असे जगावे कविता 7वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]
असे जगावे, छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर
नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर!
नको गुलामी नक्षत्रांची, भीती अांधळी ताऱ्यांची
आयुष्याला भिडतानाही, चैन करावी स्वप्नांची
असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर
नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर!
पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना
हसू असावे ओठांवरती, काळीज काढून देताना
संकटासही ठणकावून सांगावे, ये आता बेहत्तर
नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर!
करून जावे असेही काही, दुनियेतून या जाताना
गहिवर यावा जगास साऱ्या, निरोप शेवट देताना
स्वर कठोर त्या काळाचाही, क्षणभर व्हावा कातर कातर
नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर!
गुरू ठाकूर (१९६८) :
- प्रसिद्ध कवी, गीतकार, कथाकार. ‘नटरंग’, ‘अगं बाई, अरेच्चा’, ‘घर दोघांचे’, ‘टाइमपास’ यांसारख्या अनेक प्रसिद्ध मराठी व हिंदी चित्रपटांसाठी गीतलेखन.
- ज्यांची इच्छाशक्ती प्रबळ असते त्यांना संकटांतही मार्ग सापडतात.
- संकटांचा हसून सामना करावा, तसेच आयुष्यामध्येकाहीतरी चांगले कार्य करून जावे, असा संदेश कवीने प्रस्तुत कवितेतून दिला आहे.
असे जगावे कविता 7वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]
Tags:
मराठी कविता