Aai Baba Kavita In Marathi | आई बाबा मराठी कवीता

आई- वडील" म्हणजे नक्की काय असतं?

 मित्रांनो आज आपण आई-बाबांच्या नात्यावर आधारित काही कविता घेऊन आला आहोत आई-बाबा मराठी कविता या कवितासंग्रहांमध्ये आई-बाबांचा महिमा सांगणाऱ्या कविता तुम्हाला आज बघायला मिळणार आहेत आणि वाचायला मिळणार आहेत आई-बाबा म्हणजे एक कष्ट करणारा शरीर आई-बाबा म्हणजे मुलांची काळजी करणारं मन स्वतःच्या सर्व अपेक्षा बाजूला ठेवून मुलांसाठी सतत झटत राहणार अंतकरण.

वडील कुटुंबाचा पाया असतो तर आई घराचा कळस असते आई-वडील आपल्या लेकरांसाठी प्रचंड कष्ट भोगत असतात. कुटुंबाच्या सदस्यांची काळजी घेणारी आणि त्यांच्यासाठी कष्ट करणारी आपली आई सर्वांना दिसते परंतु कुटुंबाच्या रोजी रोटी साठी कष्ट करणारा बाप कोणाला दिसत नाही त्यामुळे यामध्ये आज मी वडिलांविषयी देखील प्रचंड कविता तुमच्यासाठी घेऊन आले आहेत.

या कवितांमध्ये आई-वडिलांच्या कष्टाचे वर्णन केलेले आहेत जेणेकरून मुलांना आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव होईल तर चला तर सुरुवात करूया आपल्या आजच्या या लेखाला


आई बाबा – Marathi Kavita

उपकार विसरला

जन्म दिला माता पित्याने विसरलास तू आम्हाला

सोडून चाललास लेकरा तुझ्या माय आणी बापाला

नऊ महिने आईने गर्भात लेकरा जपलं तुला

किती कळा सोसून आईने जन्म दिला तुला

माय बापांनी उन्हाचे चटके सोसून सावली दिली तुला

त्यांनी जीवन टांगत झाडाला आयुष्याचा केला झुला

तुझ आयुष्य घडवायला त्यांनी त्यांचा स्वप्नांचा त्याग केला

गरिबी असून माय बापानीं तुला काही कमी नाही पडू दिला

शिकून सवरून तुला लहानाचा मोठा माय बापानी केला

त्याना घराबाहेर काढून तू त्यांचे दुधाचे उपकार विसरला

-----------------

महिनेमागून महिने, 

शेवटी वर्ष सरुन जाते

वृध्दाश्रमाच्या पायरीवर ,

वाट तुझी पाहाते

.भिजून जातो पदर ,

अन मन रिते राहाते

कधी मधी मात्र ,

तुझी मनीऑर्डर येते

.पैसे नकोत यावेळी ,

तूच येऊन जा

बाळा मला तुझ्या ,

घरी घेऊन जा

.तुझा बा होता तोवर ,

काळ बरा गेला

तुझी आठवण काढत ,

उघड्या डोळ्यांनी गेला

शेवटपर्यंत सांगत होता,

लेक माझा भला

तू मोठा साहेब, 

त्याचं मोठं कौतुक त्याला

माझ्याही ह्रदयात फोटो,

तुझा तू पाहून जा

बाळा मला तुझ्या ,

घरी घेऊन जा.

दुष्काळाच्या साली ,

जन्म तुझा झाला

तुझ्या दुधासाठी ,

आम्ही चहा सोडून दिला

वर्षाकाठी एक कपडा,

पुरवून-पुरवून घातला

सालं घातली बापाने, 

पण तुला शाळेमधी घातला..

.हवं तर तू हे ,

सगळं विसरुन जा

पण बाळा मला ,

तुझ्या घरी घेऊन जा.

