असा रंगारी श्रावण कविता 8वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]
असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो
सृष्टीचा गा चित्रकार हिर्वा देखावा रेखितो
कलावंत हा साजिरा काय त्याची कलागत
जागोजागी चित्रांचीच त्यानं मांडली पंगत
नाचे दरी डोंगरात झिम्मा खेळतो नदीशी
रिमझिम पहाळीचं गाणं बोलतो झाडांशी
वेण्या गुंफितो वेलींच्या वेली लाजल्या लाजल्या
पाना-फुलांचे पातळ थेंबाथेंबांनी सजल्या
झुले पोरींना झुलाया असे टांगतो झाडाला
देतो झुलता झुलता लय पोरींच्या गाण्याला
पोरांमध्ये खेळायला होतो श्रावण खेळगा
दहीहंडीच्या संगती चिंब गोपाळ अवघा
पावसाचं घर कसं लख्ख उन्हात बांधतो
खोडी काढून खट्याळ झाडाआड तो लपतो
इंद्रधनुष्याचा बांध असा नभाला घालतो
रंगीबेरंगी फुलांची नक्षी रानात गांेदतो
असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो
हिर्व्या सृष्टीच्या मळ्यात खोपा करून राहतो
![]() |
| असा रंगारी श्रावण कविता |
- प्रसिद्ध लेखक, कवी. ‘भुईशास्त्र’ हा कवितासंग्रह आणि ‘जू’ हे आत्मकथन प्रसिद्ध. ‘भुईशास्त्र’ या कवितासंग्रहाला दिल्लीच्या भारतीय साहित्य अकादमीचा पहिलाच ‘राष्ट्रीय साहित्य अकादमी युवा पुरस्कार’ यासह अन्य अनेक पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. या कवितासंग्रहातील कवितांचा उडिया, हिंदी, ब हिं गं ली, उर्दू आणि इग्रजी या भाषांत अनुवाद झालेला आहे.
- २०१२ साली भारत सरकारच्या सांससां ्कृतिक मंत्रालयातर्फे चीन भेटीसाठी मराठी साहित्यिकांचा प्रतिनिधी म्हणून निवड. ‘कविता-रती’, ‘अनुष्टुभ’, ‘साधना’, ‘किशोर’ यांसारख्या विविध नियतकालिकांतून कविता, कथा प्रसिद्ध झाल्या आहेत.
- श्रावणात केवळ निसर्ग फुलून गेलेल निसर्ग नसतो; तर माणसाचे जीवनही सण, उत्सव आणि विविध क्रीडांनी गजबजून गेलेले असते.
- श्रावणरगं ात सारेच रगून जतात. प्रस्तुत कवितेत श्रावण महिन्याच्या निसर्गातील निसर्गा विलोभनीय बदलांचे सदर वर्णन केले आहे. प्रस्तुत कविता ‘किशोर’, ऑगस्ट २०१७ या मासिकातून घेतली आहे.
असा रंगारी श्रावण कविता 9वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]
Tags:
मराठी कविता
![असा रंगारी श्रावण कविता 9वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ] असा रंगारी श्रावण कविता 9वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiK-a48QUsNoGjjad7qYmfWRWNnyNXZ_ih0ZON1s4rlqWL3TK5plOhqhofiDmjxWIHBngvW-QuTYuoPweXLC-2ibbHyxWXWRA1gcu-k2tMbnhrkkA_UaBcSEunmELWyAg_LcSaO5zXGjZI/s16000-rw/%25E0%25A4%2585%25E0%25A4%25B8%25E0%25A4%25BE+%25E0%25A4%25B0%25E0%25A4%2582%25E0%25A4%2597%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25B0%25E0%25A5%2580+%25E0%25A4%25B6%25E0%25A5%258D%25E0%25A4%25B0%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25A3+%25E0%25A4%2595%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25A4%25E0%25A4%25BE+9%25E0%25A4%25B5%25E0%25A5%2580+%25E0%25A4%25AE%25E0%25A4%25B0%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25A0%25E0%25A5%2580+%255B+%25E0%25A4%2595%25E0%25A5%2583%25E0%25A4%25A4%25E0%25A5%2580+%25E0%25A4%25B8%25E0%25A5%258D%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25A7%25E0%25A5%258D%25E0%25A4%25AF%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25AF+%25E0%25A4%25B5+%25E0%25A4%25B0%25E0%25A4%25B8%25E0%25A4%2597%25E0%25A5%258D%25E0%25A4%25B0%25E0%25A4%25B9%25E0%25A4%25A3+%255D.jpg)