गोधडी कविता 8वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]
गोधडी म्हणजेच
नसतो फक्त चिंध्यांचा बोचका
गोधडी म्हणजेच गोधडी असते.
मायेलाही मिळणारी ऊब असते.
गोधडीला असते अस्तर
बापाच्या फाटक्या धोतराचे
किंवा
आईला बापाने घेतलेल्या
फाटक्या लुगड्याचे
आत-
गोधडीत
अनेक चिंध्या असतात
बसलेल्या दाटीवाटीनं
आईनं दटावून बसवलेल्या.
तेव्हा त्या फक्त चिंध्याच नसतात
त्यात असतो
मामानं घेतलेला, भाच्याचा
जीर्ण कुडता
माहेरातून आलेलं
आईच्या लुगड्याचं पटकुर
आणि
पहिल्या संक्रांतीला
बानं घेतलेलं-
आईनं असंख्य ठिगळं लावलेलं
तिचं लाडकं लुगडं
आणि
बाच्या कोपरीच्या बाह्या
आईनं ते सगळं
स्मृतीच्या सुईनं
शिवलेलं असतं त्यात.
म्हणून गोधडी म्हणजे
नसतो चिंध्यांचा बोचका
गोधडी कविता |
- मराठी ग्रामीण कादबरीकर. ग्रामजीवनातील वास्तवाचे चित्रण करणारे लेखक-कवी म्हणून प्रसिद्ध. त्यांच्या ‘पाणधुई’ व ‘कापूसकाळ’ या कादबऱ् या;‘उसाच्या कविता’, ‘वसाण’, ‘भोग सरू दे उन्हाचा’,
- ‘अधंराचा गाव माझा’ हे कवितासंग्रह; ‘एका सुगीची अखेर’ हा कथासंग्रह; ‘तऱ्होळीच पंणी’ हा ललित लेखसंग्रह इत्यादी लेखन प्रसिद्ध. लेखनासाठी पचवी ं सहून अधिक साहित्य पुरस्कारांनी सन्मानित.
- गोधडी हे केवळ पांघरूण नव्हे, तर दारिद्र्याने पोळलेल्या जगण्यावर फुंकर घालणाऱ्या प्रेमाचा, मायेचा स्पर्श होय.
- गोधडी हे आईवडिलांच्या कष्टमय जीवनाचे प्रतीक आहे. गोधडीच्या रूपाने कौटुंबिक नात्यामधील आठवणींचा गोफ विणलाआहे.
- याविषयीचे भावस्पर्शी चित्रण प्रस्तुत कवितेतून कवीने केले आहे. प्रस्तुत कविता ‘उसाच्या कविता’ या काव्यसंग्रहातून घेतली आहे.
गोधडी कविता 8वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]
Tags:
मराठी कविता