जगातील दुःख नाहीसे झाले तर मराठी निबंध | jagat dukha nasate tar marathi nibhand

जगातील दुःख नाहीसे झाले तर मराठी निबंध | jagat dukha nasate tar marathi nibhand

जगातील दुःख नाहीसे झाले तर मराठी निबंध

जगातील दुःख नाहीसे झाले तर मराठी  निबंध 

तुकाराम महाराजांनी सांगून ठेवले आहे की,

सुख पाहतां जवापाडे।
दुःख पर्वताएवढे ॥

आणि या दुःखाच्या तव्हा तरी किती ! कधी दुःख अपयशाचे असते, तर कधी विश्वासघाताचे असते. कधी अल्पकालीन विरहाचे दुःख असते, तर कधी चिरवियोगाचे दुःख mअसते. विविध प्रसंगी दुःखाची तीव्रता कमी-जास्त असते. पण कोणतेही दुःख मनाला पोळते. जिवाची तगमग करते आणि डोळ्यांतून अश्रू आणतेच आणते. असे हे दुःख जगातून नाहीसे झाले तर...? तर... तर... दारिद्र्याचा लवलेश उरणार नाही

    पोटातील भूक कोणाच्या डोळ्यांतून पाणी काढणार नाही. जगातील दु:खच नाहीसे झाले तर कोणाला कोणाचा विरह सहन करावा लागणार नाही. वृद्ध मातापित्यांना आपल्या एकुलत्या एक तरुण कर्तबगार पुत्राचा अंत पाहावा लागणार नाही. आईच्या विरहाने कोवळ्या बालकाला दुःख होणार नाही. पण त्यासाठी माणूस अजर व्हायला हवा, अमर व्हायला हवा. माणसामाणसांमधील विषमता नष्ट झाली, तरच कदाचित मत्सराचे दुःख संपुष्टात येईल. पण हे सारे कसे शक्य आहे?

    अशा क्षणी मला महाभारतातील कुंतीची आठवण येते. तिने भगवंताकडे मागणी केली होती, "परमेशा, तू मला दुःख दे !" भगवंतालाही नवल वाटले. त्याने विचारले, "का, दुःख हवे?" तेव्हा कुंतीने स्पष्ट केले, “देवा, माणसाला जेव्हा दुःख होते, तेव्हाच त्याला परमेश्वराची आठवण येते." उदया जगातील दु:ख खरोखर नाहीसे झाले, तर माणसे उद्दाम होतील. अपयशाचे भय राहिले नाही, तर माणसे प्रयत्नच करणार नाहीत. जीवनात स्पर्धा उरली नाही, तर धडपड संपेल; माणूस आळशी बनेल. दुःखाच्या धक्क्याने माणूस खचतो, काही काळ आपले सर्वस्व हरपले म्हणून हतबल होतो; पण शेवटी काळच औषधाचे काम करतो.

    एखादया वर्षी एखादया आघाताने वठलेले झाडही दुसऱ्या वर्षी पुन्हा मोहरते. माणसाची स्थिती अगदी तशीच आहे. दुःखाने खचलेली माणसे कालांतराने हसू-बोलू लागतात. अपत्यविरही माणसे अनेक अनाथ पोरक्यांचे पालक होतात आणि आपल्या दत्तक बालकांच्या संगोपनात आपले सारे शल्य विसरून जातात ! दुःख नसेल, तर सुखाची गोडी राहणार नाही. दुःखानंतर लाभलेले सुख अधिक सुखावते. सतत गोडाचे जेवण मिळणाऱ्याला कधीतरी तिखट झणझणीत खावेसे वाटतेच.

जगातील दुःख नाहीसे झाले तर मराठी निबंध | jagat dukha nasate tar marathi nibhand

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post