलेल्या कविता मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे आपण जीवनाच्या प्रवासाबरोबर हसणार रडणार स्वप्न रंगवणार आणि त्यांचे अर्थ शोधणार चला तर मग तयार आहात का? सुंदर कविता बघण्यासाठी

जीवनावर मराठी कविता | Marathi Poems On Life

जन्म दिनांकाच्या दिवशीच 

मृत्यू दिनांक ठरलेला असतो 

मधला काळ कसा जगायचा 

ज्याचा त्यानी ठरवायचा असतोइतरांवर टीका करत जगायचं 

का जीवनाचा आनंद घेत जगायचं 

हे आपलं आपण बघायचंसोबत येतानाच 

दुःख किती भोगायचं 

सुख किती द्यायचं 

सार ठरलेलं असतंमाणूस विनाकारण 

विचार करत बसतं 

असं कसं

झालं ?

आणि तसं कसं झालं ?तुमच्या अवती भवतीचे पात्र सुद्धा 

किती चांगले , किती वाईट 

कोण किती शिकणार , 

कोण कसं निघणार ?हे सर्व 

” आयुष्य ” नावाच्या नाटकातले सिन असतात 

आपण फक्त आपला रोल करायचा 

बस्स !विधात्याने एकदा तुमची स्क्रिप्ट लिहिली की लिहिली 

त्यात आपण बदल करू शकत नाही 

हे नीट समजून घ्या 

आणि आपलं आयुष्य मस्त पैकी जगाजग बदलण्याच्या भानगडीत न पडता 

आयुष्य ” जगण्याच्या ” भानगडीत पडा 

पुढचा माणूस असाच का वागतो ,

तसाच का बोलतो ,

अशा फालतू प्रश्नां वर विचार करू नका 

तो त्याचा रोल आहे , त्याला दिलेले डायलॉग वेगळे आहेत 

त्याचा रोल त्याला करू द्या

तुमचा रोल तुम्ही करा.” जीवन खूप सोप्प आहे “आयुष्य म्हणजे खेळ नव्हे,

फुकट मिळालेला वेळ नव्हे,

आयुष्य एक कोडं आहे,

सोडवाल तितकं थोडं आहे,

म्हणुन म्हणतोय आयुष्यात

येऊन माणसं मिळवावी…!!

एक-मेकांची सुख दु:खे

एक-मेकांना कळवावी…!!!

Marathi kavita on life [निघून जाते आयुष्य]

निघून जाते आयुष्य

खिसे आपुले भरताना

वेळ जाते निघून

दिवस रात्र धावताना

हरवून गेले आहे सारे

सुख विकत घेताना

क्षणभर हसणे सुद्धा

महाग झाले लोकांना

विसरलीत नातीगोती

सारे जवळ असताना

धावपळीचे आयुष्य

निमूटपणे जगताना

आयुष्य आहे सुरेख

कुणीच पाहत नाही

नुसती दगदग सुरु

वेळ कुणाजवळच नाही

बसून मित्रांसोबत

आज कुणी बोलत नाही

सुखामागे धावताना

माणूस आज हरवला आहे

हातच सुख सोडून

दुःखामागे लागला आहे

आयुष्य काय आहे

आज कुणाला कळले नाही

जगण्याचे गुपित कोडे

कुणालाच उमजले नाही

- गणेश म. तायडे, खामगांव

-----------------

बघायला गेलं तर

आयुष्यही खूप सोपं असतं…

जगायला गेलं तर

दु:खातही सुख असतं…

चालायला गेलं तर

निखारेही फूले होतात…

तोंड देता आले तर

संकट ही शुल्लक असतं…

वाटायला गेलं तर

अश्रूंत ही समाधान असतं…

पचवायला गेलं तर

अपयश ही सोपं असतं…

हसायला गेलं तर

रडणेही आपलं असतं…

बघायला गेलं तर

आयुष्यही खूप सोपं असतं…!!!! आयुष्य म्हणजे 

पत्यांचा खेळ.

चांगली पानं मिळणं

आपल्या हातात नसतं.

पण

मिळालेल्या पानांवर

चांगला डाव खेळणं,

यावर आपलं यश

अवलंबून असतं…!!!! अश्रु नसते डोळ्यांमध्ये तर डोळे इतके

सुंदर असले नसते..!

