इंटरनेट म्हणजे काय | इंटरनेट आणि वेब मधील फरक |

 आपण या पोस्ट मध्ये इंटरनेट म्हणजे काय तसेच इंटरनेट कधी निर्माण झाले इंटरनेट आणि वेब मधील फरक वेबसाईटचे पहिले रूप दुसरे रूप व तिसरे रूप इंटरनेट मुळे होणारा फायदा व इंटरनेट मुळे होणारे विविध कामे या सर्व गोष्टींचा आढावा या पोस्टमध्ये घेणार आहोत चला तर सर्वप्रथम पाहू इंटरनेट म्हणजे काय

इंटरनेट म्हणजे काय

इंटरनेट म्हणजे काय |  इंटरनेट आणि वेब मधील फरक |


इंटरनेट हे जगातील सर्वात मोठे नेटवर्क आहे. येथे सर्व नेटवर्क एकमेकांशी जोडलेले आहेत. हे एक जागतिक संगणक नेटवर्क आहे जे अनेक प्रकार आताच्या काळामध्ये इंटरनेट हे एक अत्यंत महत्त्वाचे साधन आहेत इंटरनेट मुळे संपूर्ण जग भराचा विकास होत आहेत तसेच इंटरनेट हे एक मानवी जीवनातील वरदानच होईल
 इंटरनेट मुळे आपल्याला जगभरातील कोणतीही माहिती एका क्लिक मध्ये उपलब्ध होऊ शकते व ही इंटरनेट अजून काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढत जाणार आहे  या अशा विशाल नेटवर्क ची सुरुवात 1991 मध्ये झाली

 इंटरनेट आणि वेब  म्हणजे नेमकी काय

इंटरनेट म्हणजे काय |  इंटरनेट आणि वेब मधील फरक |


 इंटरनेट ची सुरूवात 1969 मध्ये झाली जेव्हा युनायटेड स्टेट्सने एका प्रोजेक्टसाठी निधी पुरवला आणि त्याद्वारे अॅडव्हांस्ड रिसर्च प्रोजेक्ट एजंसी नेटवर्क [ Advanced Research Project Agency Network ( ARPANET ) ] नावाचे राष्ट्रीय कंप्यूटर नेटवर्क विकसित केले गेले . इंटरनेट एक विशाल नेटवर्क आहे जे जगभरातील लहान नेटवर्क्सना जोडते . वेब , ज्याला वर्ल्ड वाइड वेब किंवा www देखील म्हणतात , याची सुरूवात 1991 मध्ये झाली

वेब येण्याआधी इंटरनेट केवळ मजकूर स्वरूपात होते , ग्राफिक्स , एनिमेशन्स , ध्वनि किंवा व्हिडीओ , हे काही नव्हते . वेबमुळे हे सर्व आणणे शक्य झाले . इंटरनेटवर उपलब्ध संसाधनांसाठी वेब एक मल्टीमीडिया इंटरफेस पुरवते .

 वेबची पहिली आवृत्ति ,

 वेब 1.0 
 विद्यमान माहितीला लिंक करण्यावर केंद्रित होती . विशिष्ट शब्द किंवा वाक्ये असलेल्या वेबासाइट्सच्या लिंक देण्यासाठी गूगल सर्च सारखे सर्च प्रोग्रॅम्स या पिढीमध्ये तयार केले गेले . 2001 मध्ये दुसरी आवृत्ति , 

वेब 2.0 
आली ज्यात जास्त डायनॅमिक कन्टेट तयार करण्यावर आणि सोशल इंटरअॅक्शनवर जोर दिला गेला . वेब 2.0 अॅप्लिकेशन्सच्या सर्वात प्रसिद्ध उदाहरणापैकी एक म्हणजे फेसबुक , 

वेब 3.0 
ही सध्या चालू आवृत्ति आहे . यात अशी अॅप्लिकेशन्स आहेत जी वापरकर्त्यासाठी पर्सनलाइझ्ड कन्टेट ऑटोमॅटिकली तयार करतात . उदाहरणार्थ , गूगल नाउ वेबवर उपलब्ध डेटा ( जसे एखद्या व्यक्तिच्या नियोजित गतिविधिंचे कॅलेंडर , हवामानाचे रिपोर्ट्स आणि ट्राफिकचे रिपोर्ट्स ) वापरते , डेटामधील परस्पर - संबंध शोधते ( जसे व्यक्तिच्या दररोज ऑफिसला जाण्याच्या नियोजित कामावर हवामानाचा व ट्राफिकचा प्रभाव ) , आणि वापरकर्त्याला ही संबंधित माहिती ऑटोमॅटिकली देते ( व्यक्तिच्या स्मार्टफोनवर सकाळी अपेक्षित वाईट हवामान आणि / किंवा ट्राफिकची स्थिति पाठवणे ) .