धुणी-भांडी करीन मी, 

केरकचरा भरीन मी

पुरणपोळ्या, अळुवड्या ,

तुझ्यासाठी रांधीन मी

.नातवंडांचं दुखलं-खुपलं ,

सगळं बघेन मी

घाबरु नकोस, त्याची आजी ,

असं नाही सांगणार नाही मी

तुझ्या घरची कामवाली ,

म्हणून घेऊन जा

पण बाळा मला 

तुझ्या घरी घेऊन जा.

थकले रे डोळे बाळा, 

प्राण कंठी आले

तुझ्याविना जगणे 

आता मुश्किल झाले

.विसरु कशी तुला मी, 

तुझ्यामुुळे आई झाले

बाळ माझं ‘कुलभूषण’ 

पोरकी मी का झाले?

.आता माझ्या थडग्यापाशी 

‘आई’ म्हणून जा

जमलंच तुला तर 

हा वृध्दाश्रम पाडून जा.

--------------

राहतो फक्त आभास

आई असते जोवर आपल्यात जिवंत

तोपर्यंत तिच्यावर प्रेम करत रहा

ती निघून गेल्यावर होतो फक्त भास

आईच्या आठवणींचा राहतो आभास

बाप जिवंत आहे जोपर्यंत जगात

प्रेमाने मिठी मारून बघा त्याला

गेल्यावर राहतात फक्त आठवणीं

याद येते त्याची प्रत्येक क्षणाला

आई बाबा आहेत घराचा आधार

त्यांचा जाण्याने घर होई निराधार

आई बाबा विना घराला नसे शोभा

दिसे फक्त चार भिंतीचा घर आहे उभा

आई बाबा असतील जिवंत

तर तुमचा आधार द्या त्यांना

तुम्हाला तुमच्या पायावर केल उभ

उतरवयात तुम्ही सांभाळा त्यांना..

 ----------

त्यांना कसलंच भान नसतं

फक्त कष्ट करत असतात

चिमटा घेत पोटाला

बँकेत पैसा भरत असतात .तुमचा शब्द ते कधी

खाली पडू देत नाही

तुमची हौस भागवताना

पैशाकडेही पहात नाही.तुम्ही म्हणजे त्याची स्वप्नं

तुम्ही म्हणज त्याचा आभाळ

पेलत सगळी आव्हाने 

घडवतात तुमचा भविष्यकाळ..तुम्ही जेव्हा मान टाकता

तेव्हा बाबाही खचत असतात

आधार देता तरी

मन मारून हसत असतात..तुमच्याकडूनं तसं त्यांना 

खरंच काही नको असतं

तुमचे यश पाहून त्यांचं

अवघं पोट भरत असतं.त्यांच्या वेदना कुणालाही

कधीसुद्धा दिसत नाहीत

जग म्हणत,“ आई एवढं

बाबा कधी सोसत नाहीत.”त्यांच्या वेदना आपल्याला

तशा कधीच कळणार नाहीत

आज त्या मागितल्या तर

मुळी सुद्धा मिळणार नाहीत.एक दिवस तुम्हीसुद्धा

कधीतरी बाबा व्हाल,

त्या बाळाच्या डोळ्यात तुमच्या

स्वप्नांचं आभाळ पहालतेव्हा म्हणाल, “ आपले बाबा

खरंच कधी चुकत नव्हते

आपल्यासाठीच आयुष्यभर

रक्तसुद्धा ओकत होते.”तेव्हा सांगतो मित्रांनो

फक्त फक्त एक करा

थरथरणारा हात त्यांचा

तुमच्या हातात घट्ट धरा.आपल्या आई-वडिलांवर

खरोखर प्रेम करा..