दुःख नसते हृदयात तर

धडकत्या हृदयाला काही

किंमत उरली नसती..!

जर पुर्ण झाल्या असत्या

मनातील सर्व इच्छा तर

भगवंताची काहीच गरज

उरली नसती..!!!! आयुष्य पण हे

एक रांगोळीच आहे.

ती किती ठिपक्यांची

काढायची हे नियतीच्या

हातात असले तरी

तिच्यात कोणते व कसे

रंग भरायचे हे आपल्या

हातात असते…..!!!! आयुष्य खुप कमी आहे,

ते आनंदाने जगा..!

प्रेम् मधुरआहे,

त्याची चव चाखा..!

क्रोध घातक आहे,

त्याला गाडुन टाका..!

संकटे ही क्षण-भंगुर आहेत,

त्यांचा सामना करा..!

आठवणी या चिरंतन आहेत,

त्यांना हृदयात साठवून ठेवा….!!!! कधी असेही जगून बघा

कधीतरी एखाद्यावर विनोद करण्याआधी

समोरच्याचा विचार करुन तर बघा!

तर कधीकोणाच्या हास्यासाठी, समाधानासाठी

न आवडलेल्या विनोदावरही हसुन तर बघा!

कधी असेही जगून बघा….!!!! पंख नाहीत मला पण

उडण्याची स्वप्नं मात्र जरूर बघतो..

कमी असलं आयुष्य

तरी भरभरून जगतो..

जोडली नाहीत जास्त नाती

पण आहेत ती मनापासून जपतो…

आपल्या माणसांवर मात्र

मी स्वत:पेक्षा जास्त प्रेम करतो…..!!!!

------------------

 marathi poems on life  [ बळीराजा ]

बळीराजा गेलाय संपावर

या संपाच्या नादात

वेळ आणली त्यानं पहा

उपासमारीची समाजावर

संप संप करून काय भेटलं

शेवटी शासनानं गाजरच दिलंय

या राजकारणी लोकांच्या नादी लागून

बळीराजानं स्वतःचं हाल करून घेतलंय

बडा राजकारणी आज

शेतीवर कर्ज घेऊन मजेत राहतोय

घेणं देण नाही त्यांना बळीराजाच

त्यांच्या चुकीचे बळीराजा फळ भोगतोय

त्यांना फक्त आपल्या

स्वतः च्या कर्ज माफीचं पडलंय

बळीराजा पुरता बुडलाय आज

संपाच्या नादात त्यानं हे कुठं पाहिलंय

बळीराजा अजून पण विचार कर रे

बड्या राजकीय नेत्यांनी

तुला पूर्ण जनते पासून तोडलंय

का स्वतःच पायावर धोंडा पडतोय रे

राजकीय नेत्यांना दे लाथळून स्वतःच हो तू जनतेच्या मनातला राजा

हो तू आता खरा खुरा बळीराजा

कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील

---------------------

आयुष्य थोडसंच असावं पण..

आपल्या माणसाला ओढ

लावणारं असावं, 

आयुष्य थोडंच जगावं पण..

जन्मो-जन्मीचं प्रेम मिळावं, 

प्रेम असं द्यावं की…

घेणार्‍याची ओंजळ अपुरी पडावी, 

मैत्री अशी असावी की..

स्वार्थाचं ही भानं नसावं, 

आयुष्य असं

जगावं की….

मृत्यूने ही म्हणावं,

“जग अजून, 

मी येईन नंतर……….!!!!!!”

-----------------------

 marathi poems on life [जीव नको देऊस मित्रा]

खोट्या प्रेमासाठी जीव

नको देऊस मित्रा

आई बापाचा जीव आहे

तुझ्यावर त्यांचा तरी

विचार कर लेकरा

जीवन दिलंय देवानं तुला

जगण्यासाठी एव्हड्या

लवकर जीवनाला नको

होऊस तू भित्रा

तळ हाताच्या फोडा प्रमाण

जपलंय त्यांनी तुला लेकरा

प्रेमाचं काय आज आहे उद्या नाही

पैश्याची जो पर्यंत नांदी आहे

तो पर्यंत तुझ्या सोबत तिची चांदी आहे

खोट्या प्रेमासाठी जीव

नको देऊस मित्रा

बहीण आहे तुला जरा

तिचा तरी विचार कर लेकरा

तू गेलास तर तिला

आधार कोण देईल मित्रा

 Marathi poems on life [ ती तुमच्या आमच्या सारखी साधी माणसं असतात..]

