Definite and Indefinite Articles (a, an, the) in marathi

How to Use Articles (a/an/the) in marathi

इंग्रजीमध्ये a / an आणि the ही उपपदे आहेत. ती नामांपूर्वी वापरतात. Articles चा खालील diagram पहाः Articles
(अनिश्चितता वाचक) - Indefinite - a/an
 (निश्चितता वाचक) - Definite - the
How to Use Articles

i. a/ an = 'सर्वसामान्यपणे एक किंवा कोणतातरी'जेव्हां वस्तू विशिष्ट अशी नसते तेंव्हा नामापूर्वी किंवा विशेषण + नामापूर्वी a / an वापरतात. म्हणूनच a / an ला अनिश्चिततावाचक उपपद म्हणतात.उदा. 
 1. I saw a boy playing in the ground.
 2. Yesterday I bought a beautiful pen.

ii.The = 'ते जे तुला माहीत आहे'बोलणाराला, ऐकणाराला किंवा सर्वांना माहीत असलेल्या म्हणजेच निश्चित वस्तू पूर्वी the वापरतात. म्हणूनच the ला निश्चिततावाचक उपपद म्हणतात. उदा. 
 1. When you were searching us in canteen we were
 2. sitting in the garden.
उपपदांचे सविस्तर अर्थ खालील प्रमाणे आहेत.
How to Use Articles


A/an कधी वापरावे आपण जेव्हां मोजता येणाऱ्या एकवचनी वस्तूचा उल्लेख सर्वसामान्यपणे करतो तेव्हां a/an हे लावावेच लागते.
1. अशा नामाचा उल्लेख पहिल्यांदाच झाला तर त्या नामापूर्वी a / an वापरतात. 
उदा. I saw a boy.

2. संख्यावाचक शब्दांपूर्वी a/an वापरतात.
उदा. a hundred rupee note. a thousand people. 
या ठिकाणी a चा अर्थ सर्वसामान्यपणे हजार एक लोक असा होतो. one thousand people. या ठिकाणी one चा अर्थ (तंतोतंत) एक हजार लोक असा होतो.

3. मोजमापापूर्वी a/an वापरतात.
उदा. five rupee a dozen, one rupee a kilo.

4. शिक्षा, बक्षीस व पगारासारखी इतरत्र मोजता न येणारी नामे a/an वापरण्याच्या बाबतीत मोजता येणारी ठरतात म्हणून त्यांच्यापूर्वी a/ an वापरतात.
उदा. i. He was given a reward for his baravery.
ii. If you are promoted, you will get a higher salary.

5. नामाचे पूरक म्हणून किंवा नामाचे वर्णन करण्यासाठी आलेल्या नामापूर्वी a/an वापरतात. उदा.
 1. He has got a long nose.
 2. Ramesh is a fool.
 3. We found Pune a delightful city.
 4. He is an Indian.
 5. He is a genius.
व्यक्तीचा व्यवसाय व वस्तूचा वापर सांगण्यासाठी देखील al an वापरतात. उदा.
 1. He is a doctor.
 2. I am a teacher.
 3. He worked as a taxi-driver.
 4. My sister is training as a classical dancer.
 5. Don't use the plate as an ashtray.
येथे जो नियम लागू होतो तो आहे- 'copular relation मध्ये जी noun phrase येते तीच्यातील नामापूर्वी a/ an येते.'

6. What ने सुरू होणाऱ्या उद्गार वाक्यात a/ an वापरतात.
 • What a pity!
 • What a miserable day (it is)!
7.Quite, rather आणि such सारख्या शब्दांसोबत a/ an वापरतात. Quite / rather / such a nice day.
8. 'कोणताही एक', 'एखादा' या अर्थी देखील a/an वापरतात. त्याच बरोबर one चा unstressed form म्हणूनदेखील a/ an येते.
 1. A spider has ten legs.
 2. (I have lost my pen.) Can someone lend me a pen.
 3. (I have to go to the station) I am looking for an auto.
 4. I have two sisters and a brother.

9. Non- count noun सोबत a / an वापरावयाचे असल्यास पूढील दोन अटी पूर्ण व्हाव्या लागतात.
i. व्यक्तीला लागू होतील असे गुण त्या नामाने सुचवावे लागतात.
ii. ते नाम pre-modify किंवा post-modify झालेले असावे लागते.
उदा. 
 • Ravi had a good education.
 • My sister suffers from a strange dislike of Mathematics.

A वापरावे की an a/ an च्या नियमात बसणाऱ्या ज्या नामाचा उच्चार व्यंजनाने सुरू होतो त्या नामांपूर्वी (noun phrase पूर्वी) a वापरतात. तर ज्या नामाचा उच्चार स्वराने सुरू होतो त्यापूर्वी an वापरतात. उदा.
 1. a boy - boy चा उच्चार 'ब' या व्यंजनाने सुरू होतो.
 2. a Europian - European चा उच्चार 'य' या व्यंजनाने सुरू होतो.
 3. a book- book चा उच्चार 'ब' या व्यंजनाने सुरू होतो.
 4. an apple-apple चा उच्चार 'अॅ' या स्वराने सुरू होतो.
 5. an hour - hour चा उच्चार 'आ' या स्वराने सुरू होतो.
 6. an M.A - M. चा उच्चार 'ए' या स्वराने सुरू होतो.
इंग्रजीची व्यंजने : क, ग, च, ज, ट, ड, इत्यादी. इंग्रजीचे स्वर : अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, एइ, आइ, ॲ, ऑ इत्यादी. 

