नव्या युगाचे गाणे कविता 8वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]
अणूरेणूतुनि शब्द प्रगटति... ‘चला चला पुढती’
विज्ञानाचा प्रकाश आला घडे दिव्य क्रांती
नवयुग आले प्रभा तयाची पहा दिसत दिव्य
शून्यामधुनी विश्व उभारू जिद्द असे भव्य
हृदयांतरिच्या अशांततेचा वणवा झणि विझला
उत्कर्षाचा अन् प्रगतीचा मार्गनवा दिसला
नवी चेतना अंतरि स्फुरली दुबळेपण गेले
नैराश्याच्या होळीमधुनी तेज नवे आले
मानवतेच्या मार्गावरती उठती जरि ज्वाला
अमरत्वाची फुले वेचुनी गुंफूया माला
नको खिन्नता... नको दीनता
नवसूर्य पहा उगवतो
उत्कर्ष पहा झळकतो
संघर्ष पहा बहरतो
नसानसातुन जोश उसळतो नव आशा चित्ती
- कवी, लेखक. त्यांच्या विविध विषयांवरील काव्यरचना प्रसिद्ध आहेत. त्यांच्या काव्यातून बदलत्या काळातील मानवी जीवनावरील मार्मिक भाष्य आढळून येते.
- अतिशय वेगाने घडणाऱ्या वैज्ञानिक प्रगतीमुळे मानवी जीवनात मोठी क्रांती घडून येत आहे. विज्ञानाच्या पाठिंब्यामुळे शून्यातून नवे विश्व उभारण्याची जिदद् मानवामध्ये निर्माण होत आहे, मानवी जीवनातील दैन्य दूर होत आहे, नव्या प्रगतीच्या आशा पल्लवीत होत आहेत,
- हे या कवितेतून कवीने स्पष्ट केले आहे. प्रस्तुत कविता ही ‘किशोर’, जानवेारी १९९८ या मासिकातून घेतली आहे.
Thanks for Comment