आयुष्य जगताना दुसऱ्याचा पण विचार करणारी..

मित्र आणि नातेवाईकांत रमणारी..

सण वार एकत्र साजरी करणारी..

सुखात दुःखात वाटेकरी होणारी..

कितीही होवो त्रास.. न थकता काम करणारी..

देशात काय चाललय.. यापेक्षा शेजारी सांभाळणारी..

नाटक सिनेमा मध्ये रमणारी..

ती तुमच्या आमच्या सारखी साधी माणसं असतात..

राब राब राबणारी..

पण भविष्याची तयारी करून ठेवणारी..

स्वतः बरोबर दुसऱ्यांचा सुद्धा विचार करणारी..

ती तुमच्या आमच्या सारखी साधी माणसं असतात..

चांगल्याला चांगलं म्हणणारी..

काही अभद्र घडलं तर हळहळणारी..

मनातील भावना निखळपणे व्यक्त करणारी..

ती तुमच्या आमच्या सारखी साधी माणसं असतात..

रांगेत थांबणारी..

महागाई वाढली तरी.. तक्रार न करणारी..

सरळ मार्गी चालणारी..

वाकड्यात न शिरणारी..

झालेच चुकीचे तर माफी मागून वेळ मारून नेणारी..

ती तुमच्या आमच्या सारखी साधी माणसं असतात..

देश चालवणारी….

----------------------

माझे आयुष्य कसे गेले,

हेच कधी उमजले नाही l

कुणासाठी जीवन जगलो,

हेच मला समजले नाही ll

लहानपणी जमवायचो,

सोबतीला सारे सवंगडी l

विटीदांडू, आबाधुबी अन् 

चेंडूफली कधी लंगडी ll

खेळताना मात्र स्वतःचा,

कधी विजय पाहिला नाही ll१ll

कुणासाठी जीवन जगलो,

हेच मला समजले नाही……

तारुण्यातही मित्रांसाठी,

केल्या ब-याच भानगडी l

नको नको झंझटांमुळे,

विस्कटली जीवनाची घडी ll

दुस-यांसाठी केली लफडी,

स्वतःसाठी एकही नाही ll२ll 

कुणासाठी जीवन जगलो,

हेच मला समजले नाही ……

मग घेतला झेंडा खांद्यावर,

बनलो पक्षाचा कार्यकर्ता,

तेथे माझा उपयोग केला,

फक्त निवडणूकी पुरता ll

आंदोलनाच्या केसेस् मात्र,

अजूनही मिटल्या नाही ll३ll

कुणासाठी जीवन जगलो,

हेच मला समजले नाही…….

झाले लग्न माझे अन् ,

थाटला नवा संसार l

तेव्हापासून लागला मागे,

आणा-आणीचा बाजार ll

अपार कष्ट करुनसुध्दा,

संसार पुरा झाला नाही ll४ll

कुणासाठी जीवन जगलो,

हेच मला समजले नाही…….

मुले शिकून मोठी झाली,

अन् लागली कमवायला l

मुलगी गेली जावयासोबत,

मुलगा सुनेबरोबर गेला ll

आम्हा म्हाताऱ्यांसोबत,

कुणीही राहिला नाही ll५ll.

कुणासाठी जीवन जगलो,

हेच मला समजले नाही…….

वयानुसार शरीर थकले,

आता जडले अनेक आजार l

आम्ही म्हातारा म्हातारी,

परस्परांना देतो आधार ll६ll

आता समजलेही सारे,

पण आयुष्य उरले नाही……

आयुष्याच्या या प्रवासात,कुणासाठी जीवन जगलो,

हेच मला समजले नाही………

--------------------

 Marathi kavita on life मी म्हणालो मनाला

मी म्हणालो मनाला

थोडा विचार कर ना रे ?

बद्लतय जग सारे

थोडा तू बदल ना रे ?

