कोणाही जिवाचा । न घडो मत्सर मराठी निबंध

कोणाही जिवाचा । न घडो मत्सर  मराठी निबंध

कोणाही जिवाचा । न घडो मत्सर  मराठी निबंध


     कोणाही जिवाचा । न घडो मत्सर । वर्म सर्वेश्वर । पूजनाचे ।। ' परमेश्वराच्या पूजनाचे रहस्य सांगताना संत तुकाराम महाराज हा संदेश देतात की , ' कोणाही जिवाचा । न घडो मत्सर । ' मत्सर हा षड्विकारांपैकी एक घातक विकार आहे . हे षड्विकार माणसाच्या दुःखाला कारण होतात . जो माणूस या विकारांवर ताबा मिळवतो , तोच खरा वैष्णव , तोच खरा विष्णुभक्त .
 
        माणसाचे स्वतःवर अधिक प्रेम असते . जगात जे काही चांगले आहे , उदात्त आहे , उन्नत आहे ते मला मिळावे , असे त्याला वाटत असते . येथपर्यंत ' मानवाची वृत्ती ' म्हणून ठीक आहे . जे मला मिळाले ते दुसऱ्याला मिळू नये , ते केवळ मलाच मिळावे असे वाटणेही गैर आहे . पण त्याच्या पुढे जाऊन दुसऱ्याजवळ काही अधिक चांगल्या गोष्टी असल्या की , त्याचा हेवा करणे , राग करणे , द्वेष करणे हे निश्चितच गैर आहे . अशा वृत्तीमुळे मानवातील मानव हरवला जाऊन तो दानव बनतो . 

             मत्सरग्रस्त माणूस आपला सदसद्विवेक हरवून बसतो आणि मग वाट्टेल ते दुष्कृत्य करण्यास तो मागेपुढे पाहत नाही . सत्यभामेने रुक्मिणीचा मत्सर केला व पारिजातकाचा वृक्ष मिळवला ; पण तरीही त्या पारिजातकाची फुले रुक्मिणीच्याच अंगणात पडली . मंथरेच्या सांगण्यावरून कैकयीने कौसल्येचा , रामाचा मत्सर केला आणि पुढचे रामायण घडले . मत्सरग्रस्त माणसे कोणतेही दुष्कृत्य करण्यास सहजपणे प्रवृत्त होतात . मग एखादयाचे प्राणही घेण्यास ती मागेपुढे पाहत नाहीत . 

           आपल्याला मूल नाही म्हणून दुसऱ्याच्या मुलांचे बळी देण्याची अघोरी कृत्येही घडतात . बहुतेक सर्व भांडणांच्या मुळाशी ही मत्सरग्रस्त वृत्तीच कारणीभूत असते . अशी ही मत्सरी माणसे स्वतः कधीही सुखी होत नाहीत आणि ती दुसऱ्यालाही सुखात राहू देत नाहीत . मत्सराला आपण हद्दपार करू शकलो , तरच सारे भेदाभेद दूर होतील . सत्ताप्राप्ती साठी युद्धे , लढाया होणार नाहीत . दुसऱ्याबाबत वाईट चिंतताना माणसाने त्याच्या ठिकाणी स्वतःला पाहिले , तर तो त्या वाईट विचारापासून दूर होईल आणि मग संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानाच्या ओळी त्याच्या ओठांवर येतील -

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post