भारत देश महान 8वी मराठी
चला चला हो एकमुखाने गाऊ एकच गान
भारत देश महान, भारत देश महान ।।धृ.।।
हिमालयाची हिमशिखरे ती । भारतभूच्या शिरी डोलती ।
गंगा, यमुना आणि गोमती । घालिती पवित्र स्नान ।।१।।
इतिहास नवा हा बलिदानाचा । शौर्याचा अन् पराक्रमाचा
समतेचा अन्विश्वशांतिचा । जागवी राष्ट्राभिमान ।।२।।
शौर्याने जे वीरचि लढले । रणांगणी ते पावन झाले ।
भारतभूचे स्वप्न रंगले । चढवूनि उंच निशाण ।।३।।
माधव विचारे :
- प्रसिद्ध कवी व लेखक. त्यांच्या विविध विषयांवरील काव्यरचना प्रसिद्ध आहेत. देशभक्तीने ओतप्रोत भरलेल्यारचना हे त्यांच्या काव्याचे वैशिष्ट्य आहे.
- हिमालयाच्या शिखरांनी सुशोभित असलेल्या आणि गगं ा-यमुनेमुळे सुपीकतेचे वरदान लाभलेल्या भारतभूमीला शौर्याचीआणि पराक्रमाची मोठी परपरं ा लाभली आहे. प्रस्तुत गीतातून समता आणि विश्वशांती ही मूल् जपण् ये याचा संदेश सं दिला आहे.
- प्रस्तुत गीत हे ‘गीतपुष्पांचा फुलोरा’ या संपादित काव्यसंग्रहातून घेतलेले आहे.
भारत देश महान 8वी मराठी
Tags:
मराठी कविता