A/an कधी वापरत नाहीत -

1. मोजता न येणाऱ्या नामापूर्वी a/an वापरत नाहीत. परंतु ते नाम एखाद्या मापाने मोजले तर avan वापरतात. कधी कधी वाक्यात त्या मापाचा अर्थ असतो परंतु उल्लेख करत नाहीत. (वाक्य क्र. iv. पहा.)
UGT. i. I like sugar.
ii. Add a spoon of sugar in the tea.
iii. Give me a piece of paper.
iv. Bring me a cup of tea/ a tea.

2. अनेकवचनी नामापूर्वी a/an वापरत नाहीत. उदा. Ravi likes mangos.
3. जेवणांच्या नावांपूर्वी al an वापरत नाहीत. परंतु जेवणाच्या नावापूर्वी एखादे विशेषण किंवा वर्णन आल्यास a/ an वापरतात.
उदा. i. We take lunch at 2'o clock.
ii. She was late for breakfast yesterday.
iii. He gave us a grand tea.


Article उपपद : निश्चिततावाचक the (तोच) - How to Use Articles (the)

How to Use Articles


एखादी वस्तू वेगवेगळ्या कारणाने सर्वांना माहीत असेल म्हणजेच तिचा उल्लेख झाल्यानंतर कोणत्या वस्तूचा उल्लेख होतोय हे बोलणाराला व ऐकणाराला माहीत असेल तर अशा वस्तूपूर्वी the हे उपपद वापरतात.

|The  वापरण्याचे नियम - Terms of use the

1. एखाद्या गोष्टीचा उल्लेख दुसऱ्यांदा होत असेल तर ती गोष्ट (पहिल्यांदा झालेल्या उल्लेखामुळे) दोघांनाही माहीत आहे असे गृहीत धरतात व तिच्यापूर्वी the हे उपपद वापरतात.
उदा. I saw a boy.
The boy was very fat.
 दुसऱ्या वाक्यात boy पूर्वी the हे उपपद वापरले आहे कारण त्याचा दुसऱ्यांदा उल्लेख झालेला आहे.

2. जी गोष्ट सर्वांना माहीत असल्याकारणाने किंवा जगात एकच असल्याकारणाने विशिष्ट आहे असे समजतात अशा नामापूर्वी the हे उपपद वापरतात.
उदा.
 1. the garden, ती बगीचा जी आपल्या शहरात आहे. (एकच तर आहे आपल्या शहरात!)
 2. the sun, the moon, the stars, the earth, the sky ( एकच तर चंद्र, तारे, सुर्य आहेत.)
 3. the air, the wind, the water, the rain ( ही पंचतत्वे देखील एकमेवाव्दितीय आहेत.)
3. क्रमवाचक शब्दापूर्वी व superlative degree पूर्वी the वापरतात.
उदा.
पहिला, दुसरा
 • the first, the second, the third ...
 • the best boy in the class
 • the fastest train
4. पर्वतरांगा, नद्या, समुद्र, जंगले, वाळवंट, दया, खाडी इ. पूर्वी the वापरतात. उदा. 
 1. the Himalayas
 2. the Yamuna, the Ganga
 3. the Sahara


परंतु पर्वत (एक पर्वत), तळे, खंड, महीना, वार, देश, राज्य यांच्या नावापूर्वी the वापरत नाहीत.
उदा. 
 1. Mount Everest
 2. Silver Lake
5. देशाच्या अनेकवचनी किंवा संक्षिप्त नामापूर्वी आणि बेटांच्या समूहापूर्वी the वापरतात.
 1. the Netherlands
 2. the US
 3. the Maldiv Islands
6.एखादे नाम निश्चित करण्यासाठी त्याच्यापूर्वी किंवा त्याच्यानंतर वर्णनात्मक शब्द आल्यास the वापरतात.
उदा.
 1. the central Maharashtra
 2. the same story
 3. the book which is on the table
7.  (एकवचनी मोजता येणारे नाम) म्हणजेच या नाम, विशेषण
 • the + singular count noun
 • the + adjective 
 • the + present participle
 • the + past participle
उदा.
the cow म्हणजेच 'गाईंचा वर्ग / सर्व गाई' या अर्थी cow पूर्वी the वापरतात.

8. Non-count noun हे pre-modify झाल्यास त्यापूर्वी the येत नाही परंतु post-modify झाल्यास येते.
उदा. the history of China

9. Adjective + noun ने विशेषनाम तयार झालेले असल्यास the
वापरतात. उदा.
 1. The Arabian Sea
 2. The United Kingdom
10.वृत्तपत्राच्या नावापूर्वी the वापरतात
 1. The Indian Express,
 2. The Times of India
11. ऐतिहासिक वास्तू, स्मारके, यांच्या नामापूर्वी the वापरतात.
 • The Taj Mahal, The Red- Fort
12. दिशा नाम म्हणून आल्या असल्यास दिशांच्या नावापूर्वी the वापरतात.
उदा. He went to the East.

13. The + अनेकवचनी आडनाव, कुळाचे नाव, वंशाचे नाव म्हणजे ते
सर्व कुळ, कुटूंब, वंश.
UGT. the Tatas, the Ambanies, the Birlas

14. शासकीय व निमशासकीय संस्था, कार्यालये व त्यांच्या प्रमुखांपूर्वी the वापरतात.

15. Office, cinema आणि theatre पूर्वी the येते.
उदा. He has gone to the office.

16.Only, same पूर्वी the वापरतात.
 1. Today is the only day on which I am free.
 2. I like the same doll as my sister.
17. देशवासियांपूर्वी सर्वजण याअर्थी the वापरतात. परंतु एका- एका देशवासियांचा विचार केल्यास वापरत नाहीत.
उदा. 
i. the Americans
ii. the Indians
iii. Indians have dark skin.
iv. Englishmen are fair.

How to Use Articles (a/an/the) in marathi

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post