विसर जुन्या रुढी परंपरा

मनाची कवाडे थोडी उघड ना रे

आपलीच आहेत ती लेकर

बरोबर त्यांच्या चाल ना रे

मी म्हणालो मनाला

आजूबाजू ला जरा बघ ना रे

संपलय आपले कर्तुत्व

नव्या पीढित रम ना रे

प्रत्येक पीढीच विद्रोही आसते

स्वताची तरुनाई आठव ना रे

विश्व चक्र हे आसेच चालणार

नवी पीढी जुन्याशी भांडनार

बदल स्रुस्तिचा अटळ नियम

एवध तरी समज ना रे

मी म्हणालो मनाला

थोडा विचार कर ना रे ?

------------------

पन्नाशी झाली साठी आली 

कशाला करतो चिंता ?

प्रत्येक दिवस मजेत जगायचा 

वाढवायचा नाही गुंतावय झालं म्हातारपण आलं

उगीच बोंबलत बसू नको

विनाकारण बाम लावून

चादरीत तोंड खुपसू नकोरोजच यांना कशी काय होती

जळजळ आणि Acidity 

मलाच म्हणतेत या वयात

असते का कुठं सिमला , उटी ?तुम्हीच सांगा फिरायला जायला

वयाचा संबध असतो का ?

नेहमी नेहमी घरात बसून 

माणूस आनंदी दिसतो का ?पोटा पाण्यासाठी पोरं

घर सोडून जाणारच 

प्रत्येकाच्या आयुष्या मधे

असे रितेपण येणारचकरमत नाही करमत नाही

सारखे सारखे म्हणू नका 

मित्रां सोबत दिवस घालवा

घरात कुढत बसू नकाआवडीच्या मित्र मैत्रिणींचा 

Group करायचा मस्त 

Sugar detect होई पर्यंत 

Ice Cream करायचे फस्तदेशातल्या देशात वा परदेशात

हिंडाय-फिरायला जायचं 

वय जरी वाढलं तरी 

रोमँटिक गाणं गायचंगुडघे गेले , कंबर गेली

नेहमी नेहमी कण्हु नका 

आता आपलं काय राहिलं 

हे बोगस वाक्य म्हणू नकापिढी दर पिढी चाली रितीत

थोडे फार बदल होणारच 

पोरं पोरी त्यांच्या संसारात 

कळत नकळत गुंतणारचतू-तू , मैं-मैं , जास्त अपेक्षा

कुणाकडूनही करू नका

मस्तपैकी जगायचं सोडून

रोज रोज थोडं मरू नकाएकमेकाला समजून घेऊन

पुढे पुढे चालावे

वास्तू तथास्तु म्हणत असते

नेहमी चांगले बोलावे

----------------------

 Marathi kavita on life [ मला सुद्धा जगायचंय ]