इंटरनेट आणि वेबमध्ये गोंधळ होणे साहजिक आहे , पण हे दोन्ही वेगळे आहेत . इंटरनेट हे वास्तविक , भौतिक नेटवर्क आहे . यात नेटवर्कशी जुळलेल्या कंप्यूटर्समध्ये माहितीच्या आदान - प्रदानासाठी वायर्स , केबल्स , उपग्रह आणि नियम असतात . या नेटवर्कशी जोडलेले असल्याच्या स्थितिला ऑनलाइन असणे असेही म्हणतात . इंटरनेट जगभरात करोडो कंप्यूटर्स आणि संसाधनांना जोडते . इंटरनेटवर उपलब्ध संसाधनांसाठी वेब हा एक मल्टीमीडिया इंटरफेस आहे . जवळपास प्रत्येक देशातील करोडो वापरकर्ते दररोज इंटरनेट आणि वेबचा वापर करतात . ते काय करतात ? सर्वात कॉमन वापर असे आहेत : 
इंटरनेट म्हणजे काय |  इंटरनेट आणि वेब मधील फरक |


 इंटरनेटचा वापर आणि इंटरनेट मुळे होणारी विविध कामे

  1. संदेश आदान - प्रदान
  2. खरेदी 
  3. माहिती शोधणे
  4. शिक्षण किंवा ई - लर्निंग
  5.  मनोरंजनासाठी 
इंटरनेट म्हणजे काय |  इंटरनेट आणि वेब मधील फरक |


संदेश आदान - प्रदान ही सर्वात लोकप्रिय इंटरनेट गतिविधि आहे . तुम्ही जगात कुठुनही तुमच्या मित्र आणि परिवाराशी ई - मेल , फोटो आणि व्हिडीओचे आदान - प्रदान करु शकता . तुम्ही जुने मित्र पुन्हा शोधू शकता आणि नवे मित्र जोडू शकता . तुम्ही खास आवडीच्या विविध विषयांवर चाललेल्या चर्चा आणि वाद - विवादामध्ये सामील होऊ शकता . फेसबुक , ट्विटर , इंस्टाग्राम आणि लिंक्डइन ही काही उदाहरणे आहेत . 

खरेदी ही इंटरनेटवर झपाट्याने वाढत असलेली अॅप्लिकेशन आहे . तुम्ही विंडो शॉपिंग करु शकता , नवीन फॅशनची माहिती मिळवू शकता , स्वस्त सामान शोधू शकता आणि सामान विकत घेऊ शकता . मिंत्रा , अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट ही काही उदाहरणे आहेत . 

माहिती शोधणे एवढे सोपे कधीच नव्हते . तुम्ही तुमच्या घरच्या कंप्यूटरवरुन जगातील काही सर्वात मोठ्या लायब्ररीज अॅक्सेस करु शकता . तुम्ही नवीनतम स्थानीय , राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या मिळवू शकता . गुगल आणि बिंग ही काही उदाहरणे आहेत . 

शिक्षण किंवा ई - लर्निंग ही एक अजून जलद गतिने वाढणारे वेब अॅप्लिकेशन आहे . तुम्ही जवळपास कोणत्याही विषयाचे क्लासेस घेऊ शकता . काही कोर्सेस केवळ मजेसाठी आहेत , तर काही हायस्कूल , कॉलेज आणि ग्रॅज्युएट स्कूलसाठी आहेत . काही विनामूल्य आहेत , तर काही अत्यंत महाग आहेत . सिंपलीलर्न , खान अॅकॅडमी , लिंडा , युडेमी आणि e-learningforkids.org ही काही उदाहरणे आहेत .

 मनोरंजनासाठी तर अनंत पर्याय आहेत . तुम्हाला संगीत , मूव्हीज , नियतकालिके आणि कंप्यूटर गेम्स मिळतील . तुम्ही लाइव्ह कन्सर्ट्स आणि मूव्ही प्रिव्ह्यू पाहू शकता . तुम्हाला बुक क्लब्स आणि इंटरअॅक्टिव्ह लाइव्ह गेम्स सापडतील . डेअली मोशन आणि युट्युब ही काही उदाहरणे आहेत . इंटरनेट आणि वेब वापरण्याची पहिली पायरी आहे इंटरनेटशी कनेक्ट होणे , किंवा इंटरनेट अॅक्सेस करणे .

 आपल्याला ही पोस्ट वाचत असताना इंटरनेट म्हणजे काय  तसेच इंटर तसेच इंटरनेट व वेब यामधील फरक चांगल्याप्रकारे समजला असेल अजून काही माहिती हवी असेल तर आमच्या वेबसाईटला भेट द्या तसेच अजून काही माहिती हवी असेल तर कमेंट करा आम्ही तुम्हाला ती माहिती लवकरात लवकर मिळवून देऊ पोस्ट कशी वाटली हे नक्की कळवा धन्यवाद

 हे नक्की वाचा


Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post