--------------

बाप असतो कुटुंबाचा पाया

सगळेजण म्हणतात आईची असते वेडी माया

कुणी हे म्हणतं नाही की बाप असतो कुटुंबाचा पाया

आईने माया दिसते पण बापाचे प्रेम दिसत नाही खरे

बाप असतो फणसासारखा वरून काटे आत गोड गरे

तुम्ही चुकलात तर बाबा ओरडतात मारतात हे खरे

परंतु त्यांचा हृदयात वाहत असतात प्रेमाचे झरे

आई आहे पणती तर बाप आहे पणतीमधील वात

कुटुंबाला देतो उजेड पण स्वतः राही तेवत दिनरात

आपल्याला पायावर उभ करून दिला त्यांनी आधार

त्यांच्या उतारवयात त्यांना सांभाळा नका करू निराधार

---------------

Marathi Kavita – Aai Baba – आई बाबा

कवि – हर्षल फटांगरे पाटील

आई बाबा… जन्म तुम्ही दिला या जगती आम्हास,

मायेने आई-बाबा तुम्ही आमचा सांभाळही केला !!!

शिकवीली आम्हास तुम्ही संस्कारांची आराधना,

आई-बाबा केवढी थोर हो तुमची ही साधना !!१!!


आई-बाबा किती प्रेमळ आहात हो तुम्ही,

आमच्यावर जिव ओवाळून बसलात !!

सऱ्या आशुष्यातील जखमा ही बुजुन गेल्यात,

पाहूण जेव्हा आम्हास गालात तुम्ही हसलात || २ ||


हृदयात माझ्या आई-बाबा मी साटवीली तुमची माया,

आयुष्य घडविण्या आमचे अहोरात्र जिझवीली तुम्ही काया !!

जाईन जीथवरही मी सदेव वंदीन तुमच्याच पाया,

आयुष्य घडतांना माझे आई-बाबा झळकेल माझ्या तुन तुमच्या संस्कारांची छाया!!३!!


आमच्या या जन्माचे सार्थक आहे तुम्ही,

काळजातला आमच्या प्राण आहे तुम्ही !!

ऐकांत पनाचे आमच्या गित-संगीत केवळ तुम्हीच,

माझीया बोलक्या शब्दांची कविताही तुम्हीच ॥४॥


तुमच्या कष्टाचे चीज होईन आईबाबा,

राहीन स्थान मानाचे नेटीमी हृदयात तुम्हा आमच्या !!

नाव कमवेल, मुल आम्ही तुमची ही खात्री देतो तुम्हा,

मांगने येवढेच आमचे आई-बाबा पुढचाही जन्म तुमच्यांच पोटी राखीव ठेवा आम्हा॥५!!