पेटलेल्या दिव्यामधील

    मिणमिणती वात म्हण

    तुझ्या उमेदीला दिलेली

    नशिबाने मात म्हण

    पण तुझ्या वंशवेलीवर मला फुल बनुन उगायचंय

    आई! मला मारु नकोस मला सुद्धा जगायचंय

    तुच दिली आस मला

    तुच दिला प्राण हा

    तुच माझी माता व्हावी

    मिळावा सन्मान हा

    हक्क आहे तो माझा मला ही जग बघायचंय

    आई! मला मारु नकोस मला सुद्धा जगायचंय

    माझा गुन्हा, माझा दोष

    मला काहीच कळत नाही

    का करते तु माझ्यावर रोष

    मला काहीच कळंत नाही

    तु ही कधी मुलगी होती हे मी का तुला सांगायचंय

    आई! मला मारु नकोस मला सुद्धा जगायचंय

    नको समजुस मी तुला

    जिंदगीभरचा भार होईल

    दुर्गा होईल, शक्ती होईल

    मी तुझा आधार होईल

    समजावुन सांग तु तुझ्या मनाला असं नाही वागायचंय

    आई! मला मारु नकोस मला सुद्धा जगायचंय

--------------------------------

पूर्वीचा काळ बाबा

खरंच होता चांगला,

साधे घरं साधी माणसं,

कुठे होता बंगला ?घरं जरी साधेच पण,

माणसं होती मायाळू, 

साधी राहणी चटणी भाकरी, 

देवभोळी अन श्रद्धाळू.सख्खे काय चुलत काय, 

सगळेच आपले वाटायचे,

सुख असो दुःख असो, 

आपुलकीने भेटायचे.पाहुणा दारात दिसला की, 

खूपच आनंद व्हायचा हो,

हसून खेळून गप्पा मारून,

शीण निघून जायचा हो.श्रीमंती जरी नसली तरी,

एकट कधी वाटलं नाही,

खिसे फाटके असले तरीही,

कोणतंच काम रुकलं नाही.उसनं पासनं करायचे पण, 

पोटभर खाऊ घालायचे,

पैसे आडके नव्हते तरीही,

मन मोकळं बोलायचे.कणकेच्या उपम्या सोबत, 

गुळाचा शिरा हटायचा,

पत्रावळ जरी असली तरी,

पाट , तांब्या मिळायचा.लपाछपी पळापळी, 

बिन पैशाचे खेळ हो,

कुणीच कुठे busy नव्हते,

होता वेळच वेळ हो.चिरेबंदी वाडे सुद्धा,

खळखळून हसायचे,

निवांत गप्पा मारीत माणसं, 

ओसरीवर बसायचे.सुख शांती समाधान ” ते “

आता कुठे दिसते का ?

पॉश पॉश घरा मधे,

” तशी ” मैफिल सजते का ?नाते गोते घट्ट होते,

किंमत होती माणसाला,

प्रेमामुळे चव होती,

अंगणातल्या फणसाला.तुम्हीच सांगा नात्या मध्ये,

राहिला आहे का राम ?

भावाकडे बहिणीचा हो, 

असतो का मुक्काम ?सख्खे भाऊ सख्ख्या बहिणी, 

कुणीच कुणाला बोलत नाही,

मृदंगाच्या ताला वरती,

गाव आता का डोलत नाही.प्रेम , माया , आपुलकी हे,

शब्द आम्हाला गावतील का ?

बैठकीतल्या सतरंजीवर,

पुन्हा पाहुणे मावतील का ?तुटक तुसडे वागण्यामुळे,

मजा आता कमी झाली,

श्रीकृष्णाच्या महाला मधुनी,

सुदामाची सुट्टी झाली.हॉल किचन बेड मधे,

प्रदर्शन असतं वस्तूंचं,

का बरं विसर्जन झालं, 

चांगुलपणाच्या अस्थीचं ???जगणं खूप सुंदर आहे,त्यावर हिरमसू नका…एक फूल उमललं नाही,

म्हणून रोपाला तुडवू नका…सगळं मनासारखं होतं असं नाही,पण मनासारखंझालेलं विसरू नका…सुटतो काही जणांचा हात नकळत,पण धरलेले हात सोडू नका.

--------------------------------

 Marathi kavita on life [ आयुष्याचा भागीदार ]

तिच्या दिशेने पावलं

    आपोआप माझी वळतात

    मलाही उमजेना अशा

    वाटेला भावना कळतात

    भव्यतेची ओढ मला

    स्वप्नं माझी साहसी

    झोका घेता आकाशी भिडे

    ती ही आहे धाडसी

    पुस्तकांचे ओझे माझे

    ती लिलया पेलेल का?

    झेप घेऊनी धडपडलो

    तर ती मला झेलेल का?

