आपुले जगणे आपुली ओळख कविता 9वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]

आपुले जगणे आपुली ओळख कविता 9वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]


आपुले जगणे... आपुली ओळख! उपरे, अर्धे जोडु नको
दिवा होऊनि उजळ जगाला... चाकू होऊन कापु नको!
 नित्य घडावे वाचन, लेखन... क्षण कार्याविण दवडु नको
 नित्य परवचा, व्यायामाविण झोप घ्यावया पडु नको!

पावित्र्याची पांघर वस्त्रे, होऊन पटकुर पसरु नको
शोभेहुनही श्रेष्ठ स्वच्छता, आदिमंत्र हा विसरू नको!
नम्र रहावे, सौम्य पहावे; उगा कुणास्तव अढी नको
उगा कुणाला खिजवायला करू तयावर कडी नको!

नको फुकाची ‘हांजी हांजी’... लोचट, बुळचट काहि नको
परंतु दिसता उदात्त काही; ताठर माथा मुळि नको!
पेल शक्तीने गोवर्धन तू, कंस होऊनी छळु नको
नको उगाचच वाद परंतु कुणि धमकवता पळु नको!

अपुल्या अपुल्या दु:खासाठी नयनी अश्रु ठेवु नको
पण दुसऱ्यास्तव वाहो करुणा; व्यर्थ कोरडा राहु नको!
तुडवित राने खुशाल जावे, नव्या पथाला भिउ नको
ज्यावर श्रद्धा प्राणाआतुन ते केल्याविण राहु नको!

जेथे वाटा, तेथे काटा! उगा भेदरुन अडु नको
करता हिंमत, जगात किंमत ! भेकड, गुळमुळ रडु नको!
कर्तृत्वाचे घडवी वेरुळ, कर्तव्याला मुकु नको
मातेसह मातिचे देणे फेडायाला चुकु नको!

Also Read: 
रसग्रहण : संतवाणी - जैसा वृक्ष नेणे रसग्रहण 9th मराठी

रसग्रहण : संतवाणी (आ) धरिला पंढरीचा चोर रसग्रहण 9th मराठी

रसग्रहण : या झोपडीत माझ्या रसग्रहण इयत्ता नववी

रसग्रहण : मी वाचवतोय रसग्रहण इयत्ता नववी

रसग्रहण : महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया कविता 9वी मराठी रसग्रहण

रसग्रहण : निरोप कविता रसग्रहण इयत्ता नववी

रसग्रहण : वनवासी रसग्रहण इयत्ता नववी 

रसग्रहण : आपुले जगणे आपुली ओळख रसग्रहण इयत्ता नववी


  1.  प्रसिद्ध कवी. ‘मौनाची भाषांतरे’, ‘नेणिवेची अक्षरे’, ‘तुझ्यावरच्या कविता’, ‘अग्गोबाईऽऽ 
  2. ढग्गोबाईऽऽ’ हे काव्यसंग्रह प्रसिद्ध. स्वरचित कवितांचे अनेक म्युझिक अल्बम प्रसिद्ध व लोकप्रिय आहेत. हिंदी व मराठी चित्रपट व मालिकांसाठी गीतलेखन. 
  3. शासनाच्या विविध पुरस्कारांनी सन्मानित. दैनंदिन जीवनात वागताना काय करावे व काय करू नये, याविषयीचे भाष्य कवीने सोप्या शब्दांत कवितेतून व्यक्त केले आहे. प्रस्तुत कविता ‘अग्गोबाईऽऽ ढग्गोबाईऽऽ’ या काव्यसंग्रहातून घेतली आहे.

आपुले जगणे आपुली ओळख कविता 9वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]

1 Comments

Thanks for Comment

  1. मरुन जगणे जगून मरणे अर्थ

    ReplyDelete
Previous Post Next Post