Future: be going to ( I am going to work ) - English Grammar in marathi


Be going to ची रचना व उपयोग


सर्वसामान्यपणे भविष्यकाळाचा उल्लेख आपण will किंवा shall वापरतो. परंतु be going to ची रचना वापरुन देखील भविष्यकाळाविषयी बोलता येते. आता खालील वाक्ये अभ्यासा व A column मधील वाक्याच्या व B column मधील वाक्याच्या रचनेत वे अर्थात काय फरक आहे ते लिहा.

A column B column
1. He will fall down the manhole. 3. He is going to fall down manhole.
2. She will eat the mango. 4. She is going to eat the mango.

अगदी बरोबर ओळखलेत! Column A मधील वाक्यांत will वापरलेले आहे तर B मधील वाक्यात is going to वापरलेले आहे. A मधील वाक्यात या क्रिया उद्या किंवा भविष्यात कधीतरी घडतील अशी शक्यता सांगितलेली आहे. या क्रिया घडण्याची खात्री देण्यात आलेली नाही.

परंतु B मधील वाक्यात भविष्यात घडणान्या घटनेची खात्री दिलेली आहे. ती क्रिया घडणे निश्चित झालेले आहे किंवा ती क्रिया लवकरच घडणार असे सांगीतले आहे. वाक्य क्र. 3 मध्ये त्याच्या पडण्याची क्रिया लवकरच घडणार आहे. असे दिसते. (कारण जर त्याला समोरचा manhole दिसत नसेल तर तो पडणारच ना!)

वाक्य क्र. 4 मध्ये ती आंबा खाणार असल्याची खात्री व्यक्त करण्यात आलेली आहे. (तीने आंबा हातामध्ये घेऊन तोंडाजवळ नेला असेल तर ती तो खाणार नाही तर काय फेकून देणार?)

Be going to

1. Be going to ची रचना Going to ची रचना वापरताना going to पूर्वी am/is/ are वापरतात व नंतर क्रियापदाचे मुळ रुप वापरतात. म्हणजेच ती रचना पुढील प्रमाणे होईल. to be चे रुप + going to + क्रियापदाचे मुळ रुप 
2. Be going to चे उपयोग Be going to ची रचना पुढील परिस्थितीमध्ये वापरतात.

१. भविष्यकाळात घडणाऱ्या घटनेची खात्री वाटत असल्यास.
उदा. 
 1. He is going to fall down the manhole.
 2. He is going to fall down the manhole.
काम चालू आहे.

२. वर्तमान कृती/परिस्थितीचा भविष्यकालीन परिणाम व्यक्त करण्यासाठी: भविष्यकाळात घडणारी घटना वर्तमानकाळातच सुरू झालेली दिसत असेल तर. उदा.
 1.  He is going to fall.
 2. He is going to fall.
३. उद्देश व्यक्त करण्यासाठी:
उदा. I am going to punish you if you touch that doggy again.

४. आखलेली योजना, घेतलेला निर्णय, ठरविलेली गोष्ट व्यक्त
करण्यासाठी:
 1.  There are going to be three tests this month.
 2. I am not going to help him.
५. वाक्यात will च्या ऐवजी am/is/are going to वापरता येते.

be going to examples

Exercise: Use be going to' in the following sentences.
1. They will leave the mountains for the plains.
2. Ashwini will solve the paper tomorrow.
3. The teacher will divide the class into four groups.

Answers 
1. They are going to leave...
2. Ashwini is going to solve...
3. The teacher is going to..

Not only.... but also नुसते हेच नाही तर ते सुध्दा

not only but also grammar rules in marathi

Not only ...but also वापरताना तुलनित घटक एकाच जातीचे असावे लागतात. पहिल्या तुलनीत घटकाच्या आगोदर Not only a But also नंतर लगेच दुसरा तुलनीत नंतर but also वापरतात. घटक वापरतात.
उदा. 
 1. 1. He is rich and generous. .
 2. 2 .He is not only rich but also generous.

वरील वाक्यात rich आणि generous हे दोन्हीही शब्द विशेषणे आहेत.

1. पुनरावृत होणारे शब्द व and, as well as, than सारखे वाक्य जोडणारे शब्द काढून टाकावेत.
2. वाक्यातील शब्दांचा क्रम बदलू नये. परंतु कधी कधी महत्वाचा भाग सुरवातीला येतो.
उदा. Ordinary toys do much more than entertain the child. Ordinary toys not only entertain the child but also do much more.

3. वेगवेगळ्या क्रियापदाची किंवा दोन मोठाली वाक्ये तुलनीत केल्यास not only सुरवातीस घ्यावे त्यानंतर लागलीच सहाय्यकारी क्रियापद येते व नंतर कर्ता येतो म्हणजेच कर्ता व सा.क्रि. च्या जागांची अदला- बदल होते. कधी कधी but also ची ताटातुट होऊन also साह्यकारी क्रियापदानंतर येते.
 • i. He was funny looking and he had funny ways and notions. - Not only was he funny looking but he had also funny ways and notions.
 • ii. Its utility is steadily declining and soil quality is deteriorating. Not only is its utility steadily declining but its soil quality is also deteriorating.
कर्त्यावर भर दिलेला असेल तर also कर्त्याला लागून त्याच्या नंतर येते. उदा. Ravi also has seen it. Both....and Both ... and चा अर्थ 'दोघे / दोन्हीही (हे) आणि' ते) असा होतो. यासाठी देखील not only...but also चेच नियम लागू होतात. उदा. 
 1. Both Ramesh and Suresh helped me.
 2. She plays both tennis and badminton

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post