-------------

बापच आमचा आहे निर्माता

लेकरांच आयुष्य फुललं पाहिजे

म्हणून धडपड त्याची सुरु आहे

बापच आमचा आहे निर्माता

बापच आमचा प्रथम गुरु आहे

जो जो हट्ट केला आईकडे

तो हट्ट बापानेच पूर्ण केला

बापच आमच्या सर्व इच्छा

पूर्ण करणारा कल्पतरू आहे

आयुष्याचा प्रत्येक वळणावर

बापाने योग्य वाट दाखवली

जीवनात चुकत असताना योग्य

वाट दावणारा तो वाटसरू आहे

आईने हा जन्म दिला

पण बापाने खांद्यावर बसवून

हे जग कसे आहे दाखविले

असा हा माझा जन्मदाता आहे

एका जन्मात समजेल तुम्हाला

इतका बाप लहान नाही

सातजन्म कमी पडतील तुम्हाला

इतका बाप महान आहे

-------------

आई – बाबा

आई देव्हाऱ्यातील दिवा आहे

बाबा दिव्यातील तेवणारी वात

आई संपूर्ण कुटुंबाला चालवते

बाबा कुटुंब पोसणारे हात आहेत

आई मायेच प्रतिक आहे

तर बाबा प्रेमाचा धाक आहे

आई प्रेमाचं दरवलणारा सुगंध

बाबा ते सुगंधीत फुल आहे

आई संस्काराचा दागिना आहे

तर बाबा दागिना घडवणारा सोनार

आई आपलं जीवन थंड ठेवणारा माठ

तर बाबा माठ घडवणारा कुंभार आहे

आई घडवते आपल्या लेकरांना

बाबा घडवणारे दोन हात आहेत

आई चालवते कुटुंबाचा रहाटगाडा

बाबा कुटुंब चालवणारे पाय आहेत

आई म्हणजे आहे एक काव्य

बाबा त्या कवितेतील भाव आहे

आई म्हणजे हृदयातील प्रेमाचं घर

बाबा ते घर वसलेलं गाव आहे

आई म्हणजे आपल संपूर्ण जग

तर बाबा ब्रह्मांडाचा आहे भाग

आई म्हणजे ही पृथ्वी आहे तर

बाबा पृथ्वी तोळणारा शेषनाग

---------------

आई म्हणायची ‘श्री’ लिहावे

नव्या पानावरती,

वापरावी नवी वस्तू,

कुंकू लावल्या वरती.आई म्हणायची संध्याकाळची, 

झोपी जातात झाडे,

अजून फुलं तोडायला हात

होत नाहीत पुढे.आई म्हणायची मिळतेच यश,

तुम्ही करत रहा काम,

भीती वाटली कि फक्त म्हणावे,

राम,राम,राम.आई म्हणायची काहीही असो,

होतो सत्याचाच जय,

अजूनही खरं बोलायला वाटत नाही भय.आई म्हणायची ठेवा श्रद्धा

आपल्या प्रयत्नात,

चुकूनही दाखवू नका

ज्योतिष्याला हात.आई म्हणायची निर्मळ मन तर 

राहतो चेहरा साफ,

उपयोग नाही लाऊन काकडी

अन घेऊन सारखी वाफ.आई म्हणायची राष्ट्रध्वजाचा

राखावा नेहमी मान,

जन गण मन म्हणतांना असावी

ताठ आपली मान.आई म्हणायची अन्नावर कधी

काढू नये राग, कोणाला लागली लाथ तर, लावायची

पाया पडायला भाग.दूध ऊतू गेल्यावर चुकचुकू नये

म्हणावं ‘कृष्णार्पण अस्तु’,

वाईट शब्द आणू नयेओठांवर,

वास्तू म्हणत असते तथास्तु.आई म्हणायची पहाटेची

स्वप्न होतात खरी,

आई म्हणायची दिवा लावा,

सांजेला लक्ष्मी येते घरी.आई म्हणायची खाऊन माजावं

पण टाकू नये ताटात,

अजूनही मी संपवतो सगळं,

जरी असलं सगळं माझ्या हातात!आई म्हणायची येतेच झोप

जर मनात नसेल पाप,

जड होतात पापण्या अन

मिटतात डोळे आपोआप.अजूनही वाटतं बसलाय देव

घेऊन पाप पुण्याचा घडा,

आई सांगते तसं लक्ष ठेऊन

टाकतोय त्यात खडा.जेव्हा जेव्हा व्हायची भांडणं

आम्हा भावंडात,

आई म्हणायची अरे एक तीळ 

वाटून खायचे सात.मरण यातना सोसत

आई जन्म देत असते

आपलं हसू पहात पहात

वेदना विसरून हसत असते.बाबा मात्र हसत हसत

दिवस रात्र झटत असतात

शिस्त लावत आपल्यामधला

हिरवा अंकुर जपत असतात.

