नामांचे प्रकार - Kinds of Nouns

नामांचे प्रकार - Kinds of Nouns


वस्तूला, व्यक्तीला, ठिकाणाला, पदार्थाला किंवा गुणाला ओळखण्यासाठी त्यांना दिलेल्या नावाला नाम ( Nouns ) म्हणतात.
उदा.
  1. table (वस्तू)
  2. Ram (व्यक्ती)
  3. city (ठिकाण)
  4. water (पदार्थ)
  5. goodness (गुण)

नामांचे प्रकार Kinds of Nouns नामाचे पाच प्रकार करता येतील.

नामांचे प्रकार - Kinds of Nouns

१. सामान्य नाम Common Noun: 

सामान्य नाम - एकाच प्रकारच्या वस्तू, व्यक्ती व प्राणी या सर्वांसाठी जेव्हां एक सामाईक शब्द वापरण्यात येतो तेव्हां त्याला सामान्य नाम म्हणतात. उदा. झाड, खुर्ची, माणूस, बैल. सामान्यपणे अशा नामांचे एकवचन व अनेकवचन होते.
उदा. a tree-trees, a man - men, a chair - chairs.

२. विशेषनाम Proper Noun:

 विशेषनाम - एखाद्या व्यक्तीच्या, स्थळाच्या आणि वस्तूच्या विशेष नावाला विशेषनाम म्हणतात. हे नाव केवळ त्याच वस्तू/ व्यक्तीला दिलेले असते, दुसऱ्या वस्तू/व्यक्तीला दिलेले नसते.
उदा. रमेश, औरंगाबाद, Shivaji, Pune, Sunday

३. अमूर्त नाम Abstract Noun : 

अमूर्त नाम - हाताने स्पर्श न करता येणाऱ्या कल्पनांना, अवस्थांना अमुर्त नाम म्हणतात. उदा. प्रेमळपणा, आनंद, दुःख, अंधार, उजेड, happiness, beauty, opinion, idea

४. पदार्थवाचक नाम Material Noun : 

पदार्थवाचक नाम - सामान्यपणे एक, दोन असे मोजता न येणाऱ्या पदार्थ किंवा वस्तूला दिलेल्या नावाला पदार्थवाचक नाम म्हणतात. उदा. पाणी, साखर, कागद, तेल, water, rice, sugar

५. समूहवाचक नाम Collective Noun : वस्तूंच्या व व्यक्तींच्या समूहाचा उल्लेख करावयाचा असेल तर हे नाम वापरतात.
उदा. गर्दी, शाळा, वर्ग, थवा, class, crowd, team

नामांचे खालील पध्दतीनेदेखील वर्गीकरण करता येईल

नामांचे वाक्यात उपयोग - Uses of Nouns 

नामांचे वाक्यात खालील प्रमाणे उपयोग होतात.
१. कर्ता म्हणून (as a subject of a sentence): Ramesh is a boy.
२. कर्म म्हणून (as an object of a verb): Ramesh helped Ram.
३. पूरक म्हणून (as a compliment) : Ramesh is a doctor.
४. Preposition चे कर्म म्हणून : He put the book on the table.
५. जोडलेला भाग म्हणून as an adjunct : He called me in the evening.
६. मालकी दाखविणाऱ्या अवस्थेत (षष्ठी) देखील नाम येतेः Ram's book

Countable fchat Uncountable इंग्रजीमध्ये nouns एकतर countable (मोजता येण्याजोगे) असतात किंवा uncountable मोजता न येण्याजोगे असतात. मोजता येणाऱ्या नामांचे अनेकवचन होते तर मोजता न येणाऱ्या नामाचे अनेकवचन होत नाही.
उदा. 
  1. I like a mango. मोजता येणारे नाम, एकवचन
  2. I like mangoes. मोजता येणारे नाम, अनेकवचन
  3. I like tea. मोजता न येणारे नाम

मोजता येणाऱ्या नामांचे सर्वसामान्यपणे -5, -es लागुन अनेकवचन होते.
 उदा.

एकवचन - अनेकवचन
  1. book - books
  2. camera - cameras
  3. flower - flowers
  4. house -  houses
  5. boy - boys

सामान्यपणे Material Nouns व काही Abstract Nouns मोजता येत नाहीत. अशी नामे रचनेने एकवचनी गृहीत धरतात व त्यांच्या सोबत एकवचनी क्रियापद वापरतात. मोजता न येणाऱ्या नामांचे अनेकवचन करता येते. खालील प्रकारच्या मापांनी मोजून त्यांचे अनेकवचन करतात.

Exercise: Make plurals of the following nouns.

1) book, rat, ray, tattoo, play, peach, witch, lash, reply
Answers - books, rats, rays, tattoos, plays, peaches, withches, lashes,
replies

नामांचे प्रकार - Kinds of Nouns

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post