    नेम अचूक स्थैर्य तिच्या हाती

    तीक्ष्ण विचारांचे बाण

    सोसेल का तिच्या बुद्धीला

    माझ्या धनुष्याचा ताण

    खळाळते हास्य तिचे

    नम्रतेचा शृंगार

    तिच्या तेजस्वी डोळ्यात दिसे

    मला आयुष्याचा भागीदार

----------------------

दोन शब्द जगण्याविषयी 🕊कुणाला आपला कंटाळा येईल 

इतकं जवळ जाऊ नयेचांगुलपणाचे ओझे वाटेल

इतके चांगले वागू नयेकुणाला गरज नसेल आपली

तिथे रेंगाळत राहू नयेनशीबाने जुळलेली नाती जपावी 

पण स्वतःहून तोडू नयेगोड बोलणे गोड वागणे

कुणास अवघड वाटू नयेजवळपणाचे बंधन होईल

इतके जवळचे होऊच नयेसहजच विसरून जावे सारे

सल मनात जपू नयेनकोसे होऊ आपण

इतके आयुष्य जगूच नयेहवे हवेसे असतो तेव्हाच

पटकन दूर निघून जावे

आपले नाव दुस ऱ्याच्या ओठी

राहील इतकेच करून जावे.कारण

जीवनाच्या वाटेवर 

साथ देतात,

मात करतात

हात देतात,

घात करतात,

ती ही असतात….. माणसं !संधी देतात,

संधी साधतात,

आदर करतात,

भाव खातात

ती ही असतात….. माणसं !वेडं लावतात, 

वेडं ही करतात,

घास भरवतात,

घास हिरावतात

ती ही असतात….. माणसं !पाठीशी असतात, 

पाठ फिरवतात,

वाट दाखवतात , 

वाट लावतात

ती ही असतात….. माणसं !शब्द पाळतात, 

शब्द फिरवतात,

गळ्यात पडतात, 

गळा कापतात

ती ही असतात …… माणसं !दूर राहतात, 

तरी जवळचीच वाटतात,

जवळ राहून देखील,

परक्यासारखी वागतात

ती ही असतात …… माणसं !नाना प्रकारची अशी 

नाना माणसं,

ओळखायची कशी 

सारी असतात आपलीच माणसं !

---------------------

marathi poems on life [ माझे जगणे होते गाणे ]

माझे जगणे होते गाणे

सुरेल केंव्हा, केंव्हा बेसुर

तालावाचून वा तालावर

कधी तानांची उनाड दंगल

झाले सुर दिवाणे

कधी मनाचे कधी जनाचे

कधी धनास्तव कधी बनाचे

कधी घनाशय कधी निराशय

केवळ नादतराणे

आलापींची संथ सुरावळ

वा रागांचा संकर गोंधळ

कधी आर्तता काळजातली

केंव्हा फक्त बहाणे

राईमले राजस कूजन

कधी स्मशानामधले क्रन्दन

अजाणतेचे अरण्य केंव्हा

केंव्हा शब्द शहाणे

जमले अथवा जमले नाही

खेद खंत ना उरली काही

अदॄश्यातिल आदेशांचे

ओझे फक्त वाहणे

सुत्रावाचून सरली मैफल

दिवेही विझले सभागॄहातिल

कशास होती आणि कुणास्तव

तो जगदीश्वर जाणे

 Marathi kavita on life [ जगण्यासाठी अजुन काय हवं?]

आई, एक बाप,

एक भाऊ, एक बहिण,

असं एखादं घर हवं,

जगण्यासाठी अजुन काय हवं?

एक मित्र, एक शत्रु,

एक सुख, एक दु़:ख,

असं साधं जीवन

जगण्यासाठी अजुन काय हवं?

एक प्रेयसी, एक अर्धांगिनी,

एक खरं प्रेम, एक भक्क्म आधार,

यात कुठेही नसला प्रेमाचा अभाव तर,

जगण्यासाठी अजुन काय हवं?

एक सुर्य, एक चंद्र,

एक दिवस, एक रात्र,

फक्त सगळं समजायला हवं,

जगण्यासाठी अजुन काय हवं?

एक शक्ती, एक भक्ती,

एक सुड, एक आसक्ती

ठायी असेल युक्ती तर,

जगण्यासाठी अजुन काय हवं?

थोडा पैसा, थोडी हाव,

थोडा थाट, थोडाबडेजाव,

सगळयांच्या तोडी आपलंच नाव,

जगण्यासाठी अजुन काय हवं?

एक नोकरी, एक छोकरी,

दोन मुलं अन खायला भाकरी,

उत्तम प्रकारची जर असेल चाकरी,

जगण्यासाठी अजुन काय हवं?

एक समुद्र, एक नदी,

एक शांत, एक अवखळ

जीवनात असली जर एक तळमळ

जगण्यासाठी अजुन काय हवं?

एक इच्छा, एक आशा,

एक मागणं, अक अभिलाषा,

मनात भरलेली सदा नशा,

जगण्यासाठी अजुन काय हवं?

--------------------------

थोड जगलं पाहिजे………!!*आयुष्याच्या अल्बममध्ये

आठवणींचे फोटो असतात,

आणखी एक कॉपी काढायला

निगेटिव्हज् मात्र शिल्लक नसतात.गजर तर रोजचाच आहे

आळसाने झोपले पाहिजे,

गोडसर चहाचा घोट घेत

Tom & Jerry पाहिलं पाहिजे.आंघोळ फक्त दहा मिनिटे?