-----------

Poem : आई-वडील

बाबा, आयुष्यात चालता चालता 

खूप ठेचकाळलेले असतात,

पण दाखवताना मात्र 

काहीच न झाल्यासारखं दाखवतात ।

त्यांच्याबरोबर चालता चालता 

आई पण ठेचकाळलेली असते,

पण चेहरा मात्र 

नुकतीच उमललेली कळी असते ।

कोणतेही काम केव्हाही सांगा 

ती नेहमी तयार असते,

मनातले दुःखं दुसऱ्याला सांगताना 

मोठ्यांचा मान मात्र ठेवते ।

बाबा नहमीच 

यशाची शिखरं पादाक्रांत करतात,

पण मिळालेल्या अपमानाची 

पावती दयायला टाळतात ।

त्यांनी दिलेल्या संस्काराची शिदोरी 

कधीच अपुरी पडत नाही,

केलेल्या त्या दोघांनी कौतुक बघताना 

आनंदाश्रू थांबतच नाहीत ।

अशा मोठया मनाच्या आई-बाबांना 

आम्ही मनापासून केलेला नमस्कारसुद्धा 

त्यांचे ऋण फेडायला कमी पडतो,

त्यांच्यावर अजून किती प्रेम करावं 

हाच नेहमी प्रश्न पडतो ।।

----------------

मराठी कविता -- आई बाबा

बाप मात्र कुणाला आठवत नाही

सगळेजण आईचा महिमा गातात

कवितेत मांडतात कशी असते आई

पडद्यामागे राहून सर्व करणाऱ्या

बापाबद्दल कोणीच बोलत नाही

मुलांना भूक लागल्यानंतर आठवते

मायेचा घास भरवणारी आई

पण जेवणाची सोय करणारा

बाप मात्र कुणाला आठवत नाही

आयुष्यात बिकट परिस्थिती असताना

आई मात्र रडून मोकळी होते

वर वर खंबीरपणा दाखवणाऱ्या

बापाची अवस्था काय होते

यशोदा देवकीचा आठवतो कृष्ण

आठवतो कौसलेचा पुत्र राम

कृष्णपिता वासुदेव रामपिता दशरथ

यांचे कुणाला आठवते का नाम

मुलीच चांगल व्हावं यासाठी

कित्येकांचे उंबरठे झिजवतो बाप

मुल संसाराला लागल्यावर सुद्धा

संपत नाही त्याच्या डोक्याचा ताप

आयुष्यभर काबाड कष्ट करून

गरीब बापाचे झिजतात पाय

मोठी झाल्यावर मुलं विचारतात

तुम्ही आमच्यासाठी केल काय?

-------------

"आई- वडील" म्हणजे नक्की काय असतं?

 

आयुष्य जगण्यासाठी देवाने दिलेलं, अँडव्हान्स पाठबळ असतं...!!!

तुमच्या प्रत्येक दिवसात, त्यांनी आपलं स्वप्न पाहिलेलं असतं, तुमच्या जन्मापासून त्यांच्या मरण्यापर्यंत त्यांनी आपलं आयुष्य खर्चलेलं असतं...!!!

 "आई" तुमच्या 

आयुष्याच्या गाडीचं योग्य 

दिशा देणार "स्टीयरिंग" असतं...!!!

तर अचानक आलेल्या संकटात सावरायला, "वडील" 

म्हणजे "अर्जेंट ब्रेक" चा पर्याय असतं...!!!

"आईचं प्रेम" हे रोजच्या आयुष्यात कामाला येणारं "बँक बॅलन्स" असतं...!!!

तर "वडील" म्हणजे गरजेच्या वेळी मिळणारा तुमचा बोनस 

किंवा "व्हेरिएबल पेमेंट" असतं...!!!

"आई" म्हणजे, तुम्हाला सतत जोडणार, मोबाईलचं "नेटवर्क" असतं...!!!

आणि कधी "नेटवर्क" थकले;

 तर "वडील" अर्जंट "SMS" असतं...!!!

 "आई" म्हणजे तुमच्या

 आयुष्यातलं "अँटीव्हायरस" असतं...!!!

तर शोधून काढलेले व्हायरस संपवायचं "वडील" 

हे "क्वारनटाईन" बटण असतं...!!!

 "आई" म्हणजे तुमच्या 

आयुष्यातलं "शिक्षणाचं  विद्यापीठ" असतं...!!!

 तर "वडील" म्हणजे चालती बोलती अनुभवाची फॅकटरी असते...!!!

 "आई" म्हणजे तुमच्या आयुष्यातली साठवलेली पुण्याई असते...!!!

 तर "वडील" म्हणजे कंबर कसून आयुष्यभर मिळवलेली कमाई असते...!!!

 "आई" म्हणजे तुमच्या आयुष्यातला मागर्दशर्क गुरू असतो...!!!

 तर दाखवलेल्या वाटेवर "वडील" हा जवळचा मित्र असतो...!!!

