Verb Structures, क्रियापदांची रचना
क्रियापदांची रचना -
क्रियापदांची रचना - कोणत्याही भाषेत क्रियापद खूप महत्वाचे असते कारण (finite) क्रियापदाने वाक्य तयार होते. इंग्रजीमध्ये ( Verb Structures ) क्रियापदाला खालील चार
1. Past Tense Suffix भूतकाळ दाखविणारे + (e)d (showed)
2. Past Participle Suffix पूर्णकाळ दाखविणारे +n (shown)
3. Third Person Singular Pr. Tense Suffix +5 (shows) (साधा वर्तमानकाळ व तृतिय पूरूषी एकवचनी कर्ता दाखविणारे)
परंतु सर्वच क्रियापदांना भूतकाळ व पूर्णकाळाची नियमित प्रत्यये लागतात असे नाही. काहींना दोन्हीही प्रसंगी -(e)d लागते तर काहींना वेगळी प्रत्यये लागतात; तर काहींना प्रत्ययेच लागत नाहीत. इंग्रजीमध्ये wait सारखी क्रियापदे जास्त आहेत आणि त्यांचे भूतकाळ व भूतकाळवाचक धातुसाधीत + (e) d जोडूनच होते. क्रियापद be तर आणखीनच विचित्र पध्दतीने वागते. याची ८ रुपे आहेत. (पुढील पाठ पहा.)
एखाद्या क्रियापदाला खऱ्या अर्थाने क्रियापद व्हायचे असेल तर त्याला काळ हा लागतोच. साध्या वर्तमानकाळात क्रियापदाला लागलेला काळ फक्त तृतीय पुरुषी एक वचनी (उदा. He, She. It ) कर्ता असतानाच दिसतो- इतर कर्त्यांसोबत फक्त क्रियापदाचे मूळ रुपच दिसते. (Table व Ram हे देखील तृतीय पुरुषी एकवचनीच समजण्यात येतात.)
verb structure examples
- Igo/Wego/You go/ They go.
- He goes/She goes/Ram goes/It goes.
साधा वर्तमानकाळ व साधाभूतकाळ व्यक्त करण्यासाठी क्रियापदालाच प्रत्यये लावतात परंतु भविष्यकाळ व इतर उपकाळ व्यक्त करण्यासाठी सहाय्यकारी क्रियापदे वापरावी लागतात. चालू काळ व्यक्त करण्यासाठी be, पूर्णकाळ व्यक्त करण्यासाठी have, तर भविष्यकाळ व्यक्त करण्यासाठी will/shall ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात. उदा.
verb structure examples
i. He is going. येथे be चे वर्तमानकाळी रुप is वापरलेले आहे.
'is + verb +ing' चालू वर्तमानकाळ व्यक्त करते.
ii. He was going. येथे be चे भूतकाळी रुप was वापरलेले आहे.
'was + verb + ing' चालू भूतकाळ व्यक्त करते.
iii. He will go. यथे will वापरलेले आहे आणि 'will + क्रियापदाचे
iv. We have gone. येथे have वापरलेले आहे; 'have + verb + en'
मूळ रुप' साधा भविष्यकाळ व्यक्त करते. (P.P.) पूर्ण वर्तमानकाळ व्यक्त करते.
Verb Structures In Marathi - क्रियापदांची रचना
Tags:
इंग्रजी व्याकरण