एखाद्या दिवशी तास घ्या,

आरशासमोर स्वतःला

सुंदर म्हणता आलं पाहिजे.भसाडा का असेना

आपल्याच सुरात रमलं पाहिजे,

वेडेवाकडे अंग हलवत

नाचण सुध्दा जमलं पाहिजे.गीतेचा रस्ता योग्यच आहे

पण एखादा दिवस पाडगावकराना द्या,

रामायण मालिका नैतिक थोर

“बेवॉच” सुध्दा एन्जॉय करता आली पाहिजे.कधी तरी एकटे

उगाचच फिरले पाहिजे,

तलावाच्या काठावर

उताणे पडले पाहिजे.संध्याकाळी मंदिराबरोबरच

बागेत सुध्दा फिरलं पाहिजे,

“फुलपाखराच्या” सौंदर्याला

कधीतरी भुललं पाहिजे.द्यायला कोणी नसलं

म्हणून काय झालं?

एक गजरा विकत घ्या

ओंजळ भरुन फुलांचा नुसता श्वास घ्या.रात्री झोपताना मात्र

दोन मिनिटे देवाला द्या,

एवढया सुंदर जगण्यासाठी

नुसतं थँक्स तरी म्हणा..!!पाहता पाहता मोठे झालो

सगळेच गणित बदलत गेले

छोट्या छोट्या आनंदाचे

क्षण केव्हाच उडून गेले ।।ध्रु ।।आजीने घातलेल्या आंघोळीने

मन सुद्धा स्वछ होई 

देवपूजा पाहताना तिची

देव सुद्धा मुग्ध होईमायेन भरवलेल्या तिच्या घासांनी

दिवसभराची भूक भागे

तिच्या सुंदर गोष्टी-गाण्यांनी

शांत सुखाची झोप लागेपाहता पाहता मोठे झालो

सगळेच गणित बदलत गेले

छोट्या छोट्या आनंदाचे

क्षण केव्हाच उडून गेले || १ ||७ वाजताच्या बातम्या पाहणे

हा आजोबांचा नियम असे

‘बातम्या नको,कार्टून लावा’

असा आमचा गलका असे

------------------

marathi poems on life [बलिदान त्या महान हुतात्म्यांच]

चला झाले , संपले , श्रद्धांजलि वाहिली .

मुंबई पुन्हा एकदा कामा मध्ये जुंपली.

दोन चार दिवसात हे सार बदलून जाईल

राजकरन याचे फक्त वाढत राहिल

आज शिवराज गेले , उदया आबा जातील

फक्त मतांचा आणि मतांचा फायदा पक्ष पाहतील

सरकार "यो करेंगे , त्यों करेंगे " गात राहिल

विरोधी पक्ष नाही, नाही करत साथ जाईल.

गुप्तचर यंत्रनेत भ्रास्ताचाराची किड भर भरून वहिल

पकडले तर जुन्याचा शिवराज, नव्याच स्माईल

ठोस काही उत्तर यांना मिळनारच नाही .

पाक व्याप्त कश्मीर वर हल्ला केल्यास

मतांच गणित जुळनार नाही

त्या पेक्ष्या घोंघडे भिजत ठेवणे हे जास्त चांगल

सलमान , संजू प्रकरणी कसे लोकानाच टांगल

आजचे शहीद , उदया आठवणार ही नाहीत

पुढचा हमला होस तोवर या हल्ल्याचा निकाल,

तपास चालु , पाकिस्तान कडून चाल ढकल ?

तेव्हा पुन्हा चैनल वाले ही जुनी मढ़ी काढतील

सत्य कमी यांचीच मिर्ची जास्त भरतील .

बलिदान त्या महान हुताम्यांच

इतके मात्र करुन राहिल .

सामान्य मानसाच्या दुवेने

स्वर्ग ही त्याना मिळून जाईल.

 Marathi Kavita On Life | आयुष्यावर आधारित मराठी कविता | marathi poems on life

मित्रांनो जर तुम्हाला या आयुष्याबद्दल किंवा आपल्या जीवनावर लिहिलेल्या कविता आवडले असेल तर कमेंट करून मला नक्की कळवा आणि या लेखांमध्ये माझ्याकडून काही चुका घडले असतील तर त्या देखील मला कमेंट मध्ये कळवा जेणेकरून मी माझ्या चुका सुधारण्याचा प्रयत्न नक्की करेन धन्यवाद

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post