 "आई" म्हणजे साक्षात भगवंत, परमेश्वर असतो...!!!

 तर त्या परमेश्वरापर्यंत पोचवणारा "वडील" एक संत असतो...!!!

 "आई" म्हणजे तुमचे शरीर, मेंदू, हृदय आणि मन असतं...!!! 

 तर "वडील" म्हणजे भक्कम ठेवणारा पाठीचा कणा आणि शरीरातलं हाड अन् हाड असतं...!!!

 कधी वेदना झाल्यास तोंडी वाक्य "आई गंSSS" असतं...!!!

आणि भले मोठे संकट आले की उच्चारात "बाप रे बाप" असतं...!!!

 परमेश्वर समोर आला तरी उभे राहायला वीट फेकलेल पुंडलिकाचं मन असतं...!!!

 त्याच्या आई-बापाच्या रुपात, विठ्ठलाने स्वत:लाच तिथे पाहिलेलं असतं...!!!

म्हणूनच म्हणतो...

 परमेश्वर, अध्यात्म, भगवंत हे सगळे अजब गणित असतं...!!!

त्या सगळ्यापर्यंत पोचवणारं 

"आई- वडील" हे कनेक्शन असतं...!!!

 "आई- वडील" म्हणजे नकळत मागे असलेली मायेची सावली असते...!!!

उगाच नाही आपल्या संस्कृतीत

 "मातृ देवो भव"अन् "पितृ देवो भव" असे म्हणलेलं आहे...

 खरंच आई वडिलांच्या सेवेसाठी कधिही नाही म्हणू नका कारण जग हे पाहतोय ते आई वडिलांमुळे 

-----------------

आयुष्याच्या तव्यावरती 

संसाराची पोळी

भाजता भाजता 

हाताला किती बसले चटके

आईने मोजलेच नाही…

नवर्‍यासह लेकराबाळांचे 

करता करता

मोठ्यांचा मान राखता राखता

कितीदा वाकले गेले , 

आईने मोजलेच नाही…

जरा चुकले की 

घरच्यांची, बाहेरच्यांची

किती बोलणी खाल्ली,

काळजाला किती घरं पडली , आईने मोजलेच नाही…

याच्यासाठी त्याच्यासाठी

आणखीही कुणासाठी

जगता जगता ,

स्वतःसाठी अशी 

किती जगले ,आईने

मोजलेच नाही…

पाखरे गेली फारच दूर 

डोळा आहे श्रावणपूर

पैशाचा हा नुसता धूर

निसटून गेले कोणते सूर ,आईने

मोजलेच नाही…🦋

--------------

माझे बाबा कविता मराठी (Marathi Kavita Baba Sathi)

बाप असतो

बाप असतो वडाच्या झाडासारखा

मातीत घट्ट पाय रोवत रुतून राहणारा

उन्ह वारा पाऊस यांचा मारा सोसत

कुटुंबाला आधाराची सावली देणारा


बाप असतो खंबीर पहाडासारखा

नैसर्गिक हल्ले सोसत उभा राहणारा

घाव सोसतां सोसता तुटला जरी तरी

धीटपणे कुटुंबासाठी उभा राहणारा


बाप असतो पावसाळ्यातील छत्रीसारखा

पावसाचा मारा सहन करत राहणारा

जोरदार पाऊस आपल्या अंगावर झेलून

आपल्याला पावसापासून सुरक्षित ठेवणारा


बाप असतो उडणाऱ्या पक्षासारखा

दिवसभर पिलांसाठी न थकता फिरणारा

संध्याकाळी आपल्या घरट्याकडे परतून

आपल्या पिलांना कुशीत घेत दाणा देणारा


त्याचा आयुष्याचा विचार न करता

लेकरांच आयुष्य घडवायला झीजणारा

आपल्या भविष्याची चिंता उरी घेऊन

कधीच सुखाने तो न निजणारा


 --------------

एक सुंदर कविता आई साठीस्वयंपाक करायला आई हवी 

गरम जेवण वाढायला आई हवीअभ्यासात मदतीला आई हवी“तुला काही कळत नाही,”

