थेंब आज हा पाण्याचा कविता 7वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]

थेंब आज हा पाण्याचा कविता 7वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]

शब्द जाऊ दे, अर्थ राहू दे, विषय अहे गाण्याचा
आभाळातिल बहुमोलाचा, थेंब आज हा पाण्याचा ।।धृ.।।

मोती बनुनी सरसर येती, वर्षेमधल्या सरीतुनी
माळ आेवते, निसटुन जाते, बावरते जणू परी कुणी
या मोत्यांचा संचय कर तू, प्रश्न तुझ्या रे जीण्याचा
आभाळातिल बहुमोलाचा, थेंब आज हा पाण्याचा ।।१।।

आभाळातिल ह्या मोत्याने, मातीमधुनी पिकती मोती
निसर्ग जाणी मोल तयाचे, तुम्ही माणसे का मग कोती?
संचय करता तिजोरीतल्या, खणखणत्या त्या नाण्यांचा
आभाळातिल बहुमोलाचा, थेंब आज हा पाण्याचा ।।२।।

कशास ऐसा वेडाचाळा, स्वत: होऊनी ठगण्याचा
दृष्टिकोन तू बदल आता रे, निसर्गास ह्या बघण्याचा
तहानेसाठी सांग पुरे का घोट तुला रे सोन्याचा?
आभाळातिल बहुमोलाचा, थेंब आज हा पाण्याचा ।।३।।

थेंब आज हा पाण्याचा कविता 7वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]

  1.  नियतकालिकांतून पर्यावरणविषयक कवितांचे लेखन. 
  2. विविध कार्यक्रमांतून पर्यावरणविषयक कवितांचे सादरीकरण. 
  3. ‘पर्यावरण गीत गंगा’ हा काव्यसंग्रह प्रसिद्ध. प्रस्तुत कवितेत कवयित्रीने मानवी जीवनातील पाण्याचे महत्त्व विशद केले आहे.

थेंब आज हा पाण्याचा कविता 7वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post