अनाम वीरा कविता 7वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]

अनाम वीरा कविता 7वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]

अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनान्त
स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली न वात !
धगधगतां समराच्या ज्वाला या देशाकाशीं
जळावयास्तव संसारातुन उठोनिया जाशी!

मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा-
मरणामध्ये विलीन होसी, ना भय ना आशा !
जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव
रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव !

जरी न गातिल भाट डफावर तुशें यशोगान!
सफल जाहले तुझेच हे रे तुझेच बलिदान!
काळोखातुनि विजयाचा ये पहाटचा तारा
प्रणाम माझा पहिला तुजला मृत्युुंजय वीरा !

अनाम वीरा कविता 7वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]

 ज्ञानपीठ पारितोषिक विजेते प्रसिद्ध लेखक, कवी, नाटककार. 
‘जीवनलहरी’, ‘विशाखा’, ‘समिधा’, ‘स्वगत’, ‘हिमरेषा’, ‘वादळवेल’, ‘मारवा’, किनारा’ इत्यादी काव्यसंग्रह; 
‘वैजयंती’, ‘राजमुकुट’, ‘कौंतेय’, ‘नटसम्राट’, ‘वीज म्हणाली धरतीला’, ‘विदूषक’ इत्यादी नाटके प्रसिद्ध.
प्रस्तुत कवितेत कवीने देशाच्या सीमेवर शत्रूशी लढणाऱ्या, वेळप्रसंगी प्राणार्पण करून देशाचे रक्षण करणाऱ्या ज्ञात-
अज्ञात सैनिकांना अभिवादन केले आहे.


अनाम वीरा कविता 7वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post