ऐकून घ्यायला आई हवीखरेदीला जाताना आई हवीनिवड करताना आई हवीनसतानाही “राजपुत्र ” म्हणायला आई हवीगालावरून हात फिरवायला 

आई हवीमनासारखं घडवायला आई हवीबाबांना समजवायला आई हवीओरडा खाताना आईच हवीपदरामागे लपायला आई हवीआपली बाजू सावरायला आई हवीपाठीवरून हात फिरवायला 

आई हवीकँरमचा चौथा मेंबर आई हवीपत्ते खेळताना ही आई हवीबुद्धिबळात भिडू म्हणून आई हवीभूक लागली की आई हवीपडल्यावर सावरायला आई हवीलागलं खुपलं आईच् हवीमन मोकळं करायला आई हवीन बोललेलं कळायला आई हवीबाबा नि माझ्यात सेतु म्हणून 

आई हवीमाझ्यावाटची बोलणी खायला 

आई हवीमाझी बाजू मांडायला आई हवीमाझी बाजू पटायलाही आईच् हवीपरिस्थितीचा राग काढायला 

आई हवीतुझ्यामुळे घडलं सारं 

ऐकायला आई हवीरागराग करायलाही आई हवीनिरपेक्ष प्रेम शिकवायला आई हवीपहिलं प्रेम न सांगता कळायला 

आई हवीडोळ्यांतलं समाधान कळायला 

आई हवीएकटेपणात सांभाळून घ्यायला 

आई हवीनजरेने आधार द्यायला आई हवी“मी आहे रे “, … 

विश्वास द्यायला आई हवी..

----------------

वडिलांविषयी कविता (Majha Baap Kavita In Marathi)

संकटाना घाबरून कधीच तो हलला नाही

मनामध्ये असतात त्याचा असंख्य विचार

कुटुंबाच्या चिंतेचा डोंगर असतो नेहमी उभा

एवढं सगळं दुःख सहन करून बाप माझा तरीही स्वतःचा दुःखाबद्दल कुणासमोर बोलला नाही

संकटाना घाबरून कधीच तो हलला नाही

कुटुंबाला जगवताना आयुष्य त्याचे सरते

सरतेशेवटी नशिबात दुःखच असते त्याचा

दुःख भोगण्याशिवाय बाकी काय उरते तरीही

एवढं करून बाप कुणाला कळला नाही

संकटाना घाबरून कधीच तो हलला नाही

लेकरांसाठी बाप आयुष्यभर झिजत असतो

मुलं शिकून मोठी व्हावीत म्हणून कष्ट सोसतो

सतत त्याला सतावत असते मुलांची चिंता तरीही

परिस्थितीला पाठ दाखवून कधी वळला नाही

संकटाना घाबरून कधीच तो हलला नाही

बाप कष्ट करतो म्हणून कुटुंब सारे जगते

त्याची होणारी कसरत नशिब सुद्धा बघते

दुःखाच्या तप्त झळा सहन करून सुद्धा तरीही

बाप नावाचा सूर्य कधीच ढळला नाही

संकटाना घाबरून कधीच तो हलला नाही

--------------

जेव्हा मी मोठा होईन

आणि माझी मुलगी मला विचारेल

कि, बाबा, तुमचे पहिले प्रेम

कोण होत ?

… तेव्हा मला कपाटातून जुने

… फोटो काढून दाखवायचे

नाही आहेत, मला फक्त

माझा हाथ वर करून बोटाने

दाखवायचे आहे कि, ती किचन

मध्ये उभी आहेना तीच माझे

पहिले आणि शेवटचे प्रेम आहे

---------------

मित्रांनो जर तुम्हाला हा आजचा  माझी आई कविता | Poem on Mother in Marathi Kavita  लेख आवडला असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि या कवितांमध्ये सर्वात जास्त तुम्हाला आवडणारे कविता कुठली आहे ते देखील कमेंट करायला विसरू नका धन्यवाद

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post