विद्याप्रशंसा कविता 8वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]

विद्याप्रशंसा कविता 9वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]

विद्येनेंच मनुष्या आलें श्रेष्ठत्व ह्या जगामाजीं;
न दिसे एकहि वस्तूविद्येनेंही असाध्य आहे जी.।।१।।
देउनि किंवा भोगुनि उणें न होतांसदैव वाढतसे
ऐसें एकच विद्या-धन, अद्भुत गुण न हा दुज्यांत वसे. ।।२।।
नानाविध रत्नांची, कनकांचीं असति भूषणें फार;

परि विद्यासम एकहि शोभादायक नसे अलंकार. ।।३।।
या साऱ्या भुवनीं हित-कर विद्येसारखा सखा नाहीं;
अनुकूळ ती जयाला नित्य तयाला उणें नसे कांही. ।।४।।
गुरुपरि उपदेश करी, संकट-समयीं उपायही सुचवी,

चिंतित फळ देउनियां कल्पतरूपरि मनोरथां पुरवी. ।।५।।
यापरि सकल सुखें जी देई, दु:खें समस्त जी वारी,
त्या विद्यादेवीतें अनन्यभावें सदा भजा भारी. ।।६।।


विद्याप्रशंसा कविता 9वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]

विद्याप्रशंसा कविता 


कृष्णशास्त्री चिपळूणकर (१८२४-१८७८) : 
  1. भाषांतरकार, रसिक पंडित. मराठी व्याकरणावरील निबंध व ग्रंथपरीक्षणे त्यांच्या चिकित्सक बुद्धीचे दर्शन घडवतात. पद्य रत्नावलीत त्यांनी मेघदूताचा रसाळ अनुवाद केला आहे, 
  2. तसेच ‘अरबी भाषेतील सुरस व चमत्कारिक गोष्टी’, ‘रासेलस’ ही सॅम्युअल जॉन्सन यांची तत्त्वप्रधान कादंबरी, ‘साक्रेटिसाचे चरित्र’ आणि ‘अर्थशास्त्रपरिभाषा’ ही त्यांच्या अनुवाद कौशल्याची उदाहरणे होत. ‘अनेकविद्यामूलतत्त्वसंग्रह’ 
  3. या ग्रंथावरून त्यांची  शास्त्रीय लेखन सुगम करून सांगण्याची हातोटी प्रत्ययास येते.
  4. प्रस्तुत कवितेत विद्येची थोरवी सांगितली आहे. दुसऱ्याला विद्या दिल्याने ती कमी होत नसते, तर वाढतच असते, माणसाला संकटातून मार्ग दाखवत असते. 
  5. विद्येमुळे माणसाच्या सर्व दु:खाचे निवारण होऊ शकते. विद्येसारखा वाटाड्या, मित्र काेणीही नाही असे विद्येचे महत्त्व या कवितेत सांगितले आहे. प्रस्तुत कविता ही ‘आठवणीतल्या कविता’ भाग ३ या कवितासंग्रहातून घेतली आहे.

विद्याप्रशंसा कविता 8वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post